Thursday, 13 October 2022

56,985 भाविक रुग्णांना मिळाली आरोग्याची सेवा... 18 ठिकाणी होते प्रथमोपचार केंद्र

#शारदीय_नवरात्र_महोत्सव-2022 56,985 भाविक रुग्णांना मिळाली आरोग्याची सेवा... 18 ठिकाणी होते प्रथमोपचार केंद्र

Tuesday, 11 October 2022

जिल्ह्यातील उमेदवारांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 14 ऑक्टोंबर रोजी आयोजन

जिल्ह्यातील उमेदवारांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 14 ऑक्टोंबर रोजी आयोजन नामांकित कंपन्याचे अधिकारी 1025 पदासांठी निवड करणार – जिल्हाधिकारी शासनाच्या रोजगार व स्वंयरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षीत बेरोजगार, नोकरी इच्छुक उमेदवार यांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उदेशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागा मार्फत “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे” आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यातील आस्थापना, उद्योग यांना आवाहन करून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहभागी करून घेतले आहे. तसेच मुंबई,पुणे,औरंगाबाद,सोलापूर, बारामती येथील नामांकित कंपन्याही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपपरिसर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ऑक्टोंबर 2022 रोजी “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील नामांकित 16 उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. या माध्यमातून 1025 पदे अधिसूचित केली आहेत. पात्र आणि इच्छुक पुरूष तसेच स्त्री उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रकिया करणार आहेत. या मेळाव्यात दहावी पास किंवा नापास, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रज्युऐट, इंजिनिअरिंग यांना या रिलेशनशिप मॅनेजर, सेल्स एक्झीकिटीव, सर्टीफाईड इंटरनेट कन्सलटंट, एमबीए एचआर, फायनन्स, मार्केटींग प्रोफेशनल, टीचर डीएड, बीएड, एमएड, ट्रेनी केंद्र मॅनेजर, सॉफ्टवेअर इजिंनिअर, अकाउटंट, केमिस्ट, ऑपरेटर, जॉब ट्रेनी, सेल्स्‍ ट्रेनी,मशीन ऑपरेटर,हेल्पर, आयटीआय सर्व ट्रेड अशा प्रकारचे अनेक संधी रोजगार मेळाव्यातून उपलब्ध हेाणार आहेत. या मेळाव्यामध्ये मुंबई येथील एनआयआयटी प्रा.लि. (आयसीआयसीआय बँकेकरिता), पेटीएम, जस्टडायल, गुडवर्कर, एक्सलेंट टिचर, उस्मानाबाद येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि., ॲडलर्स बायोएनर्जी, डी.आर पॅकर्स, ऑरडर टेक्नॉलॉजी, समृध्दी गारमेंटस किनी, बारामती येथील पियाजिओ व्हेईकल्स, चाकण येथील धुत ट्रॉन्समिशन, औरंगाबाद येथील नवभारत फर्टीलायजर, लक्ष्मी अग्नीकॉम्पो, सवेरा ॲटो कॉम्पो, सोलापूर चिंचाली येथील बालाजी अमाईन्स या कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. तरी या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने नोकरी इच्छुक उमेदवार, पालक, नागरिकांनी शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ठीक 11-00 वाजता उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ उपपरिसर, एमआयडीसी एरिया या ठिकाणी उपस्थित राहून रोजगार मेळाव्यातील रोजगारच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे. ****

Wednesday, 5 October 2022

तुळजापूर मंदिरात सीमोल्लंघनाचा सोहळा जल्लोषात संपन्

शारदीय नवरात्र महोत्सव-2022 तुळजापूर मंदिरात सीमोल्लंघनाचा सोहळा जल्लोषात संपन्न
उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- श्री. तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा आणि आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली. मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व विधी करण्यात आले. तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघना नंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. यावेळी देवीच्या मुर्तीला इजा होऊ नये म्हणून 108 साडया परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी श्रीदेवीजींची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले यावेळी सर्व भाविकांनी कूंकू आणि फुलांची उधळण करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला. यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओंबासे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) योगिता कोल्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक विश्वास कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे, पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. *****

