Wednesday, 7 August 2019

पर्यावरणपोषक, निधर्मी, सलोखामय, सौहार्दाचे वातावरण असलेल्या समाजाची निर्मिती करू या -- पालक न्यायमूर्ती विश्वासराव जाधव


वृत्त क्रमांक- 521                                                 दि.04 ऑगस्ट 2019
पर्यावरणपोषक, निधर्मी, सलोखामय, सौहार्दाचे वातावरण


असलेल्या समाजाची निर्मिती करू या
--- पालक न्यायमूर्ती विश्वासराव जाधव

उस्मानाबाद,दि.04(जिमाका) :- डिजिटल क्रांतीमुळे सध्या समाजात तर निसर्ग बदलामुळे वातावरणातही अनेक बदल घडून येत आहेत.मात्र तरीही सर्वांनी मिळून पर्यावरणपोषक, निधर्मी सलोखामय, सौहार्दाचे वातावरण असलेल्या समाजाची निर्मिती करू या, असे आवाहन न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती श्री. विश्वासराव के. जाधव यांनी आज येथे केले.
उमरगा येथील न्‍यायालयाच्‍या नवीन इमारतीच्या भूमीपूजन व कोनशिला अनावरण प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल, उमरगा जिल्हा न्यायाधीश वर्ग-एक श्रीकांत साळुंखे, उमरगा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. दिलीप सगर हे उपस्थित होते.
न्यायमूर्ती श्री.जाधव म्हणाले, सध्या सर्वच क्षेत्रात बदलाचे वारे वाहत आहेत. अनेक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. त्यामुळे कायदा व न्याय व्यवस्थेतील घटकांनी हे बदल स्वीकारून काळाच्या प्रवाहाबरोबर आपल्या क्षेत्रातील अभ्यास, संदर्भ आत्मसात करून अत्यंत जाणीवपूर्वक मेहनत करणे आवश्यक आहे. समाजात आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे, मारहाण,व्हर्चुअल नंबरवरून दिल्या जाणाऱ्या धमक्या, त्यातून होणारी फसवणूक यामुळे जनता त्रस्त आहे. नवनवीन पद्धतीने घडणाऱ्या व घडवून आणण्यात येणाऱ्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा ही जलद प्रक्रियेतून देणे, समाज व्यवस्थेची गरज बनली आहे आणि त्यासाठी न्यायाधीश, वकील यांनी अधिक अभ्यास करून, संदर्भ तपासून गरजूंना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे, हे आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्य बजावण्यासाठी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम,भरपूर अभ्यास, सहनशीलता, तळमळ या बाबींना पर्याय नाही. श्री. जाधव यांनी न्यायालयास न्याय मंदिर न म्हणता न्यायदान केंद्र, न्यायदान प्रक्रिया केंद्र असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे, असे व्यक्तिगत मतही मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल यांनी केले तर स्वागतपर भाषण उमरगा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 श्रीकांत साळुंके यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. विलास कुलकर्णी, सुनील माने, सायली साठे, नरसिंग पांचाळ यांच्या कलावृंदाने गायलेल्या सुमधूर अशा स्वागतगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन  करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर उमरगा न्‍यायालयाच्‍या नवीन इमारतीचा भूमीपूजन व




कोनशिला अनावरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महेश इनामदार यांच्या मंत्रोच्चाराने येथील वातावरण अतिशय मंगलमय असे झाले होते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते नांदुर्गा या अत्यंत उपयुक्त अशा झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले. याद्वारे समाजाला झाडे तोडू नका वाचवा आणि झाडांचे पुनर्रोपण करा असा नवा संदेशही देण्यात आला. याशिवाय इमारतीचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प केलेले कंत्राटदार विक्रम गायकवाड तसेच जनहितार्थ शासकीय इमारतीकरिता स्वतःची सात एकर जागा दान करणार्‍या कै.शरणप्पा मलंग यांच्या मुलाचा न्यायमूर्ती श्री. जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, तहसिलदार संजय पवार, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. मिलिंद पाटील, आकाशवाणी केंद्राचे संजय बरिदे ,कृष्णा शिंदे ,जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती विधीज्ञ ॲड. अभयसिंह चालुक्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, संताजी चालुक्य, न्यायाधीश श्री. कारंडे, श्री. पाटील, श्री. बिलाल, श्री. गोसावी, सौ. चव्हाण, विधीज्ञ परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, ॲड.इनामदार, ॲड. सौ. पोतदार, सौ.घोडके, सौ. जोशी ,सौ.डंके, श्री. पणुरे, श्री.माळी, श्री. राजेश्वरकर, श्री.मल्हारी बनसोडे, श्री. उदय वैद्य, अरुण सूर्यवंशी, संजय बिराजदार, गोविंद गायकवाड, राहुल जाधव, अरुण सूर्यवंशी, युवराज माने, देशपांडे, दिवाकर जाधव, नंदकिशोर बिराजदार, अमित सांगवे, जुबेर कादरी,  जमील मुजावर, कपिल महाजन, अरुण हेडे, अशोक पोतदार, बालाजी सोमवंशी, प्रवीण पाटील, श्री. मंगेश येळीकर, मनोज कोडलंगरे, मंगेश चिंचोलीकर, जे.बी. शेख, एस.ए. पाटील, व्यंकटराव माळी, खाजा शेख, अमोल माळी, बी.डी. लुल्ला, फिरोज मुल्ला, सिद्राम हंदाळे, श्री.कलाने, रणजित जाधव, विशाल सूर्यवंशी, शंकर सुरवसे, एच.डी. करके,  जब्बार पटेल, श्री.कोथिबरे, श्री. व्ही.एस.आळंगे, श्री.यू.व्ही.वैद्य  आदींसह उमरगा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक संजय मैंदरगे यांनी केले तर आभार उमरगा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. दिलीप सगर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
****