Friday, 9 June 2017
महाराष्ट्र डिजीधन जनजागृती स्पर्धेतील विजेत्या संघाचा पारितोषक वितरण समारंभ संपन्न
उस्मानाबाद,दि.9:- "कॅशलेस व्यवहाराच्या विविध
पध्दती, महाराष्ट्र डिजीधन जनजागृती आणि नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी
सक्षम बनविणे" या आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्या संघाचा पारितोषक
समारंभ निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांच्या हस्ते जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
या
स्पर्धेतील पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर,स्वप्नील
पुरी,योगेश अडकिते,एनएसएस च्या जिल्हा समन्वयक डॉ.शीला स्वामी यांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी
मार्गदर्शन करताना निवासी उपजिल्हाधिकारी श्री.यादव म्हणाले की,या कॅशलेस व्यवहार
जनजागृती स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हयातील एकूण 15 महाविद्यालयातील 496 विद्यार्थी-
विद्यार्थींनीनी सहभाग नोंदवून एक आदर्श निर्माण केला आहे.कॅशलेस व्यवहार
सर्वांनीच करावा, असे आवाहन करुन कॅशलेस इकॉनॉमीचे महत्वही पटवून दिले.
महाराष्ट्र
डिजिधन जनजागृती कार्यक्रमात प्रथम आलेल्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर
महाविद्यालय,कळंब,द्वितीय छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व तृतीय विशेष
पारितोषिक रामकृष्ण परमहंस विद्यालय/महाविद्यालय,उस्मानाबाद यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र
देवून गौरविण्यात आले.तसेच या स्पर्धेत उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थीनीचा
प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र डिजिधन जनजागृती कार्यक्रमात सहभागी
झालेल्या प्रतिक गायकवाड,नितीन जोशी कुमारी
ऋतुजा घोगरे,अंजली देशमुख आणि अंकिता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. Thursday, 8 June 2017
पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टय तातडीने पूर्ण करा -पालकमंत्री दिवाकर रावते
उस्मानाबाद,दि.8:- राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना
खरीप हंगाम पीककर्जाचे वाटप करून उदिष्ट तातडीने पूर्ण करावे,असे स्पष्ट निर्देश
परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री
दिवाकर रावते यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री.रावते यांचे अध्यक्षतेखाली खरीप हंगाम
पीककर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी
ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्सव्यवसाय मंत्री तथा
सहपालकमंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी
अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी
सुनिल यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली
सातपुते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय
अधिकारी चेतन गिराशे, कृषी विकास अधिकारी श्री.खोत, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी
अधिकारी शिरीष जमदाडे,अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री.विजयकर आदीसह जिल्हा
सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.
यावेळी
पालकमंत्री श्री.रावते पुढे बोलताना म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
अडचणीत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्जाचे
वाटप करावे यासाठी जिल्हा उपनिबंधक यांनी राष्ट्रीयकृत बँकेशी समन्वय साधून
पीककर्ज वाटपाचे उदिष्ट साध्य करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी
उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटप व उदिष्टांबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांनी खरीप हंगाम पीककर्ज वाटप आढावा बैठकीत बोलताना म्हणाले की,
जिल्हयातील प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेने आपल्या बँकेत पीककर्जाबाबत फलक लावून, एक
खिडकी योजना सुरु करुन कर्ज वाटप सुरु करावे व आपल्या बँकेने केलेल्या कामाचा
अहवाल फोटोसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा,असे सूचित केले.
जिल्हयाच्या विकासात्मक कामासाठी काटेकोरपणे नियोजन करा -पालकमंत्री दिवाकर रावते
उस्मानाबाद,दि.8:- जिल्हयात विकासात्मक कामे करण्यासाठी
काटेकोरपणे नियोजन करुन सर्वांनी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता
घ्यावी, अशा सूचना परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 च्या नियोजना
संदर्भात जिल्हातील सर्व यंत्रणेच्या विभागप्रमुखासमवेत आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी पालकमंत्री रावते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्सव्यवसाय
मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर
जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी
उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका
डॉ.रूपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय
अधिकारी चेतन गिराशे, कृषी विकास अधिकारी श्री.खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी
अभियंता शिवाजी थोरात,जिल्हा कृषी अधिक्षक
कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा नियोजन
अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदिंची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी
रावते पुढे बोलताना म्हणाले की, जिल्हयातील विकासकामांना सर्व यंत्रणांनी अधिक गती
देवून जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा काटेकोर विनियोग करावा, कामे गुणवत्तपूर्ण व
दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी, केलेल्या कामांची तपासणी करण्यात
येईल.कामाची प्रशासकीय मान्यता वेळेत
व्हावी यासाठी पाठपुरावा करा,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
झालेल्या
कामांचा,चालू असलेल्या कामांचा मी स्वत: आणि सहपालकमंत्री श्री.जानकर हे वेळोवेळी
परीक्षण करतील,असेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये विशेषत: जलयुक्त शिवारची कामे
आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची पाहणी स्वत: सहपालकमंत्री महादेव
जानकर हे त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून करणार आहेत. जिल्हयाच्या विकासाची
जबाबदारी पालकमंत्र्याची असल्याने त्यासाठी अतिरिक्त निधी आणण्यासाठी ज्या आवश्यक
गरजा आहेत त्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करा यासाठी मी स्वत: व्यक्तिश:अर्थमंत्र्याकडून
अतिरिक्त निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी पाठपुरावा करीन, असेही यावेळी पालकमंत्री
श्री.रावते यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने
कामे करत असताना ज्या मूलभूत गरजा आहेत त्याला प्रथम प्राधान्य दयावे, जनसुविधा योजनेतून
जास्तीत जास्त शेडची उभारणी करावी, जिल्हयाच्या विकासात्मक कामांची नवीन यादी तयार
करावी, वृक्षलागवड करताना वड,पिंपळाची झाडे ही पडजमीन,स्मशानभूमी येथे लावावीत, व्यायाम शाळेसाठी निधी देताना तो प्राधान्याने शाळा
महाविद्यालयालाच दयावा, स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी करण्यासाठी एक एक गाव शंभर
टक्के शौचालय बांधून पूर्ण करा, नागरिकांच्या मूलभूत गरजा नियोजनबध्द लवकरात लवकर
पूर्ण व्हाव्यात यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत,अशा सूचना
यावेळी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री.रावते यांनी केल्या.
