उस्मानाबाद.दि.18:- राज्य
सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने
सरकारने कर्जमाफीची भेट दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे
पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री
तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे
सहपालकमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केले .
यावेळी आमदार
सुजितसिंह ठाकूर,जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सहकारी
संस्थेचे जिल्हा उपनिबंधक श्री. जगदाळे, जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी सुभाष चोले, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक
श्री. विजयकर, तहसिलदार सुजित नरहरे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, प्रदेश
कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, अन्य पदाधिकारी तसेच विविध
विभागांच्या विभागप्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाच्या
महत्त्वाकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017
अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पात्र लाभार्थी कुटुंबांपैकी उस्मानाबाद तालुक्यातील
चनबस शिवय्या कपाळे, रा. बावी, भारत
तात्या तांबे, रा. बावी, तुळजापूर
तालुक्यातील नागनाथ गुंड, रा. सुरतगाव, चंद्रकांत शेनमारे, रा. पिंपळा बु., भिमा आंबुरे, रा. सुरतगाव, लोहारा तालुक्यातील तुकाराम साठे, रा. माकणी,
शिवाजी करदूरे, रा. माकणी, रहेमान पठाण, रा. माकणी, कळंब तालुक्यातील शरद सावंत, रा. सौंदाणा
ढोकी, नारायण कुलकर्णी, रा.
सातेफळ, शिवहरी शेळके, रा. भोसा,
वाशी तालुक्यातील गोरोबा तावरे, रा.
जिन्नर, राजेंद्र शिंदे, रा.
बावी, प्रताप घुले, रा. वाशी,
भूम तालुक्यातील दत्तात्रय चव्हाण, रा.
वालवड, परंडा तालुक्यातील भास्कर तनपुरे, रा. खासापुरी, विक्रम देशमुख रा. खासापुरी,
सुरेश बारसकर रा. अंदोरी अशा एकूण 23 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात शाल,श्रीफळ,
टोपी, साडी-चोळी व प्रमाणपत्र
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास,मत्स्यव्यवसायमंत्री तथा उस्मानाबाद
जिल्ह्याचे सहपालकमंत्री महादेव जानकर, आमदार सुजितसिंह
ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वाटप
करण्यात आले.
यावेळी
सहपालकमंत्री श्री. महादेव जानकर म्हणाले की, शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत शेतकऱ्यांसाठीची
सर्वात मोठी कर्ज माफी आहे. दिड लाखापर्यंतचे कर्ज माफी झाल्याचेही यावेळी
पालकमंत्री श्री. जानकर यांनी सांगितले.
पुढे पालकमंत्री
श्री. महादेव जानकर म्हणाले की,उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण 1लाख 39 हजार 577
शेतकर्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले असून पात्र सर्व शेतकर्यांना
ऑक्टोबर अखेरपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हयातील
जलयुक्त शिवारच्या कामामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने
त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाची
प्रस्तावना जिल्हा उपनिबंधक श्री. जगदाळे यांनी केली तर आभार अग्रणी बँकेचे व्यवस्थापक
श्री. विजयकर यांनी मानले. यावेळी शेतकर्यांची उपस्थिती मोठया संख्येने होती.