Thursday, 15 September 2016

जनतेचा विश्वास …जनतेशी संवाद “संवाद पर्व” उस्मानाबाद आकाशवाणी केंदा्रवरून प्रसारित




उस्मानाबाद,दि.15:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली  गणेशोत्सवात जनतेला शासकीय योजनांविषयीचे जनजागरण व्हावे याकरिता संवाद पर्वहा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाच्याअनुषंगाने शासनाच्या विविध योजनांची माहिती आकाशवाणी सारख्या लोकप्रिय माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचावी याकरिता आकाशवाणी केंद्र उस्मानाबाद चे केंद्र संचालक संजय बरिदे यांनी पुढाकार घेतला.
या संवाद पर्व कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे, स्वच्छ भारत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रमाकांत गायकवाड, समाजकल्याण अधिकारी एस. एम. मिनगिरे, जिल्हा रूग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी गणेश काकडे आणि लघुसिंचन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर हे अधिकारी सहभागी झाले होते. या अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती जनतेला आकाशवाणीच्या माध्यमातून दिली.

या कामात आकाशवाणी केंद्र उस्मानाबादचे प्रसारण अधिकारी कृष्णा शिंदे आणि कार्यक्रम निर्माता संजय पाटोळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

जनतेचा विश्वास …जनतेशी संवाद “संवाद पर्व” कार्यक्रमास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

















उस्मानाबाद,दि.15:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली  गणेशोत्सवात जनतेला शासकीय योजनांविषयीचे जनजागरण व्हावे याकरिता संवाद पर्वहा उपक्रम राबविण्यात आला.जनतेचा विश्वास …जनतेशी संवाद संवाद पर्वया  उपक्रमास उस्मानाबादकरांनी उत्स्फूतर्‍ प्रतिसाद दिला.
          यानिमित्ताने या अभियानात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, जिल्हा रुग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी गणेश काकडे आणि सहायक पोलीस निरिक्षक विरयानी  कदम हे सहभागी झाले होते. जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या या अभियानाची सुरूवात गणेशनगरमधील शिवसह्याद्री गणेश मंडळात पहिला कार्यक्रम घेवून करण्यात आली. याप्रसंगी  मंडळाचे कैलास पुरी, चेतन साळुंखे, शिवाजी मुळे, प्रवीण तट, संजय लोखंडे, डॉ. विवेक माने हे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी संवाद पर्वकार्यक्रमाचा उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला.त्याचबरोबर शासनाच्या योजनांचा जनतेने अभ्यास करावा,शासनाच्या कोणकोणत्या संकेतस्थळावरून शासकीय योजनांची माहिती मिळू शकते, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपक्रम कोणकोणते आहेत याविषयी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. त्यानंतर श्री बाल हनुमान गणेश मंडळ,गवळी गल्ली या गणेशोत्सव मंडळात संवाद पर्व हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलच्या  प्रमुख  सहायक पोलीस निरिक्षक विरयानी  कदम यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सेल आणि त्याचे काम,सायबर गुन्हे याबाबतची माहिती देवून प्रबोधन केले,याशिवाय स्त्रियांविषयीच्या कायद्यांचीही माहिती त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांना दिली.
          त्यानंतर जिल्हा रूग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी श्री.गणेश काकडे यांनी जिल्हा रुग्णालयातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा,आरोग्य विभागातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा, हेल्पलाईन क्रमांक याविषयीची सविस्तर माहिती दिली. यावेळी मंडळाचे भालचंद्र हुच्चे,काशिनाथ दिवटे मन्मनाथ पाळणे,गजानन गवळी,विष्णुदास सारडा बंडू गवळी हे पदाधिकारी उपस्थित होते.उस्मानाबादमधील प्रतिष्ठित असलेल्या या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून अशा प्रकारचा उपक्रम राबविला जाण्याची ही पहिलीच वेळ असून याबाबत हे शासन जनतेच्या विकासासाठी संवेदनशील असल्याची खात्री झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
          अशाच प्रकारे सम्राट गणेश मंडळ, सावरकर चौक, शिवसह्याद्री गणेश मंडळ, गणेश नगर,शिवप्रताप बाल गणेश मंडळ, सांजा चौक  या ठिकाणीही  संवाद पर्व उपक्रम राबविण्यात आला.या सर्व ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांनी पशुसंवर्धन विभागाची माहिती, या विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना, जिल्हा रुग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी गणेश काकडे यांनी जिल्हा रुग्णालयातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा,आरोग्य विभागातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा, हेल्पलाईन क्रमांक याविषयी,  सहायक पोलीस निरिक्षक विरयानी  कदम यांनी सायबर सेल आणि त्याचे काम,सायबर गुन्हे याबद्दल तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी संवाद पर्वकार्यक्रमाचा उद्देश, शासनाच्या कोणकोणत्या संकेतस्थळावरून शासकीय योजनांची माहिती मिळू शकते, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपक्रम कोणकोणते आहेत याविषयी जनतेचे प्रबोधन केले. या सर्व उपक्रमात दूरदर्शनचे प्रतिनिधी देविदास पाठक यांनी विशेष सहकार्य केले.

या सर्व गणेशमंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले,शासनाचे अभिनंदन केले, माहिती जनसंपर्क महासंचालनालय,जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा प्रशासन यांनी गणेशोत्सवासारख्या लोकाभिमुख उत्सवाच्या निमित्ताने घेतलेला हा उपक्रम खरोखरीच अत्यंत स्तुत्य असल्याचे जाहीरपणे सांगितले.

Tuesday, 13 September 2016

जिल्हयात 22.99 मि.मी. पाऊस उमरगा तालुक्यात सर्वाधिक 91.00 मि.मी. पावसाची नोंद


उस्मानाबाद,दि.14- जिल्हयात बुधवार 14 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 239.92 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्हयात दिवसभरात सरासरी 29.99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
        तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे: उस्मानाबाद- 22.63 मि.मी., तुळजापूर-31.29मि.मी, उमरगा-91.00मि.मी, लोहारा-53.00मि.मी, कळंब 8.67 मि.मी., भूम-10.40 मि.मी., वाशी-11.33 मि.मी., परंडा-11.60 मि.मी, जिल्हयात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 56.81 टक्के नोंद झाली आहे.

Sunday, 11 September 2016

पालक सचिवांकडून आढावा बैठकीसह पीक परिस्थितीची पाहणी



उस्मानाबाद.दि.9:- प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा पालक सचिव  उस्मानाबाद जिल्हा श्री. महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेऊन  संबंधित अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना दिल्या . या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते , अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक ,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते . आढावा बैठकीत प्रारंभी महेश पाठ‍क यांनी जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबतची माहिती संबंधितांकडून घेऊन योग्य त्या सूचना दिल्या . याबरोबरच जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान , पीक विमा योजना , आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत , आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांचे सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे,आरोग्य पत्रिका , आधार कार्ड , जलयुक्त शिवार अभियान व सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.या बैठकीनंतर पालक सचिव महेश पाठक यांनी जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील परतापूर व मस्सा या गावी शेतातील सोयाबीन पीकांची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा केली  व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या पीक परिस्थिती पाहणी  वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , कृषी विभागाचे अधिकारी , ग्रामस्थ व  शेतकरी उपस्थित होते .