Monday, 22 July 2019

जिल्हयातील आर्थिक गणना 2019 होणार पेपरलेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन


वृत्त क्रमांक-470                                                     दि.22 जुलै 2019
जिल्हयातील  आर्थिक गणना 2019 होणार पेपरलेस
नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
उस्मानाबाद,दि.22:- आर्थिक गणना म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत असलेल्या सर्व आस्थापनांची संपूर्ण मोजणी होय. आर्थिक गणनेच्या माहितीवरुन संपूर्ण देशात तसेच गाव / वार्ड / तालुका स्तरावर ही माहिती केंद्र / राज्य शासनाला आणि स्थानिक शासनांना नियोजन व धोरणांसाठी उपयुक्त  ठरणार आहे. तसेच औद्योगिक विकासाचा अभाव असलेल्या क्षेत्रामंध्ये विस्तार करण्यासाठी माहिती उपयुक्त ठरणार आहे.
गणना होणारे प्रमुख घटक उद्योग, रोजगार, कामगारांची संख्या, कारखाने, दुकाने, वस्त्रोद्योग इ. बाबत प्रत्येक घराला भेट दिली जाईल व सर्वांडून माहिती प्राप्त करण्यात येणार आहे.
दि. 10 जून 2019 ला पर्यवेक्षकांना यासंदर्भात जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले असूमाहे-जुलै अखेर आर्थिक गणनेला प्रत्यक्ष प्रारंभ होईल. यावेळी प्रथमच ऑनलाइन मोबाइल ॲपदवारे  आर्थिक गणना होईल. ॲप मुळे मोबाईलची रेंज किंवा इंटरनेट सेवा उपलब्ध झाली नाही तरी गणनेतील तपशील भरता येणार आहे. या प्रणालीमुळे प्रत्यक्षात जागेवर न जाता एकाच ठिकाणी बसून माहिती भरणे अशक्य आहे. रोजगाराचे / उद्योगाचे ठिकाणही अपलोड करणे बंधनकारक आहे. आपले सरकार ,ई-सेवा केंद्रात ऑनलाईन परीक्षेव्दारे प्रगणक व पर्यवेक्षक यांची निवड केली जात आहे. प्रगणक म्हणून काम करण्यासाठी ई-सेवा आपले सरकार केंद्रात जाऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. जिल्हयात एकूण 1 हजार 12 प्रगणक  व 253 पर्यवेक्षकांची निवड करण्यात येणार असून निवड झालेल्या प्रगणकास प्रत्यक्ष भेट देन कुटुंबाची माहिती संकलित केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर ‍ही गणना अधिक नेमकेपणाने अणि अचूक करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हयातील सर्व शहर व गावात गणनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे  यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली असून त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा पोलिस अधीक्षक आर.राजा यांच्यासह 15 सदस्यांचा समावेश आहे.
माहिती संकलित करताना जिल्हयातील सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देन सहकार्य करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा सांख्यिकी  अधिकारी वामन जाधव यांनी केले आहे.
                                    ****




वृत्त क्रमांक-471                                                     दि.22 जुलै 2019
पुलंच्या साहित्यावर आधारित
स्टँड अप कॉमेडी एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन
व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात दि. 9 ऑगस्ट रोजी रंगणार स्पर्धा

उस्मानाबाद, दि. 22- महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे स्टँड अप कॉमेडी या पुलंच्या साहित्यावर आधारित एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा दि. 9 ऑगस्ट 2019 रोजी व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, उस्मानाबाद येथे संपन्न होणार आहे.
        मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर पात्र ठरणाऱ्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील विनोदी कलावंत यांमधील प्रतिभा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे की , दि. 6 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातून जिल्हास्तरीय फिरायला सुरुवात झाली, असून प्रत्येक केंद्रावरील विजेत्याला रुपये 20 हजार आणि उपविजेत्याला रुपये 15 हजार अशी लोकं स्वरूपाची फोर बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्हा केंद्रावर सकाळी दहा ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी सात अशावेळी  स्पर्धा संपन्न होईल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर स्पर्धकांना केंद्रावर नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी 750 67 48 पंचावन्नाव्या व्हाट्सअप क्रमांकावर दोन मिनिटाचे सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. यातून निवड करण्यात आलेल्या स्पर्धा कला केंद्रावर पाच ते आठ मिनिटे सादरीकरण करण्याची संधी मिळेल.
स्पर्धेचा अंतिम सोहळा दि. 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे रंगणार आहेत.
या संपूर्ण उपग्रहाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवर केले जाणार असून महाराष्ट्रातील नवागत कलावंतांची कला सर्वदूर पोहोचावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आदी भागातील शहरी व ग्रामीण विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा राबविण्यात येत आहेत. विनोद हा फुलांच्या साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समाजातील माणसांच्या वृत्तींवर मुलांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केले




