केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन धारक व निवृत्ती वेतन
धारक कल्याण विभागाच्या दि. 18 जूलै 2018 रोजीच्या पत्रानुसार संपूर्ण देशामधील
संबंधीत/ केंद्रशासित प्रदेशामध्ये पेन्शन अदालत आयोजित करण्याचे सूचित केले आहे.
महालेखापाल
कार्यालयाकडून निवृत्ती वेतन नामंजूर/आक्षेपित झालेल्या सेवानिवृत्ती अधिकारी
कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत संचालक,लेखा व कोषागारे नागपूर
यांनी पेन्शन अदालत चे आयोजन विदर्भ/मराठवाडा प्रदेशा करिता आयोजित करण्यात आले
आहे.
सदर पेन्शन अदालत दि.18
सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 1.00 ते 5.00 वाजता
(स्थळ: साई
सभागृह, शंकर अंबाझरी रोड व्होकार्ड हॉस्पीटलच्या मागे,नागपूर) महालेखापाल
नागपूर यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी उस्मानाबाद जिल्हयातील संबंधीत
कार्यालय प्रमुख / आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांचेकडील प्रलंबित निवृत्ती वेतन
प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उपस्थित राहावे.असे कोषागार अधिकारी उस्मानाबाद
यांनी कळविले आहे.
***