Saturday, 31 August 2019

मागासवर्गीय शेतकऱ्यांनी/महिलांनी विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करावेत

मागासवर्गीय शेतकऱ्यांनी/महिलांनी
विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करावेत
उस्मानाबाद,दि.30(जिमाका):-  जिल्हा परिषद स्वसंपादित उत्पन्नातील 20 टक्के सेस योजनेंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय शेतकऱ्यांना एचडीपीई पाईप पुरवठा करणे,मागासवर्गीयांना शेतकऱ्यांना पाच एचपी पानबुडी पंप पुरविणे, मागासवर्गीयांना शेळी -बोकड गटाकरिता अनुदान देणे,मागासवर्गीय महिलांना मिरची कांडप यंत्राकरिता अनुदान देणे,मागासवर्गीय महिलांना शिलाई कम पिको फॉल मशीनकरिता अनुदान देणे,या योजना राबविण्यात येतात.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अनु जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील ज्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याकडे दि. 4 सप्टेंबर 2019 पाठवून द्यावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
                                             ****
वृत्त क्रमांक- 588
कुष्ठरोग शोध, क्षयरोग रुग्ण तपासणी,असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक जागरूकता अभियानाचा प्रत्येक गरजूने लाभ घ्यावा
                                              - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद,दि.30(जिमाका):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने कृष्ठरोग रुग्ण शोध अभियान व असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक जागरूकता अभियान दि. 13 ते 28 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यास येत असून या अभियानाचा जिल्हयातील प्रत्येक गरजूने लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
या  अभियानाच्या अंमलबजावणीकरिता दि. 28 ऑगस्ट 2019 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा सभा घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बोलत होत्या.या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे-पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोपल, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग डॉ. रफिक अन्सारी , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हास्तरीय समितीचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.



या मोहिमेमध्ये समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध उपचाराखाली आणणे, नवीन सासंर्गिक रुग्णांची साखळी खंडित करणे, हा या मोहिमेचा उद्देश असून दि. 13 ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसोबतच क्षयरोग व अ सासंर्गिक आजाराची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात शंभर टक्के व शहरी भागातील निवडक भागातील 30 टक्के सर्वेक्षण करण्यात येणार असून उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी ग्रामीण भागात 1 हजार 296 व शहरी भागातील भागासाठी 132 पथके तयार करण्यात आलेली असून त्यांच्यामार्फत कुष्ठरुग्ण शोध मोहीम व असांसर्गिक आजाराची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे.
तरी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बोलत होत्या.या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे-पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोपल, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग डॉ. रफिक अन्सारी , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हास्तरीय समितीचे सन्माननीय सदस्य यांनी केले आहे.
या बैठकीस श्री .लाकाळ, श्री. सतीश गिरी, श्री. शेळके, श्री. महादेव शिंगारे आदी उपस्थित होते.
    
                                                      ****
वृत्त क्रमांक- 589
अपंग योजनेंतर्गत  लाभ मिळण्यासाठी
मतिमंद व्यक्तींनी अर्ज करावेत
       उस्मानाबाद,दि.30(जिमाका):-  जिल्हा परिषद व स्वसंपादित उत्पन्नातील 5 टक्के अपंग योजनेंतर्गत सन 2019- 20 या आर्थिक वर्षाकरीता समाज कल्याण विभागामार्फत मतिमंद व्यक्तींना आर्थिक सहाय्य रुपये 15 हजार रुपये मर्यादा, अतितीव्र अपंगांच्या पालकांना अर्थसहाय्य देणे, रुपये 15 हजार रुपये  मर्यादा, या योजना राबविण्यात येतात. 
जिल्ह्यातील ज्या अपंग लाभार्थ्यांना या योजनेचा घ्यावयाचा आहे, त्यांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी ,पंचायत समिती यांच्यामार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याकडे दि. 4 सप्टेंबर 2019 पर्यंत पाठवावेत,असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
                                                    ****



