Thursday, 30 March 2017

हरित सेना सदस्य नोंदणी अभियानात उस्मानाबाद जिल्हा राज्यात पहिला


उस्मानाबाद,दि.30:- वने, जलसाठे, नदया व वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या हरित सेना सदस्य नोंदणीत उस्मानाबाद जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक नोंदविला आहे, असे विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर यांनी कळविले आहे.
          या हरित सेना सदस्य नोंदणी कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हयात प्रमाणित वापरकर्ते वैयक्तिक सदस्य 44 हजार 343, संस्था 306, सदस्य 1 लाख 90 हजार 91 तर जिल्हयात एकूण 2 लाख 34 हजार 434 सदस्य नोंदणी झालेली आहे.
          मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्हा 9 हजार 719, बीड 83 हजार 808, हिंगोली 24 हजार 385, जालना 24 हजार 418, लातूर 2 लाख 32 हजार 523, नांदेड 18 हजार 422 तर परभणी जिल्हयात 24 हजार 654 हरित सेना सभासद नोंदणी झालेली आहे.

          या सदस्य नोंदणी कार्यक्रमास  विभागीय वन अधिकारी श्री.राजेश्वर सातेलीकर, वन परिक्षेत्र अधिकारी श्री.बी.एच. कोळगे, श्री.व्ही.एस.म्हेत्रे, वनपरिमंडल अधिकारी अमोल घोडके, श्री. खोबरे, सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी. एस. साबळे, वनरक्षक राहुल शिंदे यांनी अथक परिश्रम घेऊन राज्यात सदस्य नोंदणी अव्वल होण्यात सक्रिय सहभाग नोंदविला.