Thursday, 23 March 2017

24 मार्च 2017 रोजी नळदूर्ग किल्ल्यावर पत्रकार अभ्यास दौरा समारोप


          








उस्मानाबाद दि. 23:- जिल्हा माहिती कार्यालय आयोजित पत्रकार अभ्यास दौरा दि. 16,20 व 22 मार्च 2017 रोजी केला होता. आज दि 24 मार्च 2017 रोजी नळदूर्ग किल्ला परिसरात अभ्यास दौ-याचा समारोप लातूर विभागाचे उपसंचालक ( माहिती) तथा प्रभारी संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय औरंगाबाद विभागाचे  यशवंत भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
          या पत्रकार अभ्यास दौरा समारोप कार्यक्रमास सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन्स प्रा.लि.चे मॅनेजिग डायरेक्टर कफील मौलवी,डायरेक्टर जयधवल करमरकर, भरत जैन, जनसपर्क अधिकारी अनिल विपत, औरंगाबाद पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित कुमार खंदारे व सोलापूर दै. सकाळचे संपादक अभय दिवाणजी उपस्थित राहणार आहे.
          महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेंतर्गत या कंपनीमार्फत नळदूर्ग किल्‍ल्याचे जतन व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. व नळदूर्ग किल्‍ल्यास पर्यटन क्षेत्रात उच्चांकावर नेण्यासाठी प्रयत्नशिल आहे. नळदूर्ग किल्ला हा 17.39 अक्षास व 76.25 पूर्व रेखांक्षावर ‍स्थित आहे. निजामाच्या कालावधीत नळदूर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. सध्या नळदूर्ग किल्ला हे स्मारक महाराष्ट्र  प्राचीन स्मारके, पुराण वस्तु शास्त्र व औवेशेस अधिनियम 1960 नुसार पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद यांच्या नियंत्रणात आहे.
            जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हयातील पत्रकारांसाठी  पत्रकार अभ्यास दौरा दि. 16 मार्च 2017 रोजी  हिंगळजवाडी  ता. उस्मानाबाद- कडकनाथ कुकुटपालन, कसबे तडवळे ता. उस्मानाबाद- बंदिस्त शेळी पालन, गौर ता. कळंब- कांदा बीज उत्पादन व येरमाळा ता. कळंब – उस्मानाबाद जिल्हयातील आय एस. ओ पोलीस स्टेशन  येथे आयोजित केला होता.
          दि. 20 मार्च 2017 रोजी सारोळा ता. उस्मानाबाद- बियाणे उत्पादन प्रक्रिया, पाडोळी ता. उस्‍मानाबाद- मागेल त्याल शेततळे व उस्मानाबाद येथील हातलाई (डोंगर). दि. 22 मार्च 2017 रोजी  मानकेश्वर ता. भूम – तुती लगवड, लोणी ता. परंडा- अंगणवाडी, वांगी ता. भूम – जैविक किटकनाशके कंपोस्ट खत व वालवड ता. भूम भाजीपाला उत्पादन व विक्री या बाबतचा अभ्यास दौरा झाला आहे.

           दि. 24 मार्च 2017 रोजी बेंबळी ता. उस्मानाबाद- नामानंद फूडस व नळदूर्ग ता. तुळजापूर येथील किल्ल्यास भेट व पाहाणी दौरा केला असून येथे पत्रकार अभ्यास दौरा कार्यक्रमाचा सांगता समारोप होणार आहे. तरी जिल्हयातील पत्रकार बंधूंनी या दौ-यास मोठया संख्येन उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप  यांनी केले आहे.