Saturday, 22 April 2017

पशुसंवर्धन,दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पशुवैद्यकीय संस्थांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण



उस्मानाबाद:-यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आज पशुसंवर्धन,दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे सहपालकमंत्री  महादेव  जानकर यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण,आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हा परिषदचे अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील,पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप,प्रभारी  जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.सूर्यवंशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुकणे यांनी 19 संस्थांनी आयएसओ  मानांकन प्राप्त केले असून 40 संस्था प्रस्तावित आहेत व उर्वरित संस्था लवकरच आयएसओ  मानांकन प्राप्त करून घेतील  अशी माहिती  विशद केली.
           
सहपालकमंत्री श्री. जानकर  यांनी उस्मानाबाद जिल्हयात पशुसंवर्धन विभागाने लोकसहभागातून आयएसओ कार्यक्रम राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. सर्व आयएसओ संस्था प्रमुखांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. श्री.जानकर म्हणाले की, शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी कौशल्य प्राप्त करून शेतीशी संलग्न व्यवसाय करावा. यापुढे शेतकऱ्याला सन्मानाने जगायचे  असेल तर पशुसंवर्धनाशिवाय पर्याय नाही. भविष्यात सर्वांत  जास्त  रोजगार  हा  विभाग उपलब्ध करून देणार आहे.

यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी उस्मानाबादी शेळी विकास प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतची  मागणी केली.
           
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी मनोगत व्यक्त करून  आयएसओ  प्राप्त संस्थांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांचे संस्था प्रमुख उपस्थित होते.

 शेवटी डॉ. शितलकुमार मुकणे यांनी सर्वांचे आभार मानले. 

Wednesday, 19 April 2017

आंबा फळझाडांवरील साल खाणारी अळीचे नियंत्रण


उस्मानाबाद,दि.19:-आंबा  फऴझाडावरील  साल  खाणारी अऴी ही पतंगवर्गीय किड असून पतंग पिवऴसर तांबूस रंगाचा असतो,मादी जवळपास 2 हजार अंडी खोडाच्या सालीवर  मे  महिन्यामध्ये  घालतॆ. अंडी  दहा  दिवसात  उबतात  व अळया साल खातात. दोन ते तीन दिवसात  अऴ्या  खोडावर  जाऴी बनवतात. अळी  दिवसा  जाळीखालील  छिद्रात रहाते  व  रात्री  साल  खातॆ. पूर्ण  वाढलेली अळी पिवळसर तांबूस रंगाची असून  3.5 ते 4 से.मी. लांब असते, अळी खोड  अथवा  फांद्यावरील  छिद्रात  कोषाअवस्थेत जाते,कोषावस्था  21 ते  31  दिवसाची असतॆ.
          ही किड ओळखण्याची लक्षणॆ म्हणजे प्रादूर्भित झाडाच्या खोड अथवा फांद्यावर काऴ्या तांबूस रंगाची किडीच्या विष्ठॆपासून तयार झालेली 2 ते 2.5 से.मी. रुंदीची वेडीवाकडी  जाऴी  आढळून येते.अशी जाऴी काढून  पाहिल्यास त्या ठिकाणची साल अऴीनॆ  खाल्लॆली आढळून येते.जाऴीच्या टोकाला  छिद्रामध्यॆ अऴी आढळून यॆतॆ. अळीच्या  प्रादूर्भावामुऴॆ  झाडॆ  अशक्त होतात, त्याचा वाढीवर परिणाम होतो. प्रादुर्भाव मोठ्या  प्रमाणावर  झाल्यास  झाडाच्या  शेंड्याच्या  फांद्या  वाळतात.

          किडीचे नियंत्रणासाठी बाग स्वच्छ  ठेवावी व बाग घन झाली असल्यास विरऴनी करावी.अऴीने तयार केलेल्या  जाऴ्या काढून छिद्रामध्ये केरोसीन अथवा पेट्रोल  पिचकारीचे सहाय्याने घालून भोक चिखलानॆ बंद करावे.डायक्लोरव्हॉस 0.05 टक्के किटनाशकाचा वरीलप्रमाणे  वापर करावा.कार्बनडायसल्फाईड किंवा इडीसीटी मिक्शचरमध्ये कापसाचा  बोळा भिजवून अऴीनॆ तयार कॆलॆल्या छिद्रामध्ये घालून  ते चिखलाने  बंद करावे,अशी  माहिती  उपविभागीय  कृषी  अधिकारी, भूम  यांनी  दिली आहे.

अहमदनगर येथे सैन्य भरती रॅलीचे आयोजन



उस्मानाबाद.दि.19:- महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्हयातील (उस्मानाबाद,लातूर, बीड,पुणे व अहमदनगर) पात्र उमेदवारासाठी दि.7 ते 22 एप्रिल या कालावधीत सैन्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,तरी जिल्हयातील पात्र उमेदवारांनी या सैन्य भरती रॅलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन  तहसिलदार  सुजित नरहरे  यांनी केले आहे.