Saturday, 29 April 2017

जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार जाहीर


उस्मानाबाद, दि.29:-  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीच्या वतीने जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार 2015-16  व जिल्हास्तर युवा पुरस्कार सन 2014-15 व 2015-16 यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
            जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार सन 2015-16 चे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत, गुणवंत खेळाडू पुरुष गटातून(खो-खो) श्री.ढोबळे नितीन वैजिनाथ, गुणवंत खेळाडु महिला गटातून(आटया-पाटया) कु.शिन्दे गंगासागर उत्तम,गुण्वंत क्रीडा मार्गदर्शक(आटया-पाटया) श्री.शिन्दे अनिल अभिमान, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता,संघटक (हँडबॉल,कब्बडी) श्री.घाडगे प्रशांत विश्वनाथ आदींना तर जिल्हास्तरीय युवा क्रीडा पुरस्कारार्थी सन 2014-15 चे योगेश निवृत्ती थोरबोले,गोजवाडा ता.कळंब,सन 2015-16 चा सुहास बापूराव कांदे, सापनाई,ता.कळंब तर सन 2015-16 जिल्हास्तरीय युवा पुरस्कारार्थी संस्था संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था देविसिंगा (तुळ),तुळजापूर ही आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनी समारंभ कार्यक्रमात या पुरस्कारांचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पुरस्कार समिती उस्मानाबाद यांच्या हस्ते  वितरण करण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांनी कळविले आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


उस्मानाबाद, दि.29:-  राज्य शासनाच्या  महात्मा गांधी तंटामुक्त गाव  मोहिमेत उत्कृष्ट वार्तांकन व लेख लिहिणाऱ्या  पत्रकारांसाठी  पुरस्कार योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील  पुरस्कारांसाठी  तात्काळ प्रवेशिका  पाठविण्याचे  आवाहन  करण्यात आले आहे.  या पुरस्कारासाठी  2 मे 2016 ते 1 मे 2017 या कालावधीत  प्रसिध्द  झालेले साहित्य  पुरस्कार पात्रतेकरिता  मूल्यमापनार्थ ग्राह्य  धरण्यात  येईल .
            महात्मा  गांधी तंटामुक्त गाव मोहीम  प्रभावी व यशस्वीरित्या राबविण्यामध्ये  प्रसार  माध्यमांचा मोठा  वाटा आहे.  यासाठी पूरक  व प्रबोधनात्मक  बातम्यांच्या माध्यमातून  मोहिमेला  वस्तुनिष्ठ प्रसिध्दी  देणाऱ्या  वृत्तपत्रांच्या बातमीदारांना  जिल्हास्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावरील  पुरस्कार दिले जातात.  जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी या संबंधीचे  निकष  पूर्ण  करणाऱ्या  पात्र  पत्रकारांनी  विहित  नमुन्यातील  अर्ज तीन  प्रतीत  सर्व कागदपत्रे  व कात्रणांसह आठ दिवसात पाठवावेत असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी , उस्मानाबाद यांनी केले आहे.

            पारितोषिकासाठी  विहित मुदतीत वैयक्तिरित्या केलेले अर्जच विचारात  घेण्यात येतील.  एका  वर्तमानपत्राच्या  प्रत्येक  आवृत्तीच्या  एकाच  पत्रकाराचा अर्ज  संपादकांमार्फत  स्विकारण्यात  येईल.  या संदर्भातील  अधिक माहिती तसेच  नियमावली  जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय  इमारत, कक्ष क्र. 28 उस्मानाबाद  येथे शासकीय  कामकाजाच्या  दिवशी  कार्यालयीन वेळेत  पाहता येईल.

महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण


उस्मानाबाद. दि.29 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दि. 1 मे 2017 रोजी पोलीस संचलन  मैदानावर राज्याचे परिवहन, खार भूमि विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ होणार आहे.

समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  

शास्त्रीय कला क्षेत्रात व लोककला प्रकारात सवलतीचे गुण देण्यासाठी वाढीव पाच संस्थांची निवड


उस्मानाबाद,दि.28:-शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरिता निवड करण्यात आलेल्या संस्थाच्या यादीमध्ये आणखी पाच संस्थाचा समावेश करण्यात आलेला आहे.
            माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षामध्ये (इ.10) मार्च 2017 पासून वाढीव गुणाची सवलत देण्यासाठी शास्त्रीय,संगीत,नृत्य व वादन तसेच लोककला क्षेत्रातील संस्थांची प्रमाणपत्र देण्यासाठी निवड करण्यात आली होती.
            इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी शासन मान्य असणाऱ्या पाच संस्थांमधील विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील राखीव जागावर सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येत होता. त्या पुढील पाच संस्थांचा शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरीता निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येत आहे.अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय,सरफोजीराजे भोसले डान्स रिसर्च इन्स्टिट्यूट, नालंदा नृत्य कला महाविद्यालय, श्री.वल्लभ संगीतालय,पुणे भारत गायन समाज आदी संस्थांचा समावेश करण्यात आला असल्याचे, लातूर विभागीय सचिव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे

Friday, 28 April 2017

राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते जिल्हयाच्या दौऱ्यावर


उस्मानाबाद,दि.28:- राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते हे दि.30 एप्रिल व 1 मे 2017 या दोन दिवसाच्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
                                 रविवार दि.30 एप्रिल 2017 रोजी सकाळी सोलापूर येथून शासकीय मोटारीने अपसिंगा तालुका तुळजापूर कडे प्रयाण, दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी अपसिंगा येथे आगमन व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण, सिमेंट नालाबांध कामाची पाहणी व ग्रामस्थांची संवाद,दुपारी 1 वाजता अपसिंगा येथून शासकीय मोटारीने ढोकी तालुका उस्मानाबाद कडे प्रयाण व 1 वाजून 45 मिनिटांनी ढोकी येथे आगमन व जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरण कामांस भेट व ग्रामस्थांशी ग्रामपंचायत सभागृहात संवाद,त्यानंतर 2 वाजून 30 मिनिटांनी ढोकी येथून शासकीय मोटारीने पाथर्डी तालुका कळंब कडे प्रयाण, 3 वाजता पाथर्डी येथे आगमन व पाणीपुरवठा योजना लोकार्पण सोहळा, आर.ओ.प्लँट उदघाटन व हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यारत्न स्वागत योजनेंतर्गत मुदत ठेव प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती,दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी पाथर्डी येथून शासकीय मोटारीने मौजे इटकुर तालुका कळंब कडे प्रयाण, 3 वाजून 40 मिनिटांनी इटकुर येथे आगमन व कंपार्टमेंट बंडिंग कामाचे उदघाटन, 4 वाजता इटकुर येथून शासकीय मोटारीने पिंपळगाव लि. तालुका वाशी कडे प्रयाण, दुपारी 4 वाजुन 15 मिनिटांनी पिंपळगाव लि. येथे आगमन व जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत सिमेंट नाला बांध कामाचे व मागेल त्याला शेततळे उदघाटन कार्यक्रम व ग्रामस्थांशी संवाद, सायंकाळी 5 वाजता पिंपळगाव लि. येथून शासकीय मोटारीने वाशी कडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी वाशी येथे आगमन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नूतन वाशी बसस्थानक उदघाटन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती त्यानंतर 5 वाजून 45 मिनिटांनी वाशी येथून शासकीय मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण, 6 वाजून 45 मिनिटांनी उस्मानाबाद येथे आगमन व जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय आढावा व संनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीस उपस्थिती त्यानंतर 7 वाजून 45 मिनिटांनी दि.9 व 10 एप्रिल 2017 रोजी उस्मानाबाद येथे पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक, रात्रौ 8 वाजून 15 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद कडे प्रयाण, आगमन, राखीव व मुक्काम.
            सोमवार दि.1 मे 2017रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी शासकीय विश्रामगृह येथून शासकीय मोटारीने पोलीस परेड मैदानाकडे प्रयाण, 8 वाजता पोलीस परेड मैदान येथे आगमन व महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, 9 वाजता उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने मुंबई कडे प्रयाण करणार आहेत.

