Friday, 8 September 2017

आपत्ती जोखिम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रमाची कार्यशाळा संपन्न




आपत्ती जोखिम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रमाची कार्यशाळा संपन्न 
उस्मानाबाद, दि. 7 :- विविध विभागाच्या विकासाच्या कामामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे मुद्दे सामिल करुन लोकांचे किंवा समुदायाचे संभाव्य आपत्ती व्य्वस्थापनाच्या वेळी नुकसान टाळता यावे, यासाठी आपत्ती जोखीम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रम या प्रकल्पसंदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्‌दघाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी, माजी उपाध्यक्ष आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण (बिहार राज्य) श्री. अनिल सिंह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन तज्ञ श्री. सरबजित सिंग सहोटा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, रेडआर इंडियाचे  कार्यकारी संचालक  श्री.तानाजी शेन तसेच मंदार वैद्य, प्रविण पवार, चंद्रकांत देवकर, शाबाज खान, तनुजा आदींसह जिल्ह्यातील विविध विभागाचे  प्रमुख यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासन, युनिसेफ व रेडआर इंडिया यांचा जिल्ह्यात संयुक्त पथदर्शी कार्यक्रम आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले की, जिल्ह्यास विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो कधी भुकंपानंतर जिल्ह्यात दुष्काळ, तीव्र पाणी टंचाई, अतिवृष्टी, पूर, वीज अशा अनेक आणि त्यामधुन उद्‌भवनाऱ्या धोक्यांना सामोरे जावे लागते अशा समस्यांमुळे विकासकामांना मोठया प्रमाणावर बाधा येते. त्यामुळे विविध विभागाच्या विकास आराखडयामध्ये आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा तपशीलवार समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पथदर्शी जिल्हा म्हणून आपला जिल्हा निवडला आहे ही एक चांगली संधी आहे,  याचा चांगला उपयोग करुन घेण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती जोखिम व्यवस्थापनासह विकास आराखडयाचे आपल्या विभागात काय नियोजन करता येते ते पाहावे, असे ही सांगितले.
सरबजित सिंह यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपत्ती जोखिम व्यवस्थापनाचे काम करताना संभाव्य आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी जिल्हा, विभाग व गावपातळीवर शासकीय समन्वय यंत्रणा समृध्द झाली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये  मदतीबरोबर अन्य कामे ही केली पाहीजेत.
यावेळी अनिल सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याचे महत्व सांगितले. तसेच प्रत्येकाची सुरक्षा जशी महत्वाची आहे तसेच संभाव्य आपत्तीच्या वेळी प्रत्येक विभागाची ही सुरक्षा झाली पाहीजे, संभाव्य परिस्थितीला हाताळण्यासाठी पूरपरिस्थीतीमुळे साथ रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दुरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दुरसंचार विभाग, रस्त्यांने वाहतूकीचा संपर्क असावा यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांनी ही सज्ज असले पाहिजे यासाठी सर्व विविध प्रमुखांनी आपल्या विभागाचा पुढाकार घेवून योगदान दयावे यासाठी ही कार्यशाळा आवश्यक आहे.
या कार्यक्रमाची थोडक्यात श्रीमती. तेलोरे यांनी रुपरेषा यावेळी विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार वैद्य यांनी केले, तर आभार चंद्रकांत देवकर यांनी व्यक्त केले

