Friday, 31 March 2017

उष्ण तापमानात काळजी घ्या


उस्मानाबाद.दि.31:-उष्णतेच्या लाटेच्या कालावधीत उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  केले आहे.
          उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करण्याचे सुचविले आहे- तहान लागलेली नसली तरीसुधा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करण्यात यावा, अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत यंणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, त्यांना पुरेसे पाणी दयावे, घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, कामाच्या ठिकाणी जवळ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळावा, पहाटेच्या वेळी कामे करावीत, गरोदर कामगार  व आजारी कामगाराची अधिक काळजी घ्यावी आदी उपाय करावेत.

हे करु नये – लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाऊ नये, गडत, घट पजाड कपडे घालण्याचे टाळावे, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.  

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक



उस्मानाबाद.दि.31:- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक दि.3 एप्रिल 2017 रोजी  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी  कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, तरी या बैठकीस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. 

वाहतुकीचे नियंत्रण व नियमन


उस्मानाबाद.दि.31:-  जिल्ह्यात दिनांक 5 एप्रिल 2017 ते दि.24 एप्रिल 2017 या कालावधीत   जयंती, यात्रा, उर्स आदी उत्सव  साजरे होणार आहेत. हे उत्सव शांततेत पार पडावेत,यासाठी  मिरवणुकांदरम्यान वाहतुकीचे  नियंत्रण  व नियमन करणे आवश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता  कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उत्सवा दरम्यान तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ मात करता यावी, यासाठी जिल्ह्यातील  सर्व पोलीस उपनिरीक्षक  व त्यापेक्षा वरिष्ठ  दर्जाचे अधिकाऱ्यांना  अधिकार प्रदान केले आहेत.

 तसेच सडकांवरील  किंवा सडकेने जाणाऱ्या  मिरवणुकीतील किंवा जमावातील  लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची  वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे, मिरवणुका कोणत्या मार्गाने  जाव्यात ते मार्ग विहित करणे, प्रतिमा पुजनाच्या वेळी  किंवा लोकांच्या  एकत्र जमण्याच्या  जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण  होण्याची शक्यता  असेल अशा ठिकाणी अडथळा होऊ न देणे , सार्वजनिक ठिकाणी  कर्कश वाद्य वाजविणे यावर नियंत्रण ठेवणे  यासाठी  महाराष्ट्र पोलीस  अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे जिल्ह्यातील  सर्व पोलीस उपनिरीक्षक  व त्यापेक्षा वरिष्ठ  दर्जाचे अधिकाऱ्यांना  दिनांक 5 ते 24 एप्रिल 2017 पर्यंत पूर्ण अधिकार प्रदान केले असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कळविले आह.

Thursday, 30 March 2017

जिल्हयातील शेतकऱ्यांनी विंधन विहिरीची नोंद करून नव्या विंधन विहिरीकरीता प्रशासनाची परवानगी घ्यावी – आयुष प्रसाद



 उस्मानाबाद.दि.30:-जिल्हातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विंधन विहीर घेतली आहे त्यांनी त्याची सातबारा व नमुना नंबर 14 वर नोंद घ्यावी व नवीन विंधन विहिरीकरिता प्रशासनाची परवानगी घ्यावी, असे आवाहन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भूजल सर्वेक्षण उपविभाग स्तरीय अधिकारी कार्यशाळेत केले.
          पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे आयोजित महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 अंतर्गत उपविभागस्तरीय अधिकारी एकदिवशीय कार्यशाळेत जिल्हा नियोजन समिती सभागृहात अध्यक्षस्थानावरून आयुष  प्रसाद बोलत होते. या कार्यक्रमास भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा औरंगाबाद, उपसंचालक कार्यालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जे.एस.बेडवाल, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप उपस्थित होते.
          या कार्यशाळेत बोलताना आयुष प्रसाद म्हणाले की, जिल्हयात भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्जशॉफ्ट व नावीण्यपूर्ण योजना राबविण्यात येऊन सर्व प्रकारच्या भूजल वापरकर्त्यांना सातत्यपूर्ण भूजल उपलब्ध व्हावे तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रेात संरक्षित करता यावे यासाठी लोकसहभागातून मागणी व पुरवठा आधारित उपाय योजना करून भूजल विकास व व्यवस्थापन लोकसहभागातून करावे.

          यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक बेडवाल यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. या कार्यक्रमास उस्मानाबादचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एम.एस.शेख, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री.पुजारी, उस्मानाबाद तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, भूजल सर्वेक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर.एस. भालेराव यांनी केले तर आभार सहाय्यक भूवैज्ञानिक प्रशांत पोळ यांनी मानले.

