Saturday, 21 September 2019

शारदीय नवरात्र महोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांना दर्शन होण्यासाठी योग्य नियोजन करा -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे


वृत्त क्रमांक 641                                                               दि.21 सप्टेंबर, 2019

शारदीय नवरात्र महोत्सवात येणाऱ्या सर्व
भाविकांना दर्शन होण्यासाठी योग्य नियोजन करा
-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

         उस्मानाबाद,दि.21 (जिमाका) : तुळजापूर येथे दरवर्षी होणाऱ्या श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवात महाराष्ट्रासह  कर्नाटक, तेलंगणा राज्यांतून लाखोच्या संख्येने भाविक येतात. या भाविकांना दर्शन सुलभरित्या मिळाण्यासाठी सर्व विभागांनी योग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.
     तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासन कार्यालयाच सभागृहात आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बोलत होत्या.
यावेळी   श्री.बापूसाहेब कन्हे,तुळजापूर नगराध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, उपविभागीय अधिकारी (महसुल) रामेश्वर रोडगे, तहसिलदार तथा व्यवस्थापक श्रीमती योगीता कोल्हे, आपत्ती व्यवस्थापक श्रीमती तेलोरे, श्री.तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री सज्जनराव सांळूके, अमर कदम, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री.अनंतराव कोडो, तुळजाभवनी मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक इन्तुले,कार्य यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ यावेळी म्हणाल्या की, शारदीय नवरात्र महोत्सवात राज्यासह परराज्यातून मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी तुळजापूर येथे येतात. येणाऱ्या भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे याकरीता सुरक्षा यंत्रणासह सर्व संबंधत विभागांनी योग्य नियोजन करावे. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहनतळ, अग्निशमन वाहन, विद्युत व्यवस्था आदी बाबींचे नियोजन करावे. महोत्सवाच्या कालावधीत रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणे तात्काळ काढावीत. भाविकांसाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी. तसेच प्रसादाच्या पॅकिंग,लाह्या, पेढेसह सर्व प्रकारच्या अन्नाच्या नमुन्याची वेळोवेळी तपासणी करावी. कुंकवाचे तपासणी नमुने घ्यावेत व भेसळयुक्त विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, यासाठी वैधमापन व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे काम करावे, अशा सूचना यावेळी श्रीमती मुधोळ यांनी यावेळी दिल्या.           
एस. टी स्टॅन्डवर भाविकांच्या सोयींसाठी विशेष गाड्यांची सोय करुन त्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी देण्यात याव्यात. पोलीस विभागाने महोत्सवाच्या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. यावेळी श्रीमती मुधोळ यांनी दिल्या.
            नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक वाहनाने येतात.  त्याकरीता पार्किंगची व्यवस्था, एसटी महामंडळाने बसेसची व्यवस्था, आरोग्य विभाग, नगर परिषद, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस विभाग, महावितरण कंपनी आदी विभागानी केलेल्या नियोजनाचा व इतर व्यवस्थासंबंधी आढावा यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे घेतला.
****

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                    वृत्त क्रमांक 642                                                                                                                                                              
                विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 कार्यक्रम जाहिर
उस्मानाबाद,दि.21 (जिमाका) :-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि.21 सप्टेंबर 2019 च्या प्रसिध्दीपत्रकान्वये घोषित केला आहे.त्यानुसार महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक घेतली जाणार आहे. सदरचा कार्यक्रम पुढीलप्रमाणेअसणार आहे

अ.क्र.
                       निवडणूक कार्यक्रम
               नियोजित तारखा
1.
निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक
दि.27 सप्टेंबर 2019 (शुक्रवार),
2.
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक
दि.4 ऑक्टोबर 2019 (शुक्रवार)
3.
नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक
दि.5 ऑक्टोबर 2019 (शनिवार)
4.
उमेदवारी अर्ज मार्ग घेण्याचा अंतिम दिनांक
दि.7 ऑक्टोबर 2019 (सोमवार )
5.
मतदानाचा दिनांक
दि.21 ऑक्टोबर 2019 (सोमवार
6.
मतमोजणीचा दिनांक
दि.24 ऑक्टोबर 2019 (गुरुवार )
7.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक
दि.27 ऑक्टोबर 2019 (रविवार )

