उस्मानाबाद,दि.28:-
राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते हे दि.30
एप्रिल व 1 मे 2017 या दोन दिवसाच्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार दि.30
एप्रिल 2017 रोजी सकाळी सोलापूर येथून शासकीय मोटारीने अपसिंगा तालुका तुळजापूर
कडे प्रयाण, दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी अपसिंगा येथे आगमन व जलयुक्त शिवार
अभियानांतर्गत नाला खोलीकरण, सिमेंट नालाबांध कामाची पाहणी व ग्रामस्थांची
संवाद,दुपारी 1 वाजता अपसिंगा येथून शासकीय मोटारीने ढोकी तालुका उस्मानाबाद कडे
प्रयाण व 1 वाजून 45 मिनिटांनी ढोकी येथे आगमन व जलयुक्त शिवार अंतर्गत नाला
खोलीकरण कामांस भेट व ग्रामस्थांशी ग्रामपंचायत सभागृहात संवाद,त्यानंतर 2 वाजून
30 मिनिटांनी ढोकी येथून शासकीय मोटारीने पाथर्डी तालुका कळंब कडे प्रयाण, 3 वाजता
पाथर्डी येथे आगमन व पाणीपुरवठा योजना लोकार्पण सोहळा, आर.ओ.प्लँट उदघाटन व
हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यारत्न स्वागत योजनेंतर्गत मुदत
ठेव प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती,दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी पाथर्डी
येथून शासकीय मोटारीने मौजे इटकुर तालुका कळंब कडे प्रयाण, 3 वाजून 40 मिनिटांनी
इटकुर येथे आगमन व कंपार्टमेंट बंडिंग कामाचे उदघाटन, 4 वाजता इटकुर येथून शासकीय
मोटारीने पिंपळगाव लि. तालुका वाशी कडे प्रयाण, दुपारी 4 वाजुन 15 मिनिटांनी
पिंपळगाव लि. येथे आगमन व जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत सिमेंट नाला बांध कामाचे
व मागेल त्याला शेततळे उदघाटन कार्यक्रम व ग्रामस्थांशी संवाद, सायंकाळी 5 वाजता
पिंपळगाव लि. येथून शासकीय मोटारीने वाशी कडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजून 15
मिनिटांनी वाशी येथे आगमन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नूतन वाशी
बसस्थानक उदघाटन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती त्यानंतर 5 वाजून 45 मिनिटांनी वाशी
येथून शासकीय मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण, 6 वाजून 45 मिनिटांनी उस्मानाबाद
येथे आगमन व जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय आढावा व संनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात बैठकीस उपस्थिती त्यानंतर 7 वाजून 45 मिनिटांनी दि.9 व 10
एप्रिल 2017 रोजी उस्मानाबाद येथे पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री महोदयांनी
दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक, रात्रौ 8
वाजून 15 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद कडे
प्रयाण, आगमन, राखीव व मुक्काम.
सोमवार
दि.1 मे 2017रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी शासकीय विश्रामगृह येथून शासकीय
मोटारीने पोलीस परेड मैदानाकडे प्रयाण, 8 वाजता पोलीस परेड मैदान येथे आगमन व
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण
कार्यक्रमास उपस्थिती, 9 वाजता उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने मुंबई कडे प्रयाण
करणार आहेत.