Tuesday, 5 September 2017

शौचालय बांधा व त्याचा नियमित वापर करा -महारुद्र गालट


उस्मानाबाद,दि.5 :- स्वच्छता अभियानात नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून, प्रत्येकाने शौचालय बांधून त्याचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन नगरपरिषदेचे व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शहरातील शिवाजीनगर, नगरपालिका शाळा क्र. 6 च्या परिसरातील शिवप्रताप तरुण गणेश मंडळ आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महारुद्र गालट बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. गजानन परळीकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांची उपस्थिती होती. 
महारुद्र गालट यांनी शौचालय बांधकामासाठी नगर परिषदेकडून मिळणारे अनुदान, बचत गट संकल्पना,  प्रधानमंत्री आवास योजना, स्वयंरोजगार उपांगाअंतर्गत विविध उद्योगांची निवड, कर्ज प्रकरण, बँक व्यवहार इत्यादी बाबत उपस्थित गणेश भक्तांना सविस्तर मार्गदर्शन केले.
            मृत्यूनंतर शरीराची पारंपरिक विधीनुसार विल्हेवाट लावली जाते. परंतु मृत्यूनंतरही आपण इतरांच्या कामी येऊ शकतो ते केवळ अवयवदानाच्या माध्यमातूनच. अवयवदानातून शरीराचे विविध महत्त्वपूर्ण भाग आणि कातडी गरजूंना मिळण्यास मदत होते. अवयवदान करतानाही शासन मोठ्या प्रमाणात काळजी घेऊन कडक नियमावलीचे पालन करते. रुग्ण व नातेवाईकांच्या संमतीनेच अवयव काढून गरजू रूग्णांना वेळेत अवयवाचे प्रत्यारोपन केले जाते. त्यासाठी डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन अवघड असे हे कार्य शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडावे लागते.
            अवयवदात्याचे अवयव काढल्यानंतर अतिशय आदरपूर्वक संबंधित शरीर त्यांच्या  नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात येते, अशी माहिती  डॉ. गजानन परळीकर यांनी यावेळी दिली. तसेच अवयवदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. संकल्प करावा, असेही डॉ. परळीकर म्हणाले. ज्येष्ठ, तरुण आणि चिमुकल्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी गणेशोत्सव काळातील संवाद पर्व या उपक्रमाच्या माध्यमातून शासनामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची, उपक्रमांची जनतेला माहिती व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली. 
प्रारंभी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन गणेश मंडळाचे अनिकेत पवार यांनी केले तर आभार श्री. विकी ढेकणे यांनी मानले. कार्यक्रमास गणेश मंडळाचे बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब कथले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण-तरूणी, बालवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्वच्छता अभियानात जिल्हयातील नागरिकांचाही सहभाग महत्वाचा महारुद्र गालट


उस्मानाबाद,दि.5 :-  2 ऑक्टोबर, 2017 पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याबाबतचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्ह्यातील शहरी क्षेत्र हागणदारीमुक्‍त करण्‍याच्‍या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केलेले आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक घरी शौचालय बांधून त्याचा वापर केला पाहिजे कोणीही मागे राहू नये, या अभियानात नागरिकांचाही सहभाग खूप महत्वाचा आहे असे प्रतिपादन नगरपरिषदेचे व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शहरातील गणेश नगर भागातील शिवसहयाद्री तरुण गणेश मंडळ आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महारुद्र गालट बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. गजानन परळीकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांची उपस्थिती होती. 
महारुद्र गालट यांनी शौचालय बांधकामासाठी नगर परिषदेकडून मिळणारे अनुदान, बचत गट संकल्पना,  प्रधानमंत्री आवास योजना, स्वयंरोजगार उपांगाअंतर्गत विविध उद्योगांची निवड, कर्ज प्रकरण, बँक व्यवहार इत्यादी बाबत उपस्थित गणेश भक्तांना सविस्तर मार्गदर्शन केले.
            मृत्यूनंतर शरीराची पारंपरिक विधीनुसार विल्हेवाट लावली जाते. परंतु मृत्यूनंतरही आपण इतरांच्या कामी येऊ शकतो ते केवळ अवयवदानाच्या माध्यमातूनच. अवयवदानातून शरीराचे विविध महत्त्वपूर्ण भाग आणि कातडी गरजूंना मिळण्यास मदत होते. अवयवदान करतानाही शासन मोठ्या प्रमाणात काळजी घेऊन कडक नियमावलीचे पालन करते. रुग्ण व नातेवाईकांच्या संमतीनेच अवयव काढून गरजू रूग्णांना वेळेत अवयवाचे प्रत्यारोपन केले जाते. त्यासाठी डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन अवघड असे हे कार्य शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडावे लागते.
            अवयवदात्याचे अवयव काढल्यानंतर अतिशय आदरपूर्वक संबंधित शरीर त्यांच्या  नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात येते, अशी माहिती  डॉ. गजानन परळीकर यांनी यावेळी दिली. तसेच अवयवदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. संकल्प करावा, असेही डॉ. परळीकर म्हणाले. ज्येष्ठ, तरुण आणि चिमुकल्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी गणेशोत्सव काळातील संवाद पर्व या उपक्रमाच्या माध्यमातून शासनामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची, उपक्रमांची जनतेला माहिती व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली. 

