Friday, 29 September 2017

नवरात्रौत्सवाकरिता नऊ दिवस भाविकांची अलोट गर्दी शासन यंत्रणांचे यशस्वी नियोजन व समन्वय

शारदीय नवरात्र महोत्सव-2017

        उस्मानाबाद,दि. 30:महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शक्तीदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव तुळजापूर येथे गुरुवार दि. 21 सप्टेंबर रोजी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारिक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी  करण्यात आले.
          यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाची मुख्य पूजा पार पडली. त्यानंतर घटकलशांची पारंपरिक पध्दतीने पूजा करण्यात आली आणि गोमुख तीर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ती या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि त्यांच्या पत्नी सौ. भारती गमे यांच्या हस्ते  घटस्थापना करण्यात  आली.  यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या  दिवशी देवीची नित्योपचार  पूजा करण्यात आली.
चौथ्या माळेच्या दिवशी श्रीतुळजाभवानी देवीजींची ललित पंचमीनिमित्त नित्योपचार पूजा झाल्यानंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.
          ललित पंचमीनिमित्त रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.   
             मंगळवारी पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात आली होती.
श्री तुळजाभवानीची सहाव्या दिवशी नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेषशय्येवर विश्राम घेत असताना मातेने नेत्रकमळात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यांची नावे शुंभ व निशुंभ होती, ते उत्पन्न होताच शेषशय्येवर विष्णूवर आक्रमण करण्यासाठी जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी  विष्णूच्या नेत्रकमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले व विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी  मातेने केला, म्हणून विष्णूने आपली शेषशय्या श्रीस विश्राम करण्यासाठी दिली. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
सातव्या दिवशी म्हणजे बुधवारी दि. 27 सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी  मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आशिर्वाद  दिला होता, म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, अशी ही अवतार पूजा मांडण्यात आली होती.
आठव्या दिवशी म्हणजे गुरुवारी दि. 28 सप्टेंबर रोजी श्रीतुळजाभवानी देवीची महिषासूरमर्दिनी अंलकार पूजा मांडण्यात आली. त्यानंतर रात्री पूर्णाहूतीही देण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दि. 29 सप्टेंबर रोजी नगरच्या पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात आली, शनिवार दि. 30 सप्टेंबर रोजी श्रीदेवीजींची शिबिकारोहण, शमीपूजन आणि सार्वत्रिक सीमोल्लंघन मिरवणूक काढण्यात आली.
सीमोल्लंघनानंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. यावेळी देवीच्या मुर्तीला इजा होऊ नये म्हणून 108 साडया परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी श्रीदेवीजींची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले. यावेळी सर्व भाविकांनी कूंकू व फुलांची उधळण करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
शेवटी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तमाम उस्मानाबादवासियांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
         
