Wednesday, 22 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतमाल वाहतुक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन


विशेष लेख क्र.02                                       दि.21 एप्रिल 2020

   
             कोरोनाच्या अनुषंगाने जागतिक स्तरावर,देशपातळीवर व राज्यस्तरावर आपत्तीकालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे आपल्या देशात व संपूर्ण राज्यात लॉक डाउन जाहीर केलेले आहे. या परिस्थितीत नागरिकांना अत्यावश्यक सेवा सोडल्या तर घराबाहेर पडता येत नाही.या लॉकडाऊनच्या काळामध्ये भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्ये व किराणा या बाबींची जनतेस नितांत गरज आहे.त्यापैकी किराणा आणि अन्नधान्याचे चांगल्याप्रकारे नियोजन होत असून ग्राहकांना गरजेपुरती उपलब्धता आहे. परंतु नाशवंत शेती उत्पादनांच्या बाबतीत मागणी व पुरवठा समीकरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.
      दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत.याचे विपरीत परिणाम ग्राहक आणि शेतकरी यांना भोगावे लागत आहेत. या समस्यांवर निराकरणासाठी खालील बाबींचा नियोजनात अंतर्भाव करण्यात यावा.
    शेती मालाची काढणी व विक्री नियोजन
सद्यस्थितीमध्ये शेतमालाच्या काढणी आणि विपणनाचे  नियोजन गाव पातळीवर करणे आवश्यक आहे. सदर शेतीमालाचे कमी वजनाचे पॅकिंग करून आवश्यरकतेनुसार वाहतूक करणे सोयीस्कर होईल.
     शेतकरी उत्पादक संघ/ गटामार्फत विक्री- केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाचेही शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ/ गटामार्फत शेतमालाची विक्री ई-नाम द्वारे करण्यासाठी परवानगी देण्यात यावी.
     तसेच ग्राहकसेवेसाठी व्हाट्सअॅप इत्यादी साधनांचा वापर करावा. यासाठी शहर आणि गाव पातळीवर तरुण स्वयंसेवक, बिगर शासकीय संस्था, सामाजिक संस्था यांचा समावेश करण्यात यावा.सामाजिक साधनांच्या संदर्भात प्रचार आणि जागृतीसाठी आकाशवाणी, एफ. एम., दूरचित्रवाणी यांचा प्रभावीपणे उपयोग होईल.
       ज्या उत्पादनासाठी (उदा. पीठ, डाळी, तेल इत्यादी) शेतमालावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ वापरून जिल्हा पातळीवर नियोजन केल्यास उत्पादन आणि वाटप करणे शक्य होईल. शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ / गटांच्या सबळीकरणाची आवश्यकता आहे.
    शेतमाल वाहतुकीचे नियोजन
    शेतमाल बाजार समित्यांमधील अतिरिक्त गर्दी आणि आपत्ती कायद्याचे उल्लंघन टाळण्यासाठी अशा ठिकाणी पोहचणाऱ्या वाहनांस पूर्व आरक्षण आणि ई-पासेस प्रणालीद्वारे नियोजित केले जाऊ शकते. यामुळे बाजार समितीमध्ये येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राखता येऊ शकेल. त्याचप्रमाणे बाजार समिती त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध भागांसाठी प्रवेशाची वेळ निश्चित केल्यानेही

