उस्मानाबाद,दि.19:-आंबा फऴझाडावरील साल खाणारी अऴी ही पतंगवर्गीय किड असून पतंग पिवऴसर
तांबूस रंगाचा असतो,मादी जवळपास 2 हजार अंडी खोडाच्या सालीवर मे
महिन्यामध्ये घालतॆ. अंडी दहा दिवसात
उबतात व अळया साल खातात. दोन ते तीन दिवसात अऴ्या खोडावर
जाऴी बनवतात. अळी दिवसा जाळीखालील
छिद्रात रहाते व रात्री
साल
खातॆ. पूर्ण वाढलेली अळी पिवळसर
तांबूस रंगाची असून 3.5 ते 4 से.मी. लांब
असते, अळी खोड अथवा फांद्यावरील छिद्रात कोषाअवस्थेत जाते,कोषावस्था 21 ते 31
दिवसाची असतॆ.
ही
किड ओळखण्याची लक्षणॆ म्हणजे प्रादूर्भित झाडाच्या खोड अथवा फांद्यावर काऴ्या
तांबूस रंगाची किडीच्या विष्ठॆपासून तयार झालेली 2 ते 2.5 से.मी. रुंदीची वेडीवाकडी
जाऴी आढळून येते.अशी जाऴी काढून पाहिल्यास त्या ठिकाणची साल अऴीनॆ खाल्लॆली आढळून येते.जाऴीच्या टोकाला छिद्रामध्यॆ अऴी आढळून यॆतॆ. अळीच्या प्रादूर्भावामुऴॆ झाडॆ अशक्त होतात, त्याचा वाढीवर परिणाम होतो.
प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास झाडाच्या शेंड्याच्या फांद्या वाळतात.
किडीचे
नियंत्रणासाठी बाग स्वच्छ ठेवावी व बाग घन
झाली असल्यास विरऴनी करावी.अऴीने तयार केलेल्या जाऴ्या काढून छिद्रामध्ये केरोसीन अथवा पेट्रोल पिचकारीचे सहाय्याने घालून भोक चिखलानॆ बंद करावे.डायक्लोरव्हॉस
0.05 टक्के किटनाशकाचा वरीलप्रमाणे वापर
करावा.कार्बनडायसल्फाईड किंवा इडीसीटी मिक्शचरमध्ये कापसाचा बोळा भिजवून अऴीनॆ तयार कॆलॆल्या छिद्रामध्ये
घालून ते चिखलाने बंद करावे,अशी माहिती उपविभागीय
कृषी अधिकारी, भूम यांनी दिली
आहे.