शासनाच्या विविध विभागांनी घेतली भाविकांची विविध प्रकारे काळजी
नवरात्र महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन,  मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसिल कार्यालय यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ, आपत्कालीन विभाग आदि विभागांनी भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.
जिल्हा प्रशासन :-
जिल्हा प्रशासन आणि  मंदिर संस्थान यांच्या मार्गदशर्नाखाली सर्व विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  या यात्रेकरिता आलेल्या  भाविकांना उत्तम प्रकारे  सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या. जिल्हा सूचना –विज्ञान केंद्राच्या  ऑनलाईन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने जिल्ह्याच्या संकेतस्थळावरुन जनतेसाठी विविध विभागाच्या ऑनलाईन सेवा पुरविण्यात जिल्हा प्रशासनाने एन. आय. सी. मार्फत  महत्वाचा  वाटा उचला, नवरात्र महोत्सवात बहुतांशी भाविकांना घरबसल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी http://osmanabad.nic.in या संकेतस्थळावर ई-लाईव्ह दर्शन ही सुविधा पुरविण्यात आली. याशिवाय यावर्षी भाविकांना सुलभ दर्शनासाठी बायोमॅट्रीक पध्दतीने पासेस देऊन प्रथमच अशा प्रवेश पध्दतीचा अवलंब करण्यात आला.
पोलीस विभाग :-
नवरात्रौत्सवाच्या  निमित्ताने  देशातील  दहशतवादी  घटनांच्या  पार्श्वभूमीवर  पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख यांच्या देखरेखीखाली   श्री  तुळजाभवानीच्या  मंदिरात  कडेकोट  सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. देवीच्या  दर्शनासाठी  25 लाखांपेक्षा  जास्त भाविकांची  संख्या ग्राह्य  धरुन  प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्यापूर्वी 15 दिवसांपासून चोख पोलीस  बंदोबस्त  तैनात  करण्यात  आला होता. सुरक्षेकरिता बॉम्बशोधक पथकही सज्ज होते. वृध्द, अपंग  भाविकांना  पोलीस कर्मचारी विशेष मदत करीत होते. साधारणत: 2 हजार  पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची या ठिकाणी  नेमणूक  करण्यात आली होती. येणाऱ्या व जाणाऱ्या  प्रत्येक भाविकांवर  प्रत्यक्ष  पोलिसांकडून,  सामान्य  वेषातील पोलिसांकडून तसेच  सीसीटीव्हीमधून  बारकाईने  लक्ष दिले जात होते. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, यातच जिल्हा व पोलीस प्रशासनाचे यश आहे.
          या यात्रेच्या निमित्ताने महाद्वारासमोर उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने  पोलीस दलातील समाज व मन परिवर्तनात्मक निवडक छायाचित्रांचे अप्रतिम असे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.  
आरोग्य विभाग :-
महाराष्ट्रासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने  त्यांच्याकरिता तात्काळ आरोग्यसेवा पुरविण्यात आली होती. गर्दीत काही अघटित घटना  घडल्यास  जखमी व्यक्तीला तात्काळ  आरोग्य  सेवा मिळावी  या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे भाविकांच्या सेवेसाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकूण 14 प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आली होती.
एस.टी.महामंडळ:-
या केंद्रांसाठी शहरी भागासाठी वैद्यकीय अधिकारी,  आरोग्य कर्मचारी, चार 108 क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 13 सप्टेंबर ते 30 सप्टेबर 2017 या कालावधीत मोठया संख्येने ज्यादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
नवरात्रौत्सव काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एस.टी. महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाकडून 125, बीड विभागाकडून 10, परभणी विभागाकडून 10, लातूर विभागाकडून 10, कर्नाटक  राज्याकडून 325  ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.  
नगरपालिका:-
नगरपालिकेने या यात्रा महोत्सव काळात विविध कामांचे  नेटके नियोजन केले. सफाई विभागात-07 टॅक्ट्रर, 1 टिप्पर, 10 टमटम, सफाई मजूर (स्थाई)-22 व ठेका यांच्याकडील एकूण 300 मजूर, लातूर रोड, उस्मानाबाद रोड, घाटशीळ रोड पार्किंग, आराधवाडी, नळदुर्ग रोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली, मोबाईल टॉयलेट-12, तसेच 200 टॉयलेट यात्रा कालावधीत ठेवण्यात आले ठेवण्यात आले होते, फॉगिंग मशिन-3, मंदिरामागील आराधवाडी भागातील 70 ते 80 ट्रिप कचरा उचलण्यात आला होता व आवश्यकतेनुसार जंतूनाशके शहरात विविध ठिकाणी वापरण्यात आली होती. शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाडयात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नगरपालिकेकडून एकूण 8 प्रथमोपचार केंद्रे निश्चित करण्यात आली होती. भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून महाद्वारासमोर मोफत आरओ वॉटरची सुविधा देण्यात आली तसेच शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत होता. उस्मानाबाद रोड हायवे रोडवरील पथदिवे संपूर्ण दुरुस्त करुन चालू करण्यात आले होते. शहरात आवश्यक ठिकाणी हॅलोजन लावून विद्युत व्यवस्था करण्यात आली होती. अग्निशमन विभागाकडून 4 वाहनांची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती.
आपत्ती व्यवस्थापन विभाग :-
 जनतेला आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता शांत राहावे, गडबड गोंधळ करू नये,सैरावैरा  पळायला लागू नये, प्रशासन करीत असलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. तर आपत्ती व्यवस्थापनासंबंधी काम करणाऱ्या अधिकारी  कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की, आपत्ती व्यवस्थापन साखळीतील लहानापासून मोठया सर्व घटकांनी, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अत्यंत तत्परतेने आपआपली भूमिका चोख बजावावी, एकमेकांशी  योग्य तो समन्वय राखून आपले कर्तव्य बजावावे,शेवटी  भाविकांची सुरक्षा ही आपली सर्वांत प्रथम जबाबदारी आहे.
 या विभागाकडून घेण्यात आलेल्या मॉक ड्रीलमुळे निश्चितच जिल्हा  प्रशासन,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी, मंदीर व्यवस्थापनाचे सुरक्षारक्षक हे कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यास, यात्रेनिमित्त  येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेकरिता सर्व प्रकारे सज्ज असल्याचे सिध्द झाले होते.
जिल्हा माहिती कार्यालय :-
या कार्यालयाकडून पत्रकारांसाठी स्वतंत्र मिडीया कक्ष स्थापन करण्यात आला व या माध्यमातून दररोज श्री देवीजींच्या  बातम्या व छायाचित्रे प्रसारमाध्यमांना त्यांच्या मागणीनुसार पुरविण्यात आल्या, तसेच सोशल मिडियावरही सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. नवरात्र महोत्सवासंबंधीच्या बातम्या व छायाचित्रे  महान्यूज या शासकीय वेबपोर्टलवरही प्रसारित  करण्यात आल्या. प्रत्येक दिवशीच्या विधीची तसेच दररोज नवरात्र महोत्सवाच्या नियोजनात सहभागी असलेल्या एका शासकीय विभागाची व्हिडीओ क्लिप तयार करुन यूटयूब चॅनल व सोशल मिडीयावर सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आली.

