Thursday, 5 September 2024
Thursday, 22 August 2024
#मुख्यमंत्री_युवा_कार्य_प्रशिक्षण_योजना : सर्व विभागांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारुन रिक्त पदे तातडीने भरावी - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
#मुख्यमंत्री_युवा_कार्य_प्रशिक्षण_योजना :
सर्व विभागांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारुन रिक्त पदे तातडीने भरावी
- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
केंद्र शासनाच्या अधिनस्त कार्यालयातही देण्यात येणार प्रशिक्षण
धाराशिव दि.19( जिमाका ) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्हा चांगल्याप्रकारे काम करत आहे.जिल्हयातील युवक-युवतींना या योजनेअंतर्गत रोजगार आणि प्रशिक्षण देण्यात जिल्हा मराठवाडा विभागात अग्रेसर आहे.याचा पुढचा टप्पा देखील लवकर गाठण्यासाठी सर्व विभागांनी आपल्या कार्यालयात रिक्त असणारी पदे ही ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारुन या योजनेअंतर्गत तातडीने भरावी.असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी जिल्हयातील सर्व विभाग प्रमुखांना दिले.
कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या " मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा आज 22 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.यावेळी डॉ.ओंबासे बोलत होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी श्री.उदयसिंह भोसले,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संजय गुरव व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे यावेळी म्हणाले की, जिल्हयातील बहुतांश विभागांनी या योजनेसाठी चांगले काम केले आहे. जिल्ह़यातील युवक-युवतींना रोजगारासह शासकीय आणि खाजगी आस्थापनातही या योजनेतून प्रशिक्षण मिळत आहे.रोजगारभिमुख हे प्रशिक्षण असल्याने त्यांच्या कौशल्याचा विकास होत आहे. जिल्ह़यात 3 हजारांपेक्षा जास्त युवक-युवतींना या योजनेच्या प्रशिक्षणासाठी आदेश देवून विविध विभागात रुजू करुन घेतले आहे. यापुढील टप्पा गाठण्यासाठी सर्व विभागांनी त्यांच्या विभागातंर्गत रिक्त पदे तात्काळ ऑफलाईन पध्दतीने अर्ज जमा करुन भरुन घ्यावीत,असे डॉ. ओंबासे यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी विभागनिहाय या योजनेचा आढावा घेतला.कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त श्री.गुरव यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांनी ऑनलाईन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.तसेच ऑनलाईन केलेली रिक्त पदे ही ऑफलाईन करण्याची पध्दतही यावेळी त्यांनी सांगितली.
आढावा बैठकीला जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी सभागृहात उपस्थित होते.तर तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाअंतर्गत या योजनेअंतर्गत भरलेली आणि रिक्त पदांची माहिती दिली.
Friday, 16 August 2024
LIVE | 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
*_Stay tuned...._*
🎥📡📡🎥📡📡
*#LIVE | 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ...*
https://youtube.com/live/4vMUKq7J8SE?feature=share
🗓️ *शनिवार,१७ ऑगस्ट*
🕑 *दुपारी २ वा.*
📍 *श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे*
_(Pre-generated link)_
नागरिकांच्या समस्यांची तातडीने सोडवणूक करा - पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत
नागरिकांच्या समस्यांची तातडीने सोडवणूक करा
- पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत
भूम येथे जनता दरबार
धाराशिव दि. 16 (जिमाका) भूम तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. समस्याग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांची सोडून करणे हे यंत्रणेची काम आहे.त्यांच्या समस्यांची सोडवणूक करून त्यांना न्याय देणे हे यंत्रणांचे कर्तव्य असून आजच्या जनता दरबारात अर्ज घेऊन आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्यांची सोडून तातडीने करावी.असे निर्देश पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिले.
आज 16 ऑगस्ट रोजी भूम येथे येथील तहसील कार्यालयात आयोजित जनता दरबारात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधीक्षक संजय जाधव,उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, बाळासाहेब हळउमरीकर, बालाजी गुंजाळ, जिल्हा परिषदेचे माजी कृषी समिती सभापती अण्णासाहेब देशमुख व बाळासाहेब क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, जनता दरबार या कार्यक्रमातून नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविण्यात येत आहे.अर्ज करणारा नागरिक आणि संबंधित विभागाचे अधिकारी हे प्रत्यक्ष उपस्थित राहत असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना एक ते दोन दिवसात त्या अर्जावर कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्री या नात्याने निर्देश देण्यात येत असल्यामुळे संबंधितांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.तालुक्यात ज्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे, त्यावरील अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे.अतिक्रमणामुळे कुठेही रहदारीला अडथळा निर्माण झाला असेल तर ते अतिक्रमण प्राधान्याने काढण्यात यावे, असे ते म्हणाले.
भूम तालुक्यात आजच्या जनता दरबारात शेतकऱ्यांच्या वीज वितरण कंपनीबाबतचे अर्ज मोठ्या संख्येने असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले,वीज वितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन व डीपी उपलब्ध करून द्यावी.कुणालाही चुकीचे बील दिले जाणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या देखील तक्रारी नागरिकांनी या जनता दरबारात केल्या आहे, ज्या बसेस ज्या मार्गावर सुरू होत्या,त्या आता बंद केल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, त्यामुळे विभाग नियंत्रकाने या मार्गावरील बसेस पूर्ववत सुरू कराव्यात.ज्या गावातील नागरिकांनी बस सुरू करण्याची मागणी आपल्या अर्जात केली आहे, त्या मार्गावर येत्या एक-दोन दिवसात बसेस सुरू कराव्यात.बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे शेतकऱ्यांच्या अर्जावरून दिसून येत आहे. तेव्हा पीक कर्ज व अनुदानाबाबत बँक,जिल्हा उपनिबंधक आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन संबंधित शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यात येईल अशी त्यांनी सांगितले.
