Saturday, 7 January 2017

प्राथमिक जेष्ठता सूची जाहीर


उस्मानाबाद,दि.7:- महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठ विनियमन ) नियमावली 1982  अन्वये मंडळ अधिकारी संवर्गातील दि.1 जानेवारी 1982 ते 30 डिसेंबर 2015 या कालावधीची जेष्ठता सूचीसाठी उस्मानाबाद जिल्हयातील या कालावधीची प्राथमिक जेष्ठता सूची www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावर  प्रसिध्द  करण्यात  आलेली  आहे.
तरी मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नती झालेले/निलंबित/सेवानिवृत्त कर्मचारी  तसेच  मयत  कर्मचारी यांचे  वारस  यांनी या प्राथमिक  जेष्ठता  सूचीबाबत आक्षेप असतील  तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.23 जानेवारी 2017 पूर्वी आक्षेप सादर करावेत,असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनरे यांनी कळविले आहे.

                                         ***

पत्रकार दिनानिमित्त दि.10 जानेवारीला “बळीराजा चेतना अभियानांतर्गत” शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा पत्नींना शासकीय योजनांची माहिती


उस्मानाबाद, दि.7:-पत्रकार दिनानिमित्त जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील  विधवा पत्नीना शासकीय  योजनांची  माहिती व्हावी या हेतूने या महिलांचा जिल्हयातील प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांसोबत सुसंवाद आणि या सुसंवादानंतर उपस्थित सर्वांची आरोग्य तपासणी हे उपक्रम राबविले जाणार आहेत.
तरी  जिल्ह्यातील  शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील  विधवा पत्नीनी या कार्यक्रमासाठी  मंगळवार  , दिनांक 10 जानेवारी 2017 रोजी  सकाळी 11.00 वाजता  जिल्हा नियोजन सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय  इमारत , उस्मानाबाद  येथे उपस्थित राहावे , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी  सानप यांनी केले आहे .

****

पत्रकार दिनानिमित्त दि.10 जानेवारीला पत्रकारांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद, दि.7:- दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी रोवली.मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून  सर्वत्र साजरा केला जातो.
          यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील सर्व पत्रकारांकरिता जिल्हा नियोजन  सभागृह,  मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत येथे  दि.10 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमादरम्यान जिल्हयातील प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांचा व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा सुसंवाद,पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी हे उपक्रम राबविले जाणार आहे.
तरी जिल्हयातील  व तालुका स्तरावरील सर्व पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

                               *** 

Friday, 6 January 2017

उस्मानाबाद जिल्हयाची मागासलेपणाची व आत्महत्याग्रस्त ओळख पुसण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न–जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप


उस्मानाबाद,दि.6:- उस्मानाबाद जिल्हयाची मागासलेपणाची व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा अशी असलेली ओळख पुसून टाकण्यासाठी  प्रशासन प्रयत्न करत आहे, शासनाच्या सर्व योजना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जनसामान्यापर्यंत पोहचविण्यात येत आहेत याचा सर्वांना फायदा ही होत आहे, पत्रकारबांधव ही शासन व प्रशासनाचे लोकोपयोगी उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी चोखपणे बजावित आहेत, यापुढे ही बजावतील असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी केले.
            उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पणदिनाच्या कार्यक्रमात श्री.सानप बोलत होते. यावेळी प्रथम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. धनंजय रणदिवे, सचिव संतोष जाधव, प्रांत प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा, पत्रकार राजाभाऊ वैद्य, संतोष हंबिरे, उपेंद्र कटके, प्रशांत कावरे, मल्लिकार्जून सोनवणे, प्रवीण पवार, विजय मुंढे, सुभाष कदम, संतोष खुने, आकाश नरोटे आदीसह पत्रकार उपस्थित होते.
                यावेळी  श्री. सानप म्हणाले की, समाजाच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. पत्रकारांच्या सकारात्मक भूमिकेमुळे समाजामध्येही सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन समाज प्रगतीकडे झेपावत असतो. याचाच एक भाग म्हणून शासन व प्रशासनाकडून समाज उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात, या योजना समाजापर्यंत पोहचल्या तरच त्याचा समाज विकासासाठी योग्य उपयोग होणार आहे, यामुळे विविध वृत्तपत्र, साप्ताहिक, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीकोनातून वृत्तांकन करणे गरजेचे आहे. यामुळे शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांना मदत होईल व जिल्हयावर लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसून जाईल तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख यापुढे राहणार नाही, शेतकऱ्यांनाही पत्रकारांच्या सकारात्मक दृष्टीकोनाचा फायदा होईल यामुळे त्यांचे  पाऊल आत्महत्येकडे वळणार नाही.