या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                         ****




Friday, 20 September 2019

स्वयंरोजगार अंतर्गत पाच माजी सैनिकांना अनुदानाचे वितरण

वृत्त क्रमांक 637                                                         दि.20 सप्टेंबर 2019

स्वयंरोजगार अंतर्गत पाच माजी सैनिकांना अनुदानाचे वितरण

उस्मानाबाद,दि.20(जिमाका): माजी सैनिकांना स्वयंरोजगार योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावर मंजूर आर्थिक अनुदानाचे वाटप उस्मानाबाद जिल्ह्यातील पुढीलप्रमाणे माजी सैनिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या हस्ते झाले. दि. 20 सप्टेंबर 2019 रोजी धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्यात आली. यावेळी माजी सैनिक शिंदे विष्णू अण्णाराव यांना रु. 2,35,000/- तर माजी सैनिक कुमार भानुदास मोरे यांना रु. 2,47,082/- रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले.
 तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षात माजी सैनिकांना स्वयंरोजगार योजनेतंर्गत दि.14 फेब्रुवारी 2018 पूर्वी ट्रॅक्टर खरेदी/कुक्कुटपालनासाठी घेतलेल्या कर्जावर मंजुर आर्थिक अनुदानाचे माजी सैनिकांना वितरण करण्यात आले आहे. यामध्ये माजी सैनिक सुरवसे शिवाजी गहिनीनाथ यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी रु. 1,95,180/- माजी सैनिक सावंत त्रिंबक महादेव यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी रु. 1,75,065/- तर माजी सैनिक जाधव तानाजी शिवाजी यांना कुक्कुटपालनासाठी रु. 2,50,000/- रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले. जिल्ह्यातील सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये स्वयंरोजगार अंतर्गत जिल्ह्यातील पाच माजी सैनिकांना एकूण रक्कम वाटप करण्यात आले आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस.फिरासत यांनी कळवले आहे.
                                   ****
वृत्त क्रमांक 638

हरितगृह/शेडनेट गृह उभारणी सेवा पुरवठादारांना नोंदणी करण्याचे आवाहन

उस्मानाबाद,दि.20(जिमाका ): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2019-20 अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हरितगृह/शेडनेट गृह उभारणी सेवा पुरवठादाराची जिल्हास्तरीय नोंदणी करण्यात येणार आहेत. हरितगृह/शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या इच्छूक सेवा पुरवठादारांना उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे आपली नोंदणी अर्ज दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात (प्रपत्र 12) मध्ये सादर करावेत. अर्जांचा नमुना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तसेच www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दि.30 सप्टेंबर 2019 रोजी नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अटी व शर्ती एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2018 -19 चा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लागू राहतील. आर्थिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी उस्मानाबाद   यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
****

Attachments area

Thursday, 19 September 2019

बालविवाह रोखणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी - डॉ. संजय कोलते

