Tuesday, 7 February 2017

राज्यातील सर्वात पहिले "लोकराज्य संगणक व्यवस्थापन शास्त्र कॉलेज" बनले उस्मानाबादचे मदर कांचन कॉलेज


       उस्मानाबाद,दि.7:-लोकराज्याचा प्रचार आणि प्रसिध्दी उस्मानाबाद जिल्हयात मोठया प्रमाणात होत आहे." लोकराज्य " मासिकाचे महत्व उस्मानाबाद मध्ये सर्वत्र सर्वमान्य होऊ लागले आहे. या जिल्हयातील अतुल अशोक अजमेरा या युवकाने आपल्या आजीच्या नावाने मदर कांचन कॉलेज, उस्मानाबाद सुरू केले. संगणक शास्त्र (सी.आय.टी) व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) यांचे शिक्षण येथील विद्यार्थ्यांना दिले जात आहे. या विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षांची आवड ओळखून श्री. अजमेरा यांनी या मुलांना "लोकराज्य" या शासनाच्या मुखपत्र असलेल्या मासिकाची ओळख करून दिली. आणि त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्याशी संपर्क साधला.
          या विद्यार्थ्यांना श्री. सानप यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती तर दिलीच परंतू कोणत्याही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी माहिती व जनसंर्पकच्या महान्युजवेबपोर्टल,लोकराज्य तसेच महाराष्ट्र अहेड, दिलखुलास आकाशवाणीवरील तर जय महाराष्ट्र हा दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा कशाप्रकारे त्यांना उपयोग होऊ शकेल याची ही सविस्तर माहिती दिली.
        याच प्रेरणेतून आज श्री.आजमेरा यांनी श्री.सानप यांच्याकडे या विद्यार्थ्यांना लोकराज्य सभासद करुन घेण्याकरीता त्यांचा नावाची यादी तसेच धनादेशही सुपूर्द केला अशा प्रकारे उस्मानाबाद मधीलच नव्हे तर राज्यातील पहिले लोकराज्य संगणक व व्यवस्थापन शास्त्र कॉलेज बनन्याचा बहूमान मदर कांचन कॉलेज, उस्मानाबाद यांनी मिळविला आहे.याबद्दल सर्वांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.या यशामध्ये महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.