वृत्त क्रमांक 641 दि.21
सप्टेंबर, 2019
शारदीय नवरात्र महोत्सवात येणाऱ्या सर्व
भाविकांना दर्शन होण्यासाठी योग्य नियोजन
करा
-जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद,दि.21
(जिमाका) : तुळजापूर येथे दरवर्षी होणाऱ्या श्री तुळजाभवानी नवरात्र
महोत्सवात महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा राज्यांतून लाखोच्या संख्येने भाविक
येतात. या भाविकांना दर्शन सुलभरित्या मिळाण्यासाठी सर्व विभागांनी योग्य नियोजन
करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.
तुळजापूर येथील
श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासन कार्यालयाच सभागृहात आयोजित शारदीय
नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बोलत
होत्या.
यावेळी श्री.बापूसाहेब कन्हे,तुळजापूर नगराध्यक्ष,
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, उपविभागीय अधिकारी (महसुल) रामेश्वर रोडगे,
तहसिलदार तथा व्यवस्थापक श्रीमती योगीता कोल्हे, आपत्ती व्यवस्थापक श्रीमती
तेलोरे, श्री.तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री सज्जनराव सांळूके, अमर
कदम, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री.अनंतराव कोडो, तुळजाभवनी मंदिर
संस्थानाचे व्यवस्थापक इन्तुले,कार्य यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख
उपस्थित होते.
यावेळी
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ यावेळी म्हणाल्या की, शारदीय नवरात्र महोत्सवात
राज्यासह परराज्यातून मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी तुळजापूर येथे येतात.
येणाऱ्या भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे याकरीता सुरक्षा यंत्रणासह सर्व
संबंधत विभागांनी योग्य नियोजन करावे. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी,
मोबाईल टॉयलेट, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहनतळ, अग्निशमन वाहन, विद्युत व्यवस्था
आदी बाबींचे नियोजन करावे. महोत्सवाच्या कालावधीत रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणे
तात्काळ काढावीत. भाविकांसाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी. तसेच प्रसादाच्या
पॅकिंग,लाह्या, पेढेसह सर्व प्रकारच्या अन्नाच्या नमुन्याची वेळोवेळी तपासणी
करावी. कुंकवाचे तपासणी नमुने घ्यावेत व भेसळयुक्त विक्री करणाऱ्यावर कारवाई
करावी, यासाठी वैधमापन व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे काम करावे, अशा
सूचना यावेळी श्रीमती मुधोळ यांनी यावेळी दिल्या.
एस. टी स्टॅन्डवर भाविकांच्या
सोयींसाठी विशेष गाड्यांची सोय करुन त्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपणाद्वारे
वेळोवेळी देण्यात याव्यात. पोलीस विभागाने महोत्सवाच्या कालावधीत चोख बंदोबस्त
ठेवावा. यावेळी श्रीमती मुधोळ यांनी दिल्या.
नवरात्र महोत्सवात
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक वाहनाने येतात. त्याकरीता पार्किंगची व्यवस्था, एसटी
महामंडळाने बसेसची व्यवस्था, आरोग्य विभाग, नगर परिषद, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस
विभाग, महावितरण कंपनी आदी विभागानी केलेल्या नियोजनाचा व इतर व्यवस्थासंबंधी
आढावा यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे घेतला.
****
वृत्त क्रमांक 642
विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक-2019 कार्यक्रम जाहिर
उस्मानाबाद,दि.21 (जिमाका) :-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या निवडणूकीचा
कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि.21 सप्टेंबर 2019 च्या प्रसिध्दीपत्रकान्वये
घोषित केला आहे.त्यानुसार महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक
घेतली जाणार आहे. सदरचा कार्यक्रम पुढीलप्रमाणेअसणार आहे
|
अ.क्र.
|
निवडणूक कार्यक्रम
|
नियोजित तारखा
|
|
1.
|
निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक
|
दि.27 सप्टेंबर 2019 (शुक्रवार),
|
|
2.
|
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक
|
दि.4 ऑक्टोबर 2019 (शुक्रवार)
|
|
3.
|
नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक
|
दि.5 ऑक्टोबर 2019 (शनिवार)
|
|
4.
|
उमेदवारी अर्ज मार्ग घेण्याचा अंतिम दिनांक
|
दि.7 ऑक्टोबर 2019 (सोमवार )
|
|
5.
|
मतदानाचा दिनांक
|
दि.21 ऑक्टोबर 2019 (सोमवार
|
|
6.
|
मतमोजणीचा दिनांक
|
दि.24 ऑक्टोबर 2019 (गुरुवार )
|
|
7.
|
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक
|
दि.27 ऑक्टोबर 2019 (रविवार )
|
या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रस्तुत
प्रसिध्दीपत्रकाच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याचे
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****