उस्मानाबाद,दि.15:- जिल्हा दंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी
त्यांचे चौकशी आदेशान्वये उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील महिला बंदी नामे शितल
उर्फ ताई सिध्देश्वर हिप्परगे हिची मुलगी समीक्षा सिध्देश्वर हिप्परगे, रा.
येणेगुर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद वय 02 महिने हिचा शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद
येथे वैद्यकीय उपचार चालु असताना दि. 22 जुलै 2014 रोजी मृत्यू झाल्याने या
प्रकरणाची फौजदारी प्रक्रिया संहिता 1973(2/1974) मधील तरतुदीनुसार चौकशी
करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी श्री. चेतन गिरासे यांची नेमणूक केलेली आहे.
या
मयताच्या नातेवाईकास त्यांच्या मृत्यूबाबत काही माहिती किंवा त्यांचे काही म्हणणे
असेल तर तसे त्यांनी त्यांच्याकडील सबळ पुराव्यासह दि. 21 जुलै 2017 रोजी सकाळी
11.00 वाजता ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत या कार्यालयास हजर राहून आपले म्हणणे
पुराव्यानिशी दाखल करावे, असे उपविभागीय दंडाधिकारी श्री. चेतन गिरासे यांनी
कळविले आहे.Saturday, 15 July 2017
"अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय" प्रशिक्षण शिबीरांचा समारोप
उस्मानाबाद.दि.15:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद द्वारे
आयोजित "अवघा महाराष्ट्र फूटबॉलमय" प्रशिक्षण शिबिराचा समारोप श्री. तुळजाभवानी
जिल्हा स्टेडियम येथे करण्यात आला.
यावेळी
पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक,
क्रीडा अधिकारी, अशोक बनसोडे, मदनलाल गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक श्री.जरार कुरेशी, गणेश पवार, व कार्यालयातील
सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या
प्रशिक्षण शिबिराचे गेल्या तीन दिवसापासून रोज सकाळी व संध्याकाळी श्री.
तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेले होते. उस्मनाबाद
जिल्हयातील आठही तालुक्यातील क्रीडा
शिक्षकांनी मोठया प्रमाणात यात सहभाग नोंदविला होता.
या प्रशिक्षण शिबिराकरिता राज्य् फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक श्री.
एम.झेड.शेख यांनी सर्व क्रीडा शिक्षकांना फूटबॉल या खेळाचे कौशल्य प्रात्यक्षिकाचे
प्रशिक्षण दिले. सर्व सहभागी शिक्षकांना फूटबॉल खेळ कसा खेळावा व फूटबॉल् खेळाचा
सराव शाळेतील खेळाडूंकडून कसा करून घ्यावा
याबाबतही क्रीडा मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे कार्यालयाचे राज्य् क्रीडा मार्गदर्शक श्री. गणेश
पवार यांनी केले.
आजच्या युवा पिढीने उद्योजक बनावे
उस्मानाबद,दि.15:- वाढत्या बेरोजगारीचा विचार करता
त्यामानाने नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे आजच्या युवा पिढीने व्यवसाय,उद्योगाचा
मार्ग अवलंबला तर वाढत्या बेरोजगारीवर मात करणे शक्य होईल, असे प्रतिपादन मिटकॉनचे
जिल्हा व्यवस्थापक श्री.चव्हाण यांनी आज व्यक्त केले.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री.चव्हाण बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या
अध्यक्षतेस्थानी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे होते. स्वयंरोजगार व
कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक बालाजी मरे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेचे प्राचार्य श्री.उडाणशिवे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा
प्राचार्य श्री.जाधवर, श्री.अहिरे आदींची प्रमुख्य उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना श्री. चव्हाण
म्हणाले की, प्रत्येक तरुणाच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना कौशल्य विकासची जोड
देवून त्यांना तंत्रशिक्षण दिले तर त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव
मिळून आजचे तरुण चांगले उद्योजक होवू
शकतात.यामुळे वाढत्या बेरोजगारीवर मात करता येवू शकतो.तंत्रशिक्षणामुळे तुम्ही
मोठे उद्योजक होवून नोकरीच्या मागे न लागता इतरांना काम देणारे उद्योजक बनावे.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी
श्री.सानप म्हणाले की, आजच्या युवा पिढीने स्वत:ला कमी न लेखता स्वत: ला सक्षम
बनवून जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचावे,आजची युवा पिढी घडली तर
गाव,तालुका, जिल्हा, राज्य आणि देश घडेल त्यामुळे युवकांनी स्वत: सक्षम बनले
पाहिजे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम
केलेल्या शिक्षकांचा व उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून
सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक
संचालक श्री.मरे यांनी केले.तर आभार प्राचार्य श्री.उडाणशिवे यांनी
मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.अहिरे यांनी केले.यावेळी औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेचे शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Thursday, 13 July 2017
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी दहा हजाराच्या कर्जासाठी तात्काळ बँकेशी संपर्क साधावा
उस्मानाबाद.दि.13:- दि. 30
जून 2017 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध
होण्याच्या दृष्टीने दहा हजार रुपयेच्या मर्यादेपर्यंत शासन हमीवर तातडीने कर्ज
देण्याचे निर्देश सर्व राष्ट्रीयेृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना शासन
निर्णय दि.14 जून 2017 व शुध्दीपत्रक दि.20 जून 2017 नुसार प्राप्त झालेले आहेत.