प्रारंभी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन गणेश मंडळाचे खजीनदार प्रविण तट यांनी केले तर आभार श्री. राहुल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास गणेश मंडळाचे कैलास पुरी, विश्वजीत म्हेत्रे, चेतन साळुंके, राजेश गायकवाड, अतुल शेरकर, सुनिल परसे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण-तरूणी, बालवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

शारदिय नवरात्र महोत्सवा निमित्त नारळ व सुटे तेल विक्रीस बंदी



उस्मानाबाद.दि.5:- श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर मध्ये श्रीदेविजीच्या शारदिय नवरात्र महोत्सव साजरा होत असून या कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दि.13 सप्टेंबर 2017 ते 6 ऑक्टोबर 2017 पर्यंत श्रीतुळजाभवानी मंदिर येथे 200 मीटर परीसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे,असे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

ई.बी.सी.सवलतीसाठी प्रस्ताव सादर करावेत


उस्मानाबाद.दि.5:- सन 2017-18 मधील ई.बी.सी. शैक्षणीक सवलती व शिष्यवृत्ती चे विहीत नमुन्यातील प्रस्ताव तपासून स्विकृत करण्यासाठी तालुकास्तरावर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी आपल्या शाळेचे विषयांकित प्रस्ताव विहित नमुन्यात तयार करुन आपल्या तालुक्याच्या ठिकानी असलेल्या तारखेस कॅम्पच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहून संबंधित/अधिकारी कर्मचारी यांचे कडून तपासून घेऊन सादर करावेत, कॅम्पच्या तारखेस उपस्थित न राहिल्यास होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) औदुंबर उकिरडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
       पुढीलप्रमाणे तालुका ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.- दि.6 सप्टेंबर  रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उमरगा येथे भारत विद्यालय, तुळजापूर/लोहारा तालुक्यासाठी शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विद्यालय तुळजापूर येथे दि.7 सप्टेंबर  रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत, कळंब/वाशी तालुक्यासाठी विद्याभवन हायस्कूल कळंब येथे दि.8 सप्टेंबर  रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत, परंडा/भूम तालुक्यासाठी बावची विद्यालय परंडा येथे दि. 13 सप्टेंबर  रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत,उस्मानाबाद तालुक्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यालय उस्मानाबाद येथे दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत कॅम्प सुरु राहील.

       या ई.बी.सी. प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे जोडावित- शाळेचे पत्र, प्रमाणपत्र, सवलतीचे देयक नमुना नं.1 प्रपत्र अ मध्ये विद्यार्थी संख्या इयत्ता निहाय प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, इतर शुल्क विहित नमुन्यात विद्यार्थ्यांची यादी अनुदान आदेशाची प्रत.हा प्रस्ताव संगणकीकृत करुन 1 प्रतीत योजना निहाय स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा. सन 2017-18 ई.बी.सी. योजनेची रक्कम संबंधीत मुख्याद्यापक यांचे बँकखाते वर जमा करण्यात येणार असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडून खाते क्रमांक,शाखा, तालुका इत्यादी संपूर्ण तपशिल प्रस्तावासोबत सादर करावा,वरीलप्रमाणे दिनांकास कॅम्प मध्ये परिपूर्ण प्रस्ताव सादर करताना सन 2016-17 मध्ये प्राप्त शिष्यवृत्ती संबंधित विद्यार्थ्यांना वाटप केल्याचे पत्रके सादर केल्याशिवाय प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे ही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