            या वर्षी प्रथमच दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवर घटस्थापनेचे, वैदिक होमहवन आणि सीमोल्लंघनाचेही थेट प्रक्षेपण दि. 21 सप्टेंबर, दि. 28 सप्टेंबर व दि. 30 सप्टेंबर रोजी करण्यात आले, याचाही लाभ अनेक भाविकांनी घेतला.  

तुळजापूर मंदिरात सीमोल्लंघनाचा सोहळा जल्लोषात संपन्न

                               शारदीय नवरात्र महोत्सव-2017





उस्मानाबाद. दि.30:- श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा व आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली. मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व विधी  करण्यात आले. तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघनानंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. यावेळी देवीच्या मुर्तीला इजा होऊ नये म्हणून 108 साडया परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी श्रीदेवीजींची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले. यावेळी सर्व भाविकांनी कूंकू व फुलांची उधळण करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला. 

Thursday, 28 September 2017

वैदिक होमहवनास विधीवत पूर्णाहुती




          उस्मानाबाद.दि.28:- शारदीय नवरात्र महोत्सवात आज गुरुवारी श्री तुळजाभवानी मंदिरात  वैदिक होमहवन कार्यक्रम झाला. या सर्व धार्मिक विधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि त्यांच्या पत्नी सौ.भारती गमे  यांनी पूर्ण केले. विधीवत पूजेनंतर या होमास पूर्णाहुती देण्यात आली. सप्तपदीपाठ करुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहुती देण्याची प्रथा आहे त्यानुसार सर्व विधी पार पाडण्यात आले.
          यावेळी सुनिल गणेश पाठक (सरकारी), ऋषिकेश दादेगावकर,अनंताचार्य कांबळे, नागेश अम्बुलगे, राजन पद्माकर पाठक, सुमेद सुनिल पाठक, धनंजय सुधाकर पाठक, विश्वनाथ ढोले, अशोक घाडगे, विश्वनाथ राजाराम प्रयाग, मकरंद कमलाकर प्रयाग, भालचंद्र रामचंद्र पाठक, श्रीराम अपशिंगेकर, किशोर दासराव कुलकर्णी, बाळासाहेब दीक्षीत, गजानन भानूदास लसणे, मंगेश नारायण घंटे, सिलोत्तम जेवळीकर, गिरीष देवळालकर, बाळासाहेब कराडे, बाळासाहेब श्यामराज, सुनिल दुर्गादास लसणे, सुरेश लक्ष्मण पाठक, अशोक पाठक, प्रल्हाद पैठणकर यांनी मंत्रोचारात हे सर्व विधी पूर्ण करून केले. यावेळी बहुसंख्य ब्रम्हवृंद ही उपस्थित होते.

