उस्मानाबाद.दि.11:- निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पिकामध्ये
अनिश्चिता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपुरक जोड व्यवसाय करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांनी केले.
जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांनी कसबे तडवळा येथील शेळी पालन व्यवसाय, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील श्री.मुदडा यांची केशर आंबा
लागवड व कळंब येथे शेतकरी कंपनीचे मराठवाडा दुध डेअरीची भेट देवून पाहणी
केली.यावेळी ते उपस्थित शेतकऱ्याशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती डॉ. देशमुख, कृषी
उपसंचालक सुभाष चोले, प्रकल्प संचालक आत्मा केशव मलगुंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
डॉ.नामदेव आघाव, तहसिलदार सुजित नरहरे, तहसिलदार अशोक नंदगावकर, उपविभागीय कृषी
अधिकारी श्री.बी.यु.मंगरुळकर, तालुका कृषी अधिकारी श्री. ए.जी.देशमुख, कळंब तालुका कृषी अधिकारी श्री.मोरे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
श्री.गमे यांनी कसबे तडवळा येथील धनाजी नळे यांच्या शेळी पालन व्यवसायाला भेट
देवून पाहणी केली यावेळी श्री.गमे यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेळी पालन
व्यवसाय करावा यासाठी त्यांना माहिती देवून प्रोत्सहान दयावे, चारा उपलब्ध
असलेल्या विविध जातीचा इतर शेतकऱ्यांना पुरवठा करावा, असे शेतकरी श्री. नळे
यांच्याशी संवाद सादताना सांगितले.
यानंतर कळंब तालुक्यातील
शिराढोण येथील शेतकरी श्री.मुंदडा यांच्या शेतातील केशर आंबा लागवड, शेततळे,
गांडुळ खत निर्मिती प्रकल्पाची भेट देवून पाहणी केली.
कळंब येथील मराठवाडा ॲग्रो
प्रोसेस फार्मस प्रोडयूसर कंपनी ली. च्या मराठवाडा दुध डेअरी प्रकल्पाची भेट देवून
पाहणी केली. यावेळी श्री.गमे यांनी व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब गीते यांच्याकडून
संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली. दुधापासून तयार होणारे इतर पदार्थ तयार करुन
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा दयावा,असे यावेळी त्यांनी श्री. गीते यांना
सांगितले.
शेतकऱ्यांनी
दुगध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ
घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री.गमे यांनी केले.यावेळी व्यवस्थापक, कंपनीचे संचालक
व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.