Monday, 26 September 2022

शारदीय_नवरात्र_महोत्सव-2022 घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

शारदीय नवरात्र महोत्सव-2022 घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास
उस्मानाबाद, दि.26 (जिमाका) : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे सोमवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले. त्यानंतर घट कलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घट कलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर(www.shrituljabhavani.org) ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन सुविधेचा लाभ घरी बसूनच घ्यावा, असे आवाहन करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, अर्चनाताई पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) योगिता कोल्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक विश्वास कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, अक्षय पाटील,एस.के कदम,संजय सोंजे महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. **

Wednesday, 14 September 2022

जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहीम

जिल्ह्यात क्षयरोग आणि
कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक घरी आरोग्य विभागाची टीम धडकणार आहे. यासाठी 1 हजार 203 पथके तयार केली आहेत. ही शोध मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.

लंम्पी बाबत मदत हवीय? आता 'टोल फ्री'वर करा फोन!

लंम्पी बाबत मदत हवीय? आता 'टोल फ्री'वर करा फोन!

श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवा

श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव-2022 श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवा
उस्मानाबाद,दि.14(जिमाका):- जिल्ह्यात श्री. क्षेत्र तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी देवींची शारदीय नवरात्र महोत्सव यात्रा दि.17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022 या कालाधीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार आहे. यात्रेमध्ये यात्रेकरुंना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक सेवा देण्यात येत आहे. तरी यात्रेकरुंनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जि.प.चे आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके आणि जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.डी.के.पाटील यांच्या मार्फत करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत तात्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णवाहिका संदर्भीय आरोग्य सेवा देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत तुळजापूर शहरात श्री. तुळजाभवानी देवी मंदिर, एस.टी. स्टँड समोर, शिवाजी पुतळ्याजवळ, घाटशिळ, वाहनतळ आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र ठेवण्यात आली आहेत. तसेच दोन 108 रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत आणि प्रथमोपचार केंद्र सुरु केले आहेत. या प्रथमोपचार केंद्रात पुरेशा प्रमाणात औषधीसाठा उपलब्ध केलेला आहे. तरी प्रथमोपचार केंद्रात यात्रेकरुंना आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. श्री. क्षेत्र तुळजापूर येथे पायी येणाऱ्या यात्रेकरुंसाठी ग्रामीण भागात 19 ठिकाणी प्रथमोपचार केंद्र चालू करण्यात आली आहेत. यात्रा मार्गावर वडगाव, पाटोदा मोड, आष्टामोड, माकणी, तामलवाडी, कसई, माळूंब्रा, बोरी, तीर्थ(बु.), देवसिंगा, ताकविकी, काक्रंबा, तुरोरी, येणेगुर, तलमोड, नळदुर्ग, जळकोट, लोहारा आणि नारंगवाडी या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शहरात उपाययोजनेसाठी 10 आरोग्य पथके तयार केली आहेत. या पथकास गल्ली, वार्डाचे वाटप करुन या भागातील सर्व पाणी साठ्याचे हॉटेल, धाबे, खाणावळ येथील पाण्याचे निर्जंतुकीकरण करुन पाणी शुध्दीकरण झाल्याची खात्री ओ.टी.टेस्ट घेऊन करण्यात येते. ओ.टी.टेस्ट निगेटीव्ह आल्यास मदर सोल्युशन किंवा मेडीक्लोरद्वारे पाणी साठ्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. *****

लंम्पी स्किनचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गोजातीय प्रजातीच्या जनावरांचे सर्व प्रकारचे बाजार बंद राहणार

