उस्मानाबाद,दि.29:- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या
व्यक्तींनी व संस्थांनी सन 2017-18 या वर्षाकरीता देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब
आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी दि.10 एप्रिल 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत,
असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
अनुसुचित जाती/
जमाती, भटक्याव विमुक्त जातीचे कल्याणकारी कार्य, तसेच शारिरिक व मानसिकदृष्टया
मनोदुर्बल, अपंग, कुष्ठरोगी आदी सामाजिक
दुर्बल घाटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, सामाजिक संस्था असावेत,
सामाजिक क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष कार्य केलेले असावे. समाज भूषण पुरस्कारासाठी
पुरूषाचे वय 50वर्ष व महिलांचे वय 40 वर्ष पुर्ण असावे. प्रस्तावासोबत सामाजिक
कार्याची माहिती, स्वता:ची संपूर्ण माहिती, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, चालु
वर्षाचे पोलीस विभागाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आदी माहितीसह प्रस्ताव तीन
प्रती मध्ये सादर करावा. सदरील प्रस्ताव दि.10 एप्रिल 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, कार्यालय उस्मानााबाद येथे कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. अधिक
माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02472-2223133 वर संपर्क साधावा, असे
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद यांनी कळविले आहे.