ज्या गावांमध्ये दहनशेड नाही,अशा गावांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर काही गावात जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले की, दहनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्मशानभूमीचे सातबारा तातडीने तयार करण्यात यावे.जनता दरबारात नागरिकांच्या सर्व अर्जांची संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन येत्या दोन दिवसात कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
जनता दरबारात तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी विविध यंत्रणांशी संबंधित असलेल्या समस्यांचे व तक्रारींचे अर्ज दिले. यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी प्रत्येक अर्जदाराच्या अर्जाची बारकाईने पाहणी करून अर्जदाराशी अर्जाबाबत व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती तातडीने निकाली काढण्याबाबत निर्देशही यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
जनता दरबारात भूम तालुक्यातील प्रमोद शेळके,विजय कावळे,अनिता कडकोटे,अच्युत आठवले, बाजीराव कसबे, संदीप सपकाळ,बालाजी कुटे, दिलीप गरड,पोपटराव चौधरी,कैलास चंदनशिवे, दत्तात्रय काळे, सुरेखा बनसोडे, शिवाजी सुतार, प्रवीण खांडेकर,अभिमान जाधवर, प्रभू मदने,संजय हाडे, रेखा गणगे,अनिता पांढरे,सुभाष सावळे,रामलिंग उंबरे, उमेश दुरूंदे,महादेव कुटे,नवनाथ सुरवसे, किसन चौधरी,निलेश शिंदे, सिद्धेश्वर जगदाळे,अभिजीत महाजन, अर्चना दराडे, ईश्वर दिसले, मच्छिंद्र वरडे,अरुण झांबरे यांच्यासह अनेक नागरिकांनी या जनता दरबारात आपलया विविध समस्या सोडवणुकीसाठी अर्ज दाखल केले होते.
आजच्या या जनता दरबाराला जिल्हास्तरीयंत्रणांचे प्रमुख अधिकारी तसेच तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Saturday, 20 July 2024
1 लाख 43 हजार 251 महिलांचे अर्ज प्राप्त : त्यापैकी 59 हजार 994 ग्रामीण महिलांच्या अर्जांना तालुका समितीची मान्यता
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण
1 लाख 43 हजार 251 महिलांचे अर्ज प्राप्त : त्यापैकी 59 हजार 994 ग्रामीण महिलांच्या अर्जांना तालुका समितीची मान्यता
महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
धाराशिव दि 20 (जिमाका) राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील महिला आता मोठ्या संख्येने पुढे येत आहे. या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.दर महिन्याला 1500 रुपये पात्र महिला लाभार्थीच्या आधार सलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे वर्षासाठी 18 हजार रुपये महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
जिल्ह्यातील 4 लाख 48 हजारापेक्षा जास्त पात्र महिलांना या या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे.19 जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील 1 लाख 43 हजार 251 महिलांचे अर्ज प्राप्त झाले.यामध्ये ऑनलाईन अर्जाची संख्या 38 हजार 779 आणि 12 हजार 472 ऑफलाइन अर्जाचा समावेश आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून तालुका समितीने ग्रामीण भागातील 59 हजार 994 अर्जाना मान्यता दिली आहे.
जिल्ह्यात एकूण 8 तालुक्यात भूम, कळंब, धाराशिव,तेर,तुळजापूर उमरगा,आलूर, परंडा,लोहारा व वाशी येथे एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय आहे.या कार्यालयअंतर्गत 1885 आणि धाराशिवसह नगरपालिका क्षेत्रात 167 अशा एकूण 2052 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे.19 जुलैपर्यंत ग्रामीण भागातून 1 लाख 36 हजार 109 आणि शहरी भागातील 8142 महिलांचे असे एकूण 1 लाख 43 हजार 251 अर्ज प्राप्त झाले.यातील ग्रामीण भागातील 34 हजार 915 आणि शहरी भागातील 3864 अशी एकूण 38 हजार 779 महिलांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले.ग्रामीण भागातील 1 लाख 194 महिलांचे आणि शहरी भागातील 4472 महिलांचे असे एकूण 1 लाख 4 हजार 472 ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समितीने बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या अर्जाला मान्यता दिली आहे,ती पुढीलप्रमाणे भूम- 9292,कळंब -12 हजार 146,धाराशिव व तेर -2904, तुळजापूर- 11 हजार 339,उमरगा व आलूर- 3 हजार,परंडा- 12 हजार 675, लोहारा- 2498 आणि वाशी- 6140 अशा एकूण 59 हजार 994 ग्रामीण महिलांच्या अर्जाना मान्यता दिली आहे.शहरी भागातील किती महिलांच्या अर्जांना मान्यता मिळाली याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेच्या लाभासाठी असलेल्या निकषात बसतात, त्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.जास्तीत जास्त महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Tuesday, 16 July 2024
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना
15 जुलैपर्यंत 99 हजार महिलांचे अर्ज
79 हजार महिलांचे अर्ज ठरले योजनेसाठी पात्र
10 हजार शहरी तर 69 हजार ग्रामीण महिलांचा समावेश
धाराशिव दि.16 (जिमाका) महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्यासह पोषणात सुधारणा करण्यासोबतच कुटुंबातील त्यांच्या निर्णयक भूमिकेच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील 4 लक्ष 48 हजार 636 महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.यामध्ये शहरी भागातील 79 हजार 304 आणि ग्रामीण भागातील 3 लक्ष 69 हजार 332 महिलांना लाभ देण्याचे नियोजन आहे.2 जुलै ते 15 जुलैपर्यंत 99 हजार 665 महिलांचे अर्ज प्राप्त झाले.यामध्ये 12 हजार 215 शहरी आणि 87 हजार 450 ग्रामीण महिलांच्या अर्जाचा समावेश आहे.त्यापैकी 79 हजार 445 महिलांचे अर्ज या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले.यामध्ये शहरी भागातील 10 हजार 387 आणि ग्रामीण भागातील 69 हजार 58 महिलांच्या अर्जाचा समावेश आहे.
2 जुलै ते 15 जुलैपर्यंत 99 हजार 665 महिलांचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये धाराशिव शहरातील 2064 आणि ग्रामीण भागातील 12 हजार 186, तुळजापूर तालुक्यातील शहरी भागातील 2059 आणि ग्रामीण भागातील 9799,उमरगा तालुक्यातील उमरगा व मुरूम शहरी भागातील 2021 आणि ग्रामीण भागातील 15 हजार 768,लोहारा शहरातील 466 आणि ग्रामीण भागातील 6112,भूम शहरातील 480 आणि ग्रामीण भागातील 4012,परंडा शहरातील 1471 आणि ग्रामीण भागातील 10 हजार 544, कळंब शहरातील 1296 आणि ग्रामीण भागातील 3205, वाशी शहरातील 530 आणि ग्रामीण भागातील 7 हजार 432 असे शहरी भागातील 10 हजार 387 आणि ग्रामीण भागातील 69 हजार 58 असे एकूण 79 हजार 445 अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहे. आतापर्यंत शहरी भागातून 15.40 टक्के तर ग्रामीण भागातून 23.68 टक्के अर्ज प्राप्त झाले आहे. जास्तीत जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Monday, 15 July 2024
महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करून जास्तीत जास्त महिलांना योजनेसाठी प्रोत्साहित करा - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे
#माझी_लाडकी_बहीण_योजना
महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करून जास्तीत जास्त महिलांना योजनेसाठी प्रोत्साहित करा
- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून योजनेचा आढावा
धाराशिव दि.15 (जिमाका) मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे.ग्रामीण व शहरी भागातील या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज भरण्यास महिलांना मदत करून जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन जास्तीत जास्त महिलांना योजनेच्या लाभासाठी प्रोत्साहित करा.असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले.