*वृत्त क्र.586*                                                                                         दिनांक : 14 सप्टेंबर 2022   *लंम्पी स्किनचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गोजातीय प्रजातीच्या* *जनावरांचे सर्व प्रकारचे बाजार बंद राहणार : जिल्हाधिकारी*  
उस्मानाबाद,दि.14(जिमाका):- जनावरांमधील लंम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गीक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमानुसार लंम्पी चर्म रोगावर नियंत्रण प्रतिबंध किंवा त्यांचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे आणि म्हशी ज्या ठिकाणी ते पाळले किंवा ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे आणि म्हशी गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण पाण्याच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे. गोजातीय प्रजातींची गुरे आणि म्हशींचा कोणत्याही प्राण्यांचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन भरवणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या लंपी झालेल्या गुरांना आणि म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केले आहेत. लंम्पी स्किन रोगाच्या अंमलबजावणी करण्याकरिता यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये महसूल विभागाकडे जिल्ह्यातील कार्यान्वयीन यंत्रणाच्या मदतीने रोग नियंत्रण करणे, जनावरांचा बाजार, प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि प्राण्यांचे गट कार्यक्रम पार पाडणे यास प्रतिबंध करणे आदींची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणेकडे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेर जनावरांची होणारी वाहतूक प्रतिबंधीत करणे, आदेशांचे पालन न करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करणे आदींची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील जनावरांची होणारी वाहतूक प्रतिबंधीत करणे आदी कामांची जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाकडे लंम्पी स्किन रोगाबाबत गावांमध्ये जागृती करणे, सतर्कता बाळगणे, गावामध्ये या रोगाबाबत काही माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षास कळवणे, गोट्यामध्ये किटकनाशकची फवारणी करणे. मृत जनावरांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे आणि ग्रामसभा मध्ये विषय चर्चा करणे आदी कामांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. भुमी अभिलेख विभागाकडे रोग प्रादुर्भाव झाल्यास ईपी सेंटर पासून पाच कि.मी. च्या अंतरातील गावाचा नकाशा तयार करणे आणि पशुसंवर्धन विभागास देणे आदी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडे लंम्पी स्किन रोगाचे जनावर आढळल्यास योग्य ते उपचार करणे, विलगीकरण करणे, नमुने गोळा करुन तात्काळ प्रयोगशाळेस पाठवणे. आजारी प्राण्यांचा दैनंदिन अहवाल तयार करणे. नमुने होकारार्थी आल्यास पाच कि.मी.त्रिजेच्या गावामध्ये लसीकरण करणे आदी कामांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्व मुख्याधिकाऱ्यांकडे लंम्पी स्किन रोगाबाबत शहरामध्ये जागृती करणे, सतर्कता बाळगणे, शहरामध्ये या रोगांबाबत माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षास कळवणे. गोठ्यामध्ये किटकनाशकाची फवारणी करणे. मृत जनावरांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे. मोकाट जनावरांवर नियंत्रण एकत्रित करुन जनावरांची सोय कोंडवड्यामध्ये करणे आदीं कामांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्थाकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्राण्यांचे सर्व प्रकारचे खरेदी विक्रीचे बाजार भरवण्याबाबत बंदी घालणे, जनावरे खरेदी-विक्रीसाठी एकत्रित न आणणे आदी कामांची जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे. तरी संबंधित सर्व यंत्रणांनी निश्चित करण्यात आलेल्या जबाबदारी प्रमाणे कार्यवाही करावी तसेच या आदेशांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, असेही श्री. दिवेगावकर यांनी आदेशात म्हटले आहे. *****

Sunday, 31 July 2022

एसटी बस

एसटीनेच करा; प्रवास वर्षाला चार तपासण्यांसह फिटनेस प्रमाणपत्र! सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने जिल्ह्यात सहाही आगारांकडून आवश्यक उपाययोजना....

Thursday, 28 July 2022

शेतकऱ्यांना मिळाली 700 कोटींची सवलत.....

शेतकऱ्यांना मिळाली 700 कोटींची सवलत.....

जिल्हा परिषद राबविणार 'हर घर जल' उत्सव उपक्रम....

जिल्हा परिषद राबविणार 'हर घर जल' उत्सव उपक्रम.... ग्रामसभेत घेणार ठराव : प्रतिव्यक्ती 55 लिटरचा पाणीपुरवठा.

