उस्मानाबाद,दि.4:-
सन 2016-17 लातूर जिल्हयातील या विभागांतर्गत मोठे, मध्यम, लघु प्रकल्प, साठवण तलाव
को.प.ब. लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामामधील पिकांना पाणी देण्यासंबंधी प्रकल्पातील
पाणीसाठा उपलब्धतेनुसार प्रकल्पीय पीक रचनेनुसार पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले
असल्याचे लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे .
संबंधित
प्रकल्पातील व प्रकल्पीय पीक रचना व प्रकल्पनिहाय देण्यात येणाऱ्या पाणीपातळी
कार्यक्रमासंबंधी कार्यालयास उपलब्ध करून दिला आहे. उपलब्ध साठ्यापैकी पिण्यासाठी,
वापरासाठी प्राधान्याने आरक्षित केलेला पाणीसाठा वगळता उर्वरित पाणीसाठा
सिंचनासाठी वापरला जाईल.
सर्व
लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना नं.7 व 7-अ शासनाने सुधारित केलेल्या नमुन्यात संबंधित
शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात दि.30 नोव्हेंबरपर्यत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत
सादर करावेत. कमी पाण्यात येणारी रब्बी हंगामी पिके व लाभक्षेत्रातील प्रवाही वरील
उभा ऊस (हंगामी मंजूर) कालावधी दि.15 ऑक्टोंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 असा आहे.
नियम व अटी पुढीलप्रमाणे राहतील- ज्या
जमिनीसाठी पाणी मागणी करावयाची आहे त्या जमिनीचा मालक अथवा सामाईक मालक असला
पाहिजे,
ज्या मुदतीसाठी
पाणी दयावयाचे आहे त्या कालावधीत ती जमीन त्याच्या वहिवाटीस असावी, पाणी अर्जासोबत
मागील थकबाकी पूर्ण भरावी व रितसर पावती घ्यावी,पाणी अर्जासोबत 7/12 उतारा किंवा
खाते पुस्तिका सादर पावती करावी,पाणी मागणी अर्ज 20 आर च्या पटीत असावेत,तसेच
अर्जासोबत थकबाकी पाणीपटृी भरल्यानंतर पाणी अर्ज मंजूर करण्यात येईल, पाणी अर्ज
मंजूर झाल्यानंतर मंजूर पिकास पाणी घ्यावे व सोबत पास ठेवावा,आपआपल्या हद्दीतील
शेतचारी दूरुस्तीची जबाबदारी संबंधित बागायतदाराची राहील.शेतचारी नादुरुस्त
असल्यास मंजूरी दिली जाणार नाही व पाणी दिले जाणार नाही,मंजूरीपेक्षा जास्त
क्षेत्र सिंचित केल्यास हंगामी दराच्या सव्वापट दराने आकारणी केली जाईल, पाणी अर्ज
न देता पाणी घेतल्यास बिनअर्जी क्षेत्राचे पंचनामे करुन दंडनीय आकारणी केली जाईल,
पाट मोठा संबंध नसावा दोन्ही चारीत कमीत कमी 10 फूट अंतर ठेवावा, कालव्यावरील उपसा
सिंचन परवाना धारकांने त्याचे मंजूर क्षेत्रास ठरवून दिलेल्या तारखेस पाणी घ्यावे
कालव्याच्या पुच्छ ते शिर्ष याप्रमाणे सिंचन नियोजन असल्यास मंजूर कालावधी सोडून
मोटारी चालू ठेवल्यास सिंचन अधिनियम 1976 चे कलम 77 नुसार विद्युत पुरवठा खंडीत
करणे,मोटारी जप्त करणे,पाणीपरवाना रदृ करणे, व बिगर पाळी पंचनामा करणे अनिवार्य
ठरले याची नोंद घ्यावी, शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या प्रचलित पाणीपटृीच्या
दराने आकारणी करण्यात येईल,त्यावर 20 टक्के स्थानिक कर आकारला जाईल,नियोजित
कोटपेक्षा जास्त पाणी सिंचनासाठी वापरता येणार नाही,उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर
करावा,असे लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी कळविले आहे.


