उस्मानाबाद,दि.5:-
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार 2016 हा पुरस्कर वितरणाचा कार्यक्रम
दि.4 जानेवारी 2017 रोजी नगर परिषदेच्या नाटयगृहात संपन्न झाला. यावेळी जिल्हयातील
तेरा शिक्षकांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जिल्हा
परिषदेचे अध्यक्ष ॲड.कुलदीप (धीरज) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरणाचा
कार्यक्रम संपन्न झाला. देशमुख सुवर्णा ज्ञानदेव जि.प.प्रा.शाळा वाखरवाडी
ता.उस्मानाबाद, सुरवसे शिवाजी राम मु.अ.जि.प.प्रा.शाळा निलेगाव ता.तुळजापूर,
सोमवंशी गोविंद दत्तू जि.प.कें.प्रा.शाळा गुगळगाव ता.उमरगा, टेंगळे श्रीमंत
शंकरराव जि.प.प्रा.शाळा जेवळी ता.लोहारा,चौरे व्यंकट श्रीरंग स.शि.जि.प.प्रा.शाळा
नायगाव ता. कळंब, सातपुते जयचंद शिवाजी जि.प.प्रा.शाळा कवडेवाडी ता.वाशी, सपकाळ
नारायण नानासाहेब जि.प.प्रा.शाळा वालवड ता.भूम, साळूंके नामदेव तुकाराम
जि.प.प्राशाला खंडेश्वरवाडी
ता.परंडा, जाधवर विठ्ठल नागनाथ, मा.शि.
जि.प. प्रशाला नंदगाव ता.तुळजापूर, पाटील चंद्रशेख गिरीधर, मा.शि. जि.प. प्रशाला उमरगा
ता. उमरगा, माशाळकर बसवराज महादेव प्रा.प.
जि.प.प्रशाला धानुरी ता.लोहारा, समाधान शिकेतोड प्रा.शि.जि.प.प्रशाला हाडोंग्री
ता.भुम, (राज्य पुरस्कार प्राप्त), मदन इंगळे माध्यमिक शिक्षक ग्रामीण प्रशाला
माडज ता. उमरगा (राज्य पुरस्कार प्राप्त) आदी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड.कुलदीप (धीरज)
पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,
समाजकल्याण सभापती हरीष डावरे, श्रीमती लता पवार आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी सन 2015-16 मध्ये आपले वर्ग शंभर टक्के प्रगत
केले आहेत. वर्गामध्ये वर्गअध्यापनात ई- लर्निंगचा प्रभावी वापर केला आहे.
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी घडविले आहेत.राज्यस्तरावर इंन्सपायर्ड अवार्ड सहभाग
नोंदविले आहेत.शैक्षणिक साहित्य व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनात तालुका/ राज्य
स्तरावर प्राविण्य, वृक्षरोपण कार्यक्रमात
सहभाग, तालुकास्तरावर शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप,
उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार, रामलिंग काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली
आर.एस.लोमटे, यु.ए.सांगळे, एस.सी. घोलप, एस.व्ही. कुंभार, एस.बी.वाघमारे तसेच
कार्यालयातील कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.