मोठ्या प्रमाणात गर्दी नियंत्रणात येऊ शकते. हे नियोजन प्रत्येक बाजार समितीमार्फत करण्यात यावे.
       निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन
       आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे वाहतूक पर्व आरक्षण आणि ई-पासेस प्रणालीद्वारे नियोजित केले जाऊ शकते. यामुळे पुरेशी उपलब्धता आणि काळा बाजार रोखणे शक्य होईल.
       कर्ज पिकाची उपलब्धता- आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेती पूर्ण क्षमतेने करण्यासाठी कर्जाची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असणार आहे. या व्यतिरिक्त सध्या त्यांच्यावर असलेल्या कर्जाबाबत योग्य व्यवस्थापन करणे हे महत्वाचे आहे.
       जिल्हा पातळीवर सर्व गोदामे शासन अखत्यारित आणल्यास सदर  मालाची योग्य साठवणूक करता येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना या गोदामात ठेवलेल्या मालाच्या पावती आधारे कर्ज उपलब्ध करवून दिले जाऊ शकतो.
 याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृकता वाढविण्यासाठी नितांत आवश्यकता आहे.
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत फळांची हाताळणी विषयी मार्गदर्शन:-
1. द्राक्ष- घडांची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
2. काढणी केल्यानंतर घड जास्त वेळ शेतात/बागेत ठेवू नयेत.
3. घड वायुविजन असलेल्या सीएफबी पेटयांमध्ये भरून पेट्या बंद कराव्यात.
4. पेटया थंड तापमानास ठेवून पूर्व शीतकरण करावे व लगेच 0 ते 2 अंश सेल्सीयस  तापमान व
     85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात (कोल्डस्टोरेज  दोन महिन्यापर्यंत ठेवता येतात.)
5. द्राक्षापासून उत्तम प्रतीचा बेदाणा तयार करता येतो.
6. थॉम्पसन सिडलेस,तास-ए-गणेश, सोनाक, मणिक चमन इत्यादी जाती बेदण्यासाठी उत्तम
     आहेत.
2.आंबा- 1.पाड लागल्यावर झेल्याच्या सहाय्याने इजा न करता फळांची काढणी देठासहीत सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
2.फळे काढल्यानंतर बागेत जास्त वेळ न ठेवता पॅकिंग हाऊसमध्ये आणावित.
3. थंड पाण्यात ठेवून फळांची पूर्वशितकरण करावे व फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवावीत.
4.द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे कायूविजन असलेल्या सीएफबी पेटयामध्ये किंवा क्रेटमध्ये ठेवून 10-12 अंश सेल्सीयस तापमानास व 85-90 टक्के आद्रतेत शीतगृहात एका महिन्यापर्यंत साठविता येतात.
5.कच्च्या आंब्यापासून लोणचे,आमचूर व पन्हे तयार करता येते.
6.पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी व गर(पल्प) काढून वर्षभर साठवून ठेवता येतो.
3. चिकू- 1.काढणीस तयार झालेले फळे झेल्याच्या सहाय्याने इजा न करता सकाळी किंवा संध्याकाळी काढावेत.
2. फळे सावलीत आणून ठेवावीत.
3.फळे थंड झाल्यावर क्रेटमध्ये किंवा 0.2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॉलिथीनच्या पिशविमध्ये भरावीत.
4.पिशवी बंद करुन 18-20 अंश सेल्सीयस तापमानास ठेवल्यास 15 दिवसापर्यंत उत्तमरित्या साठविता येतात.
5.पिकण्यास सुरुवात झालेल्या चिक्कू पासून कॅन्डी व गोड चटणी करता येते व पिकलेल्या चिकूपासून पावडर तयार करता येते.
4.केळी-1.केळाला गोलाई येवून लागल्यावर,इजा न करता सकाळी किंवा संध्याकाळी काढावीत.
2.घड सावलीत आणल्यानंतर  इजा न करता फण्या वेगळ्या कराव्यात.
3. फण्या थंड झाल्यावर 6 टक्के मेण+ 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिटबुडवून ठेवाव्यात.
4. द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर क्रेटामध्ये ठेवून, 14-15 अंश सेल्सीयस तापमानास व
     85 टक्के आद्रेतेत शीतगृहात तीन आठवडयापर्यंत साठविता येतात.
5.केळीपासून वेफर्स,सुकेळी व पावडर तयार करता येते.
5.कागदी लिंबू-1.फळे पोपटी रंगाची असताना इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी
      काढावीत.2.काढलेली फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.
3. फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
4.द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे एक किलो क्षमतेच्या 0.2 टक्के वायूविजन असलेल्या
     150 गेजव्या पॉलिथीनच्या पिशाविमध्ये भरावीत किंवा क्रेटमध्ये भरावीत.
5.या पिशव्या 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात 40-45 दिवस ठेवता येतात.
6.कागदी लिंबापासून लोणचे,गोड चटणी,कॉर्डियल सिरप इ.पदार्थ तयार करता येतात.
6.मोसंबी:-1.फळांना पिवळसर रंग दिसू लागल्यावर इजा न करता ठेवून देठ ठेवून  सकाळी किंवा संध्याकाळी काढावेत.2.फळे पिरगाळून काढू नयेत.3. फळे सावलीत  आणल्यानंतर हवेशीर व मोकळ्या जागेत पसरून ठेवावीत.4.कागदी लिंबाप्रमाणेच फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक टक्के मिनिट बुडवून ठेवाव्यात.
5. द्रावणातून काढून द्रावण सुटल्यावर फळे क्रेटमध्ये भरावेत.
6. क्रेट 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात  एक महिन्यापर्यंत ठेवता येतात.7. मोसंबी फोडी काढून फ्रोजन करता येतात तसेच मार्मालेड,रस,सिरप व काबॉनेटेड शीत पेय तयार करता येतात. कोरोना पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेत पिकाचे काढणी पश्चात नियोजन:- 1.धान्य पिके शेतातून काढल्यानंतर साफ व स्वच्छ करुन


