Saturday, 21 January 2017
शहरातील पालकांना आवाहन
कुष्ठरोग आणि कुष्ठरोगींबाबतचे गैरसमज दूर करु या ...
उस्मानाबाद, दि.21 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन
कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व विशेष कुष्ठरोग शोध
मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी 30 जानेवारी 2017 रोजी
होणाऱ्या ग्रामसभेला अधिकारी , कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून कुष्ठरोगाविषयी माहिती
देवून त्यासंबंधी समाजात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात
राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्पर्श
कुष्ठरोग जनजागृती अभियान , विशेष कुष्ठरोग शोध मोहीम व दूर्गम गावात कुष्ठरोग
जनजागृती मोहीम या कार्यक्रमासंदर्भात आयोजित बैठकीत सुनिल यादव हे अध्यक्षपदावरुन
बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.शेळके, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. बी.एस.खडके,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप, महिला व बाल कल्याण श्री. सुर्यवंशी आदी
उपस्थित होते.
कुष्ठरोग हा अल्पसंसर्गजन्य रोग
आहे. वेळेत निदान व पूर्ण उपचाराने कुष्ठरोग मुक्त होतो. त्यासाठी सर्व शासकीय
रुग्णालये आरोग्य केंद्रामध्ये मोफत औषधोपचार दिला जातो, याची माहिती जनतेला होणे
आवश्यक आहे. त्यासाठी हे अभियान व मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेचे योग्य
नियोजन करुन कुष्ठरोग निमूर्लनाचा संदेश गावोगावी पोहचावा, असे सुनिल यादव यांनी
सांगितले.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती
अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजे 30
जानेवारी 2017 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येणार
आहे. त्यामध्ये कुष्ठरोग प्रतिज्ञा, कुष्ठरोगाची माहिती व नियमित विचारले जाणारे
प्रश्न व उत्तरे याची माहिती दिली जाणार आहे. दळणवळणास कठीण दूर्गम गावांमध्ये 30
जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी
सेविकांमार्फत विशेष जनजागृती मोहिमेतून कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर
करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्ह्यात मागील तीन वर्षात
कुष्ठरोग विकृती दर्जा-2 व नवीन बाल कुष्ठरुग्ण आढळलेल्या शहरी भागातील 300 घरे व
गावामधील संपूर्ण घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविली जाणार
आहे , अशी माहिती यावेळी देण्यात आली. या
कार्यक्रमाचे नियोजन जिल्ह्यामध्ये चार शहरी
भागांमध्ये व 52 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे .
कुष्ठरोग निमूर्लन जनजागृतीसाठी शासकीय/निमशासकीय
विभाग सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या
आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे , असे आवाहनही सुनिल यादव यांनी
केले.
Friday, 20 January 2017
दिनांक 26 ते 28 फेब्रुवारी,2017 दरम्यान निवड चाचणीचे आयोजन
उस्मानाबाद,दि.20:-भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारा आयोजित स्पोर्टस ट्रेंनिग सेंटर, आकूर्ली रोड
कांदीवली(पूर्व) मुंबई येथे ॲथलेटिक्स, बॉक्सींग, ज्युदो, कुस्ती, हॉकी, कब्बड्डी,
टेबल टेनिस, फुटबॉल व धनुर्विद्या या खेळातील भारतीय शालेय खेळ महासंघ (SGFI) व राष्ट्रीय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व
राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा तसेच राज्यस्तर क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य
प्राप्त प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांकाच्या वैयक्तिक व सांघीक खेळाच्या खेळाडूचे
निवड चाचणीचे आयोजन दिनांक 26 ते28 फेब्रुवारी,2017 या कालावधीत करण्यात आले आहे.
उस्मानाबाद शहर व जिल्हयातील 12 ते 16 वर्षे वयोगटातील राज्यस्तर व
राष्ट्रीयस्तरावरील / पदकविजेत्या
खेळाडूंनी निवड चाचणी करीता आणि अधिक
माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन श्री संजय
महाडिक, जिल्हा क्रीडा अधिकारी उस्मानाबाद
यांनी कळविले आहे.
