प्रधानमंत्री फसल वीमा योजनेंतर्गत पुर्नरचित
हवामानावर आधारित
फळपिक विमा योजनासाठी प्रस्ताव सादर करावेत
-जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे
उस्मानाबाद,दि.4:-प्रधानमंत्री
फसल वीमा योजनेंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जिल्हयासाठी
आंबिया बहाराकरिता द्राक्ष, केळली,आंबा,डाळिंब,मोसंबी व पेरू या पिकासाठी लागू
केलेली आहे.या योजनेंतर्गत सन 2016-17 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना
द्राक्ष, डाडिंब, मोसंबी, पेरू व केळी या पिकासाठी विमा प्रस्ताव बॅकेत दाखल
करण्याची अंतिम दिनांक 10 नाव्हेंबर 2016 तर आंबा या पिकासाठी विमा प्रस्ताव दाखल
करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे.
शेतकऱ्यांनी
हवामान धोक्यापासून संरक्षणाकरिता प्रति हेक्टर द्राक्ष पिकासाठी रूपये 12 हजार
150, केळी पिकासाठी रूपये 5 हजार 750,डाळिंब या पिकासाठी रूपये 5 हजार 500 ,मोसंबी
या पिकासाठी रूपये 3 हजार 500, पेरू या पिकासाठी रूपये 2 हजार 500, तर आंबा या
पिकासाठी रूपये 5 हजार 500 इतका विमा हप्ता बॅकेत हप्ता भरून पिक संरक्षित करावे, तर
गारपिटपासून संरक्षण करण्याकरिता प्रति हेक्टरी द्राक्ष पिकासाठी रुपये 4 हजार 667
,केळी पिकासाठी रुपये 1 हजार 898 , डाळींब यापिकासाठी रूपये 1 हजार 815 ,मोसंबी या
पिकासाठी रूपये 1 हजार 115, पेरू या पिकासाठी रूपये 825,तर आंबा या पिकासाठी 1
हजार 815 इतका विमा हप्ता बॅकेत भरून पिक संरक्षित करावे, या योजनेंतर्गत फळपिकांना
कमी जास्त पाऊस, पावसाचा खंड, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आद्रर्ता या हवामान
धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे.
प्रधामंत्री फसल बीमा योजनेंतर्गत
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2016-17 साठी आंबिया बहाराकरिता
फळपिकनिहाय अधिसुचित तालुके व महसूल मंडळे पुढीलप्रमाणे- फळपिकाचे नाव
द्राक्ष,केळी,आंबा,व डाळिंब अधिसूचित तालुके उस्मानाबाद जिल्हयातील सर्व तालुके व
सर्व महसूल मंडळे.मोसंबी उस्मानाबाद-उस्मानाबाद (ग्रा), जागजी, तुळजापूर –सर्व
महसूल मंडळे,भूम-वालवड,माणकेश्वर,अंभी व ईट, परंडा-सर्व महसूल मंडळे, लोहार, पेरू-
उस्मानाबाद-सर्व महसूल मंडळे, तुळजापूर सर्व महसूल मंडळे, भूम-भूम, वालवड, अंभी व
ईट, परंडा, उमरगा, वाशी, लोहारा- सर्व महसूल मंडळे.
वरिलप्रमाणे नमूद केलेल्या पिकासमोरील
महसूल मंडळातील शेतकऱ्यांनाच या योजनेत सहभाग घेता येईल तसेच सर्व मंडळातील
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, तसेच शेतकऱ्यांनी अधिक
माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी
अधीक्षक श्री. शिरीष जमदाडे यांनी केले आहे.