आज 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कक्षातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा तालुकास्तरीय यंत्रणांकडून आढावा घेताना डॉ.ओंबासे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गिरी व श्री.गोडभरले, उपजिल्हाधिकारी श्रीमती गायकवाड व नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक तहसील जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे म्हणाले,जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणाचे अधिकारी कर्मचारी यांनी पोहोचून त्यांना अर्ज वितरित करावे.शहरी भागात हे काम वेगाने करावे. लाभार्थ्यांनी अर्ज भरले व पात्र ठरले त्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित कराव्यात.त्यामुळे लाभार्थी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येतील.किती कर्मचाऱ्यांनी किती अर्ज संकलित केले याची माहिती ठेवावी. बचत गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे.शहरी भागात अर्जाला तपासून पात्र ठरविण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना तर ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांना आहे.शहरी भागात या योजनेसाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. त्यांच्याकडून दैनंदिन अहवाल मागवावा असे त्यांनी सांगितले.
लाभार्थ्यांच्या पात्र याद्या बघून त्यांना मंजुरी देऊन त्या प्रकाशित कराव्या असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, ऑनलाइन भरलेले अर्जसुद्धा तपासून मंजूर करावे. या कामी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा घ्याव्या.ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचे अर्ज भरून घेऊन अर्जाची छाननी करावी.या कामासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित कराव्यात. सर्वांनी या योजनेसाठी प्राधान्याने काम करावे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांचा दररोज आढावा घ्यावा. कोणत्या कर्मचाऱ्यांनी शहरी भागात अर्ज जमा केले याची नोंद घ्यावी. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देता येईल असे डॉ.ओंबासे म्हणाले.
डॉ.घोष म्हणाले,ग्रामीण भागातील योजनेच्या लाभासाठी पात्र असलेली एकही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी गावपातळीवर यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनातून काम करावे.अंगणवाडी सेविकांनी किती अर्ज भरून घेतले याची नोंद घ्यावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुकास्तरीय यंत्रणांनी आणि शहरी भागासाठी काम करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाने योजनेसाठी किती महिलांनी अर्ज केले,किती महिलांचे अर्ज प्राप्त झाले आणि किती अर्ज पात्र ठरले तसेच योजनेसाठी करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली.यावेळी तहसीलदार,गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी ही माहिती दिली.
Sunday, 14 July 2024
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण महिलांच्या सक्षमीकरणाला मिळेल चालना
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण
महिलांच्या सक्षमीकरणाला मिळेल चालना
महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य. महाराष्ट्राने सुरू केलेल्या अनेक योजना,उपक्रम व अभियानाचे अनुकरण देशातील अनेक राज्यांनी केले आहे. स्त्री आणि पुरुष ही संसाररूपी जीवनाची दोन चाके आहे. कुटुंबाच्या अर्थार्जनात महिलाही आपला सहभाग देत आहे.महिलांच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे म्हणून महिला धोरण ठरविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. माझी कन्या भाग्यश्री,लेक लाडकी या मुलींसाठी योजना सुरू केल्या.एवढ्यावरच न थांबता आता महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे.या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य,त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासोबतच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत होण्यास मदत होणार आहे.
" मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करून त्याची व्याप्ती देखील वाढविली आहे.महानगरपालिका क्षेत्राकरिता वार्ड स्तरीय समित्या गठित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा,यासाठी अनेक अटी शिथिल करून प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित असलेल्या विधवा,घटस्फोटीत,परितक्त्या, निराधार महिला त्याचप्रमाणे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.वर्षाकाठी 18 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.हा पैसा महिलांच्या अडीअडचणीच्या कामी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक बाबीसाठी खर्च करण्यात कामी पडणार असून त्यांना आत्मनिर्भर,स्वावलंबी व त्यांच्या सशक्तिकरणाला हातभार लागणार आहे.
योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारी शक्ती दूत हे मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे.नवविवाहित महिलेचे नाव रेशनकार्डवर लवकर लावणे शक्य होत नाही,त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल व त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आता योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे पोस्टातील बँक खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच ऑफलाइन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.जिल्ह्यात जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कक्ष सुरू करण्यात आले आहे.या कक्षातून महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे.जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आढावा बैठका देखील घेण्यात येत आहे.समित्या गठित करून समितीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांचे ग्रामीण व शहरी भागात अर्ज भरून घेण्यासाठी बालवाडी सेविका,अंगणवाडी सेविका, नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख,नागरी अभियानाचे व्यवस्थापक, आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ज्या महिला लाभार्थी " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील त्या लाभार्थी महिलांचे केवळ ऑफलाइन अर्ज भरून घेऊन त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल मात्र पात्र लाभार्थी महिलांकडून या योजनेचे अर्ज भरून घ्यावे लागणार आहे.
ग्रामस्तरीय समिती ही गाव पातळीवर स्थापन करण्यात येत आहे.या समितीमध्ये ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,तलाठी,अंगणवाडी सेविका, आशा सेविका,ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी असतील. या समितीचे संयोजक हे ग्रामसेवक तर सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असतील. ही समिती गाव पातळीवर जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करून ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने लाभार्थी महिलांची नोंदणी करणार आहे. ऑफलाइन अर्ज लगेच ॲप/ पोर्टलवर भरावे लागणार आहे. या समितीकडून गावातील अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी आणि आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे.ही यादी गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या यादीवर कोणी आक्षेप घेतले तर त्याचे निराकरण करण्यात येणार आहे तसेच द्विवृत्ती (डुप्लिकेशन) टाळण्यात येईल.लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,शहर अभियानाचे व्यवस्थापक,आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र,अंगणवाडी पर्यवेक्षिका,ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्रति लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे,अर्ज भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास,या प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या योजनेतील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.