धान्यातील ओलाव्याचे प्रमाण  10 ते 12 टक्के पर्यंत कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
2. बीज उत्पादनासाठी धान्याचा वापर करावयाचा असेल तर अशा धान्य पिकांची काढणी वेगळी करुन व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
3.तृणधान्य पिकापासून वेगवेगळ्या पदार्थ जसे पीठ, रवा, नाचणी,सत्व,कुरडया, पापड,चकली, बिस्किटे इत्यादी तयार करून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करून पुरवठा करावा. 4.कडधान्या पिकापासून डाळी,पीठ इत्यादी सारखे उपपदार्थ इत्यादी तयार करून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करून पुरवठा करावा.
5. तेल बियांपासून तेल घाणीचा वापर करुन बाजारपेठेच्या मागणीनुसार  तेल काढून  वेष्टण      करुन पुरवठा करावा.
6. कांदा काढण्यासाठी आला असल्यास काढणी करून शेतात 3 ते 4दिवस सुकवावा नंतर पात  कापून  2 ते 3 आठवडे सावलीत सुकवून प्रतवारी  करून कांदा  चाळीमध्ये हवेशीर साठवावा.
7.लसून काढणी झाल्यानंतर व्यवस्थित सुकवून जुड्या बांधून हवेशीर निवाऱ्याला बांधून ठेवाव्यात.
8. करोनाच्या परिस्थितीमुळे फळे व भाजीपालांना बाजार पेठेच्या मागणीनुसार कमीत कमी हाताळणी करून वेष्टण करून पुरवठा करण्यात यावा.
9. फळांची काढणी योग्य परिपक्वतेला  करून योग्य त्या तापमानाला व आर्द्रतेला व्यवस्थित साठवावीत.
10. काही फळांचे बाजारपेठेच्या आवश्यकते नुसार लगदा,रस,सिरप,स्ववॅश इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ हवाबंद डब्यामध्ये किंवा बाटल्यांमध्ये साठवून पुरवठा करावा.
11.काही फळांपासून लोणची कॅण्डी,वाळविलेले तुकडे किंवा फळांची भुकटी करुन  व्यवस्थित साठवून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
12. आंबा पिकापासून आमचूर,लोणचे, मुरंब्बा, आंबा गर, आंबा पोळी इत्यादी प्रक्रिया युक्त पदार्थ बनवून साठवून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
13. द्राक्षांपासून बेदाणा तयार करून शीत कक्षामध्ये साठवावा.
14. बटाटा  व केळी यासारख्या पिकांपासून चीप्स/वेफर्स तयार करून वाळवून साठवावीत.
15. काही फळेभाज्यांचे तुकडे करून वाळवावीत,भुकटी करावी  व साठवून बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
16. भाजीपाला तसेच मेथी ,कडीपत्ता,पालक कोथिंबीर इत्यादी वाळवून हवाबंद साठवावीत.
17.लाल मिरची व्यवस्थित सुकवून साठवावीत.
