Saturday, 3 June 2017

महागडी रक्त तपासणी ही होणार शासकीय रुग्णालयात मोफत


उस्मानाबाद दि.1:- राज्य शासनाने शासकीय रुग्णालयात रक्त,लघवी आणि तत्सम वैद्यकीय महागडया चाचण्या मोफत करण्यासाठी  एका कंपनी बरोबर करार केला असून त्यामुळे अशा महागडया तपासण्या आता शासकीय रुग्णालयात विना मुल्य केल्या जाणार आहेत.राज्यातील 33 जिल्हयात अशा प्रयोग शाळा सुरु करण्यात येणार असून उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात ही प्रयोग शाळा सुरु करण्यात आली असून राज्यातील 19 वी प्रयोगशाळा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न करुन ही योजना राज्यात कार्यान्वीत केली आहे. कंपनी करारानुसार राज्यात विविध ठिकाणी प्रयोग शाळा (लॅब) स्थापन करणार आहे.या प्रयोगशाळेतून त्यांच्याशी संलग्न असलेली शासकीय रुग्णालय,संस्थामधून रक्ताचे नमुने संकलित करुन त्यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या विना शुल्क केल्या जाणार आहेत.या चाचण्याचे तपासणी शुल्क या कंपनीला सरकार कडून मिळणार आहे.त्यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.

राज्यातील 33जिल्हयात अशा प्रकारच्या 110 प्रयोग शाळा उभारण्यात येणार आहेत.उस्मानाबादचे जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ.एकनाथ माले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही प्रयोगशाळा उस्मानाबादसाठी मिळाली आहे.  या प्रयोगशाळेतून 24 तास अतिदक्षतेच्या वेळी सेवा दिली जाणार आहे.तपासणी अहवाल केवळ तीन तासात रंग्णांना उपलब्ध करुन दिला जात आहे.हया प्रयोगशाळा राज्यातील सर्व जिल्हयात टप्प्याटप्याने सुरू होणार आहेत.याप्रयोगशाळेसाठी जिल्हा समन्वयक दत्तात्रय कोकाटे,प्रयोगशाळा वरिष्ठ तंत्रज्ञ दौलप्पा यंपाळे,रक्त संकलन तज्ञ सचिन क्षीरसागर हे काम पाहत आहेत.

          

माता-बाल मृत्यूदर कमी करण्यामध्ये परिचारिकांचा सहभाग महत्वाचा -डॉ.वडगावे



उस्मानाबाद,दि.2:- व्यक्तीच्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत परिचारिकाही आरोग्य संदर्भात महत्वाची भूमिका बजावते,तसेच माता बाल मृत्यू कमी करण्यासाठी परिचारीकांचा सहभाग महत्वाचा आहे,असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे यांनी येथे केले.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने पहिल्या शासकीय नर्सेसची कार्यशाळा डॉ.वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी बोलत होते. माता बाल संगोपनातील अद्यावत माहिती  या विषयावर ही एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी  स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल वाघमारे, डॉ.सचिन देशमुख, डॉ.महेश कानडे,रुग्ण कल्याण समितीचे अब्दुल लतिफ शेख,सेवानिवृत्त अधिसेविका विमल पानसे, अधिसेविका श्रीमती सरस्वती थोरात आदीची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ.वडगावे म्हणाले की, परिचारकांना अद्यावत शिक्षण ही महत्वाचे असून परिचारकांनी अशा कार्यशाळेत सहभागी होऊन आपले ज्ञान अद्यावत करावे.

या कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या व निरीक्षक श्रीमती अश्विनी बेले यांनी कार्यशाळेच्या महत्वाच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


या कार्यशाळेस प्राचार्य अरुण कदम,श्रीमती गोरे,सुनिता पोखरकर, रवी बसरगी,अमोल गरड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती जयश्री हेंगडे व सरस्वती खटींग यांनी केले तर आभार शासकीय नर्सिग कॉलेजचे प्राचार्य सिद्रामप्पा कोरळी यांनी केले.या कार्यशाळेसाठी जिल्हयातील परिचारिका मोठया संख्येने उपस्थित होत्या. 

