उस्मानागाद.दि.9:-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, उस्मानाबाद आयोजित हॉकी, फुटबॉल, कुस्ती, खेळांच्या क्रीडा
प्रशिक्षण शिबिरांचे उद्घाटन दि. 6 फेबुवारी 2017 रोजी सांय.
5.30 वा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा हॉकी / फुटबॉल
संघटननेचे सचिव श्री. जावेद शेख व प्रा. रवि चव्हाण, वाशी तालुका यांच्या प्रमुख
उपस्थितीत श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले.
याप्रसंगी हॉकी, फुटबॉल, कुस्ती खेळाचे मिळुन एकुण 180
प्रशिक्षणार्थी शिबिरास सहभागी आहेत. ही प्रशिक्षण शिबीर दि 6 ते 15 फेबुवारी,2017 या कालावधीत सकाळी व संध्याकाळी दोन्ही सत्रात सुरु आहे.
प्रशिक्षणार्थींना संपूर्ण अद्यावत क्रीडा साहित्य, सकाळी पोष्टिक आहार दिला जात आहे, असे जिल्हा क्रीडा
अधिकारी संजय महाडिक यांनी सांगितले आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. जावेद शेख यांनी खेळाडूंनी जिद्दीने सराव केल्यास यश नक्कीच मिळते
असे सांगितले. या प्रशिक्षण शिबिरासाठी
राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक, फुटबॉल- श्री. एम.झेङ शेख, हॉकी- श्री. झेङ
आय. कुरेशी, कुस्ती - श्री. एस. एम. वांजळे
यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुध्द प्रशिक्षण दिले जात आहे असे जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