वाशी बसस्थानकाचे रविवारी उदघाटन


उस्मानाबाद.दि.28:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वाशी येथे उभारण्यात आलेल्या नुतन बसस्थानकाचे उदघाटन रविवार दि. 30 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5 वाजुन 15 मिनिटांनी राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या हस्ते  करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उस्मानाबाद विभाग नियंत्रक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

           खासदार श्री. रविंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. मधुकरराव चव्हाण, आमदार श्री. ज्ञानराज चौगुले, आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार तानाजी सावंत, जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, वाशीच्या नगराध्यक्षा श्रीमती. प्रतिभा सिंगणापूरे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे राज्य परिवहन उस्मानाबादचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन



उस्मानाबाद,दि.28:- महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

            यावेळी सर्वसाधारण तहसिलदार अभयकुमार मस्के, जिल्हा खनिक्रम अधिकारी व्ही.जी.सय्यद व कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. 

Thursday, 27 April 2017

श्रीमती कमल कुंभार यांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान


उस्मानाबाद,दि.27:-उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगळजवाड़ी येथील कमल कुंभार
याना  राष्ट्रीय  पातळीवरील  श्रेष्ठ महिला उद्योजिका पुरस्कारांने  राष्ट्रपतीच्या हस्ते  सन्मानित  करण्यात आले.यासाठी  देशभरातून  350  यशस्वी  व्यवसायीक  महिलामधून  ३  महिलांची   निवड  करण्यात आली असून श्रीमती कुभांर या महाराष्टा्रतील एकमेव महिला उद्योजक आहेत.
            दुष्काळा असतानाही त्यांनी कडकनाथ कोंबडी या कुक्कुटपालन प्रकल्पाच्या माध्यमातून 3 हजार गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
श्रीमती  कमलताई  कुंभार या  हिंगळजवाडी  येथील सामान्य  कुटुंबातील  असून  त्यांचे शिक्षण जेमतेम, संधीची  कमतरता  यातून  त्या  स्वयंम  शिक्षण  प्रयोगच्या  बचत  गट  व  सखी  महासंघाच्या  काया्रतून  पुढे  आल्या. त्यांच्या या  कामाची  दखल   दिल्ली येथील   CII ( Confederation Of Indian
Industry) ने घेतली असून त्यांच्या मार्फत  श्रेष्ठ महिला
उद्योजिका  म्हणून  श्रीमती  कुंभार  यांना  राष्ट्रपतीच्या   हस्ते   सन्मानित   करण्यात  आले  आहे.

समुद्रवाणी येथे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य शिबिर


उस्मानाबाद,दि.27:- जिल्हा रुग्णालयाच्या वतीने शनिवार दि.29 एप्रिल 2017 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, समुद्रवाणी येथे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            या शिबिरामध्ये बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सा, अस्थीरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, भीषकतज्ञ, कान,नाक,घसा तज्ञ, आदी तज्ञ डॉक्टर मार्फत  मोफत तपासणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत रक्तदाब व मधुमेह तपासणी केली जाणार आहे.तपासणीतून आवश्यकता भासल्यास रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी संदर्भित केले जाणार आहे.
            तरी या शिबिराचा पिवळे, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्ण शिधापत्रिकाधारक, शुभ्र शीधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबातील रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केले आहे.

उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेशासाठी आवाहन


उस्मानाबाद,दि.27:- जिल्हा परिषद व जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील रहिवाशी असलेल्या पदवीधर व पदवीच्या अंतिम परीक्षेस बसलेल्या मुलींसाठी उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची तिसरी बॅच दि. 1 मे 2017 ते दि.31 ऑक्टोबर 2017 या कालावधीत उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला,(मुलांची) उस्मानाबाद येथे कार्यान्वयीत होत आहे, तरी  या केंद्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींनी प्रवेशाकरीता आवेदन पत्र विहित नमुन्यात दि. 29 एप्रिल 2017 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते यांनी केले आहे.
            या केंद्राची तिसरी बॅच दि. 1 मे 2017 ते दि.31 ऑक्टोबर 2017 या कालावधी करीता जिल्हयातील रहिवाशी असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी  व पदवीच्या अंतिम परीक्षेस बसलेल्या होतकरू व अभ्यासू मुलींसाठी नव्याने सुरू करण्यात येत आहे. या केंद्राच्या प्रशिक्षणार्थी मुलींची क्षमता दोनशे आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या मुलीकरीता शंभर जागा, शेतकरी तसेच शेतमजूर यांच्या मुलींकरीता 50 जागा व इतर विविध घटकातील मुलींसाठी 50 जागा भरण्यात येणार आहेत.

              हे केंद्र दि.1 मे 2017 पासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वयीत राहील. केंद्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींनी प्रवेशाकरीता आवेदन पत्र विहित नमुन्यात दि. 29 एप्रिल 2017 तारखेपर्यंत सकाळी 10ते 5.30 या वेळेत सादर करून उमेद स्पर्धा परिक्षा केंद्रात प्रवेश घेऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी केले आहे. 

Wednesday, 26 April 2017

ग्राम विकास लोकअदालतीचा लाभ घ्यावा - मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते


उस्मानाबाद.दि.26:-ग्रामविकास विभागाच्या योजनेबद्दल व्यक्तिगत तक्रार किंवा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी या ग्राम विकास लोकअदालतीमध्ये तक्रारी दाखल कराव्यात, या तक्रारीचा निपटारा या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी  जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामविकास लोकआदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद रायते यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रामविकास लोकअदालतीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.नेताजी पाटील यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रायते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणे, गट विकास अधिकारी श्री.चकोर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविताना ज्या नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहिल्या असतील किंवा वैयक्तिक लाभापासून वंचित राहिल्याबाबतच्या तक्रारीचा या ग्रामविकास लोकअदालतीमध्ये निपटारा करण्यात येणार आहे, ज्या तक्रारी संदिग्ध आहेत त्या तक्रारी दि.1 ते 31 मे 2017 या एक महिन्याच्या कालावधीत निपटारा करण्यात येईल, असे ही श्री. रायते यावेळी बोलताना म्हणाले.


या कार्यक्रमास उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर येथील पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 25 April 2017

ग्रामविकास लोक अदालतीचे दि.26 व27 एप्रिल 2017 ला आयोजन


उस्मानाबाद,दि.25:- जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागाकडून शासनाच्या विविध योजना जिल्हयात राबविण्यात येतात. या योजना राबविताना नागरिकांच्या तक्रारीचा वेळेत निपटारा होत नाही,त्यामुळे दि.26 व 27 एप्रिल 2017 या कालावधीत सकाळी 11 ते 5 यावेळेत तीन ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम विकास लोक अदालत घेण्यात येणार आहे.
          जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्य सर्व विभागातील कामकाज, ग्रामस्थांच्या तक्रारी, प्रलंबीत कामे याबाबत निपटारा करण्यात येणार आहे.
          उस्मानाबाद येथे ग्रामविकास लोक अदालत प्रमुख व सहाय्यक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) तर यामध्ये समाविष्ठ अधिकारी - गट विकास अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील विभाग प्रमुख, भूम येथे ग्रामविकास लोक अदालत प्रमुख व सहाय्यक म्हणून प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) तर समाविष्ठ अधिकारी - गट विकास अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील विभाग प्रमुख, उमरगा येथे ग्रामविकास लोक अदालत प्रमुख व सहाय्यक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक मनरेगा तर समाविष्ठ अधिकारी - गट विकास अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील विभाग प्रमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
          उस्मानाबाद येथे उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब येथील नागरिकांनी, भूम येथे भूम, परंडा व वाशी येथील नागरिकांनी तर उमरगा येथे उमरगा व लोहारा येथील नागरिकांनी ज्यांचे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर कामे प्रलंबीत आसून त्याचा निपटारा झालेला नाही अशा सर्व नागरिकांनी  दि.26 व 27 एप्रिल 2017 या कालावधीत संबंधीत ठिकाणी आवश्यक कागदपत्रे, पुराव्यासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते यांनी केले आहे.