Monday, 29 May 2017

औषध दुकानाच्या बंद कालावधीत रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासन सज्ज


उस्मानाबाद,दि.29:-  मंगळवार दि.30 मे 2017 रोजी एक दिवसासाठी जिल्हयातील औषध दुकानदारांच्या संघटनेचा देशव्यापी प्रस्तावित संप असल्याबाबत या प्रशासनास ज्ञात झालेले आहे.सदर कालावधीत रुग्णाची गैरसोय होऊ नये व औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा या हेतूने काही पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संघटनेस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे, जेणेकरुन जनतेस औषध उपलब्ध होतील व होणारी गैरसोय टाळली जावू शकेल.

यासाठी उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोशिएशन यांनी सदर बंद काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुकानिहाय पुढीलप्रमाणे औषध दुकानांची नावे प्रशासनास कळविले आहेत.उस्मानाबाद जाजू मेडीकल मो.9860800427, तुळजापूर भवानी मेडीकल मो. 9922716471,लोहारा गजानन मेडीकल मो.8308691011, वाशी महाराज मेडीकल मो.992220017,कळंब न्यु गंभीरे मेडीकल मो.9921091222, परंडा सीना मेडीकल मो.9822996888, भूम श्री.साई मेडीकल मेा.9765555242,उमरगा श्री.प्रेमनाथ मेडीकल मो.9730037593 हे औषध दुकाने बंद कालावधीत सुरु राहणार आहेत.  वरीलपैकी बंद कालावधीत औषध दुकानदारांनी औषधाचा पुरवठा करण्यास नकार दिल्यास त्याबाबत सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जुन्या अग्निशामक दलासमोर, उस्मानाबाद(दूरध्वनी क्र.02472 222606) येथे संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांनी केले आहे.

जिल्हयात शस्त्र व जमावबंदी


उस्मानाबाद,दि.29:- जिल्हयात सण, उत्सव शांततेत व सुरळीत पार पडण्याकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणेसाठी जिल्ह्यात दि. 26 मे 2017 ते दि. 4 जून  2017 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी  यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहील.
            आवेशी भाषणे,अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाहीत. सभ्यतेस व नीतीमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह किंवा अशी कोणतीही  वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाहीत, सभा घेता येणार नाहीत.

तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकिय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अंत्य यात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत. उक्त कालावधीत मिरवणुकांना, सभांना परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. हे आदेश दि. 4 जून  2017 रोजीच्या  रात्री  बारा पर्यंत लागू राहतील.  

अनधिकृत धार्मिक स्थळाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष



उस्मानाबाद,दि.29:- सार्वजनिक मालमत्तेवर अथवा रस्ता किंवा फूटपाथ यावर उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामाबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे तसेच या कार्यालयातील ईमेल  rdc1osmanabad@gmail.com या संकेतस्थळावर लेखी स्वरुपात व कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक-02472 225618, टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधून तक्रार दाखल करावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा


उस्मानाबाद,दि.29:- प्रत्‍येक शेतकऱ्यांच्‍या शेतास पाण्‍याची उपलब्‍धता करणे आणि पाण्‍याची कार्यक्षमता वाढवून पाण्‍याच्‍या प्रत्‍येक थेंबातून जास्‍तीत जास्‍त पीक उत्‍पादन मिळविणे या उद्देशाने सन 2015-16 पासून सूक्ष्‍म सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्‍या महत्‍वाकांक्षी योजनेमध्‍ये समाविष्‍ट केली आहे. त्‍यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्‍त करण्‍यासाठी ई-ठिबक आज्ञावली दि. 1 मे 2017 पासून सुरु करण्यात आलेली आहे.या आज्ञावलीद्वारे दि.31 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करता येणार आहेत,तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा,असे कृषी विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
दि. 14 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये सन 2016-17 पासून मराठवाडा विभागातील 8 जिल्हयांसाठी 100 टक्के राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 3 वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतून सन 2017-18 वर्षामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई  योजनेंतर्गत 2.61 लक्ष लाभार्थींच्या शेतावर 2.10 लक्ष हेक्टर क्षेत्रावर तर मराठवाडयात सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत 60 लक्ष लाभार्थींच्या शेतावर 48 लक्ष हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संच बसविण्याचे उदिष्टय निश्चित करण्यात आलेले आहे. 