18.आवळा, शतावरी ,गवती चहा,अश्वगंधा, हिरडा,बेहडा इत्यादी वाळवून त्यांची पावडर करून
      साठवावी.
19. हळद काढणीला आली असल्यास शिजवून,वाळवून,पॉलीश करुन साठवून ठेवावीत.
20.करोनाच्या  परिस्थितीमुळे शहरांमध्ये फळे व भाजीपाल्यांचा  मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सोशल माध्यमांच्या जसे व्हॉटसॲप, फेसबुक इत्यादीचा वापर लोकांच्या आवश्यकतेनुसार विविध फळे आणि भाजीपाल्यांच्या टोपल्या बनवून लोकापर्यंत पोहचवावेत.
 *फळे व भाजीपाल्यांपासून  व्यापारी दृष्ट्या बनविण्यात येणारी प्रक्रियायुक्त पदार्थ खालील प्रमाणे -फळांचे नाव, व्यापारी दृष्टया महत्वाचे पदार्थ
1.आंबा-कच्च्या आंब्यापासून निरनिराळया प्रकारचे लोणचे, आंब्याच्या फोडी, खारवुन टिकवणे, चटणी, आंबोशी,आमचूर,पन्हे,स्क्वॅश,सरबत आणि पिकलेल्या आंब्यापासून आंबा पोळी (पापड) बर्फी,जॅम,नेक्टर,आंबा पाक,टॉफी, हवाबंदडण्यातील आमरस, हवाबंद डब्यातील फोडी, गोठवलेल्या आंबा फोडी.
2.केळी-सुकेची,भुकटी, वेफर्स, केळीचा पल्प,गोड वेफर्स इत्यादी.
3. लिंबू- लिंबू लोणचे,स्क्वॅश, सरबत, लिंबूपाक,कॉर्डियल.
4. अंजीर-सुके अंजीर,जॅम,अंजीर फळांचे हवाबंद डबे(कॉनिंग), अंजीर फळे पाकविणे (कॅन्डी). 5.आवळा- चवनप्राश,मोरावळा,लोणची, आवळा सुपारी आवळा,कॅन्डी,सरबत,पल्प,आवळा चहा.
6.चिंच-काबोनेटेड पेय,जेली, चिंचोका काढून वाळवलेला  गर,चिंचेचा पल्प.
7.डाळिंब- जेली,रस, सरबत,नेक्टर, डाळिंब पाक,आनारदाना,चुर्ण,फ्रोजनदाणे, डाळिंबाच्या सालीची वाळवलेली भुकटी.
8. पेरु- सरबत,पेरुगर,जेली, चॉकलेट(टॉफी)पेरु वडी.
9. चिकू-कच्च्या चिकूपासून लोणचे,मध्यम पिकविलेल्या चिकुपासून मुरांबा आणि कॅन्डी,पिकलेल्या  चिकू फळांपासून सरबत,स्क्वॅश, जॅम, चटणी वाळविलेल्या फोडी, चिकू भुकटी,मिल्क शेक.
10. जांभूळ- रस, सरबत,स्क्वॅश,जॅम, बियांची भुकटी.
11.पपई- कच्च्या पपईपासून टुटीफुटी, पिकलेल्या पपईपासून जॅम,सरबत पेपेन.
12.बोर- बोर खजूर,सुकविलेली फळे,बोरकुट,लोणचे,मुरब्बा,सरबत,जॅम,सिरप.
13.संत्रा- सरबत,मार्मालेड,जेली,जॅम,सिरप,संत्रा फोडी डबाबंद करणे, संत्र्याच्या सालीपासून वाळवलेली भुकटी.
14.द्राक्ष-किसमीस,मनुका,रस,सरबत,सिरप.
15.स्ट्रॉबेरी- जॅम डोली, सरबत,सिरप.
16. मोसंबी –रस, सरबत, सिरप.
17. सिताफळ- पल्प काढून कमी तापमानाला साठवणे,आईस्क्रीम, मिल्क शेक.
18.टोमॅटो- केचप,सॉस,पेय,चटणी,पल्प भुकटी,पेस्ट.
19.मिरर्च (लाल)- वाळवलेली मिरची,लालमिरची पावडर, लोणचे, चटणी.