                  यावेळी शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष जाधव यांनी केले. यावेळी मोठया संख्येने जिल्हयातील पत्रकार उपस्थित होते.*****

दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन


उस्मानाबाद,दि.6:- जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या  प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले व दर्पण दिन साजरा करण्यात आला.

           जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप व कृषी विभागाचे प्रशासन अधिकारी श्री.जी.टी.गोरे यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी कृषी विभागाचे तांत्रिक अधिकारी श्री.सांगविकर, जिल्हा माहिती कार्यालयाच्या श्रीमती आशा बंडगर, भिमा पडवळ, आश्रुबा सोनवणे, दिलीप वाठोरे, अनिल वाघमारे, शशिकांत पवार, चित्रा घोडके, विलास माळी, पत्रकार आकाश नरोटे, महेबूब फकीर  आदींची  याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. 

8 जानेवारीला आरोग्य विभागाची लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर,ऑनलाईन प्रवेशपत्र काढण्याचे उमेदवारांना आवाहन


उस्मानाबाद,दि.6:-उपसंचालक आरोग्य सेवा  लातूर मंडळ अंतर्गत लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्हयातील गट क संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक रिक्त पदे भरण्यासाठी लेखी परिक्षेचे आयोजन दिनांक 8 जानेवारी 2017 रोजी करण्यात आले आहे.
  परीक्षेचे वेळापत्रक आरोग्य विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in या तसेच महाऑनलाईनच्याhttp://maharecruitment.mahaonline.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र (HALL TICKET) http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवारांनी त्यांच्याकडील Login id Password यांचा वापर करुन  प्रवेश पत्रिका Download करावी व त्याची प्रिंट सोबत आणावी. प्रवेशपत्र  टपालाने  पाठविण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहितीसाठी मे. महाऑनलाईन लि. या संस्थेच्या सहायक केंद्रास 022-61316403 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. परिक्षा केंद्रावर यासंदर्भातील कोणतीही तक्रार ऍकूण घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे डॉ. व्ही.एम कुलकर्णी, उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मंडळ , लातूर यानी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
                        *****


“12 जानेवारी रोजी जिल्हयात युवक दिनानिमित्त होणार लोकराज्य युवा दौड” माहिती कार्यालय,शिक्षण विभाग,क्रीडा विभाग,आरोग्य विभाग आणि नेहरु युवा केंद्राचा संयुक्त उपक्रम


            
               उस्मानाबाद.दि.6:- 12 जानेवारी हा दिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा माहिती कार्यालय, शिक्षण, क्रीडा,आरोग्य, नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराज्य युवा दौडचे जिल्हयात सर्वत्र आयोजन करण्यात येणार आहे.
               लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र असून या मासिकाचा उपयोग ज्ञानाकरिता शेतकरी, नोकरदार वर्ग,विद्यार्थी अशा सर्वानाच होतो. याचा होणारा लाभ सर्वदूर तळागाळापर्यंतच्या जनतेला व्हावा म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या संबंधीच्या नियोजनाची बैठक नुकतीच जिल्हा क्रीडा  विभागाच्या  कार्यालयात  पार  पडली.
               यावेळी जिल्हा माहिती अधिकारी  श्री.मनोज शिवाजी सानप,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक, शिक्षणाधिकारी (प्राथ.)श्री. सचिन जगताप, नेहरु युवा केंद्राचे लेखाधिकारी श्री.विकास कुलकर्णी, तालुका क्रीडा संयोजक, क्रीडा शिक्षक, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक आदी उपस्थित होते. लोकराज्य दौड  या माध्यमातून सर्व जनतेला ,युवक युवतींना लोकराज्य मासिक, शिक्षणाचे, खेळाचे, आरोग्याचे महत्व , नेहरु युवा केंद्राचे महत्व याद्वारे युवा युवतींना मिळणारा लाभ या विषयांची जनजागृती केली जाणार आहे.
               अशा प्रकारची लोकराज्य युवा दौड ही निश्चितपणे राज्यात उस्मानाबाद जिल्हयाचे नावलौकिक वाढविणारी ठरेल असा आत्मविश्वास या बैठकीस उपस्थित असणाऱ्या सर्वानी व्यक्त केला व हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार केला.
                                             ****

प्राथमिक जेष्ठता सूची जाहीर


उस्मानाबाद,दि.6:- महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठ विनियमन ) नियमावली 1982  अन्वये अव्वल करकून संवर्गातील दि.1 जानेवारी 1982 ते 30 डिसेंबर 2015 या कालावधीची जेष्ठता सूचीसाठी उस्मानाबाद जिल्हयातील या कालावधीची प्राथमिक जेष्ठता सूची www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावर  प्रसिध्द  करण्यात  आलेली  आहे.

