Saturday, 6 January 2018

चांगला समाज व देश घडविण्यासाठी सकारात्मक विचार करायला हवा -अपर जिल्हाधिकारी पराग सोमण


,दि.6:- वृत्तपत्रामध्ये समाजमनाचे व प्रशासनाचे योग्य ते रुप दिसले पाहिजे, यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुन चांगला समाज व देश घडविण्यासाठी  सकारात्मक विचार करायला हवा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण यांनी आज व्यक्त केले.




जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दर्पणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. सोमण हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते हे होते.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश पोतदार, पत्रकार कमलाकर कुलकर्णी, प्रशांत कावरे, धनंजय पाटील, राजाभाऊ वैद्य, देविदास पाठक, शिला उंबरे, संतोष हांबीरे, मच्छिंद्र कदम, सुभाष कदम, भिमाशंकर वाघमारे, हुंकार बनसोडे, भाऊसाहेब अणदुरकर, कलीम मुसा सय्यद, श्री.जी.बी.राजपूत, संतोष खुने, आकाश नरोटे, मल्लिकार्जून सोनवणे आदीची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पुढे बोलताना श्री.सोमण म्हणाले की, पत्रकारासाठी सकारात्मक कायदे देखील झाले आहेत, यामध्ये आर्थिक बाबीचा देखील विचार करण्यात आला आहे.

यावेळी श्री.डॉ.कोलते यांनी अध्यक्षीय समारोपात शासनाच्या विविध विकास योजनाचा रथ पुढे नेण्याचे काम पत्रकारांचे मोलाचे सहकार्य लाभते, त्यामुळे पत्रकार व प्रशासन मिळून चांगले काम करु या, असे आवाहन यावेळी केले.


यावेळी पत्रकार धनंजय रणदिवे, देविदास पाठक व संतोष हंबीरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मानले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पत्रकारांची मौखिक आरोग्य तपासणी व मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच लोकराज्य, महाकर्जमाफी, सामाजिक न्यायाच्या दिशेने, कथा परिर्वनाची – दर्शन समृध्दीचे, बदलत्या महाराष्ट्राचे आदी पुस्तकांचे यावेळी पत्रकारांना वाटप करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे व उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य व जिल्ह्यातील पत्रकार  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 5 January 2018

लोहारा येथे महा आरोग्य शिबिरात 2 हजार 475 रुग्णांची आरोग्य तपासणी




उस्मानाबाद,दि.5:- लोहारा येथे बळीराजा चेतना अभियानांतर्गत महा आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 2 हजार 475 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
लोहारा येथे बळीराजा चेतना अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर, सह्याद्री रुग्णालय उस्मानाबाद, आयुष, औषध विक्रेते संघटना, रोटरी क्लब, व्यापारी महासंघ स्वयंसेवी संस्था, मॅग्मो आदींच्या संयुक्त विद्यमाने महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी या शिबिराचे उद्‌घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करुन करण्यात आले.
यावेळी  नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कोलते, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ. चंद्रकला नारायणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंदराव सुर्यवंशी, नगरसेवक सर्वश्री अभिमान भिमराव खराडे, श्यामराव नारायणकर, प्रताप घोडके, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे, तहसिलदार शोभा पुजारी, मुख्याधिकारी सोनम देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एकनाथ माले, बीड जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बी.एस.थोरात, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.खापर्डे, डॉ.रमाकांत जोशी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजगुरु, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. गोविंद साठे, वैद्यकिय अधिकारी डॉ.आर.यु.सुर्यवंशी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग  रुग्णांची  मोफत तपासणी  व उपचार, रक्तातील साखरेची तपासणी, बी.पी.व ईसीजी तपासणी, कर्णबधिर रुग्णांची तपासणी, लहान मुलांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, दंत तपासणी, मनोविकार तपासणी आदी तज्ञ डॉक्टरांमार्फत या शिबिरात 2 हजार 475 रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले.यामध्ये 1 हजार 355 महिलांची तर 1 हजार 120 पुरुषांची तपासणी करण्यात आली. या शिबिराबरोबरच  रक्तदान शिबिरही घेण्यात आले. यामध्ये 5 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार श्री.चौगुले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी मिळून शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले पाहिजे.त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती समजून सांगितली पाहिजे. त्याचबरोबर आ.चौगुले यांनी यावेळी 200 लोकराज्य सभासदांची नोंदणी स्वखर्चाने केली.
यावेळी शासकीय योजनांच्या लाभार्थींना आमदार श्री.चौगुले यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांनी केले.यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व परिसरातील रुग्ण मोठया संख्येने उपस्थित होते.

