उस्मानाबाद,दि.3:-महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र,उस्मानाबाद अंतर्गत सुशिक्षीत बेरोजगांरासाठी उस्मानाबाद येथे
दि.7 ते 18 जानेवारी 2017 या कालावधीत व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले
आहे.
या प्रशिक्षणात दुग्धव्यवसाय,
शेळीपालन व कुक्कूट पालनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दररोज तज्ञ व्यक्तीकडून
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच उद्योजकीय माहिती, बँक अधिकाऱ्यांचे
मार्गदर्शन इत्यादी माहिती दिली जाणार आहे. तरी ईच्छूक युवक-युवतींनी अधिक माहिती
व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक प्रकाश पवार
यांच्या 9604143488 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा उद्योग
केंद्राचे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी यांनी
केले आहे. *****