Saturday, 3 March 2018

महाआरोग्य शिबिराकरिता पूर्वतयारी प्रशिक्षण उत्साहात संपन्न






उस्मानाबाद,दि.03:-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 04 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर, पोलीस कवायत मैदान, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. 
            या शिबिरात स्वयंसेवक म्हणून सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे प्रशिक्षण आज पोलीस कवायत मैदानात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात महाआरोग्य शिबिरात कोण व्यक्ती कोणती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडणार याबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि आरोग्य दूत रामेश्वर भाऊ नाईक, डॉ. पाठक यांनी उपस्थित शिक्षक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, डॉक्टर्स, तलाठी, ग्रामसेवक इत्यादींना केले. त्याचबरोबर स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी नोंदणी करण्यात आली.  
यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,  पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, आरोग्य संचालक डॉ. प्रविण शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,  उपजिल्हाधिकारी करमरकर, चेतन गिरासे, निलेश श्रींगी, आरोग्य दूत रामेश्वरभाऊ नाईक, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व औषधी द्रव्ये विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी जवळपास 90 स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे अशा असंख्य जिल्हयातील इच्छूक अधिकारी, कर्मचारी व  नागरीकांनी मंडप 
ओसंडून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.   
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) अजिंक्य पवार, सर्व उपविभागीय अधिकारी, डॉ. गलांडे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. खापर्डे, धनंजय कुलकर्णी, डॉ. फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. थोरात, मुख्याधिकारी श्री. मनोहरे, आपत्ती जोखीम व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अनिल काळे, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, डॉक्टर्स, तलाठी, ग्रामसेवक, समाजसेवक यांच्यासह विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, रुग्णालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक आदिंची उपस्थिती होती.

Thursday, 1 March 2018

महाआरोग्य शिबिरासाठी सर्वांनी स्वयंसेवक म्हणून काम करावे -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे






4 मार्च रोजी उस्मानाबाद मध्ये महिला व बालकांसाठी होणार महाआरोग्य शिबीर 
उस्मानाबाद,दि.21:-  गरजू रुग्णांचा शोध घेऊन त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याकरीता 4 मार्च रोजी आयोजित महाआरोग्य शिबिरात सर्वांनी शक्य ते सहकार्य करावे व स्वयंसेवक म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 04 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर, पोलीस कवायत मैदान, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे, या महाआरोग्य शिबिराच्या पूर्वतयारीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,  पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,  उपजिल्हाधिकारी करमरकर, आरोग्य दूत रामेश्वरभाऊ नाईक, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व औषधी द्रव्ये विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
            या शिबिरात सुमारे 1 हजार 700 तज्ञ डॉक्टर सहभागी होणार असून त्यामध्ये पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. भोजराज, डॉ. रणजित जगताप, डॉ. रमाकांत पांडा, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे, प्रभारी आयुष संचालक डॉ. गोविंद खटी यांच्यासारखे जागतिक स्तरावर ख्याती मिळवलेलेही डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.  
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत जिल्हयाचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रविंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार सुजितसिंग ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राहूल मोटे, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीमती अविदाताई जगताप, नितीन काळे, ॲड अनिल काळे इत्यादींचे सहकार्य लाभले आहे.
            शिबिराच्या रचनेत एकूण तीन रुग्ण नोंदणी विभाग, नव्वद बाहयरुग्ण कक्ष, विशेष मोतीबिंदु, ह्दयरोग, बालशल्यचिकित्सा, महिला कर्मरोग तपासणी, त्वचारोग, हाडांचे विकार, मासिक पाळी संबंधी आजार, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा इत्यादी, चार सर्व सोयीसुविधायुक्त दंततपासणी वाहने, मॅमोग्राफी व कर्करोग तपासणी वाहन, दहा ॲम्ब्यूलन्स, दोन कार्डीयाक ॲम्ब्युलन्स, चार अग्नीशमन वाहने उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व गरजू रुग्णांना मोफत चष्मे, दातांची कवळी, औषधी, ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया, एम.आर.आय., सोनोग्राफी, एक्सरे, रक्त, लघवी तपासणी करावयाची आहे त्यांना सर्व सुविधा मोफत दिली जाणार आहे. तसेच सर्वांना मोफत भोजन व पाणी आयोजकांमार्फत दिले जाणार आहे.
            या शिबिरात उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, वाशी, कळंब, परंडा, भूम, उमरगा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. 25 फेब्रुवारी ते दि. 28 फेब्रुवारी 2018 रोजीपर्यंत 55 हजार रुग्ण पूर्व तपासणी नोंदणी करण्यात आली आहे. रुग्ण पूर्व तपासणी नोंदणी लक्षात घेता या शिबिरात 1 लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे.    
या शिबिरांचा लाभ सर्व गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आरोग्य दूत रामेश्वरभाऊ नाईक आणि महाआरोग्य शिबिर आयोजन समितीने केले आहे. 
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) अजिंक्य पवार, सर्व उपविभागीय अधिकारी, डॉ. गलांडे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. खापर्डे, डॉ. फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. थोरात, मुख्याधिकारी श्री. मनोहरे, आपत्ती जोखीम व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अनिल काळे, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, नितीन भोसले यांच्यासह विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, रुग्णालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक आदिंची उपस्थिती होती.  

