Wednesday, 7 June 2017

जिल्हातील माजी सैनिक/विधवांना नोकरीची संधी


उस्मानाबाद दि.7:- जिल्हयातील गरजू माजी सैनिक/विधवासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय उस्मानाबाद यांच्या अधिपत्याखाली असलेले सैनिकी मुलांचे वसतिगृहामध्ये कंत्राटी पध्दतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात (रोजंदरी) माजी सैनिक/विधवा संवर्गातून सहायक अधीक्षक (पुरुष), स्वयंपाकी (पुरुष/स्त्री), सफाईवाला (पुरुष/स्त्री) या पदांची भरती करावयाची आहे.
इच्छुक व गरजू माजी सैनिक/माजी सैनिक विधवा तसेच इतर नागरिकांनी दि.15 जून 2017 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद येथे अर्ज सादर करावेत,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन श्री. सु.मो.गोडबोले यांनी कळविले आहे