20.मिरर्च(होरवी)- पावडर, लोणचे,सॉस चटणी.
21. कोथिंबीर- वाळवलेली कोथिंबीर,भुकटी.
22.पालक-वाळवलेली मेथी.
23. मेथी-वाळवलेली मेथी.
24.बटाटा- वेगवेगळे वेफर्स,पावडर,वाळवलेले बटाटा फोडी.
25.वांगे-वाळलेल्या वारीक फोडी.
26.कांदा- पेस्ट पावडर, वाळलेल्या चकत्या.
27.आले- पेस्ट,सुंठ,पावडर,लोणचे.
28.कोबी व फ्लॉवर- वाळवलेले तुकडे/चकत्या.
29.कढीपत्ता- वाळवलेले कढीपत्ता,पावडर.
30.गाजर- गाजर हलवा, वाळलेले बारीक तुकडे.
31. वटाणा- गोठवलेला वाटाणा, वाळलेला वाटाणा.
32.कारली- लोणचे,भुकटी,रस.
33.भोपळा- पावडर,रस, हलवा.
                          
                                                                             श्री.सुनिल सोनटक्के
                                                                           जिल्हा माहिती अधिकारी,
                                                                           जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                                    उस्मानाबाद.

खरिप हंगामासाठी बी-बियाणे व कृषी निविष्ठांची कमतरता पडणार नाही याची दक्षता घ्यावी -पालकमंत्री शंकरराव गडाख


वृत्त क्र.  236                                                                दि. 21 एप्रिल 2020



                    उस्मानाबाद, दि. 21 (जिमाका) :- सोयाबीन हे जिल्हयातील प्रमुख पीक आहे.गतवर्षी सोयाबीन  पीक काढणीस आले असतानाच अवकाळी पाऊस झाल्यामुळे ते भिजून खराब झाले. त्यामुळे यंदा पेरणीसाठी सोयाबीनसह इतर पिकांचे बी-बियाणे व कृषी निविष्ठांची  कमतरता पडणार नाही  याची प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी  दिले.

येथील प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा वार्षिक नियोजन सभागृहात खरीप हंगाम पूर्व  2020 आढावा   बैठकीत पालकमंत्री शंकरराव गडाख मार्गदर्शन करत होते.  

          या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार सुजितसिंह ठाकुर,जि.प.उपाध्यक्ष धनजंय सावंत,कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, सहायक नियेाजन अधिकारी सोमनाथ रेडडी आदी उपस्थित  होते.

          पुढे बोलताना पालकमंत्री गडाख म्हणाले की, गतवर्षी सोयाबीनचा प्रति हेक्टरी 1159 किलो उतारा मिळाला. यावर्षी देखील खरीपाची पेरणी 5 लाख 51 हजार 800 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित  आहे. त्यादृष्टीने या पेरणीसाठी लागणारी रासायनिक खते व इतर सर्व प्रकारचे बी- बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन व कृषी विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. जिल्हयातील सर्व पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी बांधवानी सेद्रीय शेतीचा अधिकाधिक अवलंब करावा व कृषी पुरक व्यवसायामध्ये वाढ करण्याचे आवाहन केले.तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.व इतर कारणे सांगून टाळाटाळ करतात ही बाब योग्य नसून सहायक उपनिबंधक सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  शेतकऱ्यांना जास्तीजास्त पीक कर्ज बँका मार्फत  उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिवांना मदत करण्यासाठी पावले उचलावित अशा  सूचनाही त्यांनी दिल्या.