विवेक खडसे
जिल्हा माहिती अधिकारी
धाराशिव
Friday, 12 July 2024
माझी लाडकी बहीण योजना : 11 जुलैपर्यंत 75 हजार महिलांनी भरले अर्ज :
माझी लाडकी बहीण योजना
*11 जुलैपर्यंत 75 हजार महिलांनी भरले अर्ज
* ग्रामीण 51 हजार तर शहरी 8 हजार महिलांचे प्रत्यक्ष अर्ज
* 15 हजार 344 महिलांचे ऑनलाइन अर्ज
धाराशिव दि.12 (जिमाका) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी योजना आहे.या योजनेच्या लाभासाठी 21 ते 65 वयोगटातील विवाहित,विधवा,घटस्फोटीत, परीतक्त्या,निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र आहेत.जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी जिल्हा प्रशासन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे.
गावपातळीवर या योजनेसाठी ग्रामस्तरीय पडताळणी समित्या गठित करण्यात आल्या आहे.जिल्ह्यात या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 11 जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील 75 हजार 702 महिलांनी अर्ज केले.यामध्ये 15 हजार 344 ऑनलाइन अर्जाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील भूम एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत 181 अंगणवाडी केंद्र कार्यरत असून 11 जुलैपर्यंत 3466 अर्ज भरले.तर 724 अर्ज महिलांनी ऑनलाईन भरले.कळंब प्रकल्पाअंतर्गत 251 अंगणवाड्या असून 7171 महिलांनी प्रत्यक्ष तर 1364 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.धाराशिव प्रकल्पाअंतर्गत 220 अंगणवाडी केंद्र कार्यरत असून या केंद्रातर्गत 5392 महिलांनी अर्ज भरले.तर 1166 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले. धाराशिव तालुक्यातील तेर बालविकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत 184 अंगणवाड्या असून 6470 महिलांनी प्रत्यक्ष अर्ज भरले.तर 1726 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.
तुळजापूर प्रकल्पअंतर्गत 240 अंगणवाड्या आहेत.या अंगणवाड्याच्या माध्यमातून 3604 महिलांनी प्रत्यक्ष तर 1474 महिलांनी ऑनलाइन अर्ज भरले. उमरगा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत 185 अंगणवाड्या येत असून या अंगणवाडयाअंतर्गत 9719 महिलांनी प्रत्यक्ष तर 2333 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.उमरगा तालुक्यातील आलूर एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत 164 अंगणवाडी केंद्र कार्यरत असून या केंद्रांतर्गत 5893 महिलांनी अर्ज भरले तर 1300 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.परंडा तालुक्यात 193 अंगणवाडी केंद्रांतर्गत 4056 महिलांनी प्रत्यक्ष व 1178 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.
लोहारा प्रकल्पअंतर्गत 150 अंगणवाड्या कार्यरत आहे.या अंगणवाड्याच्या माध्यमातून 1965 महिलांनी आणि 710 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.वाशी प्रकल्पांतर्गत 117 अंगणवाडी केंद्र असून 4126 महिलांनी प्रत्यक्ष अर्ज आणि 1124 महिलांनी ऑनलाईन अर्ज केले.
जिल्ह्यातील 10 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत 1885 अंगणवाड्या कार्यरत असून 11 जुलैपर्यंत 51 हजार 862 महिलांनी या योजनेच्या लाभासाठी प्रत्यक्षात उपस्थित राहून व 13 हजार 93 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.
धाराशिव एकात्मिक बाल विकास प्रकल्प (नागरी प्रकल्प) अंतर्गत कार्यरत 167 अंगणवाड्यांच्या माध्यमातून 8496 महिलांनी तर 2251 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी प्रकल्प अंतर्गत एकूण 2052 अंगणवाड्या कार्यरत असून या प्रकल्पांतर्गत 11 जुलैपर्यंत 60 हजार 358 महिलांनी प्रत्यक्ष आणि 15 हजार 344 महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता व लागणारे आवश्यक कागदपत्रे हे निश्चित करण्यात आले आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Thursday, 4 July 2024
परंडा येथे " संपूर्णता अभियान " चा उत्साहात शुभारंभ
परंडा येथे " संपूर्णता अभियान " चा
उत्साहात शुभारंभ
धाराशिव दि.04 (जिमाका) नीती आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून धाराशिवचा समावेश केला आहे.त्याअंतर्गत परंडा तालूका हा आकांक्षित तालूका म्हणून घोषित केला आहे.परंडा तालुक्यातील काही निर्देशांकात सुधारणा करण्याकरिता ४ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये “ संपूर्णता अभियान “ राबविण्यात येणार आहे.
संपूर्णता अभियानचा जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम आज ०४ जुलै २०२४ रोजी परंडा येथील राजधानी मंगल कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांचे हस्ते करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.मैनाक घोष हे अध्यक्षस्थानी होते.
उदघाटन कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे,जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला,जिल्हा नियोजन अधिकारी प्रवीण झाडे,गट विकास अधिकारी श्री.नागटिळक,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनयशील कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी व तालुकास्तरीय अधिकारी,कर्मचारी, आशा स्वयंसेविका वअंगणवाडी कार्यकर्ती मोठ्या संख्येने उपास्थित होत्या.
परंडा तालुक्यातील बचत गटांमार्फत या उद्घाटन कार्यक्रमामध्ये विविध वस्तूंची विक्री करण्यात आली.आरोग्य विभागाकडून आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.नागरिकांचे व अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी (रक्त दाब, शुगर तपासणी ) करण्यात आली.
आरोग्य विभागामार्फत परांडा शहरात शालेय विद्यार्थी यांची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.संपूर्णता अभियानात आरोग्य,महिला व बाल कल्याण,शिक्षण, कृषी,सामाजिक विकास या विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ठराविक निर्देशंकात माहे सप्टेंबर २०२४ अखेर १०० टक्के उदिष्ट साध्य करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी यावेळी कार्यक्रमातून निर्देश दिले.