शारदीय नवरात्र महोत्सवात आज गुरुवारी श्री तुळजाभवानी मंदिरात वैदिक होमहव...

शारदीय नवरात्र महोत्सव 2017 - Food & Drug Department

शारदीय नवरात्र महोत्सव-2017- Nagar Parishad Tuljapur work

श्री तुळजाभवानी देवीजींची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा

शारदीय नवरात्र महोत्सव-2017
       


          उस्मानाबाद,दि.28: शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापूरात श्री तुळजाभवानी देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. शेवटची माळ असल्याने भाविकांनी दर्शनासाठी आणि  देवीचे व महिषासूराचे रुप पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. 
          श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासूराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला. साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता ही सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासूराचा वध केला व सर्व देवतांना स्वर्गप्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते,अशी आख्यायिका सांगितली जाते. 
भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे,पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, व्यवस्थापक (प्रशासन)  सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

          दरम्यान काल रात्री दि.27 सप्टेंबर रोजी श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या शुक्रवार (दि.29 सप्टेंबर) रोजी श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक हे विधी करण्यात येणार आहेत.

Wednesday, 27 September 2017

आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियानांतर्गत रॅली संपन्न


उस्मानाबाद,दि.27:- महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियानानिमित्त जिल्हाधिकारी  तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे आयोजन सकाळी 9.30 वाजता शहरातील बार्शी नाका येथून निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते  हिरवा झेंडा  दाखवून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला.
शासनाच्या सूचनेनुसार दि. 27 सप्टेंबर 2017 रोजी आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच लोकजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस विभागाच्या वतीने शांताराम वाघमोडे राखीव पोलीस दल यांच्या सहकार्याने वज्रवाहन, दंगल नियंत्रक पथक, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एकनाथ माले व कर्मचारी प्रशिक्षणार्थी, शरद पवार हायस्कूल, समता विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, नगर परिषदेचे अग्निक्षमन दल वाहन व कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक आदीसह खेळाडू या रॅलीत सहभागी झाले होते.

या रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली, यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजनाबाबत माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानले.

श्री तुळजाभवानी देवीजींची भवानी तलवार अलंकार महापूजा

                         शारदीय नवरात्र महोत्सव-2017


          उस्मानाबाद,दि.27:- शारदीय नवरात्र महोत्सवात बुधवार (दि.27 सप्टेंबर) सातव्या दिवशी तुळजापूरात श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्य व परराज्यातील चालत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. प्रशासनाच्या चोख व्यवस्थापनामुळे भाविकांना कोणताही त्रास न  होता चांगल्या पद्धतीने दर्शन घेता येत आहे.
          श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार  अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी  मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आशिर्वाद  दिला होता,म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते. 
भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, व्यवस्थापक (प्रशासन)  सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

          दरम्यान काल रात्री दि.26 सप्टेंबर रोजी श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या गुरुवार (दि.28 सप्टेंबर) रोजी श्री तुळजाभवानी देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. 