****
विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावेत
उस्मानाबाद,दि.20:-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त
जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील शाळा व महाविद्यालयात
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची
शिक्षण फी, परीक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in
या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी जात
प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र,वय,उत्पन्न व रहिवास दाखला, मागील वर्षाचा
उत्तीर्ण दाखला इत्यादी कागदपत्रे शाळा, महाविद्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
पात्र विद्यार्थ्यांस मिळणारी शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर
आणि शिक्षण फी ची रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली
जाते. अधिकृत बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यासाठी पुढील बाबीची
पूर्तता विद्यार्थी, पालक यांनी त्यांच्या
शाळा, महाविद्यालयाकडे करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे आपल्या आधार कार्ड
क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी आधार कार्डची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, ज्या
बँकेमध्ये खाते उघडले आहे,त्या बँकेच्या खाते क्रमांकाची खात्री होण्यासाठी
पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न
केले असल्याबाबतचा पुरावा म्हणून बँकेकडून आधार संलग्नता केल्याबाबतची पावती सोबत
जोडावी,विद्यार्थी, पालकांनी प्रस्तावासोबत आधार क्रमांक आणि बँकेशी संलग्न
केल्याबाबत पुरावा जोडला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम
तसेच महाविद्यालयाच्या खात्यावर शिक्षण शुल्काची रक्कम प्राधान्याने जमा केली
जाईल.
लाभार्थी विद्यार्थ्यांना दिली
जाणारी शिष्यवृत्ती ही त्यांच्याच खात्यावर जमा व्हावी व त्या खात्याचा गैरवापर
होऊ नये या हेतूने प्रत्येकांना आपला आधार क्रमांक हा बँकेच्या खात्याशी संलग्न
करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची
अनियमित्ता व बोगसगिरी करण्यास वाव राहणार नाही, जिल्हयातील सर्व विद्यार्थी, पालक
व महाविद्यालयास आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपापल्या बँकेत जावून आधार
क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावेत. त्यासाठी आवश्यक तो अर्ज भरून बँकेकडे द्यावा
आणि त्या पोच पावतीची प्रत आपल्या स्कॉलरशीप अर्जा बरोबर जोडावी, असे आवाहन सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
*******
जिल्हा कारागृहात हाळदी-कुंकु व तीळगुळाचा कार्यक्रम संपन्न
उस्मानाबाद,दि.20:-येथील
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय सामाजिक संस्था यांच्या वतीने गुरुवार
दि.19 जानेवारी रोजी मकर संक्रात सणानिमित्त कारागृहातील महिला बंद्यांसाठी
हळदी-कुंकू व तीळगुळाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी
संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ज्योती सुधाकर माळाळे (बेडेकर) यांनी कारागृहातील सर्व महिला बंद्यांना मार्गदर्शन
केले. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एस.सी.भगुरे,ॲड.अरुणा गवई , कारागृहातील
महिला कर्मचारी उपस्थित होत्या.असे कारागृह अधीक्षक यांनी कळविले आहे.
******
Thursday, 19 January 2017
किमान आधारभूत दरापेक्षा कमी दरात तूरी खरेदी केल्यास कारवाई होणार -मेरी निलिमा केरकेटटा
उस्मानाबाद,
दि.19:- केंद्र शासनाने तूर खरेदी - विक्री हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला असून
जे व्यापारी शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत दरापेक्षा कमी दरात तूर खरेदी करतील
त्यांच्यावर प्रशासनाकडून अत्यंत कडक कारवाई केली जाईल, प्रंसगी परवाना ही रद्द
होवू शकेल, असा गंभीर इशाराच राज्याच्या पणण विभागाच्या सचिव तथा महाराष्ट्र राज्याच्या मेरी
नीलिमा केरकेट्टा यांनी आज येथे दिला.
उस्मानाबाद,
लातूर जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, नाफेडच्या कार्यालयांना भेट तसेच
जिल्हयात शासनातर्फे केली जाणारी तूर खरेदी प्रक्रिया पाहणीकरिता श्रीमती केरकेट्टा
जिल्हयात आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी
त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश
पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा
पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर,उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे , अभयसिंह मोहिते,
निलेश श्रींगी, चेतन गिरासे आणि जिल्हा
माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे उपस्थित होते.
श्रीमती
केरकेट्टा पुढे म्हणाल्या,केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्णपणे
सकारात्मक आणि जबाबदारीने निर्णय घेत आहेत. तूरीला किमान आधारभूत किंमत 5 हजार 50
रुपये देणे, व्यापाऱ्यांनी यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केल्यास त्यांच्यावर त्यांचे
परवाने रदृ करण्याचे शासनाचे आदेश आहेत.जिल्हा पुरवठा अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार
समित्यांनी तहसिलदार, नायब तहसिलदार, प्रांताधिकारी या सर्वांनी प्रक्रियेवर
बारकाईने नजर ठेवण्याबाबतही श्रीमती केरकट्टा यांनी सूचित केले आहे. कृषी उत्पन्न
बाजार समित्यांनी दर्शनी भागात स्वत:चे खरेदी केंद्र सुरु करावीत,शेतकऱ्यांना
व्यवस्थापन मार्गदर्शन करावे, त्यांचा माल स्वच्छ नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांनी आणलेला
माल स्वच्छ करण्याची त्याचे व्यवस्थित पॅकिंग करण्याची व्यवस्था, यंत्रणा तात्काळ
उभी करावी ,असेही श्रीमती केरकेट्टा यांनी सूचित केले.