Tuesday, 25 June 2024
शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
"सिबील स्कोअर' ची सक्ती करता येणार नाही
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत वार्षिक पत आराखडा सादर
मुंबई, दि. २५:- शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकानीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३व्या बैठकीत ते बोलत होते. पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना 'सिबील स्कोअर'ची सक्ती केली जाऊ नये. राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी समितीने सादर केलेल्या राज्याच्या सन २०२४-२५ साठीच्या ४१ लाख २८६ कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आरबीआय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावेत, असे निर्देशही देण्यात आले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील तसेच राज्याचे
मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्तमुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे सचिव तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अविरल जैन, सचिन शेंडे, नाबार्डच्या मुख्य व्यवस्थापक रश्मी दरड, विविध बँकाचे वरीष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. महाराष्ट्र कृषीप्रधान आणि प्रगतीशील आहे. महाराष्ट्राने कृषी क्षेत्रातही अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आमचा शेतकरी प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. दुर्दैवाने निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्यावर संकट येऊ राहते. अशावेळी आम्ही शासन म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत त्यासाठी आम्ही संकटातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या निकषाहून दुपटीने मदत केली आहे हेक्टर मर्यादाही वाढवली आहे एक रुपयात पिक विमा दिला आहे. बँकांनी त्याला संकट काळात आर्थिक पाठबळ न दिल्यास त्याला अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागतो. यातूनच आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते.शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तिसऱ्यांदा सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीच्या योजनेला प्रथम प्राधान्य दिले आहे. केंद्राचे सहा हजार रुपये आणि राज्याचे सहा हजार रुपये मिळून आम्ही शेतकरी सन्मान योजनेतून मदतीचा हात दिला आहे. बँका मोठ्या शेतकऱ्यांना आणि काही कृषी उद्योगांना कर्ज देतात. पण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना हात आखडता घेतला जाऊ नये. तुम्ही त्याच्या संकट काळात मागे उभे राहिल्यास तेही भक्कमपणे उभे राहतील. आम्ही देखील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करावी यासाठी प्रयत्न करतो. प्रोत्साहन देत असतो. केंद्रीय सहकार मंत्रालय निर्माण करून सहकार मंत्री अमित शहा यांनी शेतकरी आणि सहकार क्षेत्राला मजबूत करण्याचा धोरण आखले आहे. बँकानी शेतकऱ्यांसाठीच्या या संस्थांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नागरी सहकारी बँका, कृषी पतपुरवठा संस्था, जिल्हा बँकांना राष्ट्रीयकृत बँकांनी मदत केली पाहिजे. महाराष्ट्राकडे प्रचंड मोठी क्षमता आहे. उद्योग क्षेत्राचेही महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलेले असते. आपल्याकडे चांगले मनुष्यबळ आहे. आम्ही उद्योगांना रेड कार्पेट घातले आहे. दावोस येथूनही दिड लाख कोटींहून अधिक गुंतवणूक करार केले गेले आहेत. राज्याच्या विकासाला केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिनची ताकद आहे त्यामुळे बँकांनाही यात सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना विश्वास दिला पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांप्रमाणेच बँकानाही शासन म्हणून सहकार्य करू, आपल्यामागे ठामपणे उभे राहू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसूलमंत्री श्री. विखे-पाटील, सहकार मंत्री श्री. वळसे -पाटील, कृषी मंत्री श्री. मुंडे यांनीही महत्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली. तसेच चर्चेत सहभाग घेतला. सहकारी बँकांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांना कर्ज देताना सहकार्य करण्याच्या मुद्यावर या सर्वांनीच विविध सूचना केल्या.
बैठकीत श्री. पांडे यांनी राज्याचा वार्षिक पत आराखडा सादर केला. तसेच गतवर्षीच्या उद्दीष्टांची तौलनिक माहिती सादर केली.
मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये राज्याच्या वार्षिक पतपुरवठयाचे उद्दिष्ट हे रक्कम रु. ३३,९०, ६०१ कोटी होते. राज्यातील बँकांनी सक्रिय सहभागाद्वारे रु. ३८,७०,३८२ कोटी रु. वाटप करून ११८% एवढे लक्ष्य साध्य केले आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्राधान्य क्षेत्रांतर्गत एकूण उपलब्धी वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत रु. ६, ४०, २९६ कोटी इतकी असून जे उद्दिष्टाच्या ९८% आहे. (वार्षिक उद्दिष्ट रु. ६,५१, ४०१ कोटी होते).
कृषी क्षेत्रांतर्गत रु. १,६८,४८१ कोटी ह्या वार्षीक उद्दिष्टांच्या तुलनेत बँकांनी रक्कम रु. १,५४,१२० कोटींचे वितरण मागील आर्थिक केले असून ते वार्षिक उद्दिष्टाच्या ९१% आहे.
एमएसएमई क्षेत्रांतर्गत वार्षिक उद्दिष्ट रु. ३,६१,९१६ कोटी रु. च्या उद्दिष्टाच्या तुलनेत बँकांनी रु. ४,२३, ११५ कोटी रु. वितरण केले असून, जे वार्षिक उद्दिष्टाच्या ११७% आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता वार्षिक पत आराखडा हा रु. ४१,००, २८६ कोटी प्रस्तावित केला आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत २१% वाढ दर्शविते. एकूण पत आराखड्या पैकी, प्राधान्य क्षेत्रासाठी रु. ६,७८,५४० कोटी प्रस्तावित आहेत, जे गेल्या आर्थिक वर्षात ६,५१,४०१ कोटी रुपये होते.
0000
Friday, 21 June 2024
श्री.तुळजाभवानी स्टेडियम येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा
श्री.तुळजाभवानी स्टेडियम येथे
जागतिक योगदिन उत्साहात साजरा
धाराशिव दि.21(जिमाका) जिल्हा प्रशासन,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,आयुष विभाग,नेहरू युवा केंद्र,पंतजली योग समिती,क्रीडा भारती,आर्ट ऑफ लिव्हींग,धाराशिव जिल्हा योग संघटना यांचे सहकार्याने आज 21 जुन रोजी सकाळी 7 वाजता श्री.तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा क्रीडा संकुल येथे पतंजली योग संस्थेचे राम ढेरे यांनी उपस्थितांकडुन प्रात्यक्षिक करुन घेतले.यावेळी अनुरत नागटिळक यांनी योगविषयक माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी संजय डव्हळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी राम ढेरे,महिला जिल्हा प्रभारी वैशाली उपासे,आर्ट ऑफ लिव्हीगचे डॉ विकास गपाट,क्रीडा भारतीचे अलका पवार,जिल्हा योगा संघटनेचे प्रवीण गडदे,जिल्हा स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे,क्रीडा अधिकारी बी.के.नाईकवाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत योग सत्राचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मल्हारी माने व सुरेश कळमकर आदींसह योगसाधक साधिका शहरातील नागरिक,युवक, युवत व खेळाडू यांच्यासह जवळपास 450 जणांची उपस्थिती होती.