 सन 2017-18 साठी या योजनेअंतर्गत अनुदानाचे प्रमाण अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतकरी 55 टक्‍के व इतर भूधारक शेतकरी 45 टक्‍के प्रमाण आहे. राज्‍य शासनाने सूक्ष्‍म सिंचन योजनेच्‍या अंमलबजावणीमध्‍ये अधिक सुटसुटीतपणा व सूसूत्रता आणून योजना पारदर्शकरित्‍या व अधिक प्रभावीपणे राबविण्‍याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीमध्‍ये सुधारणा करण्‍यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना शासनास सादर करावयाच्‍या कागदपत्रांची संख्‍या कमी करण्‍यात आली आहे.सूक्ष्‍म सिंचन संच बसविण्‍यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्‍यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्‍वीकृती करण्‍यासाठी ई-ठिबक आज्ञावली दिनांक 1 मे 2017 पासून सुरु करण्‍यात आली असून दिनांक 31 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज स्‍वीकारण्‍यात येणार आहेत.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे कृषी विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Sunday, 28 May 2017

सर्वांनी समन्वयाने जिल्हयाचा सर्वांगीण विकास साधू या -पालकमंत्री दिवाकर रावते


                                                     
उस्मानाबाद,दि.28:- जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वय साधून धोरणात्मक निर्णय राबवूया, असे आवाहन परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज केली.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते.यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास  तथा सहपालकमंत्री महादेव जानकर,खासदार रविंद्र गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, सर्वश्री आमदार ज्ञानराज चौगुले, सुजितसिंह ठाकूर, राणाजगजितसिंह पाटील, मधुकरराव चव्हाण, राहुल मोटे, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते, उप मुख्यकार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा, कृषी विकास अधिकारी खोत,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  शिवाजी थोरात,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री रावते म्हणाले की, जिल्हयातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीकविमा, विद्युत पुरवठा, भूसंपादन असे प्रश्न उपस्थित केले आहेत.त्या प्रश्नांचे अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करुन तातडीने निर्णय घ्यावेत, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. जिल्हयातील विकासाची कामे  निधीअभावी प्रलंबित आहेत त्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी पुरविला जाईल,असेही आश्वासन दिले. काही प्रश्न राज्यस्तरावरील असतील त्याचा वैयक्तिक पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

            यावेळी जिल्हयातील खासदार, आमदार महोदयांनी विकासात्मक प्रलंबित कामाबाबतच्या सूचनांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे असे सूचविले. यावेळी पालकमंत्री श्री.रावते यांनी आपल्या सर्व सूचनांचे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.यावेळी मागील सभेतील विविध विषयावर चर्चा होऊन त्याचे अनुपालन कशा प्रकारे केले आहे यावर चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Osmanabad Palakmantri Adhava and DPDC Meeting


