Monday, 16 January 2017

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील महिला अधिकारी- कर्मचारी समितीच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न



उस्मानाबाद,दि.16:- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील महिला अधिकारी- कर्मचारी समितीच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज संपन्न झाला.  शासकीय नोकरीतील अधिकारी- कर्मचारी महिलांचे  प्रश्न सोडविण्यासाठी  तसेच विविध कार्यक्रम-सणवारांचे औचित्य साधून या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून एकत्रित येण्यासाठी  आरोग्याविषयी, इतर कलागुण आणि  प्रत्येक विभागांच्या शासकीय योजनांची माहिती सर्व महिलांना व्हावी या हेतूने ही समिती गठीत करण्यात आली आहे .
या समितीमध्ये जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रतिनिधी श्रीमती आशा बंडगर यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून कृषी कार्यालयाच्या  श्रीमती सुषमा यादव यांची उपाध्यक्ष तर महिला व बाल विकास कार्यालयाच्या श्रीमती शितल कोठावळे यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे .
मकर संक्रातीनिमित्त आयोजित या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हळदीकुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम घेतला. तसेच श्रीमती आशा बंडगर यांनी  या कार्यक्रमास उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचारी महिलांना  लोकराज्य मासिक देवून लोकराज्य मासिकाचे महत्व यावेळी पटवून सांगितले.
या कार्यक्रमात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.  यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील  सर्व महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होत्या.

****