"अवयवदान" विषयावरील जनजागृती विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा


उस्मानाबाद.दि.5:- विद्यार्थ्यांनी अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करुन त्याबाबत असणारे  गैरसमज दूर करुन  अवयदान करण्याबाबत प्रभावी मोहीम राबवावी, असे प्रतिपादन जिल्हा अवयवदान मोहीम समन्वयक डॉ.गजानन परळीकर यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने "दिशा करिअर ॲकॅडमी" येथे आयोजित ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात डॉ. परळीकर बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, दिशा करिअर ॲकडमीचे संचालक प्राध्यापक श्री. बाळकृष्ण उंबरे, प्रा. सिध्देश्वर मते आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी बोलताना डॉ. परळीकर म्हणाले की, जनजागृतीच्या अभावी अवयवदान करणाऱ्यांची संख्या आज समाजात खूप कमी आहे, त्यामुळे अनेक गरजवंत उपेक्षित आहेत.त्यासाठी युवा शक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात अवयवदानाच्या बाबतीत जनजागृती करुन अवदानाची चळवळ बनवली पाहीजे. उपस्थित विद्यार्थ्यांना अवयवदान करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
             जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यावेळी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच सखोल ज्ञान मिळावे म्हणून ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करिअर ॲकडमीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असून या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनाची माहिती मिळते, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी  लोकराज्य मासिकाचे वार्षिक  वर्गणीदार होण्याचे आवाहन यावेळी केले.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अनेक कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात यामध्ये शासनाच्या  विविध योजना, यशकथा, वेचक वेधक, फस्ट पर्सन, नौकरी मार्गदर्शन, महाभ्रमंती,  दिलखुलास, जय महाराष्ट्र,छायाचित्र दालन, चित्रफीत दालन आदींची "महान्यूज" या ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सविस्तर व विश्वासार्ह माहिती दिली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी महान्यूज ही पाहिले पाहिजे असे सांगितले. 
या "संवाद पर्व" कार्यक्रमात श्री.सानप यांनी स्पर्धा परिक्षेतील मुलाखत व व्यक्तिमत्व विकास या विषयावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी केले.
नगरपालिका प्रशासनाचे व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी विद्यार्थ्यांना नगरपालिका प्रशासन कशा प्रकारे काम करते, नागरी सुविधा, नगरपालिकेत प्रशासन अधिकारी निवड होते, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नगरपालिकेत कुठली कुठली प्रशासनाचे पदे असतात या विषयी माहिती दिली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी  या कार्यक्रमात सक्रिय होवून आपल्या अडचणी व शंका उपस्थित करुन त्याचे मान्यवरांकडून निरसन करुन घेत चर्चात्मक संवाद साधला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर बंडगर  यांनी केले तर आभार संदीप गायकवाड  यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. 

Monday, 4 September 2017

बहुरुपी कलावंतांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी कार्य करणार समाजकल्याण अधिकारी श्री. मिनगीरे


