Friday, 26 August 2016
महा-अवयवदान अभियान यशस्वी करावे
उस्मानाबद,दि.25:-आरोग्य विभागाच्या वतीने 30 ऑगस्ट ते 1
सप्टेंबर या कालावधीत महा-अवयवदान अभियान आयोजित करण्यात आले आहे. याअतंर्गत
अवयवदानाविषयी जाणीव जागृती करण्यात येणार असून या कालावधीत मानवी अवयवदान व
प्रत्यारोपण विषयाबाबत व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी
महाविद्यालयीन युवक, वैद्यकिय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध संस्था, संघटना तसेच
नागरिक यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे.
अत्याधुनिक
तंत्रज्ञाच्या आधारे मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध आजारांवर उपचार होत आहे.
अवयवदानांतर्गत लाईव्ह ऑरगन डोनेशनद्वारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते.
तसेच कॅडेव्हर/ मस्तिष्क स्तंभ मृत प्रश्चात
किडनी, लिव्हर, लंग्ज, हार्ट, त्वचा इत्यादी अवयव दान करण्यात येतात. महा-अवयवदान
अभियानातंर्गत जनतेचे अवयवदानाबाबत प्रबोधन करून जास्तीत जास्त दात्यांना संपर्क
करून समाजात याबाबत जागृती निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. वैद्यकीय
शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या
मोहिमेद्वारे राज्यभरातून जास्तीत जास्त अवयवदानाच्या नोंदणीचे उद्दीष्टे साध्य
करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासोबत समाजाच्या विविध स्तरामध्ये अवयवदानाचे
महत्त्व रूजविण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये जनजागरण फेरी विविध स्पर्धाचे
आयोजन करण्यात येणार आहे.अवयवदानाचे प्रमाण वाढावे यासाठी रूग्ण कल्याण समित्यांमार्फत,
तसेच ग्रामीण भागात पोहचून आणि कौटुंबिक सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
या
अभियानात ऑनलाईन पध्दतीने संमतीपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने www.dmer.org यासंकेतस्थळावर OrganDonation
Campiagn 2016 या ठिाकाणी क्लिक केल्यास संमतीपत्राबाबतचे पृष्ठ उघडते. त्या
ठिकाणी सुलभपणे संमतीपत्र भरता येते. याठिाकाणी मराठी व इंग्रजीमधूनही संमतीपत्र
भरता येते.
Monday, 22 August 2016
कृषी विज्ञान केंद्रातील शेतकरी प्रशिक्षणवर्ग झाला राज्यातील पहिला लोकराज्य शेतकरी प्रशिक्षण वर्ग
उस्मानाबाद,दि.22:- राज्यातील या वर्षातील
पहिला लोकराज्य शेतकरी प्रशिक्षण वर्ग बनण्याचा मान उस्मानाबादमधील कृषी विज्ञान केंद्र,
तुळजापूर या संस्थेत बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतक-यांसाठी आयोजित जगप्रसिध्द कडकनाथ
कोंबडीपालन प्रशिक्षण वर्गाने पटकाविला आहे. या प्रशिक्षण वर्गामधील एकूण 34 प्रशिक्षणार्थ्यांनी तसेच कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर या संस्थेचे प्राचार्य ,सर्व प्राध्यापक
शास्त्रज्ञ, कर्मचाऱ्यांनी “लोकराज्य” चे वार्षिक सभासदत्व स्वीकारले
आहे.
जिल्हा माहिती अधिकारी
मनोज शिवाजी सानप हे या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून या संस्थेत उपस्थित
होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना इतर मार्गदर्शनासोबतच
माहिती व जनसंपर्क
विभागाचे उपक्रम, “लोकराज्य”
मासिक, “महान्यूज” वेबपोर्टल यांचे महत्व आणि उपयोगिता समजावून सांगितली
तसेच संपूर्ण प्रशिक्षण वर्गाने व कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचा-यांनी “लोकराज्य” चे सभासदत्व
स्वीकारावे असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला कृषी
विज्ञान केंद्र व
शेतकरी प्रशिक्षणार्थ्यांनी तात्काळ सकारात्मक
प्रतिसाद देवून “लोकराज्य” चे सभासदत्व स्वीकारले.
यातील
काही शेतकरी प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आम्ही जिल्हा
माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग आमच्या गावात शासकीय योजनांच्या प्रचार
व प्रसिध्दीसाठी करूच व त्या माध्यमातून गावाचा विकासही साध्य करू. यावेळी जगप्रसिध्द
कडकनाथ कोंबडीपालन या व्यवसायातून मिळालेल्या यशाची कहानी एक दिवस “लोकराज्य” मासिकात
प्रकाशित होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आत्मा चे प्रकल्प संचालक विजय
लोखंडे, उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे प्रमुख संजय बरीदे ,वरिष्ठ
शास्त्रज्ञ तथा कृषी विज्ञान केंद्र,तुळजापूरचे प्रमुख प्रा.डॉ.सचिन
सुर्यवंशी, डॉ.अनिता जिंतूरकर, शास्त्रज्ञ
(पशुविज्ञान) हे उपस्थित
होते.
Subscribe to:
Posts (Atom)