वृत्त क्रमांक- 590
जिल्हा दिव्यांग निधी योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी
दिव्यांग व्यक्तींनी अर्ज करावेत
उस्मानाबाद,दि.30(जिमाका):- जिल्हा दिव्यांग निधी योजनेंतर्गत सन 2019- 20 या आर्थिक वर्षाकरीता समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांना शेळी बोकड गटाकरिता अनुदान, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीन साठी अर्थसहाय्य देणे, दिव्यांग शेतकऱ्यांना एचडीपीई पाईप / पाच एचपी पाणबुडी पुरविणे या योजना राबविण्यात येतात.
जिल्ह्यातील ज्या  दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे,त्यांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी ,पंचायत समिती  यांच्यामार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे दि. 4 सप्टेंबर 2019 या विहित मुदतीत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
                                                      ****
वृत्त क्रमांक- 591
माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक,प्राचार्यांना
परिक्षेसंबंधीची माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन
       उस्मानाबाद,दि.30(जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी फेब्रुवारी ,मार्च तसेच जुलै ,ऑगस्टमध्ये इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेच्या विविध कामांसाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची संबंधित अद्ययावत माहितीची वारंवार मंडळास आवश्यक असते.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून वेळोवेळी अद्ययावत माहिती मंडळात उपलब्ध होत नाही. त्यामुळे दि. 1 सप्टेंबर 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत माहिती भरून घेण्यात येण्याविषयी व प्रोफाईल भरण्याबाबतच्या तांत्रिक सूचना देण्यात आल्या आहेत. ही माहिती भरण्यासाठी इ. 10वी  httpp://profile.mh-ssc.ac.in  व इ. 12 वी  httpp://profile.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा,असे आवाहन  सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ




महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ यांनी केले आहे.
****
वृत्त क्रमांक- 592
पैदाशीकरिता निरुपयोगी असलेल्या शेळ्यांची लिलावाद्वारे विक्री
इच्छुकांनी लिलावात भाग घेण्याचे आवाहन
          उस्मानाबाद,दि.30(जिमाका):  पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र तीर्थ बुद्रुक, तालुका-तुळजापूर येथे पैदाशीकरिता निरुपयोगी असलेल्या शेळ्यांची दि. 3 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी दोन वाजता लिलावाद्वारे विक्री करावयाची आहे.
तरी इच्छुक आणि वेळेवर प्रक्षेत्रावर हजर राहून लिलावात भाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र तीर्थ बुद्रुक, तुळजापूर यांच्याशी मो.नं. 7083 120 929 येथे संपर्क करावा, असे आवाहन प्रक्षेत्र व्यवस्थापकांनी केले आहे.
                                 ****
       वृत्त क्रमांक- 593
एसएसबी मुलाखतीच्या पूर्वतयारीकरिता
विनामूल्य प्रशिक्षणाकरिता अर्ज करावेत
उस्मानाबाद,दि.30(जिमाका) :- येथील भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना SSB या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय आवार, नाशिक रोड, नाशिक येथे  महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि.18 ते 27 सप्टेंबर 2019 या कालावधीत SSB  कोर्स क्रं 50 आयोजित करण्यात येत आहे.  प्रशिक्षण कालावधीत निवास , भोजन व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली आहे.
तरी जिल्हयातील  इच्छुक व पात्र उमदेवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे दि. 16 सप्टेंबर 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे.  मुलाखतीस येण्याआधी  PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील







Recruitment Tab  ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध  Check List आणि महत्वाच्या तारखा (Important Dates)  यांचे अवलेाकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये  प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण  भरुन आणावेत.
केंद्रामध्ये एस. एस. बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेवून यावे :-
कंबाईंन डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेला/झालेली असावी. व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन.सी.सी. (सी) सर्टिफिकेट  अे/बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे, व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने  एस. एस. बी साठी शिफारस केलेली असावी.
टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्स साठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे, किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी ,छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा
दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत यांनी केले आहे.
                                                       ****
वृत्त क्रमांक- 594
मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस
महाराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा
        उस्मानाबाद,दि.30(जिमाका):- मेजर ध्यानचंद यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिन दि.29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने सर्व राज्यांना निर्देशित केलेले  आहे. त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 29 ऑगस्ट रोजी ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी श्री. अंकुश पाटील हस्ते करण्यात आले.     
        यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिलेक्रीडा अधिकारी श्री.अशेाक बनसोडे, श्री.कैलास लटके, श्री.जावेद शेखजिल्हा हॉकी असोसचिवमन्मथ पाळणे,प्रभाकर काळेपवन वाढोळेबागल सरअली सरजीवन     आकाश आकोसकरनिकीता पवार सोनाली माळी यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
        


