वृत्त क्र.603 दि.03 सप्टेंबर 2019
फॉर्म नंबर 17 भरुन इ.10 वी ,इ.12 वी ची परिक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्यास मुदतवाढ
उस्मानाबाद,दि.03,(जिमाका) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12वी परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ.10वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या (फॉर्म नंबर 17) भरून परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नाव नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी इ.10वी च्या विद्यार्थ्यांनी http://form१७.mh-ssc.ac.in आणि इ.12 वी च्या विद्यार्थ्यांनी http://form१७.mh-hsc.as.in या संकेतस्थळाला भेट दयावी व त्यावरील सूचनांनुसार आपली नाव नोंदणी करावी,असे आवाहन सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी केले आहे.
****
वृत्त क्र.604
जिल्हयातील विधानसभा मतदारसंघनिहाय
अंतिम मतदारयादी जाहीर
उस्मानाबाद,दि.03 (जिमाका):- दि.01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादयांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. दि.01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत अंतिम मतदार यादी दि. 31ऑगस्ट रोजी जिल्हयातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.
दि. 31 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आलेली विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदारयादी पुढीलप्रमाणे-
240- उमरगा-पुरुष मतदार 1 लाख 57 हजार 480, महिला मतदार 1 लाख 39 हजार 266, इतर मतदार 1, एकूण मतदार 2 लाख 96 हजार 747, 241- तुळजापूर-पुरुष मतदार 1 लाख 87 हजार 649, महिला मतदार 1 लाख 63 हजार 706, इतर मतदार 6, एकूण मतदार 3 लाख 51 हजार 361, 242- उस्मानाबाद- पुरुष मतदार 1 लाख 86 हजार 690, महिला मतदार 1 लाख 65 हजार 665, इतर मतदार 10, एकूण मतदार 3 लाख 52 हजार 365, 243- परंडा- पुरुष मतदार 1 लाख 67 हजार 026, महिला मतदार 1 लाख 46 हजार 740, इतर मतदार 1, एकूण मतदार 3 लाख 13 हजार 767 अशा प्रकारे जिल्हयात पुरुष मतदार 6 लाख 98 हजार
845 तर महिला मतदार 6 लाख 15 हजार 377, इतर मतदार 18, असे मिळून एकूण 13 लाख 14 हजार 240 मतदार आहेत.
दि. 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीमध्ये लोकसभा
सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या तुलनेत पुरुष मतदारसंख्या 8 हजार 668 व महिला मतदारांची संख्या 9 हजार 241 वाढली आहे.
जिल्हयामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या मतदारयादीच्या तुलनेत 18-91 वयोगटाच्या मतदारांमध्ये 23 हजार 358 वरुन 29 हजार 67 इतकी वाढ झाली आहे. तसेच
जिल्हयातील सैनिक मतदारांची संख्या 2 हजार 665 इतकी आहे.
आगामी विधानसभा निवडणूक – 2019 च्या अनुषंगाने अंतिम मतदारयादीमध्ये सर्व
नागरिकांनी आपल्या नावाची पडताळणी करावी. त्याकरीता नागरिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडील मतदार यादी, 1950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन चौकशी ,
www.nvsp.org.in/www. ceomaharashtra.gov.in या वेबसाईटला भेट सुविधांचा वापर करु
शकतात.
तरी जिल्हयातील सर्व मतदारांनी मतदारयादीमधील आपल्या नावाची पडताळणी करुन घ्यावी आणि आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदान प्रकियेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ.प्रताप काळे यांच्याकडून करण्यात आले आहे.
****