Wednesday, 28 February 2018

जिल्हा माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा


  



उस्मानाबाद,दि.27 :- मराठी भाषेचा गौरव म्हणून जेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करावा या शासन निर्णयाच्या अनुषंगाने येथील जिल्हा माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
             कार्यालयातील सर्व कामकाज मराठीतून करावे या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संगणकावरील व मोबाईलवरील  मराठी टायपिंग या विषयी लघु कार्यशाळा घेण्यात आली.   
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज शिवाजी सानप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी दिलीप वाठोरे,सिद्धेश्वर कोंपले,अनिल वाघमारे, शशिकांत पवार अनुलोम चे सदस्य सचिन कोळी, विका कांबळे पठाण,सचिन मोरे,आशिष लगाडे आदी   उपस्थित होते.  

जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद येथे मराठी भाषा दिन साजरा

पोलीस दलाने ISO मानांकन मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे -पोलीस महानिरीक्षक भांबरे






  
उस्मानाबाद,दि.28 :- पोलीस दलाचे काम हे खूप ताण-तणावाचे काम आहे, कामाचा भार सांभाळून आयएसओ मानांकन मिळणे हि खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे गौरवोदगार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस  महानिरीक्षक मिलिंद भांबरे यांनी यावेळी काढले. येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयएसओ प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.उस्मानाबाद मध्ये हि गोष्ट घडणे हि खूप मोठी बाब आहे, दैनंदिन ताणतणाव असताना संघटितपणे काम करणे हि खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. एका ध्येयासाठी सर्वाना प्ररीत करून ध्येय साध्य केले, त्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे त्यांनी  अभिनंदन केले.
         जनतेला उत्तम सेवा देण्यासाठी आपण काही मापदंड आखले पाहिजेत, त्यानुसार प्रयत्न करून यश मिळवावे  आणि ह्या यशाला आयएसओ मानांकन मिळणे हे उत्साहवर्धक आहे. सकारात्मक सेवाभाव मनावर बिंबवून ते आचरणातआणावे आणि यश मिळवावे .स्वतःला तेवत ठेवणे आणि टिकवणे आवश्यक आहे, असा विश्वास  त्यांनी यावेळी कार्माचार्याप्रती व्यक्त केला.
         या वेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी उस्मानाबाद पोलीस दलासाठी हा सुवर्ण क्षण असून या आनंदाबरोबरच आपली जबाबदारी देखील वाढली आहे असे  बोलून सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच अभिनंदन केलं.
             याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,मोतीचंद राठोड(उस्मानाबाद) सुनिल नेवसे ( उस्मानाबाद शहर), संभाजी बापूराव पवार (उस्मानाबाद ग्रामीण), श्री .गाते (आनंद नगर), उत्तम जाधव(बेंबळी ), राजेंद्र  बोकडे (तुळजापूर ), मिरकल (तामलवाडी), पी.सी सूर्यवंशी (नळदुर्ग), माधव गुंडले (उमरगा), एम.आय शेख (मुरूम), एस ए भंडारे (लोहारा), सूर्यवंशी  (भूम), डंबाळे (वाशी), मोताळे (परंडा), साबळे (अंभी), डी.एस बोरीगड्डे (कळंब), के एस महानभाव (ढोकी), संजीवन मिरकले (शिरढोण ), राजेंद्र बनसोडे (येरमाळा) व त्या त्या पोलीस  ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  पी.आय. अनिल सूर्यवंशी  यांनी केले.  

Monday, 26 February 2018

उस्मानाबाद मध्ये होणाऱ्या महाआरोग्य शिबीर स्थळाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी




उस्मानाबाद,दि.26:-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 04 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर, पोलीस कवायत मैदान, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे.   
            आज या कार्यक्रमस्थळाची व तेथे सुरु झालेल्या कामांची जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पाहणी केली. त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. मनोहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी प्रताप शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी पाहणी केली.