          जिल्हयात विद्यूत जोडणी विना शेतकऱ्यांच्या पिकाना पाणी देता   येत नाही त्यासाठी विद्यूत वितरण कंपनीने संबंधित ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत रखडलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची सूचना पालकमंत्री् गडाख यांनी      केली.तसेच कृषी विभागाने जिल्हयात बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी क्वॉलिटी कंट्रोल इन्सपेक्टर यांच्या माध्यमातून भरारी पथके नेमून त्यास लगाम घालावा त्याबरोबच पेरणीसाठी बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी, आंतर पीक पध्दती  व मुलस्थानी जलसंधारण पध्दतीचा  जास्तीजास्त वापर शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी जनजागृती करावी व माती परीक्षण नमुने तपासणी अहवाल शेतकऱ्यांना दिल्यानंतर कृषी विभागने सागितलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन शेतकरी करतात का नाही ?  याकडेही कृषी विभागाने लक्ष पुरावावे असे त्यांनी सूचित केले.

यावेळी जिल्हा परिषद परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर व उपस्थित लोकप्रतिनिधींनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना  बी-बियाणे, खते व पीक कर्ज वेळेत उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हा कोरोनामुक्त केल्याबददल  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजरौशन तिलक,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनमंत वडगावे याच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून  प्रशासनास सहकार्य केल्याबद्यल उस्मानाबाद जिल्हावासियांचे पालकमंत्री गडाख यांनी  आभार मानले.  

 तसेच आपल्या राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असून आपण काळजी घेणे आवश्यक आहे.लॉकडऊनच्या कालावधीमध्ये कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये प्रशासन दक्षता घेत आहे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

          या बैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, डॉ. तानाजी चिमनशेटे,प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी याच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

****

खरिप हंगामासाठी बी-बियाणे व कृषी निविष्ठांची कमतरता पडणार नाही याची दक्षता घ्यावी -पालकमंत्री शंकरराव गडाख



                    उस्मानाबाद, दि. 21 (जिमाका) :- सोयाबीन हे जिल्हयातील प्रमुख पीक आहे.गतवर्षी सोयाबीन  पीक काढणीस आले असतानाच अवकाळी पाऊस झाल्यामुळे ते भिजून खराब झाले. त्यामुळे यंदा पेरणीसाठी सोयाबीनसह इतर पिकांचे बी-बियाणे व कृषी निविष्ठांची  कमतरता पडणार नाही  याची प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी  दिले.
येथील प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा वार्षिक नियोजन सभागृहात खरीप हंगाम पूर्व  2020 आढावा   बैठकीत पालकमंत्री शंकरराव गडाख मार्गदर्शन करत होते.  
          या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार सुजितसिंह ठाकुर,जि.प.उपाध्यक्ष धनजंय सावंत,कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, सहायक नियेाजन अधिकारी सोमनाथ रेडडी आदी उपस्थित  होते.
          पुढे बोलताना पालकमंत्री गडाख म्हणाले की, गतवर्षी सोयाबीनचा प्रति हेक्टरी 1159 किलो उतारा मिळाला. यावर्षी देखील खरीपाची पेरणी 5 लाख 51 हजार 800 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित  आहे. त्यादृष्टीने या पेरणीसाठी लागणारी रासायनिक खते व इतर सर्व प्रकारचे बी- बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन व कृषी विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. जिल्हयातील सर्व पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी बांधवानी सेद्रीय शेतीचा अधिकाधिक अवलंब करावा व कृषी पुरक व्यवसायामध्ये वाढ करण्याचे आवाहन केले.तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.व इतर कारणे सांगून टाळाटाळ करतात ही बाब योग्य नसून सहायक उपनिबंधक सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी   
शेतकऱ्यांना जास्तीजास्त पीक कर्ज बँका मार्फत  उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिवांना मदत करण्यासाठी पावले उचलावित अशा  सूचनाही त्यांनी दिल्या.
          जिल्हयात विद्यूत जोडणी विना शेतकऱ्यांच्या पिकाना पाणी देता   येत नाही त्यासाठी विद्यूत वितरण कंपनीने संबंधित ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत रखडलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची सूचना पालकमंत्री् गडाख यांनी      केली.तसेच कृषी विभागाने जिल्हयात बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी क्वॉलिटी कंट्रोल इन्सपेक्टर यांच्या माध्यमातून भरारी पथके नेमून त्यास लगाम घालावा त्याबरोबच पेरणीसाठी बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी, आंतर पीक पध्दती  व मुलस्थानी जलसंधारण पध्दतीचा  जास्तीजास्त वापर शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी जनजागृती करावी व माती परीक्षण नमुने तपासणी अहवाल शेतकऱ्यांना दिल्यानंतर कृषी विभागने सागितलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन शेतकरी करतात का नाही ?  याकडेही कृषी विभागाने लक्ष पुरावावे असे त्यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हा परिषद परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर व उपस्थित लोकप्रतिनिधींनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना  बी-बियाणे, खते व पीक कर्ज वेळेत उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करण्याची मागणी केली.
यावेळी जिल्हा कोरोनामुक्त केल्याबददल  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजरौशन तिलक,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनमंत वडगावे याच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून  प्रशासनास सहकार्य केल्याबद्यल उस्मानाबाद जिल्हावासियांचे पालकमंत्री गडाख यांनी  आभार मानले.  
 