तरी अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नती झालेले/निलंबित/सेवानिवृत्त कर्मचारी  तसेच  मयत  कर्मचारी यांचे  वारस  यांनी या प्राथमिक  जेष्ठता  सुचीबाबत आक्षेप असतील  तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.20 जानेवारी 2017 पूर्वी आक्षेप सादर करावेत,असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनरे यांनी कळविले आहे. 

शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर


उस्मानाबाद,दि.6:-विधान  परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम  केंदीय  निवडणूक आयोगाने  जाहीर केला आहे.  या कार्यक्रमानुसार बुधवार दि. 4 जानेवारी, 2017 रोजीपासून  आचारसंहिता  लागू  करण्यात  आली आहे.

          मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने  जाहीर केला आहे. शिक्षक  मतदासंघासाठी  नव्याने  मतदारयाद्या तयार करण्याचे  आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. दि. 3 फेब्रुवारी 2017 ला मतदान  घेतले  जाणार असून दि. 6 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दि.10 जानेवारीपासून  उमेदवारी अर्ज  भरण्यास  प्रारंभ  होईल .दि. 17 जानेवारीला अर्ज  भरण्याचा शेवटचा  दिवस असेल. दि.18 जानेवारीला उमेदवारी अर्जाची  छाननी  करून, वैध उमेदवाराची  यादी प्रसिध्द  केली  जाईल. दि. 20 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. दि. 3 फेब्रुवारीला  सकाळी 8-00 ते  दुपारी 4-00  दरम्यान  मतदान घेतले जाणार आहे. दि. 6 फेब्रुवारीला  मतमोजणी  केली  जाणार  आहे,अशी माहिती उपजिल्हा निवडणूक  अधिकारी  उस्मानाबाद  यांनी  प्रसिध्दी  पत्रकान्वये  दिली आहे.

Thursday, 5 January 2017

6 जानेवारी पासून शाकंभरी नवरात्र महोत्सव


उस्मानाबाद दि.5 :- श्री .तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर तर्फे दि.6 जानेवारी  ते दि. 13 जानेवारी  2017 पर्यंत पुढीलप्रमाणे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
          शुक्रवार दि.6-जानेवारी  2017 रोजी घटस्थापना व नित्योपचार पूजा सोमवार  दि.9 जानेवारी 2017 सकाळी 7 वाजता जलयात्रा व रात्री छबीना.बुधवार दि.11 जानेवारी 2017 अग्निस्‍थापना,यज्ञास प्रारंभ व रात्री छबीना.गुरुवार दि. 12 जानेवारी 2017 पोर्णिमा,धुपारती,घटोस्थापन,पूर्णाहूती व रात्री छबीना.शुक्रवार दि. 13 जानेवारी 2017 अन्नदान महाप्रसाद व रात्री छबीना. 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतील विद्यार्थ्यांना एस. टी चा पास देणार - परिवहन मंत्री दिवाकर रावते


उस्मानाबाद. दि.5:- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेतील विद्यार्थ्यांना एस. टी चा पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.आहे राज्यातील युवक /युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना उद्योग. सेवा तसेच रोजगार /स्वयंरोजगाराच्‍या क्षेत्रात व्यापक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उदृदेशाने वरील दोन्ही योजना राज्यात राबविल्या जाणार आहेत.

     या योजनेंतर्गत व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ प्रवासखर्च अभावी कौशल्य प्रशिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येवू नये, या हेतूने त्यांच्‍या प्रवास खर्चात एसटी मार्फत सवलत देण्याचा प्रस्ताव एस.टी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महामंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या गावापासून प्रशिक्षण केंद्रापर्यंत  त्या गावापर्यंत ) जाण्यासाठी एस.टी पास देण्यात येईल, ही सवलत  एस.टी च्या इतर शै‍क्षणिक सवलतीप्रमाणेच असेल.

पत्रकार दिनानिमित्त दि.10 जानेवारीला पत्रकारांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद, दि.5:- दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी रोवली.मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून  सर्वत्र साजरा केला जातो.
          यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील सर्व पत्रकारांकरिता जिल्हा नियोजन  सभागृह,  मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत येथे  दि.10 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11-00 वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमादरम्यान जिल्हयातील प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांचा व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा सुसंवाद,पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील  विधवा पत्नींना शासकीय  योजनांची  माहिती देणे हे उपक्रम राबविले जाणार आहेत.

तरी जिल्हयातील सवर्‍ पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमास जरूर उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

पत्रकार दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शुभेच्छा !


