उस्मानाबाद,दि.4:- येथील
तथागत बहुउद्देशिय, शैक्षणिक,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व अखिल भारतीय भ्रष्टाचार
निर्मूलन संघर्ष समिती, उस्मानाबाद यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. 12 ते 14 जानेवारी 2017 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे व सामाजिक
उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार दि.12 जानेवारी 2017
रोजी सकाळी 10.00 वाजता राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
प्रतिमेस अभिवादन व पुष्पहार अर्पण सोहळा,
शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी दुपारी 12.00 वाजता कुष्ठधाम येथे अन्नदान,
त्यानंतर दुपारी 4.00 वाजता जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात येणार
आहेत.
शनिवार दि.14 जानेवारी रोजी
दुपारी 4.00 वाजता गरजू व गरीब कुटुंबास गरम चादरींचे वाटप करण्यात येणार आहे, असे
आयोजक आखिल भारतीय भष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष तथा तथागत
बहुद्देशिय,शैक्षणिक,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सतीष लोंढे यांनी
प्रसिध्दी पत्रकद्वारे कळविले आहे. ****