Monday, 24 April 2017

सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती/संस्थांनी अर्ज करावेत


उस्मानाबाद , दि.24:- सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार , शाहू , फुले, आंबेडकर पारितोषिक , पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार सन 2017-18 या वर्षाकरिता येणार आहेत.
तरी याकरिता सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय  काम केलेल्या  विविध संस्था/व्यक्तींनी आपले प्रस्ताव दि. 30 एप्रिल 2017 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय , उस्मानाबाद  येथे कार्यालयीन  वेळेत सादर करावेत . 
तसेच अधिक माहितीसाठी  कार्यालयाच्या 02472-2223133  या दूरध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा तसेच माहिती  व अर्जाकरिता https://sjsa.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर पाहावे , असे सहायक आयुक्त श्री. एस.एस. मते यांनी कळविले आहे .
पात्रता– व्यक्ती -  सामाजिक  क्षेत्रात म्हणजेच अनु.जाती /जमाती भटक्या  व विमुक्त जातीचे कल्याणकारी  कार्य, तसेच  शारिरीक व मानसिकदृष्ट्या  मनोदूर्बल, अपंग , कुष्ठरोगी इ. सामाजिक दूर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणारे  नामवंत समाजसेवक  असावेत , सामाजिक कल्याण क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत ,  पुरस्काराकरिता पुरुषाचे वय 50 वर्षे पूर्ण असावे, महिलांचे वय 40 वर्षे पूर्ण असावे ,  कोणत्याही  व्यक्तीस  त्याच्या आयुष्यात  एकपेक्षा  अधिकवेळा  पुरस्कारासाठी  पात्र समजण्यात येणार नाही ,  समाज भूषण  पुरस्कार  मिळण्यास जात , धर्म , लिंग , क्षेत्र  याबाबीचा विचार केला जाणार नाही , पुरस्कार मिळण्यास  आमदार , खासदार , जिल्हा परिषदेचे  सदस्य किंवा कोणत्याही पदाधिकारी  पात्र  असणार  नाहीत .
सामाजिक  संस्था -  सामाजिक संस्था ही पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 वा सोसायटीज  रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार  पंजीबध्द असावी , संस्था राजकारणापासून अलिप्त असावी , तसेच कार्य  व सेवा  ही पक्षातील  व राजकारणापासून स्वतंत्र्य अलिप्त असावीत ,  सामाजिक कल्याण क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत , पुरस्काराकरिता पुरुषाचे  वय 50 वर्षे पूर्ण असावे तर महिलांचे वय 40 वर्षे पूर्ण असावे .

नाट्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आ़मदार ठाकूर यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार



उस्मानाबाद, दि.24:- ९७ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन उस्मानाबाद येथे आयोजित करून अभूतपूर्व सोहळ्यात यशस्वी केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ व दैनिक पुण्य नगरी वृत्तपञ समूहाच्या वतीने स्वागताध्यक्ष तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा हृदयसत्कार करण्यात आला़ .
उस्मानाबाद येथे ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा शानदार सोहळ्याचा दि. 23 एप्रिल रोजी  समारोप झाला़ या सोहळ्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा संयोजक आ.ठाकूर यांचा अभूतपूर्व कार्यक्रमांनी संमेलन यशस्वी केल्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,सरचिटणीस संतोष जाधव, सहसचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, जिल्हा संघटक दिपक जाधव यांनी शाल, फेटा व बुके देवून सत्कार केला.

यावेळी सोहळ्याचे प्रमुख अतिथी तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा़.रविंद्र गायकवाड,नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, कार्याध्यक्ष दिपक करंजीकर, संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर, गंगाराम गवाणकर, आ. बसवराज पाटील,माजी आ. ज्ञानेश्वर पाटील,ओमराजे निंबाळकर,नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर,उपनगराध्यक्ष सूरज साळुंके, दत्ताभाऊ कुलकर्णी, अनिल खोचरे, नितीन काळे, ॲ नितीन भोसले, धनंजय शिंगाडे, विशाल शिंगाडे, प्रशांत पाटील, आशिष मोदाणी  आदी उपस्थित होते .