योग तज्ज्ञ राम ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक क्रीडा अधिकारी बी.के.नाईकवाडी यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी मानले.
योगा ही जीवन पद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योगा ही जीवन पद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २१ : निरोगी शरीरासाठी योगा खूप गरजेचा आहे. योगा ही जीवन पद्धती आहे ती जर सर्वांनी अंगिकारली तर नक्कीच सुदृढ नागरिक घडू शकतात आणि सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती असते असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव सेवा नितीन गद्रे यांच्यासह योगा इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी जयदेव योगेंद्र यांच्यासह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, योगाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे. योगा जीवनशैलीमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे प्रत्येकाने दररोज योगा करणे गरजेचे आहे. शरीर आणि मन जोडण्याचे योग हे साधन आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी अर्धा तास चालेल्या योगामध्ये मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव गृह विभाग सुजाता सौनिक, राज्य उत्पादन शुल्कचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा प्रधानसचिव मनिषा वर्मा, मुख्यमंत्री यांचे प्रधानसचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाचे प्रधानसचिव प्रविण दराडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधानसचिव दिनेश वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
****
Tuesday, 4 June 2024
40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी
*40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक*
*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी*
* 4250 मतदारांनी केला नोटाचा वापर
* 7953 मतदारांनी केले टपाल मतपत्रिकेतून मतदान
धाराशिव दि.04 (माध्यम कक्ष) 40 -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज 4 जून रोजी सकाळी 8 वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव येथे सुरुवात झाली.एकूण 30 फेरीनंतर निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर हे 3 लक्ष 29 हजार 846 एवढ्या मताधिकक्याने विजयी झाले. श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या उमेदवार सौ अर्चना पाटील यांचा पराभव केला.श्री.राजेनिंबाळकर या 7 लक्ष 48 हजार 752 मते पडली.
निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या 31 उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे. सौ.अर्चना राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)(4 लक्ष 18 हजार 906),ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (7 लक्ष 48 हजार 752),संजयकुमार भागवत वाघमारे,बहुजन समाज पार्टी (5 हजार 615),आर्यनराजे किसनराव शिंदे, राष्ट्रीय समाज दल (आर) (1887),भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर,वंचित बहुजन आघाडी (33 हजार 402),नेताजी नागनाथ गोरे,देश जनहित पार्टी (2 हजार 336), नवनाथ विश्वनाथ दुधाळ,विश्व शक्ती पार्टी (1 हजार 135),नितेश शिवाजी पवार,हिंदराष्ट्र संघ (1 हजार 79),ॲड. विश्वजीत विजयकुमार शिंदे, आदर्श संग्राम पार्टी (865),शामराव हरीभाऊ पवार, समनक जनता पार्टी (1509),शेख नौशाद इकबाल,स्वराज्य शक्ती सेना (1686), सिध्दीक इब्राहीम बौडीवाले उर्फ गोलाभाई, ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (2060),ज्ञानेश्वर नागनाथ कोळी,समता पार्टी (6472), अर्जुन (दादा) सलगर,अपक्ष ( 1935), उमाजी पांडूरंग गायकवाड,अपक्ष (3095),काका फुलचंद कांबळे, अपक्ष(4811),काकासाहेब संदिपान खोत,अपक्ष (5715),गोवर्धन सुब्राव निंबाळकर,अपक्ष (18966), नवनाथ दशरथ उपळेकर,अपक्ष (2108), नितीन नागनाथ गायकवाड,अपक्ष (731), ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे,अपक्ष (677),नितीन खंडू भोरे,अपक्ष (1204) मनोहर आनंदराव पाटील,अपक्ष (1190), योगीराज आनंता तांबे,अपक्ष (1336), राजकुमार साहेबराव पाटील,अपक्ष (593),राम हनुमंत शेंडगे,अपक्ष (3263),विलास भागवत घाडगे,अपक्ष (610),शायनी नवनाथ जाधव,अपक्ष (782),समीरसिंह रमेशचंद्र साळवी,अपक्ष (594), सोमनाथ नानासाहेब कांबळे- अपक्ष (1268), हनुमंत लक्ष्मण बोंदर, अपक्ष (2172) आणि नोटा (4298)असे मतदान झाले.एकूण 12 लक्ष 81 हजार 52 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये टपाल मतपत्रिकेच्या 7953 मतांचा समावेश आहे.
निवडणूकीत विजयी झालेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी विजयी झाल्याबद्दल भारत निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र दिले.
