उस्मानाबाद,दि.25:-
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आयोजित
खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांचेकडील 241 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरूष व स्त्री उमेदवारांच्या मुलाखती
घेउन निवड करणार आहेत.
एसबीआय लाईफ इन्सूरन्स कंपनी ली. उस्मानाबाद मध्ये ॲडवायजर पदांची संख्या 30, पात्रता इ.10/12वी किंवा पदवी
पास, सन ऍ़ल्यमिनियम ॲन्ड फॅब्रिकेशन,
प्लायग्लास ॲन्ड हार्डवेअर बार्शी नाका,
उस्मानाबाद या कंपनीत अकाउंटटसाठी एक
स्त्री, एक पुरूष, पात्रता बीकॉम/ एमकॉम पास, सेल्समन दोन, पात्रता इ. 12 वी पास,
पेंटर एक, आयटीआय ट्रेड, ग्लास कटर एक, पात्रता आयटीआय ट्रेड, हेल्पर 4, पात्रता 10 वी पास,
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत किल्लारी, ता.औसा जि.लातुर (प्रशिक्षण
अनिवार्य)- मेसन 50, पात्रता इयत्ता 5 वी किंवा आयटीआय मेसन, बार बेंडीग 50, पात्रता इयत्ता 5 वी पास, वेल्डींग
50, पात्रता इयत्त 10 वी किंवा आयटीआय वेल्डर,
नर्सींग सहायक - 50, पात्रता इयत्ता 8 वी
पास (फक्त मुलींसाठी) या सर्व पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे अशी राहील.
वेतन शैक्षणिक
व पदाच्या योग्यतेनुसार देण्यात येईल कॅन्टीन,
निवास, ट्रान्सपोर्टेशन इत्यादी सोई/सुविधा याबाबत संबधित कंपनीच्या नियमानुसार,
प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी/उद्योजक सविस्तर माहिती व
मार्गदर्शन करतील.
शैक्षणिक
पात्रतचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), अनुभव असल्यास
प्रमाणपत्र, एम्पलॉयमेंट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि 02 पासपोर्ट साईझ फोटो
इत्यादी. सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीसह प्रत्यक्ष
जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उस्मानाबाद येथे गुरूवार दिनांक 30 मार्च 2017 रोजी सकाळी 11
वाजता स्वखर्चाने हजर राहून
खाजगी क्षेत्रातील रोजगारांच्या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी
लाभ घ्यावा, संपर्कासाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र : 02472–222236 वर संपर्क
करावा, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद यांनी केले आहे.