जिल्हा वार्षिक योजनेचा योग्य नियोजनाने निधी वेळेत खर्च करा
                                                     -पालकमंत्री दिवाकर रावते
उस्मानाबाद,दि.28:- जिल्हयातील प्रशासकीय विभागाने जिल्हा वार्षीक योजनेच्या  प्रस्तावाची वेळेत तांत्रिक मान्यता घेवून जिल्हा वार्षिक योजनेचा निधीही वेळेत खर्च करावा, असे निर्देश खारभूमी विकास तथा पालकमंत्री  दिवाकर रावते यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना 2015-16 व 2016-17 या वर्षांचा आढावा घेण्यात आला यावेळी पालकमंत्री रावते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास  तथा सहपालकमंत्री महादेव जानकर,आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते, कृषी विकास अधिकारी खोत,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  शिवाजी थोरात,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रावते पुढे बोलताना म्हणाले की, जिल्हयाला  उपलब्ध झालेला  निधी वेळेत खर्च करा, निधी वेळेत  नाही खर्च न झाल्यानंतर तो निधी समर्पित होत असल्याने जिल्हयाच्या विकासकामांचीही गती मंदावते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी कामाचे प्रस्ताव जलदगतीने प्रशासकीय मान्यता घेवून  कार्यवाही करावी..
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे  यांनी सन 2015-16 व 2016-17 च्या जिल्हा वार्षिक योजनेचे  सादरीकरण केले. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार जिल्हा वार्षीक योजना  सन 2016-17 मध्ये सर्वसाधारणसाठी  174 कोटी 92 लाख, अनुसूचित  जातीसाठी 62 कोटी 92 लाख तर आदावासी क्षेत्राबाहेरील अदिवासीकरिता उपयोजनासाठी 2 कोटी 15लाख 57 हजार मंजूर नियतव्यय असल्याचे सांगितले आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 करीता यंत्रणेने प्रस्तावित केलेला नियतव्यय विचारात घेवून व शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत रुपये 135 कोटी 58 लक्ष किंमतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अनुसूचित जाती उपयोजना करीता यंत्रणेने प्रस्तावित केलेला नियतव्यय विचारात घेवून व शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत रुपये 70 कोटी 89 लक्ष किंमतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण  गमे यांनी जिल्हा वार्षिक योजनाच्या खर्चाचे यापुढे  योग्य नियोजन केले जाईल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हानियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 
शेतकऱ्याचे दु:ख जाणून घेवून
त्यांना मदत होईल अशा योजना राबवा
                                                      -पालकमंत्री दिवाकर रावते
उस्मानबाद:- शासनाने बळीराजा चेतना अभियांनतर्गत उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्हयांची निवड केली होती.त्या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे दु:ख समजून घेवून त्याला मदत होईल या भावनेतून शासनाच्या योजना तडफेने राबवा,अशा सूचना पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा चेतना अभियान संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास  तथा सहपालकमंत्री महादेव जानकर,आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते, कृषी विकास अधिकारी खोत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  शिवाजी थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, आत्माचे प्रकल्प  संचालक विजय  हिरामेठ आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री रावते पुढे म्हणाले की, जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबाना येणाऱ्या खरीप हंगामासाठी बळीराजा चेतना अभियानातून बी -बियाणे खरेदीसाठी मदत करा.शेतकरी गटांना फिरता निधी देताना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांवर व्यवसाय करण्यासाठी मदत करा, बळीराजा चेतना अभियान हा आपल्या जिल्हयात पथदर्शी कार्यक्रम असून ही योजना राबविताना या जिल्हयाला आलेले अनुभव, निरीक्षण नोंदले गेले पाहिजे. बळीराजा चेतना अभियानातून जिल्हयातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत,  हे अभियान राबविताना धोरणात्मक निर्णय घेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे पाहावे अशा सूचनाही पालकमंत्री  रावते यांनी केली.

पालकमंत्री श्री.रावते यांनी यावेळी बळीराजा चेतना अभियानांतर्गत विविध विभागाने राबविलेल्या योजनांचा व उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी गमे यांनी या अभियानूत जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबाना पेरणीसाठी महाबीजचे बियाणे अनुदानावर वितरित करावे अशी सूचना केली.

जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी यावेळी फिरता निधी संदभा्रत माहितीचे सादरीकरण केले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.