हरित सेना सदस्य नोंदणी अभियानात उस्मानाबाद जिल्हा राज्यात पहिला


उस्मानाबाद,दि.30:- वने, जलसाठे, नदया व वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या हरित सेना सदस्य नोंदणीत उस्मानाबाद जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक नोंदविला आहे, असे विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर यांनी कळविले आहे.
          या हरित सेना सदस्य नोंदणी कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हयात प्रमाणित वापरकर्ते वैयक्तिक सदस्य 44 हजार 343, संस्था 306, सदस्य 1 लाख 90 हजार 91 तर जिल्हयात एकूण 2 लाख 34 हजार 434 सदस्य नोंदणी झालेली आहे.
          मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्हा 9 हजार 719, बीड 83 हजार 808, हिंगोली 24 हजार 385, जालना 24 हजार 418, लातूर 2 लाख 32 हजार 523, नांदेड 18 हजार 422 तर परभणी जिल्हयात 24 हजार 654 हरित सेना सभासद नोंदणी झालेली आहे.

          या सदस्य नोंदणी कार्यक्रमास  विभागीय वन अधिकारी श्री.राजेश्वर सातेलीकर, वन परिक्षेत्र अधिकारी श्री.बी.एच. कोळगे, श्री.व्ही.एस.म्हेत्रे, वनपरिमंडल अधिकारी अमोल घोडके, श्री. खोबरे, सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी. एस. साबळे, वनरक्षक राहुल शिंदे यांनी अथक परिश्रम घेऊन राज्यात सदस्य नोंदणी अव्वल होण्यात सक्रिय सहभाग नोंदविला. 

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा पूर्वतयारी नि:शुल्क, निवासी मार्गदर्शन शिबीर


उस्मानाबाद,दि.30:- जे विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षेतून राष्ट्रीय प्रज्ञा शोध (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत,  त्यांनी प्रादेशिक विद्या प्राधीकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था), नागपूर या संस्थेकडे दि.5 एप्रिल 2017 पूर्वी आपली संमतीपत्रे पाठवावे, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक औदुंबर उकिरडे यांनी कळविले आहे.

          राज्यस्तरावरुन राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि.18 ते 27 एप्रिल 2017 या कालावधीत त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा, जिल्हा अहमदनगर येथे करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि.5 एप्रिल 2017 पूर्वी आपली संमतीपत्र संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था), रविनगर  नागपूर यांच्याकडे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने शिक्षणाधिकारी मार्फत सादर करावेत,या नि:शुल्क शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी  उकिरडे केले आहे.

राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा शेकापूर येथे समारोप


उस्मानाबाद.दि.30:- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद च्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रम संस्कारासाठी विशेष युवक शिबिराचा शेकापूर येथे दि. 24 मार्च 2017 रोजी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. पी.व्ही. झानपुरे यांच्या अध्यक्षतेखाली  समारोप करण्यात आला.
          शेकापूर येथे दि.18 ते 24 मार्च 2017 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गतत श्रम संस्कारासाठी विशेष युवक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण 75 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. या शिबिराचा समारोप दि. 24 मार्च रोजी श्री. झानपुरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेवून करण्यात आला. यावेळी प्राचार्य एम.एस. उडाणशिवे, मुख्य लिपीक श्री. डी.बी. सरवदे, श्री. धनशेट्टी, श्री. एम.बी. पिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी श्री. बी.बी. जाधव, शिल्पनिदेशक श्री. बी.एच. भोसले, श्री. के.डी. नाईक, व्ही. एम. जोंधळे, सी.आर. राऊत यांनी परिश्रम घेतले. श्री. भोसले यांनी सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीताने शिबिराची सांगता करण्यात आली.

Wednesday, 29 March 2017

उस्मानाबाद जिल्हयात समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेचे काम उत्कृष्ट