*****
Monday, 3 June 2024
कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह* माध्यम साक्षरता अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
*| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ३ जून २०२४|*
*कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह*
माध्यम साक्षरता अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=127953
*विविध आयुधांचा उपयोग करून जनतेचे प्रश्न सोडविण्यावर सभागृहाचा भर - विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे*
https://mahasamvad.in/?p=127959
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
ओळख विधिमंडळ कामकाजाची’ विषयावरील कार्यशाळा*
📢 *‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ विषयावरील कार्यशाळा* 🗞️🎙️
सर्व संचालक, उपसंचालक आणि जिल्हा माहिती अधिकारी
*माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माध्यम साक्षरता अभियान’ अंतर्गत पत्रकार तसेच महासंचालनालयातील अधिकारी यांच्याकरिता ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.*
> या कार्यशाळेचे थेटप्रसारण महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून करण्यात येत आहे. थेटप्रसारणाची लिंक आपण आपल्या कार्यालयाच्या एक्स( ट्विटर) तसेच मेटा (फेसबूक) वर सतर्क राहून पोस्ट करावी. तसेच कार्यशाळेची माहिती माध्यम प्रतिनिधींच्या व्हॉटसअप ग्रुप तथा ईमेल वर पाठवावी.⏩
🗓️ *३ जून २०२४*
⏰ *दुपारी १२ ते सायंकाळी ५*
📍 *विधिमंडळ वार्ताहर कक्ष, मंत्रालय, मुंबई*
📌 *कार्यशाळेतील सत्र*
* प्रथम सत्र : विधिमंडळाची कार्यपद्धती व संकल्पना
*वक्ते : श्री. जितेंद्र भोळे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ*
* द्वितीय सत्र : विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, विधिमंडळ चर्चा आणि विशेषाधिकार
*वक्ते : श्री. अनंत कळसे, निवृत्त प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ*
* तृतीय सत्र : विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज, विधिमंडळ दस्तऐवज
*वक्ते : डॉ. नीलम गोहे, मा. उपसभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ*
📡
🔗 *थेटप्रसारणाची लिंक*
*मेटा (फेसबूक)*
https://www.facebook.com/events/777816251125554/
*युट्युब*
https://youtube.com/live/K2HxASx6EqI?feature=share
Friday, 31 May 2024
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या ४ जून रोजीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या 4 जून रोजीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण
- जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती
* सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात
* मतमोजणी केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध
* विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार मतमोजणी
* सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची होणार मोजणी
* 500 पोलीस कर्मचारी - अधिकाऱ्यांचा सुरक्षा बंदोबस्त
* 1200 अधिकारी-कर्मचारी करणार मतमोजणी
धाराशिव दि 31 (जिमाका) 40- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव येथे सकाळी 8 वाजतापासून सुरु होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी आज 31 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले व उपजिल्हाधिकारी श्री.राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यावेळी म्हणाले,शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्रॉंग रूम अर्थात सुरक्षा कक्षात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या असून या स्ट्रॉंग रूमचे सील सकाळी 6.30 वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे.टपाली मतपत्रिका ह्या कोषागार कार्यालयातील स्ट्रॉंग रूम येथे ठेवण्यात आल्या असून 4 जून रोजी सकाळी 6 वाजता ह्या टपाली मतपत्रिका शासकीय तंत्रनिकेतन येथील मतमोजणी केंद्रावर घेऊन जाण्यात येणार आहे. 3979 दिव्यांग मतदार आणि 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक,भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील 1810 भारतीय सैनिकांनी आणि सुविधा केंद्रात मतदान केलेल्या 3442 मतदारांचे असे एकूण 9231 मतदारांच्या टपाली मतपत्रिकांची मोजणी सकाळी 8 वाजता सुरू करण्यात येणार आहे. सकाळीच 8.30 वाजता मतदान यंत्राद्वारे करण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती डॉ.ओंबासे यांनी दिली.
डॉ.ओंबासे पुढे म्हणाले,औसा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी हॉल क्रमांक 119 मध्ये 14 टेबलवर होणार असून मतमोजणीच्या 22 फेऱ्या,उमरगा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी हॉल क्रमांक 111 मध्ये 14 टेबलवर 23 फेऱ्यांमध्ये, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची मतमोजणी हॉल क्रमांक 208 मध्ये 14 टेबलवर 29 फेऱ्यांमध्ये, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील मतांची मतमोजणी हॉल क्रमांक 203 मध्ये 14 टेबलवर 30 फेऱ्यांमध्ये,परंडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी हॉल क्रमांक 206 मध्ये 14 टेबलवर 27 फेऱ्यांमध्ये आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी हॉल क्रमांक 209 मध्ये 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये होणार आहे. टपाली मतपत्रिकेची मतमोजणी हॉल क्रमांक 124 आणि 127 मध्ये होणार असून या हॉलमध्ये प्रत्येकी 8 टेबलवर आणि भारतीय सैन्यातील कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील भारतीय जवानांच्या मतदानाची मतमोजणी हॉल क्रमांक 102 मध्ये सहा टेबलवर होणार असल्याची माहिती डॉ.ओंबासे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर अंतरापासून मतमोजणी केंद्रावर पायी चालत यावे लागणार असल्याचे सांगून डॉ. ओंबासे म्हणाले,मतमोजणी केंद्रावर वाहन पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर उमेदवार प्रतिनिधींना मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध राहणार आहे.मतमोजणी केंद्रावर सशुल्क भोजन व्यवस्था राहणार आहे.मतमोजणीसाठी जवळपास 1500 अधिकारी - कर्मचारी असतील. विधानसभा मतदारसंघनिहाय 6 सभागृहात मतमोजणीचे काम 1200 अधिकारी कर्मचारी करणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतन येथे 6 मोठे सभागृह असल्यामुळे मतमोजणीची अतिशय चांगली व्यवस्था उपलब्ध आहे.ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत तेथून ते मतमोजणी कक्षापर्यंत सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी मतमोजणी करून ती एक्सेल शीट तसेच मॅन्युअलमध्ये करून खात्री करूनच encore अँपवर अपलोड करतील.ही माहिती थेट eci.gov.in या आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असल्याचे डॉ.ओंबासे यांनी सांगितले.
3 जून रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी केंद्र येथे मतमोजणीची रंगीत तालीम होणार असल्याचे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले,मतमोजणी केंद्रावर माध्यमांच्या प्रतिनिधींना व्यवस्थित वृत्त संकलन करता यावे यासाठी माध्यम कक्ष हॉल क्रमांक 103 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. ज्या माध्यमांच्या प्रतिनिधी व त्यांच्या कॅमेरामनकडे भारत निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील प्राधिकार पत्र दिले आहे केवळ त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.माध्यम प्रतिनिधींना मतमोजणीचे वृत्तसंकलन करताना अडचण येऊ नये यासाठी त्यांना मोबाईल,कॅमेरा व व्हिडिओ कॅमेरा व संबंधित साहित्य मतमोजणी केंद्रात घेऊन जाता येईल.मात्र यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात कोणते साहित्य मतमोजणी केंद्रावर घेऊन जाणार आहात याबाबतचे लेखी स्वरुपात कळवावे लागणार आहे.लेखी कळविल्यानंतरच जिल्हा माहिती अधिकारी हे त्याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना लेखी स्वरुपात कळविल्यानंतरच संबंधित माध्यमांच्या प्रतिनिधींना साहित्य मतमोजणी केंद्रावर सोबत घेऊन जाता येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
डॉ.ओंबासे म्हणाले,मतमोजणी केंद्रावर अधिकारी,कर्मचारी व उमेदवार प्रतिनिधी यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उमेदवार,उमेदवार प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक व पत्रकार बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.ओंबासे यांनी यावेळी केले.
पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी मतमोजणी केंद्रावर पोलिस बंदोबस्ताबाबत माहिती देताना म्हणाले, 400 पोलीस-कर्मचारी आणि 50 पोलीस अधिकारी असा एकूण 500 पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त मतमोजणी केंद्रावर राहणार आहे.केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलिसांची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था मतमोजणी केंद्रावर राहणार असून मतमोजणी केंद्रात मोबाईल सोबत घेऊन जाण्यास परवानगी राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Saturday, 13 April 2024
निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला तुळजापूर येथील दोन कर्मचारी निलंबित
निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला
तुळजापूर येथील दोन कर्मचारी निलंबित
धाराशिव दि 13 (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी घोषित केला.त्याचदिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीचे कामकाज विहित मुदतीत होण्यासाठी विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 159 मधील तरतूदीनुसार अधिग्रहित करण्यात आल्या.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या असताना लोकसभा निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी तुळजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील वरिष्ठ लिपिक एस एस सोलणकर व तुळजापूर पंचायत समितीचे ग्रामसेवक डी.डी कांबळे यांना 12 एप्रिल रोजी निलंबित केले.
श्री.सोलंकर व श्री कांबळे यांची नियुक्ती खानापूर येथील तपासणी नाक्यावर करण्यात आली होती. तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांनी 11 एप्रिल रोजी या तपासणी नाक्याला भेट दिली असता,भेटीदरम्यान हे दोन्ही कर्मचारी गैरहजर आढळले. याबाबतचा अहवाल श्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला. निवडणुकीच्या राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याने हे दोन्ही कर्मचारी दोषी आढळले.दोषी आढळलेल्या या दोन्ही कर्मचाऱ्यांवर 12 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे निलंबित केले.
Friday, 23 February 2024
विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर उध्दाटन कार्यक्रम
https://www.facebook.com/share/p/aDe9AYDYPK8xag1y/?mibextid=qi2Omg
Tuesday, 20 February 2024
मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी 23 व 24 फेब्रुवारीला लातूर येथे विभागीय भव्य नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर
• ऑनलाईन नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ कार्यान्वित
लातूर दि. 18: राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा अनुक्रमाने 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर येथे होणार आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता https://nmrmlatur.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी या संकेतस्थळवर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात येणार आहे. यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. तसेच 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यात विविध उद्योजक, व्यावसायिक प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार युवक-युवती यांची मुलाखतीद्वारे निवड करतील.
23 फेब्रुवारीला मार्गदर्शन शिबिरातून मिळणार करिअरच्या नवीन वाटांची माहिती
दहावी, बारावी किंवा पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी, करिअरच्या नव्या वाटांची माहिती युवक-युवतींना व्हावी, यासाठी नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी, 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कृषि उद्योग, पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, नर्सिंग यासारख्या विविध क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगारातील संधीविषयी व्याख्यान, चर्चासत्र आदी कार्यक्रम होतील. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभाग, बँकामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहितीही दिली जाणार आहे.
24 फेब्रुवारी रोजी भव्य महारोजगार मेळाव्यातून रोजगाराच्या संधी
नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणहून उद्योजक उपस्थित राहून शैक्षणिक पात्रता व मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 पासूनच लातूर शहरातील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय (सर्व ट्रेड) आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत.
रोजगार मेळाव्यासाठी येथे करा ऑनलाईन नोंदणी
मराठवाड्यातील युवक-युवतींनी लातूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरात उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी https://nmrmlatur.in हे संकेतस्थळ (क्यू आर कोडसह) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये ‘उमेदवार’ पर्याय निवडून लॉगीन करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, महास्वयंम नोंदणी क्रमांक यासह इतर माहिती भरून छायाचित्र, सी.व्ही. (बायोडाटा) अपलोड करावा.
तेव्हा धाराशिव जिल्ह्यातील इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय उत्तीर्ण व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी वरील मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी श्री प्रवीण औताडे यांनी केले आहे
Wednesday, 14 February 2024
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास “ शिवगर्जना ” च्या माध्यमातून होणार सादर
श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान महानाट्य
बैठक व्यवस्था,वाहनतळ, सजावट आणि सुरक्षेविषयी अधिकाऱ्यांकडून पाहणी
धाराशिव दि.14 (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्तवतीने 18 ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित " शिवगर्जना " या महानाट्याचे आयोजन श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल, धाराशिव येथे सायंकाळी 6.30 वाजता करण्यात येणार आहे.या महानाट्यात 12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत व शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली.
" शिवगर्जना " महानाट्याची प्रेक्षक क्षमता 10 ते 15 हजार इतकी आहे.फिरता 65 फुटी भव्य रंगमंचावर 300 कलावंत हे महानाट्य सादर करणार आहे.यामध्ये हत्ती,घोडे,उंट व बैलगाडी देखील असणार आहे.या महानाट्यामध्ये चित्तथरारक लढाया,रोमांचकारी प्रसंग,एक धगधगत्या इतिहासाची आठवण,नेत्र सुखद अतीषबाजी,खराखुरा निखळ इतिहास, मंत्रमुग्ध संगीत,नेत्रदीपक प्रकाश योजना, आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड घातलेली पाहायला मिळणार आहे.
या महानाट्यमध्ये विनायक चौगुले छत्रपती शिवाजी महारजांची भुमिका साकारत आहे.बाल शिवाजी राजेंची भुमिका सूरज कोळी साकारत असून मां जिजाऊची भुमिका दिपाली हांडे,शहाजी राजेंची भुमिका सुहास चौगुले तर अफजल खानाची भुमिका शकील पटेल हे साकारणार आहेत.या महानाट्यात 250 हून अधिक कलावंत,हत्ती,घोडे,उंट व बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे.
या महानाट्याचे निवेदक राम गुरव आणि शाहीर शुभम वाघे असतील.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील महानाट्य ‘ शिवगर्जना ’चे विनामूल्य प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.हे प्रयोग प्रतिदिन सायंकाळी 6.30 वाजता सुरु होतील. प्रत्येक दिवशी किमान 10 हजार नागरिक उपस्थित राहतील,अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.कार्यक्रम स्थळाची बैठक व्यवस्था,वाहनतळ,सजावट आणि सुरक्षेविषयी अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत आहे.अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण,विजयनगरचे साम्राज्य,लखोजी राजाची हत्या, शिवजन्म,युद्ध कला व राज्यकारभार प्रशिक्षण,स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध,पन्हाळगड वेढा,पावनखिंडीतील शौर्यगाथा, शाहिस्तेखानाची फजिती,सुरत मोहिम,कोकण मोहीम,पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य,आग्रा भेट,तानाजी मालुसरेचे बलिदान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हे प्रसंग या महानाट्यातून बघायला मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास महानाट्याच्या माध्यमातून सादर होणार आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याच्या लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
















