तसेच आपल्या राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असून आपण काळजी घेणे आवश्यक आहे.लॉकडऊनच्या कालावधीमध्ये कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये प्रशासन दक्षता घेत आहे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
          या बैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, डॉ. तानाजी चिमनशेटे,प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी याच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****

Tuesday, 21 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यानी फक्त जीवनावश्यक वस्तुचाच पुरवठा करावा - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे




                                              

उस्मानाबाद, दि.21(जिमाका):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी दि. 3 मे, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत.

       भारत सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांमध्ये ई- कॉमर्स कंपन्यांना फक्त जिवनावश्यक वस्तुंचाच व्यापार व पुरवठा करता येईल असे नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त अधिकारानुसार कोरोना विषाणूचा

प्रादुर्भाव रोखण्याकरिता ई-कॉमर्स कंपन्यांना फक्त जीवनावश्यक वस्तुंचाच व्यापार व पुरवठा पुढे चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच जीवनावश्यक नसलेल्या इतर कोणत्याही वस्तुंचा व्यापार अथवा पुरवठा करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लघंन झाल्यास ई-कॉमर्स कंपन्यावर कारवाईस पात्र राहतील.

                                            ****

कर्मचाऱ्यांना परवाना व पासेस देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती




      उस्मानाबाद, दि. 21 (जिमाका) :- भारत सरकारने कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनच्या कालावधी दि. 3 मे,2020 पर्यंत वाढविला आहे. कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊनचे कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सुट दिलेली कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना परवाना, पासेस देणे आवश्यक आहे.

        उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कोविड 19 चा प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच लॉकडाऊन कालावधीत आवश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना वाहतूक परवाना, पासेस देणे. सुट दिलेली कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचारी, कामगार, व्यक्तींना प्रवासासाठी प्रवासी पासेस, परवाना देणे, कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचारी, कामगार, व्यक्तींच्या प्रवासाच्या वाहनांसाठी वाहतूक पासेस, परवाना देणे ही कामे सुसुत्रितपणे होणे आवश्यक आहे.

          त्यामुळे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कामाचे स्वरुप व परवाना, पासेस देणारे सक्षम अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. आवश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना वाहतूक परवाना, पासेस देणे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ,उस्मानाबाद. सुट दिलेली कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचारी, कामगार, व्यक्तींना प्रवासासाठी प्रवासी पासेस, परवाना देणे बाबत. INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय दंडाधिकारी / INCIDENT COMMANDER तथा तालुका दंडाधिकारी. कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचारी, कामगार, व्यक्तींच्या प्रवासाच्या वाहनांसाठी वाहतूक पासेस, परवाना देणे. संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेले

अधिकारी. वरीलप्रमाणे परवाना, पासेस देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी ऑनलाईन अर्ज, करावयाच्या साईट, लिंक याची माहिती उपलब्ध करुन द्यावेत, असेही आदेशात नमूद केले आहे.

         या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड 19 उपायोजना नियम, 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

हे आदेश आदेशाचे दिनांकापासून दि. 3 मे, 2020 पर्यंत लागू राहतील.

                                           *****