Friday, 27 September 2019

243-परंडा विधानसभा मतदारसंघाकरीता एक अर्ज दाखल

वि.स. वृत्त : 01
                                       243-परंडा विधानसभा मतदारसंघाकरीता एक अर्ज दाखल

             उस्मानाबाद, दि.27: विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता 243-परंडा विधानसभा मतदार संघातून निवडणूकीसाठी आज एका उमेदवारांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत, त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र. उमेदवारांचे नाव पत्ता पक्षाचे नाव नामनिर्देशन पत्राची संख्या
1 आर्यनराजे किसनराव शिंदे 19, आर्यपथ, भूम, ता. भूम, जि. उस्मानाबाद अपक्ष 01
   
    
**
वि.स. वृत्त : 02
                                       240-उमरगा (अ.जा.) आणि 241-तुळजापूर विधानसभा मतदार संघ
                                              निवडणूक खर्च निरीक्षक ब्रजेश कुमार पांडे यांची नियुक्ती

             उस्मानाबाद, दि.27: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 240-उमरगा आणि 241-तुळजापूर विधानसभा मतदार संघाकरीता ब्रजेश कुमार पांडे यांची निवडणुक खर्च निरीक्षक म्हणुन नियुक्ती केली आहे.
निवडणूक निरिक्षक ब्रजेश कुमार पांडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक 7666029513 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत ब्रजेश कुमार पांडे यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, उमरगा आणि शासकीय विश्रामगृह, तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथे असणार आहे. उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता अजीत मदने यांची निवडणुक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.
**


वि.स. वृत्त : 03
                                           242-उस्मानाबाद आणि 243-परंडा विधानसभा मतदार संघ
                                              निवडणूक खर्च निरीक्षक अभय चरण रौत यांची नियुक्ती

        उस्मानाबाद, दि.27: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 242-उस्मानाबाद आणि 243-परंडा विधानसभा मतदार संघाकरीता अभय चरण रौत यांची निवडणुक खर्च निरीक्षक म्हणुन नियुक्ती केली आहे.
निवडणूक निरिक्षक अभय चरण रौत यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक 9438917228 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत अभय चरण रौत  यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, शिंगोली, ता. जि. उस्मानाबाद आणि शासकीय विश्रामगृह, परंडा, जि. उस्मानाबाद येथे असणार आहे. जिल्हा परिषदेचे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवटे यांची निवडणुक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.
**
वि.स. वृत्त : 04
                              निवडणूक खर्च निरीक्षक ब्रजेश कुमार पांडे यांनी घेतला आढावा

             उस्मानाबाद, दि.27: विधानसभा निवडणुक-2019 च्या कालावधीत उमेदवारांच्या खर्चाच्या सर्व बाबी व्यवस्थित नोंदवाव्यात अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक ब्रजेश कुमार पांडे यांनी सहाय्यक खर्च निरीक्षकांना दिल्या. 240-उमरगा आणि 241-तुळजापूर मतदार संघातील मतदारांच्या मतदान संबधित काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांक 7666029513 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागांने आवश्यक तपासण्या करुन अवैध दारु मतदार संघात न येण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. आयकर विभागाने जप्त केलेल्या रोख रक्कमांबाबत खात्री करुन नियमाप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. निवडणुका निपक्ष:पातीपणाने व शांततेने होण्यासाठी सर्व पथकांनी काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना ही यावेळी ब्रजेश कुमार पांडे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी 240-उमरगा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्या सह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक खर्च निरिक्षक व विविध विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.
**

Monday, 23 September 2019

विधानसभा निवडणूक आदर्श आचार संहितेचे पालन करा -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

वृत्त क्रमांक 656                                                 दि.23 सप्टेंबर, 2019

विधानसभा निवडणूक आदर्श आचार संहितेचे पालन करा
-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

उस्मानाबाद,दि.23(जिमाका): भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकची जाहिर करण्यात आली असून शनिवार (दि.21) पासून राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी आदर्श आचार संहितेचे कोटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले. 
येथील प्रशासकीय इमारतीतील डी.पी.सी. सभागृहात विभाग प्रमुख व नोडल अधिकारी अचार संहिता यांच्या बैठकीत श्रीमती मुधोळ-मुंडे या बोलत होत्या. यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिाकरी विठ्ठल उदमले, चारुशिला देशमुख, रामेश्वर रोडगे आणि मनिषा राशिनकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनाचे तसेच राजकीय व्यक्तींचे छायाचित्र असलेले फ्लेक्स, बॅनर, पोस्टर तात्काळ काढून टाकावेत. तसेच सार्वजनीक मालमत्तेवर लावण्यात आलेल्या राजकीय जाहिराती ही तात्काळ काढण्यात याव्यात. तसेच भूमिपूजन, उद्घाटनाच्या कोनशिला झाकुन ठेवाव्यात. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार करु नये किंवा त्यांना मदत करु नये.  आदर्श आचार संहितेच्या कालावधीत कोणतीही निवीदा प्रक्रिया, निविदा उघडणे, कार्यारंभ आदेश देणे किंवा नवीन काम सुरु होणार नाही याची सर्व संबंधीत विभागानी दक्षता घ्यावी. परंतू टंचाई संबंधीत कामे परवानगी घेवून करता येईल. तसेच विधानसभा निवडणुकीत सर्व समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने काम करा. तसेच सदर कामे करतांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याची काळजी घ्यावी, असे ही श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या.
यावेळी जिपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी आदर्श अचार संहितेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
*****
वृत्त क्रमांक 657
बालशक्ती पुरस्कार सन 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता अर्ज मागणी
उस्मानाबाद,दि.23(जिमाका): केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार- ज्या मुलांनी  (वय 5 पेक्षा अधिक  व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये  वैयक्तिक पुरस्कार- मुलांचा विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतनात अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7  वर्षे कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. संस्था स्तरावर- बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये संस्था पूर्णता: शासनाच्या निधीवरच अवलंबून नसावी.  तसेच बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
 बालशक्ती पुरस्कार सन 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचा अर्ज हे www.nca.wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.अर्ज करण्याची अंतीम मुदत दि. 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत होती. ती आता दि. 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त बाल विकास महिला व बालकल्याण विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळविले आहे.
                                                               ****



पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबत जाहीर आवाहन

वृत्त क्रमांक 652                                                                                     दि.23 सप्टेंबर, 2019
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबत जाहीर आवाहन

उस्मानाबाद,दि.23(जिमाका) : राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागांद्वारे शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वित आहे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून मोठे शहरे (महानगरांमध्ये) विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर इ.10 वी  नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संकलन बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करण्यात करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्या-त्या अभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे.
 महानगरपालिका/ नगरपालिका हद्दीमध्ये आणि नगरपालिका /नगरपालिका हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/ शिक्षण संस्थेत शिकत असलेलले विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यात  पात्र राहतील .
तरी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत प्रवेश घेण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे. संपर्कासाठी प्रकल्प कार्यालयाचा पत्ता. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प सोलापूर. फ्लॉट नं. 2, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, कॉलेज जवळ, कुमठा नाका, परिसर सोलापूर. दूरध्वनी क्रमांक 0217-2607600 येथे संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांनी केले आहे.
                                                        ****
वृत्त क्रमांक 653
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या
पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
            उस्मानाबाद,दि.23 (जिमाका) :  उस्मानाबाद येथील भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कळविण्यात येत की, एस. एस. बी. या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसुल आयुक्त कार्यालय आवार, नाशिक रोड, नाशिक येथे  महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक १०/१०/२०१९ ते १९/१०/२०१९ या कालावधीत एस. एस. बी.  कोर्स क्रं 51 आयाजित करण्यात येत आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन व प्रशिक्षणाची सोय विनामुल्य करण्यात आलेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील  इच्छुक व पात्र उमदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाची संधीसाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे दिनांक ०७ ऑक्टोबर, २०१९ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वर किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab  ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध 


Check List आणि महत्वाच्या तारखा (Important Dates)  यांचे अवलेाकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये  प्रिंट काढुन त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ठ डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढुन ते पुर्ण  भरुन आणावेत. तसेच केंद्रामध्ये एस. एस. बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक असून त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेवुन यावे. यात  कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी त्यासाठी सविसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. तसेच एन.सी.सी. (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने  एस एस बी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठीचे कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्रं. ०२५३-२४५१०३१ आणि ०२५३-२४५१०३२ असुन कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.
                                             ****
वृत्त क्रमांक 654
हरवलेल्या मुलीची माहिती देण्याचे आवाहन
          उस्मानाबाद,दि.23(जिमाका) : कु. श्रध्दा सुमंतराव जाधव वय 21 वर्ष रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद ही दि. 19 सप्टेंबर, 2019 रोजीचे सकाळी 10.00 वाजता कॉलेजला म्हणून गेली आहे. तिच्या घराच्यांनी तिला दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता मैत्रीणीकडे तेरणा कॉलेज जवळ अभ्यास करते, व अभ्यास संपला की येते असे सांगितले होते. परंतू घरच्यांनी तिची वाट पाहुन परत सात वाजता फोन केला असता तिचा फोन बंद झालेला होता. कुटूंबीयांनी तिची वाट पाहीली परंतु ती अद्यापपर्यंत घरी आली नसल्याने तिच्या कुटूंबीयांनी पोलीस स्टेशन उस्मानाबाद यांच्याकडे तक्रार केली. सदर युवतीचे वर्णन पुढीलप्रमाणे असून तिचा वर्ण गोरा व चेहरा गोल असुन, शाळेचा निळ्या रंगाचा जॅकेट, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट पायात सँडल असे अंगावर कपडे आहेत.,उंची 5 फुट, शिक्षण- बी.एस.स्सी., शरीर बांधा-सडपातळ असलेला अशा वर्णनाची मुलगी हरवलह असल्याची तक्रार पोलीस स्टेशन, उस्मानाबाद यांच्याकडे आली आहे. तरी वरील वर्णनाच्या मुलीची माहिती मिळाल्यास पोलीस  निरीक्षण  पोलीस स्टेशन, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आल आहे.
                                                          ****