Tuesday, 3 January 2017

काम वाटप समितीची बैठक 17 जानेवारी रोजी


उस्मानाबाद,दि.3:-जिल्हा परिषद बांधकाम विभाग/सिंचन विभागांतर्गत विविध विकास योजनेची रूपये 3 लाखाच्या आतील किंमतीची व जिल्हा परिषदेकडील नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या काम वाटप समितीची बैठक दि.17 जानेवारी 2017 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे दुपारी 1.00 वाजता आयोजित केली आहे.
            सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यासाठी 5 कामे व मजूर सहकारी संस्थांसाठी 7 कामे राखीव ठेवण्यात आली आहेत. तरी इच्छूक सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांनी काम करण्यास इच्छूक असल्याचे इच्छापत्र कार्यकारी अभियंता,  जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्याकडे दि.7 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत दुपारी 4.00 वाजेपर्यंत दाखल करावेत.
            प्राप्त झालेल्या इच्छापत्राची पडताळणी करून पात्र सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांची यादी बांधकाम विभागाच्या सूचना फलकावर दि. 9 जानेवारी 2017 रोजी प्रसिध्द करण्यात येईल व त्यांनाच दि. 10 जानेवारीच्या काम वाटप बैठकीत भाग घेता येईल.त्यासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत-

            सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्याकडे जिल्हा परिषदेकडील वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याची सत्यप्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पूर्वी त्यांनी 5 लाखापर्यंतची कामे केलेली नाहीत. अशाच सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांना काम वाटपात भाग घेता येईल .विद्युतीकरणाच्या कामासाठी जिल्हा परिषदेकडील विद्युतीकरणाचे पंचीकरण असलेले पात्र ठरतील.सुशिक्षित बेरेागार अभियंता /मजूरी सहकारी संस्था पात्र ठरतील. सुशिक्षित अभियंतासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या कामासाठी जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता अर्ज करू शकतील. सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांनी स्वत: बैठकीस उपस्थित राहावे.काम वाटप समीतीचा निर्णय अंतिम राहील,असे  कार्यकारी  अभियंता बांधकाम , जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. ****