Tuesday, 26 September 2017

Shri tuljabhavani shesh shahi puja

श्री तुळजाभवानी देवीजींचे शेषशाही अलंकार महापूजा

शारदीय नवरात्र महोत्सव-2017



          उस्मानाबाद,दि.26:- शारदीय नवरात्र महोत्सवात मंगळवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.  श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
            श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेषशय्येवर विश्राम घेत असताना मातेने नेत्रकमळात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यांची नावे शुंभ व निशुंभ होती, ते उत्पन्न होताच शेषशय्येवर विष्णूवर आक्रमण करण्यासाठी जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी  विष्णूच्या नेत्रकमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले व विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी  मातेने केला, म्हणून विष्णूने आपली शेषशय्या श्रीस विश्राम करण्यासाठी दिली. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते,अशी आख्यायिका सांगितली जाते.
भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, व्यवस्थापक (प्रशासन) सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान काल रात्री दि.25 सप्टेंबर रोजी श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या दि. 27 रोजी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.           

Monday, 25 September 2017

जलयुक्त शिवार अभियान उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ठरतेय वरदान



    दुष्काळ व टंचाई निवारणार्थ  महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसाठ्याबरोबरच भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. या कामामुळे विहिरीच्या पाणीसाठयात 3 ते 3.50 मीटरने सरासरी वाढ झाली आहे.
                    शासनाने दुष्काळ व टंचाई निवारणार्थ  जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानाची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडवून ते पाणी जमिनीत जिरव‌िणे आणि भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या  तीनवर्षेपुर्ती निमित्त जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामाचा थोडक्यात घेतलेला आढावा या लेखा द्वारे पाहू…..
          या अभियानातून सन 2015-16 या वर्षी जिल्ह्यातील 217 गावांची निवड करण्यात आली. या गावात अभियानाच्या माध्यमातून जल संधारणाची कामे करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिल्याच वर्षी या अभियानाअंतर्गत 21025 कामे हाती घेण्यात आली. सन 2015-16 मध्ये करण्यात आलेल्या कामावर 86.54 कोटी रुपये खर्च करुन यामध्ये हाती घेण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली. यात मोठयाप्रमाणात लोकसहभागातून देखील कामे करण्यात आली आहेत
         सन 2016-17 या वर्षात राज्य सरकारने  जलयुक्त शिवार अभियानासाठी राज्यातून 5 हजार 281 गावांची निवड केली. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 191  गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये  16 हजार 795 कामे प्रस्तावित करण्यात आली. निवडलेल्या सर्व गावात कामे सुरु करण्यात आली असून यातील 9 हजार 800 कामे पूर्ण झाली आहेत तर प्रगतीपथावर 4 हजार 73 कामे आहेत. प्रगतीपथावरील व पूर्ण कामांची संख्या 13 हजार 873 इतकी आहे. या अभियानांतर्गत दि. 7 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत शासकीय यंत्रणा व लोकसहभागातून 14.73 लाख घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. सन 2016-17 या वर्षातील कामावर आतापर्यंत 74.56 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामे 2 हजार 922 आहेत. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवडलेल्या गावातील प्रकल्प आराखडयानुसार 26 गावातील कामे शंभर टक्केपूर्ण झाली आहेत तर 71 गावातील कामे ऐंशी टक्केपूर्ण झाली असून 94 गावातील कामे 50 टक्केपर्यंतपूर्ण झाली आहेत. याकामामुळे 9544.57 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे. सद्यस्थितीत या कामामुळे 6565.30 टीसीएम पाणी साठा झाला आहे.
          सन 2017-18 मध्ये या अभियानांतर्गत  जिल्ह्यातील 178 गावांची निवड करण्यात आली असून यात 10 हजार 579 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामाच्या प्रकल्प आराखडयास 2 ऑक्टोबर 2017 रोजीच्या ग्रामसभेच्या मान्यतेनंतर तालुका व जिल्हास्तरीय समितीची मान्यता, सक्षम अधिकाऱ्याची प्रशासकीय मान्यता व त्यानंतर निविदा प्रक्रिया करणे व कार्यारंभ आदेश देवून कामे सुरु करण्यात येणार आहेत.
          जलयुक्त शिवारामधील जलसंवर्धनाच्या कामात कंपार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांध, नाला सरळीकरण व खोलीकरण, सिमेंट नाला, नदी नाले पाझर तलाव व ओढ्यामधील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, शेततळी आदी कामांचा समावेश आहे. या कामांमध्ये यंदाच्या वर्षी सप्टेंबरअखेर चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. याचा परिणाम भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यात झाला आहे.
          गेल्या अनेक वर्षांपासून कोरडेठाक असणारे बोअर, विहिरी जलयुक्तच्या कामामुळे पाण्याने भरल्या आहेत. बोअरला मुबलक पाणी येऊ लागले आहे. जलयुक्त शिवाराच्या कामामुळे भूगर्भातील पाणीपातळी तर वाढली; पण त्याचबरोबर नदी, नाले, नवीन सिमेंट बंधारे यामध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने जिल्ह्यातील पाणी साठ्यातही भरीव वाढ झाली आहे.
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 3 हजार 700 शेततळयाचे उदिष्ट देण्यात आले होते त्यापैकी 2 हजार 224 शेततळे पूर्ण झाली असून चालू असलेली शेततळेचे कामांची संख्या 462 आहे, यामध्ये अनुदान अदायगी केलेल्या शेततळयांची संख्या 1 हजार 472 इतकी आहे, यासाठी 596.15 लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे.  
          मागेल त्याला शेततळे ऑनलाईन योजनेद्वारे 6 हजार 496 अर्ज प्राप्त झाले असून 1 हजार 96 कामांना कार्यरंभ आदेश देण्यात आले आसून त्यापैकी 447 शेततळयाची कामे पूर्ण झाली आहेत.