वृत्त क्र.636                                                                                                                          दि.18 सप्टेंबर 2019
बालविवाह रोखणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी
                                                   - डॉ. संजय कोलते
        उस्मानाबाद,दि.18 (जिमाका): मुलींनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःची क्षमता सिध्द करावी. बालविवाह होणे अतिशय दुर्दैवी प्रथा असून  बालविवाह रोखणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. विशेषत: ग्रामीण भागात याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. मुली उच्चशिक्षित व्हाव्यात, समाजात बालविवाहाला थारा देऊ नये , मुलींचा जन्माचा दर वाढला पाहिजे, असे विचार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आज येथे व्यक्त केले.
उमरगा शहरात बुधवारी ( ता.18) रोजी बालविवाह एक अभि:शाप या लघुचित्रपटाचे प्रदर्शन व चित्रपटातील कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार  या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम थिएटर येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे अध्यक्षस्थानी होते तर पंचायत समितीचे सभापती अॅड.राजासाहेब पाटील,नगराध्यक्षा  प्रेमलता टोपगे, उपविभागीय पोलिस अधिकारी  अनुराधा उदमले,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत,  तहसिलदार संजय पवार,  उमरगा पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ.घनश्याम जाधव, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड,अंनिसचे जिल्हा राज्य सरचिटणीस प्रा. किरण सगर, तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. दिलीप सगर, अॅड. प्रदीप पणुरे, अॅड. प्रवीण तोतला, आरपीआयचे तालुका अध्यक्ष सुभाष सोनकांबळे, महिला बालविकास अधिकारी सुरेखा जाधव, उद्योजिका ज्योती सपाटे आदींची उपस्थिती होती. 
उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांनी समाजातील अनिष्ठ रुढीला बाजूला सारून मुलींनी स्वतःमधील आत्मविश्वास जागृत करण्याची गरज असल्याचे सांगितले.




पंचायत समितीचे सभापती राजेसाहेब पाटील,किरण सगर, सचिन बिद्री, किशोरी साठे आदी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी उपस्थित महिला व मुली तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकराज्य या शासनाच्या मुखपत्राचे सामूहिक वाचन केले. श्री.छत्रपती महाविद्यालय, उमरगा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच.जाधव आणि आदर्श महाविद्यालय, उमरगा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप गरूड यांनी लोकराज्य महाविद्यालय म्हणून प्रस्ताव जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांच्याकडे सुपूर्द केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने धनुर्विदयेत राष्ट्रीय पारितोषिक मिळविणारी कु.आर्या सुरेंद्रवाले आणि भारूड लोककलेव्दारे राज्य व देशपातळीवर उस्मानाबाद जिल्हयाचे नाव उज्वल करणारी  कु.कृष्णाई उळेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.याप्रसंगी मोबाईलच्या माध्यमातून कृष्णाई उळेकर हिने बालविवाह प्रतिबंध या विषयावरील सुंदरसे भारुड सादर करून उपस्थित महिला व मुलींचे प्रबोधन केले. कृष्णाईच्या वतीने तिचे वडील श्री.प्रभाकर उळेकर या कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांनी प्रास्ताविक केले.
अमोल पाटील, संजय कोथळीकर, प्रा. युसुफ मुल्ला, प्रभाकर मजगे, विजय जाधव, शैलेश महामुनी, पद्माकर मोरे, प्रा. विनोद देवरकर, रविंद्र पोतदार, स्वाती मायाचारी, कैलास आष्टे, सारंग देवा, इमाद सय्यद आदींनी यासाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रवीण स्वामी, पुष्पलता पांढरे यांनी केले. श्री. सचिन बिद्री यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास उमरगा शहरातील शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षिका,अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.
*****

जनतेला केंद्रस्थानी मानून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मिळून जनतेचे प्रश्न सोडविणे महत्वाचे --- पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

वृत्त क्र.634                                                                                                                          दि.17 सप्टेंबर 2019
                                   