Thursday, 4 January 2018

05सिध्दी 2017_संकल्प 2018 जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद वृत्तपत्र कात्रणे


04 सिध्दी 2017_संकल्प 2018 जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद वृत्तपत्र कात्रणे


03सिध्दी 2017_संकल्प 2018 जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद वृत्तपत्र कात्रणे


02 सिध्दी 2017_संकल्प 2018 जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद वृत्तपत्र कात्रणे


01 सिध्दी 2017_संकल्प 2018 जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद वृत्तपत्र कात्रणे


08 सिध्दी 2017_संकल्प 2018 – जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद – वृत्तपत्र कात्रणे


07 सिध्दी 2017_संकल्प 2018 – जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद – वृत्तपत्र कात्रणे


06 सिध्दी 2017_संकल्प 2018 – जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद – वृत्तपत्र कात्रणे


05 सिध्दी 2017_संकल्प 2018 – जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद – वृत्तपत्र कात्रणे


04 सिध्दी 2017_संकल्प 2018 – जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद – वृत्तपत्र कात्रणे


03 सिध्दी 2017_संकल्प 2018 – जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद – वृत्तपत्र कात्रणे


02 सिध्दी 2017_संकल्प 2018 – जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद – वृत्तपत्र कात्रणे


सिध्दी 2017_संकल्प 2018 – जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद – वृत्तपत्र कात्रणे


Wednesday, 3 January 2018

सिध्दी 2017_संकल्प 2018 - जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद

जिल्हयाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कोलते



उस्मानाबाद,दि.3:- वृक्ष लागवड, माता बाल मृत्यू, स्वच्छ भारत अभियान, अवयवदान, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हा सुजलाम्, सुफलाम् व दुष्काळमुक्त करुन  जिल्हयाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी आज येथे केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सिध्दी 2017-संकल्प 2018 यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, वन अधिकारी अशोक पवार, जिल्हा अवयवदान समन्वयक डॉ. गजानन परळीकर,  जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख, स्वच्छता अभियानाचे जिल्हा समन्वयक रमाकांत गायकवाड आदींसह जिल्ह्यातील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या हस्ते पूजन करण्यात आले व त्यानंतर सर्वांचे स्वागत उस्मानाबादची ओळख जगभरात करुन देणारी जरबेरा फुले देऊन करण्यात आले. 
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसाठ्याबरोबरच भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. या कामांमुळे विहिरीच्या पाणीसाठयात 3 ते 3.50 मीटरने सरासरी वाढ झाली आहे.या अभियानातून सन 2015-16 या वर्षी जिल्ह्यातील 217 गावांची निवड करण्यात आली होती. या गावात अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिल्याच वर्षी या अभियानांतर्गत एकवीस हजार पंचवीस कामे हाती घेण्यात आली होती, ती सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून सन 2016-17 या वर्षात जिल्ह्यातील 191 गावांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 16 हजार 795 कामे प्रस्तावित करण्यात आली. निवडलेल्या सर्व गावात कामे सुरु करण्यात आली असून यातील 10 हजार 47 कामे पूर्ण झाली आहेत तर प्रगतीपथावर 3 हजार 844 कामे आहेत. या अभियानांतर्गत शासकीय यंत्रणा व लोकसहभागातून 14.73 लाख घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. या कामामुळे एक संरक्षित सिंचन क्षेत्र 19 हजार 556 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. या कामामुळे 6 हजार 744 टीसीएम पाणी साठा झाला, अशी माहिती दिली.
            ते म्हणाले की, सन 2017-18 मध्ये या अभियानांतर्गत  जिल्ह्यातील 178 गावांची निवड करण्यात आली असून यात 6 हजार 994 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात 4 हजार 215 कामांना प्रशासकीय मंजुरी असून कार्यारंभ आदेश 1 हजार 292 कामांना दिला असून 230 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 3 हजार 700 शेततळयाचे उदिष्ट देण्यात आले होते त्यापैकी 1 हजार 653 शेततळे पूर्ण झाली असून चालू असलेली शेततळेचे कामांची संख्या 103 आहे, यामध्ये अनुदान अदायगी केलेल्या शेततळयांची संख्या 1 हजार 649 इतकी आहे, यासाठी 6 कोटी 85 लाख  रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले  यांनी जिल्हा रुग्णालयातर्फे जिल्हयात राबविण्यात आलेले आधार ॲट बर्थ, ई-ब्लड बँक, टेलिमेडिसीन, मुलीच्या जन्माचा जन्मोत्सव, महाआरोग्य शिबीर, अवयवदान या विशेष उपक्रमांबद्दल उपस्थित पत्रकारांना माहिती दिली.
यानंतर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांनी आरोग्य विषयक माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. 1 वर्षापर्यंतच्या बाळाला आजारी असेलतर त्याच्या उपचारासाठी मोफत गाडीची सेवा पुरवली जाते यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठी मदत होत आहे. शासकीय रुग्णालयात 76 प्रसूती करण्यात येतात. त्याचबरोबर पल्स पोलिओ लसीकरण 99 टक्के मुलांपर्यंत पोहोचविले जाते. जीवनसत्व अ 96 टक्के बालकांना देण्यात येते. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक मातांना योजनेंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
वन अधिकारी अशोक पवार यांनी वन विभागाच्या सादरीकरणात वृक्ष लागवडीची देखील प्रभावी अंमलबजावणी करुन सन 2017 मध्ये जिल्ह्याला सहा लाख तेवीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टये देण्यात आले होते.  जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त दहा लाख पंच्च्यान्नव हजार 633 वृक्ष लागवड करण्यात आली, अशी माहिती दिली.  
स्वच्छता अभियानाचे जिल्हा समन्वयक रमाकांत गायकवाड यांनी जिल्हयातील स्वच्छता अभियानाची माहिती देताना स्वच्छ भारत मिशन अभियान जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवून यशस्वी केले. यामुळे आज पायाभूत सर्व्हेक्षण सन 2012 प्रमाणे जिल्हा शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला असून नियमित शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, निगराणी समिती स्थापना, विद्यार्थी न्यायालय, स्वछाग्रहींची नेमणूक, मासिक पाळी व्यवस्थापनाच्या सुविधा उपलब्ध करणे, आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची उपलब्ध करुन देणे आदी संकल्प करण्यात येत आहे, असे सांगितले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अप्पर जिल्हाधिकारी श्री. सोमण म्हणाले की, प्रसारमाध्यमे आणि प्रशासन यांनी एकमेकांशी नेहमीच बौध्दिक आणि वैचारीक देवाण-घेवाण केल्यास त्यातून सकारात्मक काम चांगल्या प्रकारे होवू शकते, त्यातूनच उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासाला निश्चितच हातभार लागलेला आहे आणि यापुढेही लागत राहील. प्रसारमाध्यमांनी प्रशासनाला सकारात्मक कामांसाठी केलेल्या सूचनांचे नेहमी स्वागतच राहील.

प्रास्ताविकात श्री. सानप यांनी सिध्दी 2017-संकल्प 2018 या उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली तर आभार प्रदर्शनात जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मनोगत व्यक्त करताना उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासात पत्रकारांच्या योगदानाचे अनन्यसाधारण महत्व असून यापुढेही प्रशासनातील अधिकारी व प्रसारमाध्यमे सकारात्मक भावनेने काम करतील व त्यातून जिल्हयाची सकारात्मक ओळख सर्व देशाला होईल, असा विश्वास व्यक्त केला व या उपक्रमासाठी उपस्थित सर्वांना धन्यवाद दिले. याशिवाय उपस्थित सर्वांना माहिती व जनसंपर्कचे प्रकाशन लोकराज्य मासिक, महाराष्ट्र अहेड मासिक तसेच इतर काही पुस्तिका भेट स्वरुपात देण्यात आल्या.