Wednesday, 7 June 2017

राष्ट्रीय बाल कल्याण,राजीव गांधी मानवसेवा व विशेष नैपुण्य पुरस्कारासाठी 20 जून पर्यंत अर्ज करावेत


उस्मानाबाद दि.7:- राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार सन 2016, राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार सन 2017  व विशेष नैपुण्य पुरस्कार 2017 करिता नामांकनासाठी  दि.20 जून 2017 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

या पुरस्काराचे नियमावली व निकष केंद्रशासनाच्या www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.तरी इच्छुक व्यक्तीनी व संस्थानी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळ मजला रुम नंबर 10 उस्मानाबाद येथे दि.20 जून 2017 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.आर.जी.बांगर यांनी केले आहे.