जनतेला केंद्रस्थानी मानून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने
मिळून जनतेचे प्रश्न सोडविणे महत्वाचे
                                            --- पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
उस्मानाबाद, दि.17:- जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्यासह खासदार ओमराजे निंबाळकर आणि अन्य पदाधिकारी, अधिकारी यांच्या साथीने जिल्ह्यात विविध तालुकास्तरावर जनता दरबार आयोजित केले जात आहेत, जनतेचे प्रश्न जनतेत जाऊन जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे, जनतेला केंद्रस्थानी मानून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मिळून जनतेचे प्रश्न सोडविणे महत्वाचे आहे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 71 व्या  वर्धापनादिनाच्या मुख्य  ध्वजारोहण सोहळयाप्रसंगी केले.  
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, प्र.अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, कार्यकारी अभियंता अनिल सगर, जिल्हा पुरवठा अधिकारी  डॉ. चारुशिला देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.प्रताप काळे, महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी आंधळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे, उप अभियंता श्री. गपाट, कनिष्ठ अभियंता श्री. मुळे, उप वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.पवार, तहसिलदार अभय म्हस्के, राजकुमार माने, श्री. तेलूरकर, श्री.पाचभाई, जिल्हा क्रीडा अधिकारी  भाग्यश्री बिले, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे श्री.कोंडेकर,श्री. रुकमे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, शिक्षणाधिकारी श्री. सुसर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे,नायब तहसिलदार संतोष पाटील, अनिल खोचरे, कैलास पाटील,  विविध विभागांचे विभाग प्रमुख, पत्रकार, विद्यार्थी व अन्य मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. 
यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आतापर्यंत विविध विकासकामांसाठी उस्मानाबाद जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून दिला असून  यापुढेही शासन आणि प्रशासनाकडून विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत बोलताना पालकमंत्री श्री.सावंत म्हणाले, उस्मानाबाद जिल्हयामध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प लिंक-5 चे काम प्रगतीपथावर असून या प्रकल्पास  मा. राज्यपाल महोदयांच्या निधी सूत्राबाहेर निधी प्राप्त होत असून सन 2017-18 मध्ये रु.237 कोटी व सन 2018-19 मध्ये रु.523 कोटी असे एकूण रु. 760 कोटी निधी प्राप्त असून सन 2019-20 साठी रु.500 कोटी निधीची तरतूद मंजूर असून  प्रकल्पाचे काम  प्रगतीपथावर आहे.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत वॉटर ग्रीड प्रकल्पाचा विशेष उल्लेख करताना म्हणाले की, शासनाने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विविध कामांसाठी रू.3 हजार 122 कोटीच्या निविदा मागविल्या आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांसाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा आदी कामांसाठी 3 हजार 122 कोटींच्या पहिल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत वॉटर ग्रीड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे इस्त्रायल शासनाच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायजेस कंपनी सोबत करार करण्यात आला असून या करारानुसार सहा टप्प्यात विविध अहवाल व 10 प्राथमिक संकलन अहवाल असे सर्व अहवाल फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करण्यात येणार आहेत. या कार्यवाही अंतर्गत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी पहिला व दुसरा प्राथमिक संकलन अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 37.92 किलोमीटर एमएस पाईप तर 665.75 किलोमीटर डीआय पाईप लाईन अशी एकूण 703.67 किलोमीटर पाईप लाईन प्रस्तावित आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 1 हजार 409.57 कोटी अशी एकूण 3 हजार 122 कोटी 18 लाख किंमत प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी हायब्रिड ॲन्युटी मॉडेलवर निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 
नुकताच शासनाने विदर्भ-मराठवाड्यातील सावकारांनी परवाना क्षेत्राबाहेर दिलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेतला. याबाबत आपल्या भाषणात बोलताना प्रा.डॉ.सावंत म्हणाले, विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.राज्य शासनाने एप्रिल 2015 मध्ये विविध नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार 19 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या मंजुरीनुसार 31 मार्च 2018 पर्यंत 46 हजार 735 शेतकऱ्यांची 55 कोटी 96 लाख 65 हजार रुपयांची मुद्दल आणि 10 कोटी 59 लाख 73 हजार रुपयांचे व्याज असे एकूण 66 कोटी 56 लाख 38 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जापोटी 1 हजार 393 सावकारांना वितरित करण्यात आली आहे.
          शेवटी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झालेले  स्वातंत्र्यसैनिक  आयुष्यभर  क्रियाशील  राहिले  आणि आजही  क्रियाशील आहेत,अशा या महान स्वातंत्र्यसैनिकांनी केवळ स्वातंत्र्य  मिळविणे  एवढेच ध्येय  समोर  न ठेवता समग्र  विकासाचा  ध्यास  धरला होता, तो ध्यास लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.त्यांचा आशिर्वाद सदैव आपल्या सोबत आहेत, असे सांगून पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी उपस्थित सर्वांना आवाहन केले की, या ऐतिहासिक दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया…..शासन, प्रशासन आणि सर्व नागरिक मिळून आपल्या जिल्हयाला आकांक्षित जिल्हयांच्या यादीतून लवकरात लवकर बाहेर काढू  आणि या जिल्हयाला विकसित जिल्हा म्हणून ओळख मिळवून देवू या ! तुम्ही आम्ही आपण सर्व जबाबदार नागरिक म्हणून कायदा व सुव्यवस्था व सामाजिक शिस्तीचे पाईक होवून जिल्हयाच्या विकासासाठी एकत्रित येऊन चांगले काम करु या !
          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांचे आगमन होताच सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम हुतात्मा स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले,पोलीस विभागातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
          या सोहळयाच्या निमित्ताने जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मिळविलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेचा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष हाफीझ अलिमोद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सन्मान करण्यात आला. या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे  सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.
          कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी,पत्रकार यांची सदिच्छा भेट घेतली.
********





राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळेचा बहुमान मिळालेल्या मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेचा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरव



वृत्त क्रमांक-635                                                                                                                                                        

राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळेचा बहुमान मिळालेल्या
मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेचा
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरव

उस्मानाबाद,दि.17(जिमाका): मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळयात मौलाना अबुल कलाम आझाद ही शाळा जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा झाल्याबददल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष हाफीझ अलिमोद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सन्मान करण्यात आला.
शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' हे लोकप्रिय मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून मान्यता पावले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय, त्यांची अंमलबजावणी यांची अधिकृत आणि अचूक माहिती पुरविणारे  व तब्बल 5 लाख 17 हजार 68 इतका अधिकृत खप असणारे हे एकमेव शासकीय मासिक आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त असणारे हे मासिक आहे. विशेष म्हणजे हे मासिक मराठी भाषेसह इंग्रजी,उर्दू ,हिंदी आणि गुजराती  भाषेतही प्रकाशित होते.
जिल्हयात या मासिकाबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध प्रकारे जनजागृती सातत्याने केली जाते.यास प्रतिसाद देताना जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेने मिळविला आहे. या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे  सभासदत्व स्वीकारले
 आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्था स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम, मतदार जनजागृती, अल्पसंख्याक समाजात शिक्षणासाठी जनजागृती, पूरग्रस्तांसाठी मदत फेरी  असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातही आघाडीवर आहे.
          या सन्मानाबददल या शाळेचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
********


Monday, 16 September 2019

राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळा मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळा


वृत्त क्रमांक-632                                               दि.16 सप्टेंबर 2019



राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळा

मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळा
                                                                  
          उस्मानाबाद,दि.16(जिमाका): शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' हे लोकप्रिय मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून मान्यता पावले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय, त्यांची अंमलबजावणी यांची अधिकृत आणि अचूक माहिती पुरविणारे  व तब्बल 5 लाख 17 हजार 68 इतका अधिकृत खप असणारे हे एकमेव शासकीय मासिक आहे.समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त असणारे हे मासिक आहे. विशेष म्हणजे हे मासिक मराठी भाषेसह इंग्रजी,उर्दू ,हिंदी आणि गुजराती  भाषेतही प्रकाशित होते.
          जिल्हयात या मासिकाबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध प्रकारे जनजागृती सातत्याने केली जाते. यास प्रतिसाद देताना जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेने मिळविला आहे. या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे  सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.
 मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्था स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम, मतदार जनजागृती, अल्पसंख्याक समाजात शिक्षणासाठी जनजागृती, पूरग्रस्तांसाठी मदत फेरी  असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातही आघाडीवर आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष हाफीझ अलिमोद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले असून दि.17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळयात पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून या संस्थेचा सन्मान करण्यात येणार आहे.
*******