उस्मानाबाद.दि.29:- समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना सन 2016-17 व 2017-18 मध्ये उस्मानाबाद जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात येत असून जिल्हयात विविध योजनेसाठी 7 हजार 561 अर्जप्राप्त झाले आहेत, यापैकी  3 हजार 269 कामांना तांत्रिक मंजूरी, 1 हजार 735 कामांना प्रशासकीय मंजूरी देवून जिल्हाभरात 632 कामे चालू आहेत तर 245 कामे पूर्ण झाली आहेत, असे उस्मानाबाद जिल्हा समृध्द महाराष्ट्र जनकल्याण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये उस्मानाबाद जिल्हयासाठी अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 4 हजार 500 कामाचे उदिष्ट होते यासाठी 1 हजार 73 अर्ज प्राप्त झाले होती 214 कामांना तांत्रिक मंजूरी, 106 कामांना प्रशासकीय मंजूरी पैकी 77 कामे चालू असून 29 कामे पूर्ण झाली आहेत.अमृतकुंड शेततळे कामाचे उद्दिष्टय 6 हजार 600, 287 अर्ज प्राप्त, 177 कामांना तांत्रिक मंजूरी, 110 कामांना प्रशासकीय मंजूरी, 63 कामे चालू व 19 कामे पूर्ण झाली आहेत. भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टींग 2 हजार 400 कामांचे उद्दिष्टय 417 अर्ज प्राप्त,226 कामांना तांत्रिक मंजूरी, 187 कामांना प्रशासकीय मंजूरी व 7 कामे चालू. भू-संजीवनी  नाडेप कंपोस्टींग 2 हजार 200 कामांचे उद्दिष्टय, 358 अर्ज प्राप्त, 192 कामांना तांत्रिक मंजूरी, 159 कामांना प्रशासकीय मंजूरी व 16 कामे चालु आहेत.
कल्पवृक्ष फळबाग लागवड योजने अंतर्गत 2 हजार 700 कामांचे उद्दिष्टय, 107 अर्ज प्राप्त, 36 कामांना तांत्रिक मंजूरी, 36 कामांना प्रशासकीय मंजूरी तर 11 कामे चालू आहेत. निर्मल शौचालय 2 हजार 111 कामांचे उद्दिष्टय, 2 हजार 129 अर्ज प्राप्त, 1 हजार 353 कामांना तांत्रिक मंजूरी, 666 कामांना प्रशासकीय मंजूरी, 181 कामे चालू असून 70 कामे पूर्ण झालेली आहेत. निर्मल शोष खड्डे 4 हजार कामाचे उदिष्ट, 1 हजार 559 अर्ज प्राप्त, 526 कामांना तांत्रिक मंजूरी व 37 कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.
समृध्द गाव तलाव योजनेंतर्गत 4 हजार 900 कामाचे उद्दिष्टय असून जिल्हाभरातून 9 अर्ज प्राप्त झाले आहेत. अंकुर रोपवाटिका 43 लाख कामांचे उद्दिष्टय, 41 अर्ज प्राप्त, 17.00 तांत्रिक मान्यता, 13.00 प्रशासकीय मंजूरी, 7.00 कामे चालू आहेत. तर नंदनवन वृक्ष लागवड 4.30 लाख कामाचे उदिष्ट, 33 अर्ज प्राप्त, 30.00 तांत्रिक मान्यता, 30 प्रशासकीय मंजूरी व 27 कामे चालू आहेत. समृध्द ग्राम योजनेंतर्गत जिल्हयात 5 हजार कामाचे उद्दिष्टय असून 1 हजार 548 अर्ज प्राप्त, 498 कामांना तांत्रिक मंजूरी, 391 कामांना प्रशासकीय मंजूरी, 2 हजार 473 कामे चालू आहेत व 127 कामे पूर्ण झालेली आहेत.

2 एप्रिल रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण


उस्मानाबाद,दि.29:- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दि. 2 एप्रिल 2017 रोजी संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येणार आहे.या मेहिमेंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची मात्रा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते  यांनी  दिली आहे.

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

   
उस्मानाबद,दि.29:-उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 2 एप्रिल  2017 रोजी राज्य सेवा  (पूर्व) परीक्षा -2017 सकाळी 10-30 ते 1-00 व दुपारी 3 ते 5 या कालावधीत पुढील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे-
          श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज पहिला मजला, श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज दुसरा मजला, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, व्ही.जे.शिंदे कॉलेज, वरूडा रोड, उस्मानाबाद, विद्यामाता हायस्कुल, सांजा नाका, बायपास रोड,  उस्मानाबाद, जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला  शहर  पोलीस  शेजारी उस्मानाबाद.

          या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे,परीक्षार्थींना कसलाही अडथळा येऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पाबंद करणे, तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स,ई-मेल, रेडियो, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक, गणनायंत्र व अशा इतर प्रकारच्या स्वरूपातील बाबी विद्यार्थांना पुरवठा करण्यात येवू नये म्हणून  या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात दि. 2 एप्रिल  2017 रोजी सकाळी 8-00 ते संध्याकाळी 7 वाजे पर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी फौजदारी पक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्यवये उक्त परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

जिल्हयात शस्त्र व जमावबंदी


उस्मानाबाद,दि.29:- जिल्हयात सण, उत्सव शांततेत व सुरळीत पार पडण्याकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणेसाठी जिल्ह्यात 28 मार्च 2017 ते  5 एप्रिल 2017 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी  यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहील.
          आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाहीत. सभ्यतेस व नीतीमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाहीत, सभा घेता येणार नाहीत.

तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकिय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अंत्य यात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत. उक्त कालावधीत मिरवणुकांना, सभांना परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे आदेश दि. 5 एप्रिल 2017 रोजीच्या  रात्री  दहा पर्यंत लागू राहतील.        

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत


          उस्मानाबाद,दि.29:- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींनी व संस्थांनी सन 2017-18 या वर्षाकरीता देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी दि.10 एप्रिल 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

           अनुसुचित जाती/ जमाती, भटक्याव विमुक्त जातीचे कल्याणकारी कार्य, तसेच शारिरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल, अपंग, कुष्ठरोगी आदी  सामाजिक दुर्बल घाटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, सामाजिक संस्था असावेत, सामाजिक क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष कार्य केलेले असावे. समाज भूषण पुरस्कारासाठी पुरूषाचे वय 50वर्ष व महिलांचे वय 40 वर्ष पुर्ण असावे. प्रस्तावासोबत सामाजिक कार्याची माहिती, स्वता:ची संपूर्ण माहिती, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, चालु वर्षाचे पोलीस विभागाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आदी माहितीसह प्रस्ताव तीन प्रती मध्ये सादर करावा. सदरील प्रस्ताव दि.10 एप्रिल 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय उस्मानााबाद येथे कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02472-2223133 वर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद  यांनी कळविले आहे.