Saturday, 25 March 2017

आर.टी.ई.नुसार 25 टक्के मोफत प्रवेश पात्र पालकांनी दि.3 एप्रिल 2017 पर्यंत प्रवेश घ्यावा -सचिन जगताप


                                                            
उस्मानाबाद,दि.25:बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणांतर्गत  दुर्बल  आणि  वंचित घटकांना विनाअनुदानीत  आणि  कायम  विनाअनुदानीत  शाळांमध्ये  किमान 25  टक्के प्रवेश  तरतूद आहे.  त्याप्रमाणे  ऑनलाईनव्दारे  पहिल्या  लॉटरी  मधील  फेरी  क्र.2 नुसार  निवड झालेले किंवा न झालेल्या पालकांना त्यांच्या नोंद केलेल्या मोबाईलवर क्रमांकावर दिनांक 23 मार्च 2017  रोजी  SMS  पाठविण्यात आले आहेत.
 पात्र  पालकांनी   दिनांक 3 एप्रिल 2017  पर्यंत  त्यांच्या  ॲपलिकेशन  नंबर  व  पासवर्ड वापरुन शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्या स्वाक्षरीचे ॲडमीट  कार्ड  काढावे  व  सोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे  तहसिलदार  यांचे सन 2015-16 चे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवाशी  पुरावा, रंगीत  फोटो  व  अपंगत्व  असल्यास  प्रमाणपत्र  इत्यादी  कागदपत्र  सादर करुन   निवड   झालेल्या  शाळेत  प्रवेश  घ्यावा.

ज्या  विद्यार्थ्यांची  निवड  झालेली  आहे अशा विद्यार्थ्यांची  यादी  मुख्याध्यापक  यांच्या  लॉगिंनवर  दिसत आहे. दिनांक 3 एप्रिल 2017 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्राची व शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्या  स्वाक्षरीचे  ॲडमीट  कार्डची  तपासणी  करुन  सदरील विद्यार्थ्यांस मुख्याध्यापक लाँगीन  वर  जाऊन  कागदपत्रे  पूर्ण  असल्यास  Admitted   म्हणावे, कागदपत्र  पूर्ण  नसल्यास  मुख्याध्यापकांना  दिलेल्या  मुदतीच्या  शेवटच्या  दिवशी Rejected म्हणावे. काही  पालक विहीत  मुदतीत  शाळास्तरावर  प्रवेशासाठी आलेच नाही तर अशा पालकांना मुख्याध्यापकांनी आपल्यास्तरावरुन  दूरध्वनीवरुन   संपर्क  साधावा  तरीही  दिलेल्या मुदतीत  न आल्यास त्यांना  Not Approached  म्हणावे.मुख्याध्यापक  लॉगिंन वर एकही विद्यार्थी Pending राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  सचिन  जगताप  यांनी  केले  आहे.