उस्मानाबाद, दि.5:- दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी रोवली.मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून  सर्वत्र साजरा केला जातो. 

     या दिनानिमित्त  जिल्हयातील  सर्व  प्रसारमाध्यम  प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज  शिवाजी सानप आणि जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून प्रसारमाध्यम प्रतिनिधी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाकरिता मोलाचे योगदान देत असून यापुढेही  हे  योगदान असेच उत्तरोत्तर वाढत जावो अशा शब्दात शुभेच्छा सर्व पत्रकार बांधवांसाठी व्यक्त करण्यात आल्या आहेत.

बळीराजा चेतना अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे कार्यक्रम संपन्न



उस्मानाबाद,दि.5:- बळीराजा चेतना अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, कृषी विभाग व आत्मा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या  अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे दि.4 जानेवारी 2017 रोजी कार्यक्रम घेण्यात आला.
                 या कार्यक्रमात दोन महिला कृषी गटांना मिनी डाळ मिल, दहा गटांना स्पायरल सेपरेटर, दहा गटांना वॉटर व्हिल व पाच गटांना सोलर ड्रायरचे वाटप करण्यात आले.  यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिरीष जमदाडे,  आत्माचे प्रकल्प संचालक श्री. विजय हिरेमठ,सहयोगी प्राध्यापक, अंबाजोगाई,डॉ. विलास टाकणखार,प्रकल्प उपसंचालक, आत्मा श्री. सुभाष चोले, आदींची प्रमुख उपस्थितीत होती.
                सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शास्त्रज्ञ (गृहविज्ञान) प्रा. वर्षा मरवाळीकर, यांनी केले. सूत्रसंचलन शास्त्रज्ञ(मृदविज्ञान) डॉ. भगवान आरबाड,यांनी तरआभार प्रदर्शन शास्त्रज्ञ  (उद्यानविद्या) प्रा. गणेश मंडलिक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञ (पशु विज्ञान) डॉ. अनिता जिंतूरकर,व शास्त्रज्ञ (कृषीविद्या) प्रा. अपेक्षा कसबे यांनी परिश्रम घेतले. 

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक पुरस्काराचे वितरण





उस्मानाबाद,दि.5:- जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार 2016 हा पुरस्कर वितरणाचा कार्यक्रम दि.4 जानेवारी 2017 रोजी नगर परिषदेच्या नाटयगृहात संपन्न झाला. यावेळी जिल्हयातील तेरा शिक्षकांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
           जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड.कुलदीप (धीरज) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. देशमुख सुवर्णा ज्ञानदेव जि.प.प्रा.शाळा वाखरवाडी ता.उस्मानाबाद, सुरवसे शिवाजी राम मु.अ.जि.प.प्रा.शाळा निलेगाव ता.तुळजापूर, सोमवंशी गोविंद दत्तू जि.प.कें.प्रा.शाळा गुगळगाव ता.उमरगा, टेंगळे श्रीमंत शंकरराव जि.प.प्रा.शाळा जेवळी ता.लोहारा,चौरे व्यंकट श्रीरंग स.शि.जि.प.प्रा.शाळा नायगाव ता. कळंब, सातपुते जयचंद शिवाजी जि.प.प्रा.शाळा कवडेवाडी ता.वाशी, सपकाळ नारायण नानासाहेब जि.प.प्रा.शाळा वालवड ता.भूम, साळूंके नामदेव तुकाराम जि.प.प्राशाला  खंडेश्वरवाडी ता.परंडा,  जाधवर विठ्ठल नागनाथ, मा.शि. जि.प. प्रशाला नंदगाव ता.तुळजापूर, पाटील चंद्रशेख गिरीधर, मा.शि. जि.प. प्रशाला उमरगा ता. उमरगा, माशाळकर बसवराज महादेव  प्रा.प. जि.प.प्रशाला धानुरी ता.लोहारा, समाधान शिकेतोड प्रा.शि.जि.प.प्रशाला हाडोंग्री ता.भुम, (राज्य पुरस्कार प्राप्त), मदन इंगळे माध्यमिक शिक्षक ग्रामीण प्रशाला माडज ता. उमरगा (राज्य पुरस्कार प्राप्त) आदी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड.कुलदीप (धीरज) पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, समाजकल्याण सभापती हरीष डावरे, श्रीमती लता पवार आदी मान्यवरांच्या  हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
             पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी  सन 2015-16 मध्ये आपले वर्ग शंभर टक्के प्रगत केले आहेत. वर्गामध्ये वर्गअध्यापनात ई- लर्निंगचा प्रभावी वापर केला आहे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी घडविले आहेत.राज्यस्तरावर इंन्सपायर्ड अवार्ड सहभाग नोंदविले आहेत.शैक्षणिक साहित्य व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनात तालुका/ राज्य स्तरावर प्राविण्य, वृक्षरोपण  कार्यक्रमात सहभाग, तालुकास्तरावर शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत.
                    या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार, रामलिंग काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली आर.एस.लोमटे, यु.ए.सांगळे, एस.सी. घोलप, एस.व्ही. कुंभार, एस.बी.वाघमारे तसेच कार्यालयातील कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. 