स्टँड अप कॉमेडीही स्पर्धा देखील अशाच स्वरूपाची होणार आहे. एखाद्या वृत्तीवरख्‍ माणसाच्या स्वभावावर दैनंदिन व्यावहारिक जीवनात घडणार्‍या प्रसंगांवर मिश्किल टिप्पणी करत,
त्यातील विनोद सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न अनेक स्टँड अप कॉमेडियन करतात. सध्या तरुणाईत हा प्रकार लोकप्रिय होत आहे. त्यामुळे याच धर्तीवर पुलंचे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील स्पर्धकांनी वर दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर आपला दोन मिनिटांचा व्हिडिओ पाठवा आणि अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत चौधरी यांच्याशी व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा,असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
****

वृत्त क्रमांक-472
         
विभागीय मंडळ स्तरावर इ.10वी, 12वीच्या
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुरू
उस्मानाबाद,दि.22- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबुर्डा, ,शिवाजी नगर पुणे यांच्या वतीने जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इ.दहावीसाठी 0 23 82 251 633 व इ. बारावी साठी 0 23 82 251 733 या हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत.
तरी विद्यार्थी पालक व शाळाप्रमुखांनी आपापल्या अडचणींविषयी उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावर तसेच लातूर जिल्हयासाठी एम. एस.दाणाई यांच्याशी 94 22 0 15 15 2, उस्मानाबाद जिल्हयासाठी व्ही.के.कदम यांच्याशी 94 23 72 17 56 तर नांदेड जिल्हयासाठी बी.एम. कच्छवे यांच्याशी 93 71 26 15 00 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी कळविले आहे.
****







वृत्त क्रमांक-473                                                   दि.22 जुलै 2019
माता व बालकांचे आरोग्य सुधारणे ही काळाची गरज
                                                 -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
उस्मानाबाद,दि.22- उस्मानाबाद जिल्हा आकांक्षा जिल्हा आहे. त्यात ग्रामीण व शहरी भागातील गरोदर माता व बालकांचे आरोग्याचे निर्देशांक यास विशेष महत्त्व आहे. ग्रामीण भागात आशा/आरोग्य सेवक/सेविका यांच्यामार्फत वैदयकीय सेवा अधिक गुणवत्तापूर्ण देऊन प्रत्येक गरोदर माता व बालक यांना आरोग्यसेवेच्या प्रवाहात आणून विशेष काळजी घेणे व  माता व बालकांचे आरोग्य सुधारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी  आज येथे केले. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे शहरी भागात विशेष जननी शिशु सुरक्षा आरोग्य शिबीरे आयोजित करण्याबाबत सूचित केले होते. त्यातील पहिल्या जननी शिशू आरोग्य शिबिराचे आयोजन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 2 यांच्या वतीने अलमास सिद्दिक अहमद उर्दू शाळा व मदरसा, गालिब नगर, उस्मानाबाद येथे करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी यावेळी उपस्थित गरोदर माता बालकांशी संवाद साधला. त्यात आरोग्यदायी जीवनशैली बरोबरच स्वतःची काळजी घ्यावी, रक्तक्षय व इतर कोणत्याही आजाराबाबत तात्काळ आरोग्य संस्थेशी संवाद साधून निरसन करून घ्यावे व समाज सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, कुपोषित बालकांना अंगणवाडीमार्फत विविध प्रकारचे खाद्य वाटप करण्यात येत आहे. ते वेळेवर व नियमित दिल्यास कुपोषणाचे प्रमाण निश्‍चितच कमी होणार आहे.सध्या मुलींच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत असल्यामुळे शालेय जीवनापासूनच रक्तवाढीसाठी गोळ्या घेतल्यास भविष्यात कुपोषणाचे प्रमाण कमी होणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी परिसर स्वच्छता, वृक्ष लागवडीचे फायदे, माता व बालकांमधील कुपोषण व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुपोषित मातांना आरोग्य कार्डाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, मुफ्ती रहमतुल्ला खान, मीर हजरत अली, डॉ. शेवाळे, मौलाना निसार अहमद, शेख हुसेनी, शेख सादिक, डॉ. श्रीमती पाटील, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री.लाकाळ, श्री. पाटील, श्री. दिलीप जाधव, शालेय विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन दुबे यांनी केले.