प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा - कौस्तुभ दिवेगावकर

प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा - कौस्तुभ दिवेगावकर

"हर घर तिरंगा"साठी नगरपालिका खरेदी करणार दहा हजार झेंडे!

"हर घर तिरंगा"साठी नगरपालिका खरेदी करणार दहा हजार झेंडे! जनजागृतीवर भर : बचत गटांच्या महिला 'डोअर टू डोअर'

Thursday, 21 July 2022

सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी टपाल खात्याच्या वतीने फिलाटेली स्कॉलरशिप
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश
सर्वच शेतकऱ्यांनी पीक विमा भरुन पिके संरक्षित करावीत – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार मोफत प्रिकॉशन डोस

जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार मोफत प्रिकॉशन डोस
कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सव : नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आवाहन

Tuesday, 19 July 2022

जिल्हा परिषदेच्या स्वसंपादित योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा परिषदेच्या स्वसंपादित योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन उस्मानाबाद,दि.19(जिमाका) जि.प.च्या कृषी विभागामार्फत 2022-23 मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, यामध्ये कंपनीची नोंदणी आणि कार्यालय स्थापन करणे याकरिता अनुदान देण्यात येणार आहे. विविध शासकीय विभागांच्या योजनांचा शेतक-यांना शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत लाभ घेण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. कंपनींना वेळोवेळी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. या योजनेतंर्गत जिल्हयामध्ये प्रति जिल्हा परिषद मतदार संघामध्ये एक याप्रमाणे 55 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. या योजने करीता जिल्हा परिषद गटातील इच्छूक शेतक-यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याकडे अर्ज सादर करावेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2022 पर्यंत राहिल. या योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे. अटी व शर्ती :-शेतकरी उत्पादक कंपनीतील सर्व शेतकरी हे एकाच जि.प. मतदारसंघातल्या गावातील असावीत. कंपनीच्या संचालक मंडळात एक महिला शेतकरी असावी. एका जिल्हा परिषद गटामध्ये एकाच कंपनीस अनुदान देय राहील.कंपनीच्या नावात जि.प. असा उल्लेख बंधनकारक असेल.नोंदणी प्रमाणपत्र व कार्यालय स्थापन केल्यानंतरच अनुदान देय राहील.पंचायत समिती कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) अर्जाची छाननी करून निवड झाल्यानंतर नोंदणीसाठी कळवतील.पूर्वसंमती प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीनंतर व कार्यालय स्थापन झाल्यानंतर अनुदान वितरीत करण्यात येईल.जे प्रथम अर्ज सादर करतील त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.निवडीचे अंतिम अधिकार पंचायत समिती कृषी अधिकारी सामान्य यांना राहतील.जर कागदपत्रांची पूर्तता व नोंदणी फिस वेळेत सादर न केल्यास प्रतिक्षाधिन यादीतील व्दितीय क्रमांकावरील अर्जाचा विचार करण्यात येईल.पूर्वसंमती न घेता नोंदणी केलेल्या कंपनीस अनुदान देण्यात येणार नाही.मुदत संपल्यानंतर अर्ज सादर केल्यास सदर अर्जाचा विचार होणार नाही. या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या तालूक्याच्या पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधावा. ****

सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करण्याचे आवाहन

सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करण्याचे आवाहन उस्मानाबाद,दि.19(जिमाका) :- जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये (‍रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील शासकीय,निमशासकीय, तसेच कलम 5(2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायदयातंर्गत असणा-या आस्थापनांना त्याच्या आस्थापनेवर असणा-या सर्व कर्मचा-याची स्त्री-पुरूष आणि एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयाकिंत कायद्यातील तरतुदीनूसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमीतपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाच्या www.rojgar.mahaswaym.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हयातील सर्व आस्थापनांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडून यापूर्वीच युजर नेम आणि पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करून आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02472-299434 किंवा ईमेल आयडी -osmanabadrojgar@gmail.com अथवा asstdiremp.osmanabad@ese.maharashtra.gov.in यावर उदयोजक नोंदणी क्रमांक आणि ईतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधावा. जून-2022 अखेर संपणा-या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद या कार्यालयाद्वारे चालू आहे. त्यामुळे सर्व आस्थापनाकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सदरील तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम दि. 31 जुलै 2022 आहे. विहीत मुदतीत ऑन लाईन पध्दतीने सादर करावे आणि कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे. तसेच प्रत्येक आस्थापनेने नोंदणी तपशील देखील नोंदवून आवश्यक ती सर्व माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं.रा.गुरव यांनी केले आहे.‍ ****

