Thursday, 21 July 2022
जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार मोफत प्रिकॉशन डोस
जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार मोफत प्रिकॉशन डोस
कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सव : नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आवाहन
Tuesday, 19 July 2022
जिल्हा परिषदेच्या स्वसंपादित योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जिल्हा परिषदेच्या स्वसंपादित योजनेअंतर्गत
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.19(जिमाका) जि.प.च्या कृषी विभागामार्फत 2022-23 मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, यामध्ये कंपनीची नोंदणी आणि कार्यालय स्थापन करणे याकरिता अनुदान देण्यात येणार आहे. विविध शासकीय विभागांच्या योजनांचा शेतक-यांना शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत लाभ घेण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. कंपनींना वेळोवेळी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. या योजनेतंर्गत जिल्हयामध्ये प्रति जिल्हा परिषद मतदार संघामध्ये एक याप्रमाणे 55 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे.
या योजने करीता जिल्हा परिषद गटातील इच्छूक शेतक-यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याकडे अर्ज सादर करावेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2022 पर्यंत राहिल. या योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
अटी व शर्ती :-शेतकरी उत्पादक कंपनीतील सर्व शेतकरी हे एकाच जि.प. मतदारसंघातल्या गावातील असावीत. कंपनीच्या संचालक मंडळात एक महिला शेतकरी असावी. एका जिल्हा परिषद गटामध्ये एकाच कंपनीस अनुदान देय राहील.कंपनीच्या नावात जि.प. असा उल्लेख बंधनकारक असेल.नोंदणी प्रमाणपत्र व कार्यालय स्थापन केल्यानंतरच अनुदान देय राहील.पंचायत समिती कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) अर्जाची छाननी करून निवड झाल्यानंतर नोंदणीसाठी कळवतील.पूर्वसंमती प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीनंतर व कार्यालय स्थापन झाल्यानंतर अनुदान वितरीत करण्यात येईल.जे प्रथम अर्ज सादर करतील त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.निवडीचे अंतिम अधिकार पंचायत समिती कृषी अधिकारी सामान्य यांना राहतील.जर कागदपत्रांची पूर्तता व नोंदणी फिस वेळेत सादर न केल्यास प्रतिक्षाधिन यादीतील व्दितीय क्रमांकावरील अर्जाचा विचार करण्यात येईल.पूर्वसंमती न घेता नोंदणी केलेल्या कंपनीस अनुदान देण्यात येणार नाही.मुदत संपल्यानंतर अर्ज सादर केल्यास सदर अर्जाचा विचार होणार नाही.
या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या तालूक्याच्या पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधावा.
****
सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करण्याचे आवाहन
सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची
त्रैमासिक माहिती सादर करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.19(जिमाका) :- जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील शासकीय,निमशासकीय, तसेच कलम 5(2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायदयातंर्गत असणा-या आस्थापनांना त्याच्या आस्थापनेवर असणा-या सर्व कर्मचा-याची स्त्री-पुरूष आणि एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयाकिंत कायद्यातील तरतुदीनूसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमीतपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाच्या www.rojgar.mahaswaym.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हयातील सर्व आस्थापनांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडून यापूर्वीच युजर नेम आणि पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करून आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02472-299434 किंवा ईमेल आयडी -osmanabadrojgar@gmail.com अथवा asstdiremp.osmanabad@ese.maharashtra.gov.in यावर उदयोजक नोंदणी क्रमांक आणि ईतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधावा.
जून-2022 अखेर संपणा-या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद या कार्यालयाद्वारे चालू आहे. त्यामुळे सर्व आस्थापनाकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सदरील तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम दि. 31 जुलै 2022 आहे. विहीत मुदतीत ऑन लाईन पध्दतीने सादर करावे आणि कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे. तसेच प्रत्येक आस्थापनेने नोंदणी तपशील देखील नोंदवून आवश्यक ती सर्व माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं.रा.गुरव यांनी केले आहे.
****
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी महास्वयंम वेबपोर्टलवर त्यांच्या नोंदणीची माहिती अद्यावत करण्याचे आवाहन
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी महास्वयंम वेबपोर्टलवर
त्यांच्या नोंदणीची माहिती अद्यावत करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.19(जिमाका) महाराष्ट्र शासन कौशल् विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एंप्लॉयमेंट नोंदणी कार्ड www.mahaswayam.in हे वेबपोर्टल विकसीत करण्यात आले आहे.
जिल्हातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवार, कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ ईच्छिणारे उमेदवार तसेच या पोर्टल वर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्यापपर्यत एप्लॉयमेंट कार्डशी आधार लिंक केलेले नाही, त्यांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करुन घ्यावी.उमेदवारांना अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02472-299434 किंवा ईमेल आयडी osmanabadrojgar@gmail.com अथवा asstdiremp.osmanabad@ese.maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र संजय गुरव यांनी केले आहे.
****
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजनेतर्गत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजनेतर्गत
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू
उस्मानाबाद,दि.19(जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या येथील मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायातील अर्थात मुस्लिम,ख्रिचन,बौध्द,जैन,पारसी,शिख,ज्यू धर्मीय विद्यार्थीच्या उच्च शिक्षणाकरिता प्रामुख्याने मेडिकल,इंजिनिअरिंग,एमबीए, फार्मसी आदी अभ्यासक्रमांसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता कर्ज योजनेत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे, पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावावेत , असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी केले आहे.
या योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहिती करीता www.malms.maharashtar.gov.in या संकेत स्थळाचा वापर करावा अथवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा . जिल्हा कार्यालयाचा पत्ता- मातोश्री क्लिनिक बिल्डिंग(डॉ.गपाट), पहिला मजला,पोलीस लाईन समोर मेन रोड,उस्मानाबाद. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा व्यवस्थापक रिजवान पठाण यांनी केले अहे.
****
जि.प.च्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जि.प.च्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत
वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.19(जिमाका) जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसुचित जातीच्या विशेष घटक योजनेत वयक्तिक लाभाच्या विविध योजनीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे . यात अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी पिठाची गिरणीचा पुरवठा करण्यात येणार आहे . यात पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येईल . अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिनचा पुरवठा करण्यात येणार असून . पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी मिनी दाल मील पुरवठा करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद स्वंसपादीत उत्पन्नातील योजनेअंतर्गत सर्वसाधारण मुलीं, महिलांना एम.एस.सी.आय.टी.(MSCIT) प्रशिक्षण देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे.पाचवी ते बारावीपर्यत शिक्षण घेत असलेल्या सर्वसाधारण संवर्गातील मुलींना सायकल देण्यात येणार आहेत .यात पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येईल.
या योजनांसाठी पात्र असलेल्या लाभार्थीनी विहित नमुन्यातील अर्ज तालुकास्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) आणि गावपातळीवर अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क साधून दि. 17 ऑगस्ट 2022 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयास अर्ज सादर करण्याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) बी.एच. निपाणीकर यांनी कळविले आहे.
****
Subscribe to:
Posts (Atom)