राष्ट्रीय क्रीडा दिन औचित्य साधून जिल्हयातील राज्यस्तरापासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेल्या उपस्थित खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला तसेच जिल्हास्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.
        यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मेजर ध्यानचंद यांच्यापासून प्रत्येक खेळाडूने प्रेरणा घेवून खेळावरखेळ शिक्षकावर आणि मैदानावर श्रध्दा ठेवण्याची गरज मांडली. व क्रीडा दिनाचे महत्व पटवून देत क्रीडा क्षेत्रामध्ये असलेल्या संधींविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले.
    जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन पुढीलप्रमाणे आहे.-
                खेळाचे नाव ,वयोगट, स्पर्धेचा कालावधी ,स्पर्धेचे स्थळ
बॅडमिंटन १४,१७,१९ वर्षे मुले व मुली, ३१ऑगस्ट, श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद, मल्लखांब १४,१७,१९ वर्षे मुले व मुली ०७ सप्टेंबर, जयहिंद विद्यालय, कसबे तडवळे जिम्नॅस्टीक्स १४,१७,१९ वर्षे मुले व मुली ०७ सप्टेंबर, जयहिंद विद्यालय, कसबे तडवळे,
तलवारबाजी १४,१७,१९ वर्षे मुले व मुली ०९ सप्टेंबर, श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद, वुशु१७,१९ वर्षे मुले व मुली ११ सप्टेंबर, श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम उस्मानाबाद, आट्यापाट्या १४,१७,१९ वर्षे मुले व मुली १३ सप्टेंबर, श्री. शिवछत्रपती आश्रमशाळा इटकूर ता.कळंब जि.उस्मानाबाद, डॉजबॉल १७१९ वर्षे मुले व मुली २३ सप्टेंबर, श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद, जलतरण  १४,१७,१९ वर्षे मुले व मुली २४ सप्टेंबर रोमा हॉटेल उस्मानाबाद, मैदानी १४,१७,१९ वर्षे मुले १४,१७,१९ वर्षे मुली २६ व २७ सप्टेंबर , श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद, स्क्वॅश१४,१७,१९ वर्षे मुले व मुली ३० सप्टेंबर, महादेव गव्हार व्यायामशाळा व क्रीडा मंडळ, येडशी ता.उस्मानाबाद.
सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा,अधिक माहितीसाठी  मो.क्र. ९९२३५३१४२३ (कैलास लटके - क्रीडा अधिकारी) व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले  यांनी केले आहे.
                                                 
Attachments area

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभाकरिता अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभाकरिता
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
     उस्मानाबाद,दि.30(जिमाका)- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सन 2019-20 अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील सन 1992-93 पासून राबविण्यात येत होती. या योजनेंतर्गत जमीन सुधारणा, शेतीची सुधारित शेती अवजारे, बैलजोडी, नवीन विहीर, पंपसेट इत्यादी बाबींचा 100 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येत होता.
ही योजना दीर्घकाळापासून राबविण्यात येत असल्यामुळे योजनेचे पुनर्विलोकन सन 2017-18    मध्ये करण्यात आले व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नव्याने सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंपसंच (डिझेल/ विद्युत पंप), वीज जोडणी आकार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करणे, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन व तुषार सिंचन), परसबाग, पीव्हीसी/एच.डी.पी.ई. पाईप या बाबींना अनुदान देण्यात येते.
         तरी अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावेत. ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित व छायांकित प्रतीसह कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी.
अधिक माहितीसाठी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी किंवा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना), जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद किंवा जिल्हा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार व जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांनी केले आहे.
                                                        ****
  वृत्त क्रमांक-597

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभाकरिता
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत    
      उस्मानाबाद,दि.30(जिमाका)-  अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष घटक योजना सन 1982 पासून राबविण्यात येत होती. या योजनेंतर्गत जमीन सुधारणा, शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी, नवीन विहीर, पंपसेट इत्यादी




बाबींचा 100 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येत होता. या योजनेचे पुनर्विलोकन सन 2016-17 मध्ये करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नव्याने सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंपसंच, वीज जोडणी आकार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करणे, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक व तुषार) या बाबींना अनुदान देण्यात येते.
तरी अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावेत. ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित व छायांकित प्रतीसह कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी.
अधिक माहितीसाठी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी किंवा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना), जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद किंवा जिल्हा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार व जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांनी केले आहे.
                           **********