त्या अनुषंगाने जिल्हयातील दि. 30 जून 2017 रोजी
थकबाकीदार असलेल्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासन निर्णयानुसार खरीप
पिकासाठी दहा रुपयेचे तातडीचे कर्ज घेण्यासाठी त्या त्या गावातील शेतकऱ्यांनी
आवश्यक कागदपत्रासह आपले गाव दत्तक असलेल्या राष्ट्रीयकृत बँक,ग्रामीण बँक शाखेशी
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,जिल्हा अग्रणी बँक अधिकारी व
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री.जगदाळे यांनी केले आहे.
जिल्हयात नव मतदारांची नोंदणी मोहीम स्वरुपात राबवा -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
उस्मानाबाद.दि.13:- भारत
निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21) नोंदणी करण्याकरीता
जिल्हयात दि. 1 ते 31 जुलै 2017 या कालावधीत विशेष मोहीम राबवून या मोहिमेत उस्मानाबाद जिल्हयातील जास्तीत जास्त
तरुण व पात्र प्रथम मतदारांची नोंदणी करावी, असे निर्देश
उस्मानाबादचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी
दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तरुण व पात्र प्रथम
मतदारांची मतदान नोंदणी संदर्भात आढावा बैठक घेतली.यावेळी ते बोलत होते.यावेळी
उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग) प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद चेतन
गिराशे,उपविभागीय अधिकारी उमरगा निलेश श्रींगी, तहसिलदार उस्मानाबाद सुजित नरहरे,
तहसिलदार कळंब अशोक नांदगावकर, तहसिलदार तुळजापूर दिनेश झांपले, तहसिलदार लोहारा ज्योती
पुजारे, तहसिलदार वाशी संदीप राजपूरे, तहसिलदार परंडा श्री.स्वरुप कंकाळ,शिक्षणाधिकारी(माध्यमिक)श्री.उकिरडे
व जिल्हयातील विविध कॉलेजचे प्राचार्य आदींची प्रमुख्य उपस्थिती होती.
महाविद्यालयीन
प्रवेशाच्या वेळी नोंदणी दि. 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18
वर्ष पूर्ण झालेल्या नवीन पात्र मतदारांना महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळीच
मतदारयादीत नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून घोषणापत्र भरून घ्यावे.सर्व कॉलेजमधून
18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांची शंभर टक्के नोंदणी करावी,एक
ही विद्यार्थी नोंदणी पासून वंचित राहता कामा नये, मतदाराची दुबार नोंदणी होवू नये
यादृष्टीने वय 21 पेक्षा जास्त असल्यास नोंदणीचे वेळी प्रतिज्ञापत्र भरून
घ्यावे, दि. 22 जुलै 2017 या दिवशी जिल्हयातील सर्व महाविद्यालयात विशेष शिबिरे (Special
Camp) आयोजित करण्यात यावेत व जास्तीत जास्त पात्र मतदारांची
नोंदणी करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी यावेळी
दिल्या.
मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक
घरांना 31 जुलै 2017 पर्यंत घरोघरी भेट देवून मतदारांची नोंदणी, वगळणी व दुरुस्तीसाठी अर्ज नोंदवून घ्यावेत,नवीन मतदारांच्या नोंदणी सोबतच
बीएलओ यांनी घरोघरी भेट देताना मतदारयादीतील मतदार मयत असतील तर त्यांची माहिती
घेवून तसेच स्थलांतरीत मतदारांचीही माहिती घेवून त्यानंतर योग्य चौकशीनंतर मयत, स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करावी, असेही
यावेळी निर्देश जिल्हाधिकारी श्री.गमे
यांनी यावेळी दिले. Monday, 10 July 2017
स्व. वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या वतीने विविध योजना
हातलाई देवी डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रम
दहा हजार रुपयाच्या कर्जाची हमी शासनाने घेतली असल्यामुळे त्याचे तातडीने सर्व बँकांनी वाटप करावे -पालकमंत्री दिवाकर रावते
उस्मानाबाद,दि.10:- ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीक विमा सन
2016-17 ची रक्कम जमा आहे त्या शेतकऱ्यांचा
खरीप पीक विमा सन 2017-18 चा हप्ता त्या
रक्कमेतून भरुन घेतला जावा, असे निर्देश परिवहन, खारभूमी विकास तथा
पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते व पशुसंवर्धन, दुग्धविकास तथा सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या
अध्यक्षतेखाली पीक कर्ज /कर्जमाफी, जिल्हा वार्षिक योजना 2017-18
या वर्षांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री.रावते बोलत होते.
यावेळी, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर
जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,उपमुख्य कार्यकारी
अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा कृषी अधिक्षक
कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री.व्ही.आर.
जगदाळे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे पाटील, जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात,विभागीय वन अधिकारी राजेश्वर
सातेलीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे, सर्व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आदिंची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
पालकमंत्री श्री.रावते म्हणाले की, ज्या
शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमेची रक्कम जमा आहे व ज्या शेतकऱ्यांची खरीप पीक विमा सन 2016-17 ची रक्कम
अद्याप ही वितरण झाली नाही त्या शेतकऱ्यांच्या
रक्कमेतून खरीप पीक विमा सन 2017-18 चा
पीक विमा हप्ता भरुन घेतला जावा, दहा हजार रुपयाच्या कर्जाची हमी शासनाने घेतली
असल्यामुळे त्याचे तातडीने सर्व बँकांनी वाटप करावे.
खरीप हंगाम सन 2017-18 साठीचे पीक कर्जाचे
लक्षांक पूर्तता बँकांनी करावी, यासाठी पीक कर्ज वाटप मेळावे घ्यावेत, पीक कर्ज
वाटपाबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी समन्वय साधावा, अशा सूचना यावेळी
पालकमंत्री श्री. रावते यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री.रावते यांनी जिल्हयातील शेतकरी
कर्ज माफीचा आढावा घेतला. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2017-18
च्या योजनेच्या मंजूर नियतव्यय, अखर्चित निधी, दायित्व,उपलब्ध निधी आदींचा यावेळी
आढावा घेण्यात आला. नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्हा परिषदेच्या इयत्ता 1 ली ते 4 थी
पर्यंतच्या सर्व शाळा ई-लर्निंग करण्यासाठी यावेळी निधी उपलब्ध करुन देण्यात आला.
सहपालकमंत्री
श्री.जानकर यांनी शासनाच्या योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व
अधिकाऱ्यांनी सकारात्मक राहिले पाहिजे, त्याचबरोबर जिल्हयात जलयुक्तच्या कामांना
गती देवून कामे दर्जेदार व जलद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी
श्री.गमे यांनी नाविण्यपूर्ण योजनेतून अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे
यावेळी सांगितले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 करीता सर्वसाधारण
क्षेत्राकरीता 148 कोटी 13 लक्ष, अनुसुचित जाती उपयोजना करीता 70 कोटी 79 लक्ष, आदिवासी
क्षेत्राबाहेरील क्षेत्राकरीता उपयोजना करीता 2 कोटी 27 लक्ष 2 हजार नियतव्यय
मंजूर असल्याचे यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी सन 2017-18 च्या जिल्हा वार्षिक
योजनेचे सादरीकरण केले. विविध विभागाचे
विभाग प्रमुख आढावा बैठकीस उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)