उस्मानाबाद, दि.04:- बहुरुपी कलाकारांनी संपूर्ण आयुष्यभर विविध कलांद्वारे समाजाला आनंद दिला आहे, शासनाच्या वतीने समाजकल्याण विभागांतर्गत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल अशा प्रकारचे कार्य पुढील काळात करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचचे समाज कल्याण अधिकारी श्री. मिनगीरे यांनी दिली.  
            जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील हंगरगा वस्ती येथे संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    
यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी गोरे, उपसरपंच मधुकर भंडारे, नागनाथ लोंढे, राजाभाऊ घोडके, डॉ. किरण पवार, डॉ. कुतवाळे यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.    
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, सांस्कृतिक, कला, वाड्मय क्षेत्रात  बहुरुपी कलाकारांची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. ज्या स्त्री किंवा पुरुष कलावंताचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांना शासनाच्या वतीने विशेष सहाय्य केले जाते. या ठिकाणच्या जास्तीत-जास्त कलावंतांना मानधन देण्यासाठी मी प्रयत्न करीन तसेच शासनाच्या वतीने असणाऱ्या योजनांचा लाभ देण्याचाही प्रयत्न करीन. तसेच संवादपर्व हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.   
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यावेळी बोलताना म्हणाल्या की, कलावंताच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येतो त्यासाठी या भागातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज एकत्रीतरित्या भरुन सादर करावेत आणि या भागातील एकही लहान मूल शिक्षणापासुन वंचित राहायला नको यासाठी आवश्यक ती मदत करण्यास उत्सुक असल्याचे सांगीतले.
त्यानंतर शाहीर राणा जोगदंड, माऊली विभूते, सिध्दराम विभूते, निलम विभूते यांनी समाजप्रबोधनपर गीत सादर केली तर बहुरुपी कलावंतांनी रामायणाचे सादरीकरण कलेच्या माध्यमातून सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी हंगरगा वस्तीच्या गणेश मंडळाचे पदाधिकारी, बहरुपी कलावंत, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

स्पर्धा परिक्षेसाठी इतिहासाचा अभ्यास करताना संदर्भग्रंथांचेही वाचन करा पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे


उस्मानाबाद, दि.03:- स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना इतिहास या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त संदर्भग्रंथांचेही वाचन करावे, असे प्रतिपादन पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे  यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या वतीने मौजे ढोकी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, उदगीर, जिल्हा लातूर आणि जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, ढोकी येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश बप्पा देशमुख, राहुल पाटील, राहुल जगताप व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.   
जयराज खोचरे यांनी सांगितले की, इतिहास या विषयाचा अभ्यास एखाद्या चांगल्या संदर्भ ग्रंथातून, क्रमिक पुस्तकातूनच सुरुवात करा, जेणेकरुन सर्व प्रश्न प्रकारांनुसार तुम्ही विचार कराल आणि कमी वेळेत त्या संबंधीत विषयात पारंगत व्हाल. स्पर्धा परीक्षेचा फक्त अभ्यास करु नका तर तो आपल्या जगण्याचा एक भाग बनवा. जास्त संदर्भग्रंथ वाचण्यापेक्षा प्रत्येक घटकावर एक किंवा दोन संदर्भग्रंथांचे वाचन करा, सध्याच्या परीक्षेचे स्वरुप गतिशील झाले आहे त्यामुळे केवळ माहितीचा साठा उपयोगी नाही, वाचन किंवा अभ्यास विश्लेषणात्मक आणि सुसंगत असणे गरजेचे आहे, प्रत्येक गोष्टीत अभ्यास शोधा तरच तुमच्यामध्ये भावी अधिकारी होण्याचे गुण तयार होतील.
तसेच शासन विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल असे अनेक उपक्रम राबवित आहे, याचाच एक भाग म्हणून संवादपर्व हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.   
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना अनेक शंकाकुशंकानी मन वेढलेलं असतं, त्यामुळे सर्वप्रथम या शंकाकुशंका, संशयकल्लोळ मनातून बाजूला करा, ज्या पदासाठी आपण तयारी करतोय त्याचा अभ्यासक्रम काय आहे, बरेच विद्यार्थी परिक्षा पास होवून देखील मुलाखतीत पात्र ठरीत नाहीत, त्यामुळे मुलाखतीची तयारी आपण कशा पध्दतीने केली पाहिजे, मुळात आयुष्य हे
सरल, सुगम कधीही नसतं. अनंत अडचणी, अडथळे, विवंचना यातून मार्ग शोधावा लागतो. त्या
आयुष्याच्या अडथळ्यांच्या तुलनेत हे अडथळे अगदी किरकोळ आहेत. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा, आज ना उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.  

यावेळी ढोकी गावचे सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.