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2016 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


मुंबई,  : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31 डिसेंबर, 2016 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2017 असा आहे.
            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  
पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे
अ.क्र
पुरस्काराचेनाव
पारितोषिक
1
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
2
अनंत गोपाळशेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
3
बाबूराव विष्णूपराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
4
मौलाना अबुलकलामआझादपुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
5
यशवंतराव चव्हाणपुरस्कार
शासकीयगट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
6
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्त कथा पुरस्कार(राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
7
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
8
केकीमूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.वज.) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
9
सोशल मीडिया पुरस्कार
(राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
10
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)




विभागीय पुरस्कार

11
दादासाहेबपोतनीसपुरस्कार,
नाशिकविभाग

51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र,याव्यतिरिक्तरुपये 10 हजारदै.गावकरीनेपुरस्कृतकेलेआहेत.)
12
अनंतरावभालेरावपुरस्कार,
औरंगाबादविभाग (लातूरसह)
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
13
आचार्यअत्रेपुरस्कार,
मुंबईविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
14

नानासाहेबपरूळेकरपुरस्कार,
पुणेविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
15
शि.म.परांजपेपुरस्कार,
कोकणविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
16
ग.गो.जाधवपुरस्कार,
कोल्हापूरविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
17
लोकनायकबापूजीअणेपुरस्कार,
अमरावतीविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
18
ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,
नागपूरविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
       
नियम व अटी
राज्य/विभागीय पुरस्कार
        पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षांचीकामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक प्रसिध्दीसाठी,  जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य / विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच सोशल मीडिया पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत.  पुरस्कारासाठी  निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यकआहे.
            पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिके सोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतींसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचारकेलाजाईल.
            पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक(माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिके सोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू  या चार ही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया तर्फे  परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल.  समिती ची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारा संबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
            ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे,  अशाच नियत कालिकांतील मजकूर प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
            जे पत्रकार बृहन्मुंबई, नवीमुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल.  मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
            गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्गआणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल.  दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.
            शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पाठवाव्या लागतील.
            2016 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात,   नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिके सोबत जोडणेआवश्यकआहे.
            प्रवेशिका राज्य स्तरासाठी किंवा विभागीय स्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे या बाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त,  खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल.  एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
            प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
सोशल मीडिया पुरस्कार
            ही स्पर्धा संकेतस्थळे व ब्लॉग व सोशल मिडीयातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त/पत्रकारिता विषयक मजकुरा साठी आहे. यास्पर्धे साठी संकेत स्थळे व ब्लॉग सोशल मीडियाचा वृत्त/पत्रकारिता विषयक प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. स्वतंत्र ब्लॉगद्वारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष झालेले असावे. त्याचप्रमाणे, वृत्त/पत्रकारिताविषयक संकेतस्थळ अधिकृत असावे व त्यावर सोशल मीडिया वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असाव्यात व त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असावी. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी सोशल मीडियाद्वारे करण्यात आलेल्या पत्रकारितेची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रित प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
            केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लिखाणातून लोकांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणाऱ्या पत्रकारांना तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील पत्रकारांना सहभागी होता येईल. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅसची तसेच वीजेची निर्मिती इत्यादी बाबत लिखाण केलेले असावे. शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक विविध योजनांची प्रसिध्दी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी  लिखाणाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन इत्यादींचा या पुरस्कार स्पर्धेत अंतर्भाव होईल. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
        इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी  वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था  प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,  हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्याची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती  करण्यात येईल. तसेच याशिवाय अन्य संबंधित अटी  या गटासाठीही लागू राहतील.     
                                छायाचित्रकार पुरस्कार
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्ण वेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे,  शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.
            महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटोप्रत नसावी. पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी,  शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिध्दीसाठी जनतेमधील जाणिव जागृती साठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.  एकाच छायाचित्र काराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.  पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिके सोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिध्द झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिके सोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
केकीमूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीयगट (मावज)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उपरोक्त सर्व स्पर्धा विषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावतीवसंचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचयकेंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरुचौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई -32 येथे उपलब्धआहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

०००