उस्मानाबाद,दि.2:- महाराष्ट्र
राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यांकरीता
इच्छूक संस्थांकडून, व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याचा
कालावधी दि.16 जानेवारी 2017 पर्यंत नियमित शुल्कासह राहील व दि. 17 ते 31
जानेवारी 2017 पर्यंत विलंब शुल्कासह आहे.
अर्ज
व माहितीपुस्तिका www.msbve.gov.in या
मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी इच्छूक
संस्थांनी संकेत स्थळावरून सन 2017-18 साठी प्रसिध्द केलेल्या माहिती पुस्तिकेमधून
आवश्यक परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज व त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे , चलन इत्यादी
संबंधित जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याकडे वरील
कालावधीत जमा करावयाचे आहे.
अधिक
माहितीसाठी संबंधित जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याशी
संपर्क साधावा अथवा मंडळाच्या www.msbve.gov.in
या संकेतस्थळावरुन घ्यावी . असे जिल्हा
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी कळविले आहे.
******