या बैठकीत
जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी
सन 2017-18 च्या जिल्हा वार्षिक योजनेचे
सादरीकरण केले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नरेगा मधून
ग्रामपंचायतचे बांधकामाचे प्रस्ताव तयार करुन त्यातून ग्रामपंचायत कार्यालयाचे
बांधकाम करावे व नियोजन तयार करुन कामे
करावीत अशी सूचना केली. यावेळी पालकमंत्री श्री.रावते यांनी जिल्हा वार्षिक योजना
सन 2017-18 च्या निधी व त्याचे खर्चाचे नियोजन याचा आढावा विविध विभागांच्या उपस्थित
अधिकाऱ्यांकडून घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हानियोजन अधिकारी सुधाकर आडे
यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
Wednesday, 7 June 2017
जिल्हातील माजी सैनिक/विधवांना नोकरीची संधी
उस्मानाबाद दि.7:- जिल्हयातील गरजू माजी सैनिक/विधवासाठी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय उस्मानाबाद यांच्या अधिपत्याखाली असलेले सैनिकी मुलांचे वसतिगृहामध्ये
कंत्राटी पध्दतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात (रोजंदरी) माजी सैनिक/विधवा
संवर्गातून सहायक अधीक्षक (पुरुष), स्वयंपाकी (पुरुष/स्त्री), सफाईवाला
(पुरुष/स्त्री) या पदांची भरती करावयाची आहे.
इच्छुक व गरजू माजी सैनिक/माजी सैनिक विधवा तसेच इतर नागरिकांनी
दि.15 जून 2017 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद येथे अर्ज सादर
करावेत,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन श्री. सु.मो.गोडबोले यांनी
कळविले आहेराष्ट्रीय बाल कल्याण,राजीव गांधी मानवसेवा व विशेष नैपुण्य पुरस्कारासाठी 20 जून पर्यंत अर्ज करावेत
उस्मानाबाद दि.7:- राष्ट्रीय बाल
कल्याण पुरस्कार सन 2016, राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार सन 2017 व विशेष नैपुण्य पुरस्कार 2017 करिता नामांकनासाठी
दि.20 जून 2017 पर्यंत आवश्यक त्या
कागदपत्रासह अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी
केले आहे.
या पुरस्काराचे नियमावली व निकष केंद्रशासनाच्या www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.तरी
इच्छुक व्यक्तीनी व संस्थानी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालय
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळ मजला रुम नंबर 10 उस्मानाबाद येथे दि.20 जून 2017
पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी श्री.आर.जी.बांगर यांनी केले आहे.
सहपालकमंत्री महादेव जानकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद.दि.7:-राज्याचे
पशुसंवर्धन,दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री उस्मानाबाद महादेव
जानकर हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील
प्रमाणे राहील-
गुरुवार दि.
8 जून 2017 रोजी पहाटे 4.40 वाजता उस्मानाबाद रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने
शासकीय विश्रामगृह उस्मानाबादकडे प्रयाण.सकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह
उस्मानबाद येथे आगमन व राखीव.सकाळी 9.40 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानबाद येथून
शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण.
सकाळी 10.00 वाजता जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 व
2016-17 बाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात.दुपारी 4.10 वाजता शासकीय
विश्रामगृह उस्मानाबादकडे प्रयाण.दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद
येथे आगमन व राखीव. 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथून शासकीय मोटारीने जिल्हा
औरंगाबादकडे प्रयाण.पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद
दि.7:- राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम
हे दि. 11 व 12 जून 2017 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील
प्रमाणे राहील.
रविवार
दि. 11 जून 2017 रोजी दुपारी
2 वाजता लातूर येथून शासकीय वाहनाने उस्मानाबादकडे प्रयाण.दुपारी 3 वाजता शासकीय
विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी
3.15 वाजता उस्मानाबाद जिल्हा प्रमुख अनिल
खोचरे (प्रभारी) यांचे समवेत चर्चेसाठी
राखीव. (विधानसभा-
उमरगा, तुळजापूर,उस्मानाबाद,परंडा). सायंकाळी 7 नंतर शासकीय वाहनाने श्री देवी
क्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन व पूजा विधी. रात्री शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे मुक्काम.सोमवार दि.12
जून 2017 रोजी पहाटे 6 वाजता श्री देवी क्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे
दर्शन व पूजा विधी. सकाळी 7.30 वाजता शासकीय वाहनाने बीड जिल्ह्याकडे प्रयाण
करतील.
Subscribe to:
Posts (Atom)