Friday, 20 September 2019

स्वयंरोजगार अंतर्गत पाच माजी सैनिकांना अनुदानाचे वितरण

वृत्त क्रमांक 637                                                         दि.20 सप्टेंबर 2019

स्वयंरोजगार अंतर्गत पाच माजी सैनिकांना अनुदानाचे वितरण

उस्मानाबाद,दि.20(जिमाका): माजी सैनिकांना स्वयंरोजगार योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावर मंजूर आर्थिक अनुदानाचे वाटप उस्मानाबाद जिल्ह्यातील पुढीलप्रमाणे माजी सैनिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या हस्ते झाले. दि. 20 सप्टेंबर 2019 रोजी धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्यात आली. यावेळी माजी सैनिक शिंदे विष्णू अण्णाराव यांना रु. 2,35,000/- तर माजी सैनिक कुमार भानुदास मोरे यांना रु. 2,47,082/- रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले.
 तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षात माजी सैनिकांना स्वयंरोजगार योजनेतंर्गत दि.14 फेब्रुवारी 2018 पूर्वी ट्रॅक्टर खरेदी/कुक्कुटपालनासाठी घेतलेल्या कर्जावर मंजुर आर्थिक अनुदानाचे माजी सैनिकांना वितरण करण्यात आले आहे. यामध्ये माजी सैनिक सुरवसे शिवाजी गहिनीनाथ यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी रु. 1,95,180/- माजी सैनिक सावंत त्रिंबक महादेव यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी रु. 1,75,065/- तर माजी सैनिक जाधव तानाजी शिवाजी यांना कुक्कुटपालनासाठी रु. 2,50,000/- रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले. जिल्ह्यातील सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये स्वयंरोजगार अंतर्गत जिल्ह्यातील पाच माजी सैनिकांना एकूण रक्कम वाटप करण्यात आले आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस.फिरासत यांनी कळवले आहे.
                                   ****
वृत्त क्रमांक 638

हरितगृह/शेडनेट गृह उभारणी सेवा पुरवठादारांना नोंदणी करण्याचे आवाहन

उस्मानाबाद,दि.20(जिमाका ): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2019-20 अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हरितगृह/शेडनेट गृह उभारणी सेवा पुरवठादाराची जिल्हास्तरीय नोंदणी करण्यात येणार आहेत. हरितगृह/शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या इच्छूक सेवा पुरवठादारांना उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे आपली नोंदणी अर्ज दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात (प्रपत्र 12) मध्ये सादर करावेत. अर्जांचा नमुना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तसेच www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दि.30 सप्टेंबर 2019 रोजी नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अटी व शर्ती एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2018 -19 चा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लागू राहतील. आर्थिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी उस्मानाबाद   यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
****

Attachments area