Monday, 10 September 2018

विदर्भ व मराठवाडा विभागासाठी पेन्शन अदालतीचे आयेाजन


           केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन धारक व निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाच्या दि. 18 जूलै 2018 रोजीच्या पत्रानुसार संपूर्ण देशामधील संबंधीत/ केंद्रशासित प्रदेशामध्ये पेन्शन अदालत आयोजित करण्याचे सूचित केले आहे.
         महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन नामंजूर/आक्षेपित झालेल्या सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त  विभागामार्फत संचालक,लेखा व कोषागारे नागपूर यांनी पेन्शन अदालत चे आयोजन विदर्भ/मराठवाडा प्रदेशा करिता आयोजित करण्यात आले आहे.
 सदर पेन्शन अदालत दि.18 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 1.00 ते 5.00 वाजता
(स्थळ: साई सभागृह, शंकर अंबाझरी रोड व्होकार्ड हॉस्पीटलच्या मागे,नागपूर) महालेखापाल नागपूर यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी उस्मानाबाद जिल्हयातील संबंधीत कार्यालय प्रमुख / आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांचेकडील प्रलंबित निवृत्ती वेतन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उपस्थित राहावे.असे कोषागार अधिकारी उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
***