ज्या
शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांकडून नाकारला जाईल त्याच्या कारणांसह नमुना म्हणून-माल
साठवून ठेवण्यात येईल, या मालाची नंतर नाफेड कडून तपासणी करुन अंतिम निर्णय घेतला जाईल.
शेतकऱ्यांनी आपला माल हा शक्यतो कृषी उत्पन्न बाजार समितीलाच विकावा, असे आवाहन
प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हा माल विकताना शेतकऱ्यांनी किमान शेत वा शेतमालाची
अट रदृ करण्यात आली असून त्यांनी एका
साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचे आहे की हे शेत माझे आहे व हा आणलेला
शेत माल माझ्याच शेतातून आणला आहे. या प्रतिज्ञापत्रासोबतच शेतकऱ्यांनी स्वत:चे
निवडणूक ओळखपत्र आधारकार्ड, बँक खात्याची सविस्तर माहिती सादर करावयाची आहे.
Monday, 16 January 2017
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील महिला अधिकारी- कर्मचारी समितीच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
उस्मानाबाद,दि.16:- मध्यवर्ती
प्रशासकीय इमारतीमधील महिला अधिकारी- कर्मचारी समितीच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त
हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज संपन्न झाला.
शासकीय नोकरीतील अधिकारी- कर्मचारी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विविध कार्यक्रम-सणवारांचे औचित्य साधून या
धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून एकत्रित येण्यासाठी आरोग्याविषयी, इतर कलागुण आणि प्रत्येक विभागांच्या शासकीय योजनांची माहिती
सर्व महिलांना व्हावी या हेतूने ही समिती गठीत करण्यात आली आहे .
या समितीमध्ये जिल्हा माहिती
कार्यालयाच्या प्रतिनिधी श्रीमती आशा बंडगर यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड
करण्यात आली असून कृषी कार्यालयाच्या
श्रीमती सुषमा यादव यांची उपाध्यक्ष तर महिला व बाल विकास कार्यालयाच्या
श्रीमती शितल कोठावळे यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे .
मकर संक्रातीनिमित्त आयोजित
या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हळदीकुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम घेतला.
तसेच श्रीमती आशा बंडगर यांनी या
कार्यक्रमास उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचारी महिलांना लोकराज्य मासिक देवून लोकराज्य मासिकाचे महत्व
यावेळी पटवून सांगितले.
या कार्यक्रमात मध्यवर्ती
प्रशासकीय इमारतीतील सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होत्या.
****
टायपिंग व डेटा इंट्री टेस्ट रविवार दि.29 जानेवारी 2017 रोजी मुंबईच्या विविध केंद्रावर आयोजित
उस्मानाबाद,दि.16:- ज्या
परीक्षार्थीनी पूर्वी पी.ए./एस.ए. टायपिंग व डेटा इंट्री टेस्ट दिलेली होती
त्यांच्यासाठी पुन्हा टायपिंग व डेटा इंट्री टेस्ट रविवार दि.29 जानेवारी 2017
रोजी नवी मुंबई मधील पुढील केंद्रामध्ये घेण्यात येईल.
केंद्र
कोड (अ), भारतीय विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था, सेक्टर -7 बेलपाडा, खारघर रेल्वे
स्टेशनजवळ, नवी मुंबई-400614 येथे सकाळी 9.00 ते 5.30 (पाच बॅचेसमध्ये), केंद्र
कोड (ब), पिल्लाईज माहिती व तकनीकी विद्यालय, सेक्टर 16, नवीन पनवेल, नवी
मुंबई-410206 येथे सकाळी 9.00 ते 5.30
(पाच बॅचेसमध्ये), केंद्र कोड (क),एम.जी.एम.तकनीकी विद्यालय, एक्सप्रेस वे जवळ,
कामोठे, नवी मुंबई-410206 येथे सकाळी 9.00
ते 5.30 (पाच बॅचेसमध्ये), घेण्यात येईल.
पात्र परीक्षार्थीनी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी http://www.pasadreexam2017.in वेबसाईट
वापरावी. परीक्षार्थीच्या सरावाकरिता पुढील URL दि.23 ते 25 जानेवारी 2017 या
कालावधीत cbtdemo.quizky.net वर उपलब्ध
असेल. असे सहायक निदेशक (भर्ती) चिफ पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, डी.जी. चासकर यांनी कळविले आहे.
*******
आंब्यावरील फांदीमर रोगाचॆ नियंत्रण
उस्मानाबाद,दि.16:- चालूवर्षी बऱ्याच
आंब्यावर फांदीमर रोगाची
लागण झाल्याचॆ दिसत असून हा
एक बुरशीजन्य रोग आहॆ.