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी महास्वयंम वेबपोर्टलवर त्यांच्या नोंदणीची माहिती अद्यावत करण्याचे आवाहन

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी महास्वयंम वेबपोर्टलवर त्यांच्या नोंदणीची माहिती अद्यावत करण्याचे आवाहन उस्मानाबाद,दि.19(जिमाका) महाराष्ट्र शासन कौशल्‍ विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एंप्लॉयमेंट नोंदणी कार्ड www.mahaswayam.in हे वेबपोर्टल विकसीत करण्यात आले आहे. जिल्हातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवार, कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ ईच्छिणारे उमेदवार तसेच या पोर्टल वर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्यापपर्यत एप्लॉयमेंट कार्डशी आधार लिंक केलेले नाही, त्यांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करुन घ्यावी.उमेदवारांना अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02472-299434 किंवा ईमेल आयडी osmanabadrojgar@gmail.com अथवा asstdiremp.osmanabad@ese.maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य ‍विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र संजय गुरव यांनी केले आहे. ****

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजनेतर्गत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजनेतर्गत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू उस्मानाबाद,दि.19(जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या येथील मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायातील अर्थात मुस्लिम,ख्रिचन,बौध्द,जैन,पारसी,शिख,ज्यू धर्मीय विद्यार्थीच्या उच्च शिक्षणाकरिता प्रामुख्याने मेडिकल,इंजिनिअरिंग,एमबीए, फार्मसी आदी अभ्यासक्रमांसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता कर्ज योजनेत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे, पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावावेत , असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी केले आहे. या योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहिती करीता www.malms.maharashtar.gov.in या संकेत स्थळाचा वापर करावा अथवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा . जिल्हा कार्यालयाचा पत्ता- मातोश्री क्लिनिक बिल्डिंग(डॉ.गपाट), पहिला मजला,पोलीस लाईन समोर मेन रोड,उस्मानाबाद. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा व्यवस्थापक रिजवान पठाण यांनी केले अहे. ****

जि.प.च्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जि.प.च्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उस्मानाबाद,दि.19(जिमाका) जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसुचित जातीच्या विशेष घटक योजनेत वयक्तिक लाभाच्या विविध योजनीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे . यात अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी पिठाची गिरणीचा पुरवठा करण्यात येणार आहे . यात पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येईल . अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिनचा पुरवठा करण्यात येणार असून . पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी मिनी दाल मील पुरवठा करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद स्वंसपादीत उत्पन्नातील योजनेअंतर्गत सर्वसाधारण मुलीं, महिलांना एम.एस.सी.आय.टी.(MSCIT) प्रशिक्षण देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे.पाचवी ते बारावीपर्यत शिक्षण घेत असलेल्या सर्वसाधारण संवर्गातील मुलींना सायकल देण्यात येणार आहेत .यात पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येईल. या योजनांसाठी पात्र असलेल्या लाभार्थीनी विहित नमुन्यातील अर्ज तालुकास्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) आणि गावपातळीवर अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क साधून दि. 17 ऑगस्ट 2022 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयास अर्ज सादर करण्याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) बी.एच. निपाणीकर यांनी कळविले आहे. ****
उस्मानाबाद : शेतकऱ्यांनो पीक विमा भरुन तुमचे पीक आणि आनंद ही ठेवा सुरक्षित – महेश तीर्थकर - 31 जुलै पूर्वी पीक विमा भरा