                                                     मनोज शिवाजी सानप
                                                          जिल्हा माहिती अधिकारी,

                                                               उस्मानाबाद.

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक क्षेत्रापुरती स्थानिक सुट्टी


उस्मानाबाद,दि.25:- उमरगा तालुक्यातील मौजे आनंदनगर या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची निवडणूक होत असून काही तांत्रिक कारणामुळे दि. 23 सप्टेंबर 2017 रोजी होणारे मतदान दि.26 सप्टेंबर 2017 रोजी होणार असल्याने तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता (01) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रापुरती दि. 26 सप्टेंबर 2017 रोजी  स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
          त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील माहे नोव्हेंबर -2017 मध्ये मुदती संपणाऱ्या 165 ग्रामपंचायतीसाठी दि.7 ऑक्टोबर 2017 रोजी होणारे मतदान दि.16 ऑक्टोबर 2017 रोजी होणार असल्याने दि.7 ऑक्टोबर 2017 रोजी जाहीर केलेली सुट्टी रध्द करुन दि.16 ऑक्टोबर 2017 रोजी देण्यात आली आहे.

दि.26 सप्टेंबर 2017 व दि.16 ऑक्टोबर 2017 या दोन दिवशी जाहीर केलेली स्थानिक सुट्टी फक्त ज्या ग्रामपंचायतीची सर्वात्रिक निवडणुक आहे त्याच ग्रामपंचायतीच्या हाध्दीत मर्यादीत राहील, असे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी कळविले आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती. मात्र विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन मिळत आहे.

श्री तुळजाभवानी देवीजींचे मुरली अलंकार महापूजेकरिता भाविकांची प्रचंड गर्दी




          उस्मानाबाद, दि.25:- शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती. मात्र विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन मिळत आहे.
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री देवीजींचे या रुपातील दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. चौथ्या माळेपासून  विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे.         भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, व्यवस्थापक (प्रशासन)  सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. दरम्यान काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या (दि.26) श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. 