रोगकारक बुरशी फांद्याच्या सालीमधून आत प्रवॆश करतॆ व
तिची वाढ फांदीमध्यॆ होतॆ. प्रादुर्भित
ठिकाणची साल उभी तडकल्यासारखी दिसतॆ
व त्यामध्यॆ पांढरट
रंगाच्या बुरशीची वाढ झालॆली
दिसून यॆतॆ. या ठिकाणातून
सुरुवातीस पांढरट व नंतर तांबूस रंगाचा डिंक बाहॆर यॆतो. प्रादुर्भित फांदी शॆंड्याकडून वाऴतॆ.
बऱ्याच वॆऴा नवीन
लागवड कॆलॆल्या बागांमध्यॆ
प्रादूर्भाव मुख्य खोडावर दिसतो
परिणामी झाड सूकून जाते.
या रोगाच्या
नियंत्रणासाठी पावसाऴा सुरू
होण्यापूर्वी 1 टक्कॆ
बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड
2.5 ग्रॅंम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात खोड व फांद्या व्यवस्थित भिजतील अशाप्रकारॆ
फवारणी करावी. सद्य:स्थितीत आंबा झाडांवर मोहोर असून ही फवारणी न घॆता चालू हंगामातील आंबा फऴांची
काढणी झाल्यावरच पावसाऴा
सुरु होण्यापूर्वी घॆण्यात यावी,लक्षणॆ दिसून यॆताच
प्रादूर्भित भागावरील साल
थोडी खरवडावी व त्यावर
बोर्डोपॆस्ट लावावी प्रादूर्भित
रोगाच्या फांद्या प्रादुर्भित भागाच्या 2 तॆ 3 इंच
खाली कापून इतरत्र न टाकता जाऴून टाकाव्यात. कापलॆल्या भागास बोर्डोपॆस्ट
लावावी सदर बुरशीनाशकॆ लॆबल क्लॆम नाहीत अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी भूम आर. टी. जाधव, यांनी दिली
आहॆ.****
जिल्हा स्वच्छता हागणदारीमुक्त कृती आराखड्यांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
उस्मानाबाद,दि.16:-स्वच्छ
भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा परिषद
उस्मानाबाद व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यामाने उस्मानाबाद जिल्हा हागणदारीमुक्त
करण्यासाठी आज येथील कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा स्वच्छता हागणदारीमुक्त
कृती आराखड्यांतर्गत जिल्हास्तरीय दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .
या
कार्यशाळेस मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद
रायते म्हणाले की, प्रत्येक घरामध्ये
शौचालय असणे आवश्यक आहे , उघड्यावर शौच
करणे हे थांबविण्यासाठी तसेच प्रत्येकास
घरात शौचालय बांधण्याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे, यासाठी ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक आहे . मार्च 2018 पर्यंत संपूर्ण जिल्हा
हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. एमआरईजीएस, गट विकास अधिकारी , जिल्ह्यातील
सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने
हे उदिृष्ट पूर्ण करण्याचा मानस यावेळी श्री. रायते यांनी बोलून दाखविला .
या
कार्यशाळेस संबोधताना सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की , स्वच्छ भारत
अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी 470 गट बनविण्यात आले
आहेत, या गटांद्वारे जिल्हा हागणदारीमुक्त
करण्यासाठी संकल्प करण्यात आला असून जिल्ह्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी येणाऱ्या मुख्य अडचणी जाणून त्यावरील उपाय
योजना शोधणे, शौचालय नसलेल्या कुटुंबाची माहिती घेणे, संख्यात्मक उदिृष्टपूर्तीचा व हागणदारीमुक्तीचा आराखडा तयार करणे , प्रेरकांची
व प्रशिक्षकांची यादी तयार करणे , ओडीएपी चे नियोजन करणे , लोकप्रतिनिधींची यादी तयार
करणे , मनुष्यबळ उपलब्धतेचा तक्ता तयार
करणे इत्यादी बाबींची रुपरेषा त्यांनी
यावेळी स्पष्ट केली .
या
कार्यशाळेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक उप मुख्य
कार्यकारी अधिकारी शेखर जाधव यांनी केले .
या
कार्यशाळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी अनुप शेंगुलवार, टाटा अनुसंशोधन
संस्थेचे समन्वयक श्री. मॅथ्यू , सचिन
सुपेकर , प्रायमो संस्थेचे प्रतिनिधी सचिन
हंचळगे , जयंत देशपांडे, सर्व विस्तार अधिकारी ,सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी व टाटा संशोधन संस्थेचे विद्यार्थी
आदी उपस्थित होते . ****
Subscribe to:
Posts (Atom)



