उस्मानाबाद , दि.3:- राष्ट्रीय
माध्यमिक शिक्षा अभियान व राज्य विज्ञान
व गणित शिक्षण संस्था , नागपूर आणि शिक्षण विभाग माध्यमिक
जिल्हा परिषद , उस्मानाबाद यांच्या
संयुक्त विद्यमाने वतीने कळंब
येथील विद्याभवन हायस्कूल येथे जिल्हास्तरीय
विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे आयोजन दिनांक 3, 4 व 5
जानेवारी 2017 दरम्यान करण्यात आले आहे .
या ग्रंथ महोत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीने
करण्यात आली . या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन
उप विभागीय अधिकारी श्री. अभयसिंह मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच आज
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे
पूजनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . ही ग्रंथ दिंडी जिल्हा कन्या प्रशाला येथून निघून विद्याभवन येथे आगमन झाले .
यावेळी
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. सुधाकर
गुंड गुरुजी, शिक्षणाधिकारी (माध्य) श्री. औदुंबर उकिरडे , उप शिक्षणाधिकारी श्री. जोशी , जिल्हा कन्या
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कदम , जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रतिनिधी
श्रीमती आशा बंडगर , विविध शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित
होते . *****