Sunday, 24 September 2017

श्री. तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची चौथी माळ

नवरात्रौ महोत्सवात नगरपालिकेचे चोख व्यवस्थापन


          उस्मानाबाद, दि.24: शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभापासून  नगर पालिका प्रशासनाकडून  नियोजनात्मक आराखडयानुसार जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान अध्यक्ष        श्री. राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली  नगरपालिका प्रशासनाने चोख व्यवस्थापन केले आहे. नवरात्र महोत्सवात भाविकांनी मोठी गर्दी होणार असल्याने भाविकांच्या सेवेसाठी न.प.कर्मचारी रात्रंदिवस सेवा करीत आहेत. नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष पंडीत जगदाळे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी तुळजापूर शहर आणि मंदिर परिसर  येथे सतत लक्ष ठेवून आहेत.
          नगरपालिकेने या यात्रा महोत्सव काळात विविध कामांचे नियोजन केले असून  सफाई विभाग नगरपालिकांचे कर्मचारी सतत कार्यरत आहेत. लातूर रोड,वेताळ ते बारालिंग रोड, उस्मानाबाद रोड, घाटशीळ रोड पार्कींग,मोबाईल टॉयलेट,फॉगींग मशीन,मंदीर मागील आराधवाडी भागातील कचरा उचलण्यात आला असून आवश्यतेनुसार जंतुनाशके शहरात विविध ठिकाणी वापरण्यात येत आहेत. नगरपालिकांकडून भवानी मंदिर परिसर,पावणारा गणपती, घाटशीळ रोड पार्कींग, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक( लातूर रोड) आणि बाबजी अड्डा या ठिकाणी प्रथमोपचार केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.
          नगरपालिकेकडून यात्रेकरु भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणी पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहरातील विविध कुंड, विहीरी इत्यादी पाणीसाठे ब्लिचींग पावडरचा योग्य मात्रा निर्जंतुकीकरण केले आहे. शहरातील हॉटेल व्यावसायिकाचे नमुने पाणी तपासणीची सोय केली आहे. पाणपोई व प्रशासकीय यंत्रणेकरीता पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
          उस्मानाबाद रोड हायवे रोडवरील पथदिवे संपूर्ण दुरुस्त करुन चालू करण्यात आले आहेत. यात्रा कालावधीमध्ये शहरात आवश्यक ठिकाणी हॅलोजन लावून विद्यूत व्यवस्था करण्यात आली आहे. भवानी मंदिरासमोर, घाटशीळ रोड पार्कींग, आराधवाडी व पोलीस स्टेशन या ठिकाणी अग्निशमन विभागाकडून 4 वाहनांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच प्राधिकरणाकडून दीपक चौक ते आंबेडकर चौक, शिवाजी चौक आदि ठिकाणची अतिक्रमणे काढली आहेत. महाद्वार रोड ते कमानवेस पॅचवर्कचे काम पूर्ण केले आहे. तसेच अग्रवाल बिल्डींग ते आर्य चौक पॅच वर्क चे काम पूर्ण झाले आहे.
          शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली आहेत. तसेच  शहरातील प्रमुख ठिकाणी बॅरेकेटींग,स्वागत कमानी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरात भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता नगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे. 

श्री तुळजाभवानीच्या छबिन्यास भाविकांची गर्दी देवीजींची रथ अलंकार महापूजा





         उस्मानाबाद,दि.24:- तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची शनिवारी नित्योपचार पूजा करण्यात आली. आज रविवार असल्यामुळे देवीजींची नित्योपचार झाल्यानंतर विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.
        दररोज श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जात आहेत.  श्री तुळजाभवानी देवींच्या विविध अलंकार पूजेस आजपासून (दि.24) पासून सुरुवात होणार आहे.  यात, दि.24 रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 25 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 26 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 27 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 28 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (शनिवारी) रात्री 10 वाजता  भाविकांच्या अपार उत्साहात श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
            भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देऊन देवीने रथातून येऊन भक्तांचे संकट निवारण केले होते, त्यामुळे या रथ अलंकार महापूजेला विशेष महत्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या देवीच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. 

जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची मीडीया कक्षास भेट



उस्मानाबाद, दि. 22: श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात स्थापित मिडीया कक्षास जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन प्रसारमाध्यमांना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली. प्रसारमाध्यमांना मंदिरातील कार्यक्रम व विधीची माहिती कक्षाद्वारे पुरविण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येत असून शारदीय नवरात्र महोत्सवाला अधिकाधिक सकारात्मक प्रसिध्दी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रसारमाध्यम प्रतिनिधींना केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, मंदिर संस्थानचे तहसीलदार सुनिल पवार, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी भिमा पडवळ, आयुब पठाण, अनिल वाघमारे, सचिन मोरे  यांची उपस्थिती होती.