Hon Haribhau Bagde

Sunday, 23 April 2017

दूध उत्पादकांच्या हितासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे- -विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे



उस्मानाबाद,दि.23-:-उस्मानाबाद जिल्ह्यात दूध उत्पादक व संकलनासाठी उत्तम वाव आहे.  मात्र दूध उत्पादकाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येवून कटिबद्ध होणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन  विधानसभा  अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले.
          तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित,उस्मानाबाद यांच्या दूध संकलकचा शुभारंभ व दूध उत्पादक मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
          यावेळी सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, विधान परिषद सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर, विधानसभा सदस्य आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चना पाटील, नितिन काळे, दत्ता कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील, नानासाहेब पाटील हे उपस्थित होते.
          श्री. बागडे पुढे म्हणाले, सहकारातून  उभ्या राहिलेल्या बऱ्याच संस्था आज मरणासन्न अवस्थेत आहेत. मात्र यातही चांगल्या संस्थांनी पुर्नजिवित होणे आवश्यक आहे.  त्यासाठी सशक्त, सक्षम सहकारी संस्थांनी अशा मृत मात्र चांगल्या संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करावे.  ते म्हणाले, दूध संकलन ही एक सामूहिक प्रक्रिया आहे.  त्यासाठी शिस्तबद्धतेने नियोजनाची गरज असून यात राजकारण न आणता, व्यक्ती न पाहता दूधाची प्रत चांगली असणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर दूध उत्पादकांनी क्लस्टर पद्धतीने, बचतगटाच्या माध्यमातून या व्यवसायात प्रगती साधता आली पाहिजे. या प्रक्रियेत सातत्य हवे व सर्वांनी मार्केटिंगचेही कौशल्य आत्मसात करायला हवे, असेही श्री. बागडे म्हणाले.  शेवटी श्री बागडे यांनी सहकारात गैरमार्गाने  नफा  कमावू नये व चांगल्या मार्गाने कमविलेला नफा सर्व सभासदांना समान वाटप करावा असा कानमंत्रही उपस्थित दूध उत्पादक, संकलकांना दिला.
          सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तुळजाभवानी दूध संघाने नव्या जोमाने पुन्हा सुरुवात केल्याबद्दल  त्यांचे अभिनंदन केले व ते म्हणाले की, राजकीय  झूल बाजूला ठेवून या संघाने आपली पुढील वाटचाल यशस्वी करावी.  सभासद, संस्था, गावचा विकास हाच ध्यास घ्यावा आणि यासाठी सर्वांची दांडगी इच्छाशक्ती ही असावी.  शासनाच्या योजनांचा नीट अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावेत.  तसेच शेतीपूरक व्यवसायावरही लक्ष केंद्रित करावे. जेणे करुन शेती बरोबरीनेच  इतरही बाबी  शेतकऱ्यास सहाय्यकारी ठरतील.
          यावेळी जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचा त्यांच्या सहकार क्षेत्रातील कामाबद्दल आणि अमूल दुग्ध उद्योगाचा श्री. देशमुख यांनी विशेष उल्लेख करुन उस्मानाबाद मधील सध्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांची राजुरी गाव व अमूल उद्योग यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही केले.
          या कार्यक्रमाप्रसंगी  प्रभात सहकारी पतपेढीच्या वतीने या दूध संघाला सहकार्य म्हणून रुपये पाच लाखांचा धनादेश उपस्थित मान्यवर व चेअरमन  डॉ. डी.बी. मोरे यांच्या हस्ते  दूध संघाचे  महाव्यवस्थापक एस.आर. नाईकवाडी  यांना देण्यात आला.

          कार्यक्रमाचे  प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य सहकारी दूध  महासंघाचे महाव्यवस्थापक एस.आर. नाईकवाडी  यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. एस.एस. बोडके यांनी केले. आभार प्रदर्शन हरिभाऊ लोमटे यांनी केले.  शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.